© शुभांगी मस्के
थोडी सावलीची जागा बघून, गाडी पार्क केली. कारबाहेर आली, एका जागी स्तब्ध ऊभं राहून. एक नजर घरावरुन फिरवली.. एका नजरेत तिने तिचं माहेर सामावून घेतलं.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
सुखदाची कार थांबली, सूर्य आग ओकत होता, उन्हाचा चटका जाणवला.. एरवी माहेरच्या अंगणातला डेरेदार कडुलिंब हक्काची सावली देण्यासाठी,येणा-या जाणा-यांच्या स्वागतासाठी सतत उभा असायचा. आज मात्र तो नव्हता. सगळचं मोकळढाकळं आणि भन्नाट-भन्नाट वाटत होतं..
थोडी सावलीची जागा बघून, गाडी पार्क केली. कारबाहेर आली, एका जागी स्तब्ध ऊभं राहून. एक नजर घरावरुन फिरवली.. एका नजरेत तिने तिचं माहेर सामावून घेतलं.
उन्हाच्या चटक्यांना झेलतच पोर्चकडे धावली..
गेल्या वर्षभरात, घराचा पार चेहरामोहरा बदलला होता. घराचं डिझायनर लूक खूपच सुंदर होतं, घराला जणू बंगल्याचं स्वरुप आलं होतं... समोर मोठ्ठा पोर्च, गेट जूनंच तरी रंगरंगोटी झालेलं.. चकाचक..
तिने गेटची कडी खोलली, तिला उघडायला ही वेळ लागला.. अंगणातलं तुळशी वृंदावन तसचं भकास पडलं होतं. कदाचित उन्हाने वाळली होती तुळलं अंगणातली..
जाई, जूई, कुंदा चमेली.... कोप-यातला प्राजक्त... झाडवेली, फुलांनी बहरलेले अंगण.. तसं सुनं सुनं भासलं.. रंगिबेरंगी कुंड्यांमध्ये सुंदर अशी शो ची दोन चार झाडंआपल्या अस्तित्वाच्या खुणा टिकवण्याच्या प्रयत्नात होती..
दरवाजा आतून बंद होता.. बंद दरवाज्याकडे बघून तिला कसनुसचं झालं.. आईबाबा असताना, दरवाजा असा क्वचितच बंद असायचा.

"माणसांनी भरलेल्या घराचा दरवाजा सदानकदा गजबजलेला असावा" बाबांचे शब्द सुखदाला आठवले.
थोडं चाचपडतच, सुखदाने डोअरबेल वाजवली.
थोडं चाचपडतच, सुखदाने डोअरबेल वाजवली.
रक्षाने आतून दरवाजा उघडला. आत्तु...आत्तु छोट्या पर्णवीची गोड हाक कानी पडली.. पर्णवीने आत्तु आत्तु करत साडीला फेर धरुन लोटांगणच घातलं.
आत्तुने ही पर्णवीच्या गालांच्या गोड गोड पाप्या घेतल्या.
रक्षाने ट्रेमध्ये ग्लास भरुन आणले, पाणी दिलं प्यायला.. रक्षा, बाविसेक वर्षाची मुलगी गेली पाच-सहा वर्षापासून पर्णवीला दिवसभर सांभाळायला यायची त्यामुळे घरचीच झाली होती..
Tv चा आवाज सोडला तर, घरात कसलाच आवाज नव्हता.. शांत शांत वाटत होतं.

