© शुभांगी मस्के
मेहेंदी है रचनेवाली... हातों में गहरी लाली...
गाण्याच्या तालावर, सर्व मुलींच्या घोळक्यात आभा मोठ्या आनंदाने बेधुंद होऊन, ठुमके देत होती ..
हिरव्या लाल मेहंदीने, रंगलेले हात घेवून कुणी ठुमकत होत्या तर कुणी फोटो काढण्यात दंग, तर कुणी रंगलेल्या मेहंदीवर साखर पाणी लावण्यात, कुणी गप्पांमध्ये मग्न होत्या, मंडपात लग्नाचा माहोल तयार झाला होता.
घरातलं पहिलंवहिलं लग्नकार्य असल्याने सगळ्यांच्या चेह-यावर उत्साह ओसंडून वाहात होता..
"अगं आभा.. ये!! तू एकटीच राहीलीस बघ, मेहंदी काढायची, असे पांढरे कोरे हात ठेवू नये गं! लग्नात कुणी?लाडक्या आत्याच्या लेकीचं, तुझ्या आते बहिणीचं लग्न आहे, परक्या कोणाचं असतं तर ठिक.

बघ माझ्या हातावर कसा रंग चढलाय मेहंदीचा... कधी नव्हे ते तुझ्या आज्जीने ही दोन्ही हातांवर कोपरापर्यत मेहंदी काढली बघ." आत्याने आभाला मेहंदी काढून घेण्यासाठी हक्काने बजावलं.
"आत्या नाही गं.... मला नाही काढू वाटत हातावर मेहंदी." आभाने सारवासारव केली..
"काही ऐकणार नाही मी तुझं." मोठ्या जबरदस्तीने हात पकटून तीने आभाला मेहंदी लावणा-यांच्या घोळक्यात बसवलं.
मी हातावर कधी मेहंदी काढणार नाही? मेहंदी न काढायची, तिने घेतलेली शपथ आठवून, ती बसल्या जागी ताडकन उठली.
---------
आभाच्या आईला म्हणजे सुजाताला हातावर मेहंदी लावायला, साजश्रुंगार करायला फार आवडायचं.

हातभर बांगड्या, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि गळ्यात काळ्या मण्यांच मनीमंगळसुत्र..साजश्रुंगार करायला आवडायचं सुजाताला, नीटननेटकी राहायची.
तिचे हात, नव्या नवरीसारखे, सतत मेहंदीने रंगलेले असायचे, मेहंदी काढायला तर खूप आवडायचं तिला. स्वत:च ब्युटी पार्लर असल्याने, फावल्या वेळात मेहंदीचे क्लास ही घ्यायची.
मेहंदीचा रंग, छान चढायचा तिच्या हातावर.

रंग चढलेल्या हाताकडे बघून.. "क्या यही प्यार है.. हॉ हॉ, यही प्यार है".. सुजाताकडे बघत, आभाचे बाबा सतत गुणगुणायचे.
सगळं छान सुरु होतं.. आणि कुणाची दृष्ट लागावी, तसं सगळंच नेस्तनाबूत झालं.
दहावीत होती आभा, बाबा गेले तेव्हा.
सतत हसत रहाणारी सुजाता, अबोल झाली... गळ्यात मंगळसुत्र नाहीच, पण सुजाताने नीटनेटके राहीलेलं ही सुजाताच्या सासूला म्हणजे आभाच्या आजीला खटकायचं.
नागपंचमीच्या सणाच्या, निमित्ताने आभाने स्वत:च्या हातावर सुंदर मेहंदी काढली...लेकीच्या हातावर मेहंदीचा चढलेला रंग बघून, सुजाताला खीप आनंद झाला.
"आई ये, मी तुला ही काढून देते, मेहंदी"

नाही नाही म्हणत आभाने आईच्या हातावर आग्रहाने मेहंदी काढलीच.
चार टिपके मेहंदीचे, हातावर ठेवले असतील नसतील तर आज्जीने सुजाताला खूप खूप काही काही सुनावलं.

