© अपर्णा देशपांडे
वाजीद आणि विली हे सिव्हिल इंजिनीअर होते . अतिशय दुर्गम भागात मिलिटरी साठी रस्ते बांधण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव होता .
18380 फुटावर 'खारडुंग- ला ' ह्या हिमालयातील डोंगराळ भागात रस्ता बनवणे हे फार मोठे आव्हान होते . लडाख भागात ह्यापूर्वी देखील बरेच अवघड रस्ते बांधण्यात आले होते .
' खारडुंग -ला 'मुळे भारताला चांगलेच अभेद्य सुरक्षा कवच मिळणार होते .
तिथून सहा किलोमीटर वर एक छोटा मिलिटरी तळ उभारण्यात आला होता .
वातावरण थोडे पावसाळी होते . चौघे गप्पा मारत जात होते . तेव्हा अंगद म्हणाला , " इथे विमान उडवायला मला खूप आवडतं ."
" तू समोर बघ रे बाबा , धडकवशील आम्हाला एखाद्या सुळक्याला . " विली म्हणाला आणि सगळे हसले .
थोडा थोडा पाऊस सुरू झाला . अचानक वातावरण बदललं . उत्तर पश्चिमी पंजाब वरून जम्मू कडे जात असताना विमानाला हादरे बसायला लागले .
दिव्या म्हणाली , " काय कॅप्टन , आज काय विचार आहे ? काही खळबळजनक घडवून आणायचंय का ?"
" अरे नाही , खरंच वेदर खूप खराब झालंय . आलार्मिंग आहे हे , Be in position !! We may need to leave the craft !! "
त्याने कंट्रोल स्टेशन ला हवामानाबद्दल मेसेज पाठवला . 'अबोर्ट करा !! ' असे त्यांचे उत्तर आले.
प्रचंड थंडी होती . खाली फक्त भयानक दाट पांढरा धुकट विस्तार दिसत होता .
सगळे सिरीयस झाले . Escape ची तयारी सुरू झाली ...आता परिस्थिती खूपच हाताबाहेर जायला लागली , विमान कंट्रोल करणे शक्य जात नव्हते आणि संदेश आला , " Quit !"
वाजीद ने प्रत्येकाला पॅराशूट बॅग्स दिल्या.
अंगद नि altitude , पोसिशन , विंड थ्रस्ट हे सगळे आकडे सांगितले .
इमर्जन्सी दरवाजा उघडला .....सगळ्यांनी पोझिशनस घेतल्या ....अंगद ने आकडे मोजायला सुरुवात केली ...तीन ....दोन ....एक !!!!!
सगळ्यात आधी वाजीद ,मग विली ने बाहेर उडी घेतली .
" दिव्या s s जम्प !!! पॉईंट पी 3 ला आपला बेस कॅम्प आहे , त्या दिशेने जा ." अंगद ओरडला
" तू पण निघ लगेच ! खाली वस्ती नाही , सपाट जमीन किंवा पठारही ही नाहीये , बघूया !!." ती ओरडली .
तिने डिप्लोयमेंट बॅग पाठीवर घेतली , straps बांधल्या आणि उडी घेतली . काही सेकंदात स्वतः ला पोझिशन केले , अलटिमिटर वर 2500 आकडा बघितला , वर पाहीले , अंगद निघाला असणार कारण विमान भरकटत जातांना दिसले .
इंडियन एअरफोर्स चे C-130 J हे सामान वाहू विमान LOC जवळील पहाडी क्षेत्रात बांधकाम विषयक सामान घेऊन निघाले . ह्या महिन्यातील ही त्यांची पाचवी खेप होती .
एकदा कच्चा रस्ता केला की मग बाकी काम जवानांसाठी आणि मजुरांसाठी सोपे जाणार होते . पायलट कॅप्टन अंगद सहित त्यात एकूण चार जण होते . कॅप्टन दिव्या शेरगील , वाजीद आणि विली .