"घरी नाही का गं कुणी??" सुखदाने विचारलं..
"नाही ताई कुणीच नाही, दादा वहिनी ऑफिसला गेलेत." रक्षाने उत्तर दिलं.
मी सांगितलं, आज येणार म्हणून, कित्येक महिन्यात साधी भेट नाही... तरी गेलेत ऑफिसला... क्षणभर सुखदाच्या मनात विचार आला....
सुखदा इकडे, एका पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी म्हणून आलेली... यायचं ठरलं असल्याने, तसं तिने दादा वहिनीला कळवलं ही होतं..काहीशा विचारात, तिने असं भर दुपारी येण्याचं कारण रक्षाला बोलता बोलता सांगितलं.. घटाघटा पाणी पिलं.
'मी आलीय घरी' पटापट मँसेज टाईप करुन तिने दादा वहिनीला पाठवला.
पर्णवीसाठी आणलेला खाऊ तिने, पर्णवीला दिला.. तिच्या आवडीचं फरसाण आणि संत्राबर्फी आत्तुने आणलेली बघून स्वारी भलतीच खुश झाली.. दोन घास फरसाणचे तिने स्वत:च्या पोटात टाकले, रक्षालाही घेवून खायला सांगितलं.
किचन ओट्याचा तर पार चेहरामोहरा बदललेला होता.. मॉड्युलर किचन, चिमणी... सुंदर टाईल्स.... वरचं एक कपाट तिने हलकेच उघडून बंद केलं... ट्रॉल्यांची फक्तचं एक दोन वेळा उघड झाप केली.
घराच्या भिंतींवर नव्या सुंदर रंगाची फक्त रंगरंगोटीच नाही तर... भिंतींवरच्या आठवणी ही बदललेल्या जाणवल्या..
हॉलच्या एका भिंतीवर बाबांनी मोठ्या हौसेने लावलेला सर्वांचा फॅमिली फोटो नव्हता.. बाबांना रिटायर्डमेंटच्या वेळी मिळालेला नाचणारा गणपती ही नव्हता.
लग्नापूर्वी मोठ्या हौसेने बनवलेल्या सिरॅमिकच्या कुंड्या, फ्रेम, वॉल हॅगींग, नाचणा-या डॉलचं कँनव्हास पेंटींग.. आजवर माहेरच्या भिंतीवर तो-यात मिरवणारं सुखदाचं अस्तित्व, विखुरल्यागत सुखदाला जाणवलं.
फोन जवळ असेलल्या आराम खुर्चीत बाबा सदानकदा बसलेले असायचे.. त्या आराम खुर्चीच्या जागी, आता हॅगींग झुला लटकलेला होता.... क्षणभर ती त्या झोपाळ्यावर टेकली.. पर्णवी संत्राबर्फी खाण्यात मग्न होती..
हॉलमधे मोठ्ठा सोफासेट... त्यावरील मोठाली कुशन्स, जणू हॉलची शोभा वाढवत होता... भिंतीवर अडकवलेल्या घड्याळापासून तर कोप-यात ठेवलेल्या फ्लॉवर पॉट पर्यत सगळंच बदललेलं होतं.
ज्या घरात ती लहानाची मोठी झाली... जिला कोपरानकोपरा तिच्या ओळखीचा होता...तिच्या हक्काच्या माहेरीच, तिला अनोळखी अनोळखी भासत होतं.
छोट्या पर्णवीची खेळणी, टेडी बिअर, तिच्या चिमुकल्या हाताच्या पेंटिंग्ज... समोरच्या भिंतींवर कोरलेलं सुंदर नक्षीकाम...तिची बालकथांची पुस्तक, छान शोकेसमध्ये रचून ठेवली होती. चिमुकल्या हातांनी बनवलेल्या सीशेल्स ची शोपीसेस, कोप-यात ठेवलेली indoor plants हॉलची शोभा वाढवत होते..
सुखदाने बसल्या जागी, हॉलच्या कोप-या कोप-यात नजर फिरवली... उठली तशी, चालता चालता... आत गेली... आईच्या रुमचा दरवाजा बंद होता.
तिने दरवाजा उघडला... रुममध्ये अंधार पसरला होता... तिचा हात आपोआप लाईटच्या नेमक्या त्याच बटनवर गेला..
लाईट नाही ताई ह्या खोलीत, खूप दिवस झाले... पोर्चमधला लाईट खराब झाला होता, तर इथला लाईट काढून दादाने बाहेर लावला.

