© वर्षा पाचारणे
साऱ्यांची धमाल मस्ती करत जेवणं आटोपली. तितक्यात बाळाने डायपरमध्ये शी केल्याने स्वच्छता करणे गरजेचे होते.. मघाशी सतीश एन्जॉय करत असून मीराला एकटीला बाळाला सांभाळावे लागल्याने, तो राग तिने आत्ता मात्र बाहेर काढला..
"अगं, मिरा पिल्लूने शी केली आहे, त्याचा डायपर बदल.. म्हणजे मग घरी पोहोचेपर्यंत काळजी नको" असं म्हणत सतीश पुन्हा मित्रांच्या घोळक्यात वळणार तितक्यात मीरा कडाडली.
"मघाशी मी बसले ना पिल्लुला घेऊन, मग आता तू बदलशिल त्याची पँट". असं म्हणत मिरा बाळाला सतीशकडे सोपवून रागात निघून गेली आणि मित्र मैत्रिणंबरोबर डान्स करण्यात मग्न झाली.
मग हे महाशय कसेबसे अचानक आलेली स्वच्छता मोहीम आटोपून येईपर्यंत साधारण अर्धा तास उलटला.. पिकनिक आटोपती घेत सारेजण घरी परतले.
"बघा ना, तुमची मुलगी कशी स्वत:च्या हाताने भाजी पोळी खाते..आमचा यथार्थ खातंच नाही काही.... मोबाइल दिला हातात, तर कुठे थोडासा वरण भात पोटात जातो त्याच्या"...
"आमच्या यथार्थला अजूनही टॉयलेटमध्ये जावून शी शू करायला कळत नाही... डायपर नसेल तर घरात कुठेही याचा प्रकार सुरू"... असे म्हणत आपण किती गोष्टी मुलाला शिकवू पाहतोय, पण तो ऐकत नाही या नावावर पचवायचा हा भाबडा प्रयत्न.
असेच दिवस सरत होते. मग आता अडीच वर्ष वय म्हटल्यावर शाळेत घालण्याची घाई झाल्याने शहरातील सर्वात चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं गेलं.
अशीच पुढे वर्षामागून वर्ष जात राहणार होती. पण मुलगा चुकतोय की पालक स्वतः चुकतात? हे कोण ठरवणार.
आजकाल मुल जन्मालाही आलेलं नसतं, तर त्याच्या करिअरच्या गप्पा मारल्या जातात. त्याच्या भविष्यासाठी पैश्यापाण्याची तरतूद करणं, एवढेच नव्हे तर त्याने कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये अव्वल व्हायचं तेही ठरवलं जातं.
बरं गाडी एवढ्यावरच थांबत नाही.. त्याच्या उत्तम संगोपनासाठी आवश्यक वाटत असलेल्या, जितक्या जमतील तितक्या पुस्तकांचं पारायण केलं जातं. परंतु या सगळ्यात अति काळजीपोटी किंवा आपण योग्य पालक आहोत हे दाखवण्याच्या अट्टाहासापायी कधीकधी हेच आधुनिक पालकत्व कसं गंडलं जातं, याची ही कथा..
मिरा आणि सतीश एक उच्चशिक्षित जोडपं. लग्नानंतर लगेच बाळाचा विचार करायचा नाही असं ठरवून त्यांनी लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतर अपत्य प्राप्तीचा विचार केला.
मिरा आणि सतीश एक उच्चशिक्षित जोडपं. लग्नानंतर लगेच बाळाचा विचार करायचा नाही असं ठरवून त्यांनी लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतर अपत्य प्राप्तीचा विचार केला.
लवकरच गोड बातमी समजली. मीराला तिसरा महिना लागला आणि डॉक्टरांनी तिला गोळ्यांचा भरमसाठ कोर्स दिला. तिच्या सततच्या तक्रारी ऐकून डॉक्टरांनी तिला बेड रेस्टचा सल्लाही दिला.