वाजीद आणि विली हे सिव्हिल इंजिनीअर होते . अतिशय दुर्गम भागात मिलिटरी साठी रस्ते बांधण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव होता .
18380 फुटावर 'खारडुंग- ला ' ह्या हिमालयातील डोंगराळ भागात रस्ता बनवणे हे फार मोठे आव्हान होते . लडाख भागात ह्यापूर्वी देखील बरेच अवघड रस्ते बांधण्यात आले होते .
' खारडुंग -ला 'मुळे भारताला चांगलेच अभेद्य सुरक्षा कवच मिळणार होते .
तिथून सहा किलोमीटर वर एक छोटा मिलिटरी तळ उभारण्यात आला होता .
वातावरण थोडे पावसाळी होते . चौघे गप्पा मारत जात होते . तेव्हा अंगद म्हणाला , " इथे विमान उडवायला मला खूप आवडतं ."
" तू समोर बघ रे बाबा , धडकवशील आम्हाला एखाद्या सुळक्याला . " विली म्हणाला आणि सगळे हसले .
थोडा थोडा पाऊस सुरू झाला . अचानक वातावरण बदललं . उत्तर पश्चिमी पंजाब वरून जम्मू कडे जात असताना विमानाला हादरे बसायला लागले .
दिव्या म्हणाली , " काय कॅप्टन , आज काय विचार आहे ? काही खळबळजनक घडवून आणायचंय का ?"
" अरे नाही , खरंच वेदर खूप खराब झालंय . आलार्मिंग आहे हे , Be in position !! We may need to leave the craft !! "
त्याने कंट्रोल स्टेशन ला हवामानाबद्दल मेसेज पाठवला . 'अबोर्ट करा !! ' असे त्यांचे उत्तर आले.
प्रचंड थंडी होती . खाली फक्त भयानक दाट पांढरा धुकट विस्तार दिसत होता .
सगळे सिरीयस झाले . Escape ची तयारी सुरू झाली ...आता परिस्थिती खूपच हाताबाहेर जायला लागली , विमान कंट्रोल करणे शक्य जात नव्हते आणि संदेश आला , " Quit !"
वाजीद ने प्रत्येकाला पॅराशूट बॅग्स दिल्या.
अंगद नि altitude , पोसिशन , विंड थ्रस्ट हे सगळे आकडे सांगितले .
इमर्जन्सी दरवाजा उघडला .....सगळ्यांनी पोझिशनस घेतल्या ....अंगद ने आकडे मोजायला सुरुवात केली ...तीन ....दोन ....एक !!!!!
सगळ्यात आधी वाजीद ,मग विली ने बाहेर उडी घेतली .
" दिव्या s s जम्प !!! पॉईंट पी 3 ला आपला बेस कॅम्प आहे , त्या दिशेने जा ." अंगद ओरडला
" तू पण निघ लगेच ! खाली वस्ती नाही , सपाट जमीन किंवा पठारही ही नाहीये , बघूया !!." ती ओरडली .
तिने डिप्लोयमेंट बॅग पाठीवर घेतली , straps बांधल्या आणि उडी घेतली . काही सेकंदात स्वतः ला पोझिशन केले , अलटिमिटर वर 2500 आकडा बघितला , वर पाहीले , अंगद निघाला असणार कारण विमान भरकटत जातांना दिसले .
प्रचंड वारे वाहत होते . तिने सयाचिन ड्रेस घातला होता ,तरीही झोंबणारे वारे जाणवतच होतेच . हेल्मेट वरचा लाईट ऑन करूनही काहीच दिसत नव्हते इतके दाट पांढरे आवरण होते सगळीकडे . बर्फ़ाच्या फ्लेक्स मुळे चेहेऱ्यावर सतत पांढरी चादर येत होती .
तिला बाकीचे साथीदार दिसणे शक्य नव्हते . विली , वाजीद बरेच खाली पोहोचले असतील ..तिला वाटले . इतक्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यात देखील तिने स्वतः ला स्थिर ठेवायचा प्रयत्न केला . तिला तिचे कोचिंग आठवले .