तसही फार नाही येत ह्या खोलीत कुणी.. धुळ असेल खूप, अडगळ असते ठेवलेली फक्त.. रक्षा मागून येत बोलली..
"अडगळीची खोली!"..ऐकून तीला कससचं झालं... ही खोली तिच्या ओळखीची... न चाचपडत ती पुढे सरकली...
दरवाजा उघडणार तो भलं मोठं कपाट दरवाजासमोर ठेवलं होतं.
आईने काटकसर करुन, एक एक पैसा जमवून घेतलेलं ते जूनं गोदरेजचं कपाट.. त्यामुळे दरवाजा उघडताच आला नाही... तीने मोबाईलचा टॉर्च ऑन केला.. खिडकीचा पडदा सरकवला... खिडकी उघडली...
आईबाबांनी बांधलेल्या घरात, पूर्वी सर्वांत जास्ती वर्दळ ह्या रुममध्येच असायची... इन मिन तिन रुम होत्या मग ह्या रुममध्येच जेवण, इथेच अभ्यास आणि इथेच खाली गाद्या टाकून झोपायचो ही तिच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहीलं.

पाहूणे, पहायला आले तेव्हा ह्याच रुमच्या साक्षीने नटली-सजली सवरली होती... बाळंतपणात, तेलपाणी आणि धुरीच्या गंधाची साक्षिदार, अनेक सुखाच्या क्षणांबरोबर दु:खद् क्षणांच्यााही भागीदार झाल्या होत्या ह्या चार भिंती..
हॉलमध्ये असलेल्या, बाबांच्या आराम खूर्चीची रवानगी, ह्या रुमच्या खिडकीजवळ केलेली होती....कित्येक दिवसांची धुळ त्या खुर्चीवर साचली होती, कुणास ठाऊक. तिने तिथल्याच एका कपड्याने खूर्चीवरची धुळ झटकली.
जुन्या आरशावरुन तिने हळूच फडकं फिरवलं, आईच्या टिकल्या चिटकवल्याच्या खूणा अजूनही होत्या तिथे तशाच चिटकलेल्या..
स्वत:ला तिने आरशात न्याहाळलं... गालावर हसू, नी डोळ्यात आसू, आरशाला नाही ना खोटं बोलता येत.. असतं तेच दिसतं.. कितीही विसरायचा प्रयत्न केला, तरी आठवणी पाठ सोडत नाही तेच खरं... डोळ्यातलं पाणी अलगद् गालांवर ओघळलं..
थोडं झुकूनचं तिने खिडकी उघडली. खिडकीतला गुलाबी चाफा, आहाहा!! कसा फुलांनी डवरलेला असायचा सदानकदा, तिने खिडकीतून बाहेर डोकावलं..
"चाफा कुठे गेला गं?".. तिने रक्षाला विचारलं..
"सुकलेली पानफुलं पडायची ताई, खूप कचरा व्हायचा, म्हणून दादाने तोडून टाकला"... रक्षाने सांगितलं.. "तोडला पण त्यामुळे खूप उन्हाचा तडाखा जाणवतो आता.. बरा होता पूर्वी सावली असायची.". रक्षा बोलत होती..
कडूलिंब ही त्याच कारणासाठी तोडला असावा बहूधा, सुखदाच्या मनात येवून गेलं....भिंतींवरच्या आठवणींही .... जुन्या झाल्या असाव्या कदाचित.... म्हणूनचं!! काहीशा स्तब्धपणे तिने लांब उसासा घेतला..
आईचं कपाट उघडलं....कपाट उघडतानाचा तो खडकन आवाज, अगदी तस्साच आला! पैठणी, कांजीवरम, इरकल कॉटन, शिफॉनच्या साड्या, तर काही काढापदराच्या साड्या, तशाच एकावर एक घड्या, तर काही हँगरमध्ये अडकवलेल्या... आईने मोठ्या हौसेने घेतलेल्या खणाच्या साडीवरुन तिने हळूवार हात फिरवला.
कोप-यातल्या आईच्या बांगड्यांच्या हॅगरला तिचा धक्का लागला, बांगड्यांची किणकिण... आई!!! ती दचकली... आईच्या अस्तित्वाचा गंध अवतिभोवती दरवळत असल्याची अनुभुती झाली.... आई अवतिभोवतीच असल्याचं तिला जाणवलं.
आई- बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाला... तिने बाबांना दिलेलं स्वेटर... आईला दिलेली शॉल... हळूच एका कोप-यातून डोकावली... आईबाबांचा स्पर्श तिला जाणवला..
बाबा गेले नी आईच्या एकटेपणाच्या साक्षीदार झाल्या होत्या ह्या चार भिंती... टेबल क्लॉथ, भरतकामाचे रुमाल, आईने स्वत:ला गुंतवून घेतलं होतं... लेकीसुनांच्या बाळंतविड्यात आई आठवणी गुंफत होती..
आईने प्रेमाने बनवलेले शॉल, स्वेटरच्या आठवणींतल्या सुंदर मिठीनेही ही उबदार वाटायचं.
आई विणत असलेलं, अर्धवट राहिलेलं स्वेटर.... लोकरीच्या बंडलला....तसचं गुंडाळलं होतं.. आईच्या विणकामाच्या सूया तशाच लोकरीच्या गोळ्यात अडकलेल्या तिला दिसल्या...
सूयांना लावलेलं, अर्धवट स्वेटर.... तिने हळूच कपाटातून बाहेर काढलं.... छातीशी कवटाळलं... आईच्या आठवणीत तिच्या डोळ्यातून टपटप अश्रु ओघळले...
सगळीकडे तिने हळूवार नजर फिरवली.. पुस्तक, कपडे, आईच्या पोथ्या, बाबांची छत्री, तिथल्या प्रत्येक वस्तू तिने नजरेत साठवल्या....
हवेची थंडगार झुळूक, खिडकीतून आत आली... बाबांची आराम खूर्ची हळूहळू हलली.... ती बाबांच्या आरामखुुर्चीत बसली, आठवणी मनात रुंजी घालत होत्या.
आत्तु... आत्तु... म्हणत लाडक्या भाचीने मागुन येत, हाक दिली... तशी ती भानावर आली... अर्धवट राहिलेलं स्वेटर, आणि आईच्या सुया घेवून ती रुमबाहेर पडली.
"आत्तु हे काय गं!! माझा फेवरेट पिंक... माझं आहे ना हे!!" स्वेटरकडे बोट दाखवत पर्णवीने विचारलं.