खरं पहाता तिची प्रकृती उत्तम होती, परंतु सतत धास्तावलेपणा, सारं काही नीट होईल की नाही या विचाराने ती गोष्टींचा बाऊ करत होती.
बरं मीरा आणि सतीश दोघीही एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला असल्याने त्यांच्या कामाच्या वेळा फार वेगळ्या होत्या. त्यामुळे दोघांच्याही आई-बाबांनी त्यांच्या सोबत रहायचे म्हटले तरी दिवसभर त्या हाय प्रोफाईल सोसायटीत दरवाजे बंद करून या वयस्कर मंडळींना करमणे शक्यच नव्हते.. त्यामुळे या राजा-राणीचा संसार अगदी मनमानीपणाने चालू होता..
तिच्या या अवस्थेत घरून काम करण्याची सुविधा असल्याने मीराला नोकरीवर जाण्याचा काही त्रास नव्हता. त्यामुळे ऑफिसचे काम संपल्यानंतर निवांतपणे पडून रहाणे, जेवण बनवायचा कंटाळा आला की काहीतरी अरबट चरबट खाणे, दुपारी झोपल्याने रात्री जागरण करणे अशी तिची दिनचर्या होती.

नवव्या महिन्यात ती माहेरी गेली.. दिलेल्या तारखेला नॉर्मल डिलिव्हरी झाली.. मिराने मुलाला जन्म दिला.
बाळ झाल्यावर दोन महिन्यानंतर मिरा स्वतःच्या घरी आली.. सतीशने बाळाचे स्वागत करण्यासाठी घर अगदी सुंदर सजवलं होतं. अगदी इव्हेंट ऑर्गनायझर कडून सगळी जय्यत तयारी करून घेतली होती.
बाळ झाल्यावर दोन महिन्यानंतर मिरा स्वतःच्या घरी आली.. सतीशने बाळाचे स्वागत करण्यासाठी घर अगदी सुंदर सजवलं होतं. अगदी इव्हेंट ऑर्गनायझर कडून सगळी जय्यत तयारी करून घेतली होती.
बाळाची वेलकम सेरेमनी खूप जल्लोषात साजरी झाली. मीराच्या सासुबाई तिच्या मदतीसाठी महिनाभर राहणार होत्या.
पण मीरा आणि सतीशचं उशिरा उठणं, घरात अगदी कामांची टाळाटाळ करणं याला वैतागून सासुबाईही कसाबसा महिना काढत गावी निघून गेल्या. कारण या दोघांनाही काही समजावून सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी हे त्यांनी आधीच हेरलं होतं..
आता कोणीच मदतीला नसताना या आई-बाबांची खरी पालकत्वाची सुरुवात झाली होती.
आता कोणीच मदतीला नसताना या आई-बाबांची खरी पालकत्वाची सुरुवात झाली होती.
बाळ रडायला लागलं, की त्याने रडून घर डोक्यावर घेण्यापेक्षा यांची त्याला शांत करताना उडणारी तारांबळ इतकी असे की ते लेकरू वैतागून रडून तासाभराने शांत व्हायचं.
रोज शी शूच्या कपड्यांचा ढीग कोण धुवत बसणार, म्हणून दर महिन्याला डायपरचे पॅकेट्स न चुकता घरी येऊ लागले.
त्यामुळे बाळाच्या नाजूक त्वचेला कधी पुरळ, कधी रॅशेश येऊ लागले.. पण यांनी त्यांचे डायपर सत्र सुरू ठेवले..
हाssss, फार तर काय, डॉक्टरांकडून बाळासाठी स्किन cream आणत राहिले, परंतु डायपर वापरणं तात्पुरते सुद्धा बंद केले नाहीत.
नव्याने आई बाबा झालेलं हे जोडपं तीन चार महिन्यांतच अगदी पालकत्वाच्या ओझ्याने वाकलं गेलं.