सर म्हणाले होते , खालची माणसं मुंगी एव्हढी दिसायला लागले की पॅराशूट उघडा . मुंग्या माणसा एव्हढ्या दिसायला लागल्या म्हणजे वेळ निघून गेलेली असेल .
वारे तिला खूप मागच्या दिशेने ढकलत होते . अलटिमिटर ने 1250 m दाखवले की तिने कळ दाबली (ओढली) पायलट शूट आधी उघडले . ब्रायडल लूप मधून खाली कॅनॉपी उघडली . तिने स्टीअरिंग स्ट्रिंग्स हातात घेतल्या . कॅनॉपी उघडायला त्रास होत होता .

ससपेन्शन लाईन्स वर खुपच ताण येत होता . हवेचा थ्रस्ट इतका जास्त होता की कॅनॉपी स्कर्ट फाटेल की काय असे तिला वाटायला लागले . मधेच ती दणकून कशावर तरी आदळली . तो डोंगरातून बाहेर आलेला सुळका होता .
तिच्या पॅराशूट च्या दोन स्टीअरिंग स्ट्रिंग्स तिच्या हातात होत्या , पण हवे त्या दिशेला पॅराशूट वळत नव्हते . आपण नेमके कुठून उडतोय हे तिला समजायला मार्ग नव्हता . लँड कुठे जमिनीवर होणार की पाण्यात हेही कळायला मार्ग नव्हता . तिच्याजवळ इमर्जन्सी किट होती , पण ती पाठीवरच्या जेटपॅक मध्ये होती .
तिचा टर्मिनल velocity पॉईंट ( ब्रेक इवन ) आला . आता खाली येण्याचा वेग वाढला होता . ती अनियंत्रित पध्दतीने खाली यायला लागली .......आणि चर्रर्रर्र कन काहीतरी चिरून गेले ...वाकडा तिकडा झटका बसला ....आणि कॅनॉपी सगळी डोक्यावर पडून ती एका झाडात अडकली .

हेल्मेट वरचा लाईट फुटला होता . तिने आधी एक मजबूत फांदी पकडली . चाचपडत दोन फांद्यांमधील बेचकी बघितली ,आणि तिथे स्थिर झाली . पोटावर जखम झाली असणार कारण भयंकर चरचर होत होती .
थोडंसं स्थिर होत तिने आधी दोन घोट पाणी प्यायलं . बॅगेतील किट काढली . त्यात बरेच उपकरणं होते . GPS स्टेटस बघू शकत न्हवती , नेटवर्क नव्हतं . मायक्रोफोन सुरू नव्हता . घड्याळ रात्री आठ ची वेळ दाखवत होतं .
दिव्याने बागेतून बॅटरी काढली .
प्रकाश टाकला .ती एका दाट जंगलात झाडावर अडकलेली होती . बाजूने प्रचंड मोठे पहाड . आणि भयाण काळोख .
कोणता भाग असेल हा ? जम्मू - श्रीनगर घाटी ? पण ही अशी झाडं ? डोळे फाडून उपयोग नव्हता . सकाळपर्यंत वाट बघावी लागणार होती . तिला आपल्या तीन साथीदारांची आठवण आली . कुठे असतील ते ? श्रीनगर कॅम्प ला पोहोचले असतील ?
त्याच अवाढव्य झाडाच्या फांदीवर तिने कॅनॉपी पसरवली आणि पाठ टेकली . दोरीने स्वतःला बांधून ठेवले खास मिलिटरी पध्दतीने ,आणि तशीच टेकून झोपली .
जाग आली तेव्हा वादळ शमलं होतं . अजूनही उजाडलं नव्हतं .
तिने पॅराशूट तिथेच सोडला , फक्त एक बळकट दोरी कापून घेतली , आणि झाडावरून उतरायला सुरुवात केली . ते देवदार चं झाड होतं . साल , चिनार देवदार चं जंगल होतं . उतरे पर्यंत थोडं फटफटलं होतं .