आभालाही चांगलच नाही नाही म्हणे पर्यत बदडून काढलं.
मी ह्यापुढे कधिच नाही काढणार मेहंदी, आभा हमसून हमसून रडत होती.
कुणाचा हात पकडून पळून जायचयं तुला आता, मी जीवंत असेपर्यत, माझ्या घरात हे असे सोंग मी मुळीच खपवून घेणार नाही. विधवेनं विधवेसारखं रहावं. आजीने खूप सुनावलं होतं.
----------
सुजाताचं पार्लरही बंद पडलं, आभा जसजशी मोठी होतं होती. साजश्रुंगारापासून ती स्वत:ला अलिप्तच ठेवू लागली.
पुढे शिक्षणासाठी आभा बाहेरगावी गेली. ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन आभा, कॉलेजची टॉम बॉय झाली..
-----------
शिक्षण पूर्ण झालं. आभाने शहरात लठ्ठ पगाराची नोकरी ही मिळवली. दिसायला ही तशी नाकीडोळी सुंदर होती. लग्नासाठी आता निरोप यायला लागले होते.

दोनाचे चार हात झाले की आपण मोकळे.. आत्ता सर्वांनाच आभाच्या लग्नाचे वेध लागले होते.
एकुलती एक भाची, आपल्या घरची सून व्हावी. आभाच्या आत्याच्या मनातली सुप्त इच्छा तीने तिच्या आईजवळ म्हणजे आजीजवळ बोलून दाखवली होती.
आभा मात्र लग्नाचा विषय, धुडकावून लावायची..
आजी आजोबा... आईने लग्नाचा विषय काढला तरी, ती चिडायची, मला लग्नच करायचं नाही स्पष्टच सांगायची.
नवरा गेल्यानंतर स्त्रीच्या.... आयुष्याला अर्थ राहात नसेल.... तिचा साजश्रुंगार, तिच्यापासून हिरावला जात असेल... तिच्या आवडीनिवडींना तिला तिलांजली द्यावी लागत असेल.असं असेल तर मी लग्न न करताच सुखी आहे.

मला लग्नाच्या फंदात अडकायचच नाही.. तिच स्पष्ट मत होतं.
सुरवातीला सर्वांनाच तिचं म्हणणं... अल्लडपणाचं वाटे, पण लग्नाचं वय उलटू चाललं होतं, तरी ती आपल्या मतावर ठाम होती.

तिच्यापेक्षा छोटी असूनही आतेबहिणीचं लग्न होणार होतं.... आत्ता सर्वांनाच आभाच्या लग्नाची काळजी वाटायची..
---------
स्त्रीचा सगळा साजश्रुंगार, जर का फक्त नव-याच्या नावाचा असेल तर मी लग्न केलेलं नाही, मला नवरा नाही... मग मी का म्हणून ह्या फाल्तूच्या साजश्रुंगारात अडकवून घ्यायचं स्वत:ला.
जिन्स टॉप आणि कानात छोटेसे स्टड्स.. बाकी तिचं दागदागिन्यांंसोबत वाकडंच होतं..
-----------
मेहंदी लावायची नाही, म्हणत उभ्या झालेल्या आभाकडे बघत.... आजी, ओरडलीच,"ए पोरी!.... काही तरीच काय तुझं.. बस गपगुमान.
भरल्या मंडपात असे रिकामे हात बरे नाही दिसत... चार ठिपके तरी काढ हातावर... बहिणीचं लग्न आहे, करवली म्हणून मिरवायचयं ना!" आत्ता आज्जीने जवळ बसवून आभाला समजावलं..
"ए, आज्जी... माझं डोकं फिरवू नकोस हं!! एकदा सांगितलं ना, मला नाही काढायची मेहंदी" आभाने आजीच्या हाताला जोरात हिसका दिला.
हेकेखोर स्वभाव.... दोघींचा...आज्जी-नाती एकसारख्या आत्या दुरुनचं पुटपुटली..
लग्न नाही करायचं म्हणतेय, बिनलग्नाची रहाणार आहे का ही... समाज काय म्हणेल.... बिनबापाच्या पोरीकडे लक्ष नाही दिलं कुणी.... पोरीबाळीच्या जातीला आडमुठेपणाचं वागणं शोभत नाही...
"मी काय म्हणते, झालं गेलं गंगेला मिळालं.. एकच एक गोष्ट धरुन ठेवल्याने कसं होईल बरं" आत्या समजावण्याच्या सुरात बोलत होती.
"ए आत्या तू मला आग्रह करु नकोस बरं... एकदा सांगितलंय ना मी.... ना मी मेहंदी काढणार, ना मी स्वत:ला लग्नाच्या बेडीत अडकवून घेणार.
आज दहा वर्ष झालीत बाबा जावून..... विसरायचा प्रयत्न केला तरी, आईकडे बघितलं की बाबांची आठवण येते आणि बाबा गेल्याचं दु:ख जाणवत राहातं.