नव्याने आई बाबा झालेलं हे जोडपं तीन चार महिन्यांतच अगदी पालकत्वाच्या ओझ्याने वाकलं गेलं.
मग मरगळ झटकण्यासाठी आता वीकेंडला मित्र मंडळींसोबत कुठेतरी भटकंती प्लॅन करायचा ठरला.
आता बाळामुळे कुठेतरी तास दीड तासाच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी जाऊ, असा विचार करुन मग जोडपं निघालं.
गाडीत गप्पांना उधाण आलेलं असताना लेकरू रडू लागला.. गाडीतले सो कॉल्ड मावशी, काका आपापल्या परीने त्या बाळाला शांत करायच्या प्रयत्नात.
शेवटी त्याला भूक लागली असेल, असा निष्कर्ष काढत मग दूध पाजण्यास मिराने गाडीतील कोपऱ्याची सीट पकडली.. लेकरू क्षणात शांत झालं.. मग पुन्हा मित्र मंडळी गप्पात रंगली.
सतीश पुन्हा मित्रांच्या घोळक्यात शिरताच मिराच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेली.
साऱ्यांची धमाल मस्ती करत जेवणं आटोपली. तितक्यात बाळाने डायपरमध्ये शी केल्याने स्वच्छता करणे गरजेचे होते.. मघाशी सतीश एन्जॉय करत असून मीराला एकटीला बाळाला सांभाळावे लागल्याने, तो राग तिने आत्ता मात्र बाहेर काढला..
"अगं, मिरा पिल्लूने शी केली आहे, त्याचा डायपर बदल.. म्हणजे मग घरी पोहोचेपर्यंत काळजी नको" असं म्हणत सतीश पुन्हा मित्रांच्या घोळक्यात वळणार तितक्यात मीरा कडाडली.
"मघाशी मी बसले ना पिल्लुला घेऊन, मग आता तू बदलशिल त्याची पँट". असं म्हणत मिरा बाळाला सतीशकडे सोपवून रागात निघून गेली आणि मित्र मैत्रिणंबरोबर डान्स करण्यात मग्न झाली.
मग हे महाशय कसेबसे अचानक आलेली स्वच्छता मोहीम आटोपून येईपर्यंत साधारण अर्धा तास उलटला.. पिकनिक आटोपती घेत सारेजण घरी परतले.
दिवसभराच्या भटकंतीनंतर थकवा आल्याने आल्या आल्या दोघेही झोपून गेले. पण रात्री मात्र बाळाला ताप आल्याने त्यांच्या पिल्लुला काही झोप नव्हती. त्यामुळे आजही जागरण ठरलेलं होतं... आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन पुन्हा पुढचे तीन चार दिवस याच पद्धतीने जाणार, हे चित्र दोघांच्याही डोळ्यासमोर येताच अंगातलं उरलं सुरलेलं अवसानही गळून पडलं..
बाळ कधी एकदा पेज, खीर खायला लागेल असं मीराला झालं होतं.. किमान त्यामुळे तरी एकदा बाळाचे पोट भरले असेल, की आपणही निवांत होऊ असे तिला वाटायचे.
बाळ कधी एकदा पेज, खीर खायला लागेल असं मीराला झालं होतं.. किमान त्यामुळे तरी एकदा बाळाचे पोट भरले असेल, की आपणही निवांत होऊ असे तिला वाटायचे.
थोरामोठ्यांनी आता बाळाला वरच अन्न सुरू करायला हरकत नाही, असे सांगताच मग आपल्या मिरा सतीशने आई सांगेल त्याप्रमाणे थोडी पेज वगैरे देऊन पाहिली.
त्या लेकराने मटामटा ती खाऊची वाटी संपवावी, अशी अपेक्षा करणारे हे नवखे आई बाबा पहिल्या दोन तीन दिवसांतच 'ये बहोत मुश्किल टास्क है', या निष्कर्षावर पोहोचले.