तिची नजर समोरच्या बर्फाच्या डोंगरावर गेली ..ती नीट निरखून बघू लागली ......हे ...हे ...आपले भारतीय शिखरं नाहीत !! मी डोंगराच्या दुसऱ्या बाजूला आहे !! ....ही ...गर्जनवाला पहाडी आहे !! देवा !! मी पाकिस्तान हद्दीत येऊन पडलेय !!!!
आपण कुठल्या परिस्थितीत अडकलोय याची दिव्याला कल्पना आली . ह्या भागातून कुठूनही डोंगर ओलांडून भारतात वापस जाणे शक्य नाही . तीला त्या भागाच्या भोगौलीक परीस्थितीची चांगलीच जाणीव होती .
म्हणजे प्रत्येकालाच याचे पूर्ण ट्रेनिंग दिल्या गेले होते . अशा परीस्थितीत कायदे करार पाळल्या जातील अशी अपेक्षाही ठेवायची नसते हे ही त्यांना सांगितल्या गेले होते . आणि ह्यापूर्वी चे आपल्या सैनिकांना आलेले अनुभव भयानक होते . पाकिस्तानात चुकून येणारा प्रत्येक भारतीय हा गुप्तहेर नसतो हे त्यांनाही ठाऊक आहेच की , तरीही . .
ती खाली पोहोचली. सॅक मध्ये खाद्यपदार्थ होते . तिने थोडंसं खाल्लं , बाकी ठेवलं तसंच . तीथलं जंगल आणि पर्वत रांगा इतक्या अभेद्य होत्या की आता आत गावातून जाऊन मार्ग शोधावा लागणार होता.

आपल्या लोकांना निदान इतके तरी कळालेच असेल की मी पोहोचलेली नाही ,म्हणजे माझा शोध घ्यावा लागेल . ते पाक एम्बेसी किंवा पाक मिलिटरी ला कळवतील का ? ....तिच्या मनात अनेक प्रश्न होते .
आता आपण एक भारतीय मिलिटरी ऑफिसर बनून सामोरे जावे का आपली ओळख न दाखवता माणसात मिसळावे ?
काहीही ठरवलं तरी इथून तर खाली उतरावेच लागणार होते . तिने बुटांचे बंद आवळून घेतले . झाडाची एक मजबूत फांदी आधाराला घेतली ,आणि पहाडी उतरायला सुरुवात केली .
********

कॅप्टन अंगद ने विमानातून उडी घेतली आणि तो भरकटत जम्मू च्या एका डोंगराळ भागात जाऊन पोहोचला . भारतात ल्या कुठल्याही भागात पोहोचले तरी आपल्या मिलिटरी ऑफिसर ला काहीही अडचण येत नाही .
दुसऱ्याच दिवशी पहाटे तो ठरलेल्या बेस कॅम्प वर पोहोचला . वाजीद आणि विली आधीच सुखरूप पोहोचले होते . दिव्या कडून काहीच मेसेज नव्हता . तिचा फोनही लागत नव्हता .
त्या भागातील सगळ्या गावांना ह्याबद्दल खबर केली होती .दिव्या चा शोध घेणे सुरू झाले होते.
भारतीय हद्दीतील अख्खी जम्मू वादी आणि जंगल चाळून तिला शोधा असा हुकूमच होता . ती तिकडे इतक्या लांब पाक हद्दीत जाऊन पडली असेल अशी त्यांना शंकाच आली नव्हती .
दुपार पर्यंत तिचा काही पत्ता लागला नाही तेव्हा श्रीनगर बेस चे विंग कमांडर सुरज चंद्रा यांनी अंगद ला त्यांच्या मनातील शंका बोलून दाखवली . अंगद पण त्याच विवंचनेत होता कारण तिला शोधायला पाठवलेले सगळे हेलिकॉप्टर वापस आले होते .