बाबा तर गेले, आईचा जिवंत पुतळा झालाय. जगणं विसरलीय ती.... तू काही बोलायचं नाही अशी तिने शपथ घातलीय म्हणून, मी गप्प बसलीय एवढी वर्ष.
बाबा गेल्याचं आभाळाएवढं दु:ख, विसरण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही सगळ्यांनी कधी विसरु दिल नाही... आईला मात्र रोज तिळ तिळ मरताना बघितलयं मी.
नशिबवान असतात सगळ्या, ज्यांच सौभाग्य अबाधित असतं.. म्हणून का, नव-याच्या जाण्याने एका बाईच्या जगण्याचा हक्कच हिरावून घ्यायचा का? त्यात तिची तरी काय चूक सांग बरं" आभाने आत्याकडे बघत म्हटलं..
"नकोय मला... मेहंदी आणि तो साज श्रृंगार, आणि तू घेतलेला तो लाछा ही नकोय.. मी आहे तशी येईल लग्नात नाही तर सांग आत्ताच येणार नाही" एवढं बोलून पाय आपटत आभा आत निघून गेली.

'तिला मारल्याचे, तिच्या पाठीवरचे व्रण केव्हाचं मिटले... मात्र मनावर उमटलेले व्रण काही केल्या मिटत नाही... दिवसेंदिवस ते चिघळत जातायत.' आजी स्वत:शीच पुटपुटली.
दहा वर्षापूर्वी तिला मारल्याचं अपराधीपण अजूनचं गडद होतं चाललं होतं.
पश्चातापाचे अश्रु, पदराने पुसत आजी उठली... आणि आभाच्या पाठोपाठ आत गेली..
आतल्या खोलीत आभा, आईच्या कुशीत हमसून हमसून रडत होती.
"आभा बाळा, असं बोलतात का, मोठ्यांशी? बाबा गेल्यावर माझ्या श्रुंगाराला तरी काय अर्थ होता सांग.. मग तो मी केला काय नी नाही केला काय? एकच ना!" आभाच्या केसांमधून हात फिरवत सुजाता बोलत होती.
"नाही गं सुजाता... माझं चुकलचं, मीच स्वार्थी झाले. एकूलत्या एका पोराच्या जाण्याने एवढी खचले, की मी तुझ्यापासून तुझ जगणचं हिरावून घेतलं.
दिसायला सुंदर होतीस, पार्लर चालवायचीस. उद्या तुझं पाऊल वाकडं पडलं म्हणजे, अशा कुचकामी विचाराने तुझ्यापासून मी तुझं स्वातंत्र्य हिरावून घेतलं.
पोरीकडे लक्ष देण्याच्या नावाखाली, तुझ्या इच्छा आकांक्षाना, आवडीनिवडीना मुरड घालायला भाग पाडलं... चकार शब्द काढला नाहीस तू सगळं मुकाट्याने सहन करत राहीलीस.
अपराधी आहे ग मी तुझी." आज्जीने दोन्ही हात सुजातापुढे जोडले, तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहायला लागल्या..
आजींने दोघींनाही प्रेमाने जवळ घेतलं.. सुजाताचा हात धरुन आजीने सुजाताला, बाहेर मंडपात आणलं... तिला मेहंदी काढण्यासाठी बसवलं..
पाणावलेल्या डोळ्यांनी, आभा ही आई शेजारी बसली.

"मग सांग, लिहिणार का मेहंदीत माझ्या लेकाचं नाव ?"आत्याने आभाला स्पष्टच विचारलं.
मंडपात मित्रांच्या घोळक्यात बसलेल्या प्रतिककडे तिने चोरट्या नजरेने पाहीलं..
तो ही आडून तिच्याकडेच बघत होता. नजरेवर नजर पडली आणि आभा गोड लाजली.
आता, ती ही प्रतिकच्या नावाची मेहंदी काढून घेणार होती... प्रेमाच्या रंगात रंगून जाणार होती...
आत्याच्या बोलण्यावर, आभाने हलकेच मान हलवली. आजीच्या डोळ्यात पाणी तरळलं.... एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच, सोडून गेलेला लेक अवतीभोवती असल्याचं आज्जीला जाणवलं.

सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...