मग रोज ती पेज, नाचणी सत्त्व वगैरे देऊन पाहिल्यानंतर काही मॉडर्न चविचे देऊन पाहू म्हणून मार्केटमध्ये बाळांच्या आहाराची पुरेपूर काळजी घेतल्याचे चित्र दाखवणाऱ्या पावडरीच्या पाकीटाकडे मोर्चा वळला.
मग रोज ती पेज, नाचणी सत्त्व वगैरे देऊन पाहिल्यानंतर काही मॉडर्न चविचे देऊन पाहू म्हणून मार्केटमध्ये बाळांच्या आहाराची पुरेपूर काळजी घेतल्याचे चित्र दाखवणाऱ्या पावडरीच्या पाकीटाकडे मोर्चा वळला.
दिवस रात्र लेकरू भुकेलेलं वाटलं, की वाटीभर पावडरीची पेज झटकन बनवून तयार... थोडे दिवसांनी पावडर पेजची जागा मिक्सरमधून बारीक केलेल्या वरण भाताने घेतली....
मग अडीच तीन वर्षाचा होऊनही मिरा सतीशचा मुलगा यथार्थ ते वरण भाताचे मिक्सर मध्ये बारीक केलेल मिश्रण चमच्याने खायचा.. तेही स्वतःच्या हाताने नाही.
मग अडीच तीन वर्षाचा होऊनही मिरा सतीशचा मुलगा यथार्थ ते वरण भाताचे मिक्सर मध्ये बारीक केलेल मिश्रण चमच्याने खायचा.. तेही स्वतःच्या हाताने नाही.
त्याला खायला द्यायचे म्हणजे एकीकडे मोबाईल वर कार्टून सुरू आणि मग कुठे एक एक चमचा घशात जात असे... अजूनही कमरेला डाईपर पँट साथ देत होत्याच.
बाहेर कुणाकडेही हे जोडपं गेलं की मुलाच्या तक्रारींचा पाढा वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.
बाहेर कुणाकडेही हे जोडपं गेलं की मुलाच्या तक्रारींचा पाढा वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.
"बघा ना, तुमची मुलगी कशी स्वत:च्या हाताने भाजी पोळी खाते..आमचा यथार्थ खातंच नाही काही.... मोबाइल दिला हातात, तर कुठे थोडासा वरण भात पोटात जातो त्याच्या"...
"आमच्या यथार्थला अजूनही टॉयलेटमध्ये जावून शी शू करायला कळत नाही... डायपर नसेल तर घरात कुठेही याचा प्रकार सुरू"... असे म्हणत आपण किती गोष्टी मुलाला शिकवू पाहतोय, पण तो ऐकत नाही या नावावर पचवायचा हा भाबडा प्रयत्न.
असेच दिवस सरत होते. मग आता अडीच वर्ष वय म्हटल्यावर शाळेत घालण्याची घाई झाल्याने शहरातील सर्वात चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं गेलं.
युनिफॉर्म, बॅग, टिफीन, वॉटर बॉटल, सारी जय्यत तयारी झाली... दुसऱ्या दिवशी सकाळ पासून यथार्थ शाळेत जाऊ लागला आणि मीरा व सतीशला थोडं हायसं वाटलं.
शाळेत जाऊ लागलेला यथार्थ मात्र उपाशी पोटी घरी येत होता. कारण तिथे कुणी हाताने खाऊ घालणारे नव्हते.
मग यावर तोडगा म्हणून आई बाबा रोज चिप्स, कपकेक्स, असा खाऊ डब्यात देऊ लागले... आता खाऊ मिळाला म्हणुन मुल खुश आणि मुलाने टिफीन संपवला म्हणून आई बाबा खुश.... त्यांच्या मते प्रॉब्लेम सॉल्व्ह्ड..
झालं पण रोज तळलेले, मैद्याचे, आणि अती गोड पदार्थ खाऊन मुलगा दिसताना गुबगुबीत, गोंडस दिसला तरी पोषणमूल्य मिळत नसल्याने सतत आजारी पडण्याच्या समस्या वाढल्या.