" तुमची शंका बरोबर आहे सर . आता पाक आर्मी आणि एम्बसी ला ताबडतोब कळवून टाकावे ........Will they cooperate sir ?" अंगद च्या मनावर प्रचंड दडपण आले होते .
" काय म्हणतात चंद्रा सर ?" वाजीद ने विचारले .
"............प्रयत्न करू म्हणतात ."
" ह्या बाबतीत दोन्ही देशात करार होतात , जगाला ओरडून सांगितल्या जाते की पहा आम्ही किती सामंजस्याने वागतो ..आणि प्रत्यक्ष वेळ आली की ...." वाजीद चा तळतळाट होत होता .
" शांत हो वाजीद . आपण इथे कामगिरीवर आलोय . कंट्रोल !! चल , पहाडी वर जायचंय . "
*******

दिव्या न थांबता खाली उतरली . एका झऱ्यावर थांबून तिने पाणी भरून घेतले . हेल्मेट काढून फेकले कारण सूर्य तळपत होता आणि वातावरणातील बोचरेपणा गायब झाला होता . रुमालाने केस घट्ट आवळून बांधले ,आणि निघाली . खाली उतारालागत काही झोपड्या होत्या ....आणि पलीकडच्या शिखरांवर ...ते काय ..तिने दुर्बीण डोळ्याला लावली ....ती पाक आर्मी ची
चौकी होती !!
पुढे जावे की नाही ...त्यांच्या नजरेतून सुटणे शक्य नाही . असा विचार सुरू असतानाच सटकन गोळी येऊन शेजारच्या झाडावर लागली . मग ठाय ठाय गोळ्या सुरू झाल्या . सतत गोळीबार सुरू होता . पाच एक मिनिटांनी फैरी बंद झाल्या .

आडवं पडूनच तिने हातातील झाडाची फांदी उचलली . त्याला पांढरा रुमाल बांधला आणि दगडा आडून काठी उंच धरली ..... ते मैत्री चे ...तहाचे निशाण होते .
काहीच हाल चाल नाही हे पाहून ती बाहेर आली . तीच काठी उंचावून जोरजोरात हालवू लागली. तिकडून देखील तशीच हालचाल होत होती हे तिला दुर्बिणीतून दिसले . आपल्या देशा कडून आपल्यासाठी ह्यांना काही विनंतीवजा सूचना आली असेल का ? तिच्या मनात आले .
आता ती न लपता हात उंचावत मोकळ्या जागेत आली . आपली खरी बाजू त्यांच्या समोर मांडायची मग जे होईल ते होईल असे तिने ठरवले .
*********

तोपर्यंत भारतीय विदेश मंत्री , मिलिटरी चीफ , ऍडमिरल चंद्रा यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली .
पाकिस्तानातील भारतीय दूतावासाशी त्वरित संपर्क करण्यात आला . तिथले भारतीय राजदूत मेघना देसाई यांनी युद्ध पातळीवर हालचाल करून कॅप्टन दिव्या शेरगिल यांची कस्टडी आपल्याकडे घ्यावी असे सांगण्यात आले .
मेघना देसाई ताबडतोब पाक आर्मी जनरल यांना बोलल्या . कॅप्टन दिव्या ह्या भारतीय वायुसेनेच्या अधिकारी आहेत , अपघाताने .....................अशी सगळी माहिती देणारे पत्र आणि अर्ज देण्यात आला .

शिवाय भारतीय सरकार कडून रीतसर मेल पाठवल्या गेल्या . तेथील परराष्ट्रमंत्री यांनी अतिशय आदरपूर्वक सांगितले की ते सर्वतोपरी सहकार्य करतील .
त्यांनी आश्वासन दिले की ते काही तासात दिव्याचे बोलणे भारतीय सरकारशी करवून देतील . भारताला फार मोठा दिलासा मिळाला होता .
क्रमश:
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.