बरं डॉक्टरांनी बाहेरच काही खाल्लं का विचारताच यांनी पुन्हा तक्रारीचा पाढा वाचला... "बाहेरचे पदार्थ अगदी स्वत:च्या हाताने खातो, पण भाजी पोळीला हातही लावत नाही", वगैरे वगैरे..
यावर डॉक्टर पुन्हा औषधांचा कोर्स देऊन बाहेरचे पदार्थ टाळण्याचा सल्ला द्यायचे... पण पुन्हा यांचं घोडं आहे तिथेच उभं अश्यातली गत.
मुलाने औषध प्यावं म्हणून आई बाबा त्याला मोठ्या चॉकलेटचे आमिष दाखवून एका हातात चॉकलेट अन् एका हातात औषध घेऊन तयार.
असं करता करता मुलगा सात आठ वर्षाचा झाला.. पण अजूनही त्याला ताटातील एक पोळी संपवण्यासाठी किमान एक तास लागत होता.

पण 'शिकेल हळूहळू', या तत्त्वावर आई-बाबा देखील कुठल्याही प्रकारचं वळण लावण्याचा प्रयत्न म्हणून करत नव्हते.
आपल्या मुलाने सगळ्या गोष्टीत पारंगत असावं, म्हणून मग जमेल तितके क्लास लावून त्या लेकराचा बालपणातील आनंदच जणू हिरावून घ्यायचा असंच या दोघांनी ठरवलं की काय हा प्रश्न पडायचा.
अर्धा तास म्हणून यथार्थ निवांत असेल तर शपथ.. सकाळी उठून आधी क्रिकेटचा क्लास, मग शाळा, दुपारी घरी आल्यावर अर्ध्या तासाने लगेच अॅबॅकसचा क्लास, मग कराटे क्लास संध्याकाळी सहा वाजता संगीताचा क्लास आणि त्यानंतर स्केटिंग क्लास..
या सगळ्या क्लासच्या ओझ्याने मुलगा अक्षरशः थकून जायचा. बळजबरी लावलेल्या क्लासेसमुळे कुठल्याच क्लासमध्ये त्याचं लक्ष नसायचं.
'सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत', या विनाकारण असलेल्या आईबाबांच्या अट्टाहासामुळे त्याचे अभ्यासातही दुर्लक्ष होत होते.. पण मग पुन्हा 'इतके सगळे क्लास लावून, त्याला कुठलीच गोष्ट जमत नाही, त्याला कसली आवडच नाही', असं म्हणत या जोडप्याच्या तक्रारींचा पाढा सुरूच.
अशीच पुढे वर्षामागून वर्ष जात राहणार होती. पण मुलगा चुकतोय की पालक स्वतः चुकतात? हे कोण ठरवणार.
'आम्ही जे काही करतोय, ते तुझ्याच सुखासाठी', असं म्हणत असताना जर लहानपणीच त्याला निरागस आयुष्य जगू दिलं नाही तर नक्की कुठल्या प्रकारचे सुख तुम्ही त्याला देऊ पाहत आहात?', याचा पालकांनी विचार करायला हवा.
आपल्या मुलांनी अव्वल असावं असे निश्चितच प्रत्येक पालकांची अपेक्षा असणार आणि ती रास्तही आहे, परंतु खरंच आपण जगलेलं बालपण आणि आपल्या मुलांचे बालपण यात आलेली तफावत पाहता कुठलं बालपण सरस ठरते हे प्रत्येकाने पडताळून पहावे..
'आम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या आम्ही तुम्हाला आणून देतो', हे जेव्हा पालक बोलून दाखवतात तेव्हा त्या वाक्यात फक्त देवाण-घेवाण उरलेली असते. '
'आम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या आम्ही तुम्हाला आणून देतो', हे जेव्हा पालक बोलून दाखवतात तेव्हा त्या वाक्यात फक्त देवाण-घेवाण उरलेली असते. '
आम्ही तुला हे दिलं, म्हणजे आता तू आमच्या अपेक्षेप्रमाणेच वागलं पाहिजे', असं अव्यक्त बंधन घातलं जात.. खरंच हे योग्य आहे का?.. मुलं म्हणजे चावीवर चालणारी खेळणी नाहीत.
बालपण हे आयुष्यातलं सगळ्यात मोठ्ठं सुख असतं.. आयुष्यातली चढाओढ, स्पर्धा यापासून लांब असलेलं ते एक निरागस विश्व असतं. पण तेच विश्व जर त्यांच्याकडून हिरावून घेतलं, तर ती मुलं सुकलेल्या फुलांप्रमाणे निस्तेज वाटू लागतात.
मूल जन्माला आल्यावर ते मातीच्या गोळ्याप्रमाणे असतं. आपण ज्याप्रमाणे त्याची जडणघडण करणार, त्याचप्रमाणे ते घडणार असतं.
मूल जन्माला आल्यावर ते मातीच्या गोळ्याप्रमाणे असतं. आपण ज्याप्रमाणे त्याची जडणघडण करणार, त्याचप्रमाणे ते घडणार असतं.
त्यामुळेच अति लाडाने, अति क्रोधाने, किंवा अशा स्वतःच भांबावलेल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली खरंच ते मुल योग्य पद्धतीने घडेल का?...
जंक फूड वाईट असं म्हणणारे पालक रोज स्वतः मुलांच्या हातात चिप्सचे पॅकेट देतात.. सुरुवातीला गमतीने दिलेले चिप्स मग हट्ट कधी बनतात कळतही नाही. तिच तऱ्हा गोड पदार्थ, चॉकलेट, केक वगैरेची... बरं ते पदार्थ खाऊन झाल्यावर मुल लगेच स्वच्छ चुळ भरत नाही.
त्यामुळे दाताच्या अनेक तक्रारी उद्भवतात... त्यामुळे पुन्हा खाण्याची नाटकं सुरू... ही चुकीच्या सवयींची साखळी दिवसागणिक वाढतच जाते... आणि सगळा दोष मात्र मुलांच्या माथी मारला जातो..
प्रत्येक पालकाने केवळ एकदा स्वत:चं बालपण आठवून बघावं, की आपले आई वडील सतत खाऊची वाटी घेऊन आपल्या मागे फिरायचे का?...
प्रत्येक पालकाने केवळ एकदा स्वत:चं बालपण आठवून बघावं, की आपले आई वडील सतत खाऊची वाटी घेऊन आपल्या मागे फिरायचे का?...
आपण जेवत नसू तर ते गोष्टी सांगायचे पण आपण आपल्याच हाताने जेवण संपवावे, हा त्यांचा अट्टाहास असायचा. ताटात जेवण शिल्लक रहाता कामा नये, ही शिकवण त्यांनी कधी दिली हे कळलंही नाही आपल्याला.. पण नकळत ती सवय आपल्या अंगी मुरली गेली..
अनेक गोष्टी त्यांनी आचरणातून शिकवल्या.. नेहमी समोर बसवून संस्कार शिकवले असे झाले का कधी? तर नाही.... कारण अगदी रोजच्या वागण्याचे धडे त्यांनी आपल्याला लीलया शिकवले होते...
मग जुनी पिढी काही सल्ले देऊ पाहत असेल तेव्हा जुने जाऊ द्या मरणालागुनी म्हणण्यापेक्षा, नाक मुरडत उगाच आपण किती सुज्ञ पालक आहोत असा आधुनिकतेचा मळकट बुरखा पांघरण्यापेक्षा, आजच खऱ्या अर्थाने पालकत्व डोळसपणे निभवायला शिका...
तरच पुन्हा एक बोट मुलांकडे दाखवताना चार बोटं आपल्याकडे रोखली जाणार नाहीत.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
© वर्षा पाचारणे
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...