"हो बाळा तुझचं आहे!!" सुखदाने मान डोलावली.. आईने शिकवलेलं थोडसं आठवतं, तिने अर्धवट राहिलेलं स्वेटर तिच्या भाचीसाठी पूर्ण करायचं मनोमन ठरवलं...
नात्याची विण कशी घट्ट असावी, ह्या स्वेटरसारखी.. मतभेद, मतभेद विण सैल करु पाहातील, उकलतील ही... आपण मात्र त्यांना घट्ट विणत रहायचं.. आईचे शब्द जसेच्या तसे तिच्या मनात घोळत राहीले.
ती बाहेर पोर्चमध्ये आली, सुर्य मावळतीला जायला निघाला होता.. झुळझुळ वारा वाहात होता.. कार्यक्रमात तिला मिळालेलं तुळशीचं रोपटं, तिने कारमधुन काढलं... पर्णवीला सोबत घेवून तुळशीचं रोपट वृंदावनात लावलं..

तिच्या माहेरच्या अंगणात तिने लावलेलं ते तुळशीचं रोपटं... हव्याच्या तालावर आता आनंदात डोलत होतं..
मोबाईल खणाणला... "सखुताई आम्ही येतोय...जावू नका" भावाच्या मोबाईलवरुन सुखदाची वहिनी, ममता बोलत होती.

"आज ऑफिसला जाण कित्ती आवश्यक होतं", ती फोनवर बोलत असताना..."सुख आलयं माझ्या दारी"... भाऊ गुणगुणत होता..
सुखदाला बरं वाटलं... ओळखी... अनोळखी... माहेरचे कोपरे... आता तिला आपलेसे वाटायला लागले होते. मानापमानात गोंजारलेले... रुसवे फुगवे बाजूला सारायचं, तिने मनोमन ठरवलं....
अपेक्षांच्या पल्लाड... झालं गेलं सारं सारं विसरुन, हक्काच्या माहेरपणाला आता ती नेहमीच येणार होती.. तिच्या आठवणीतल्या घराच्या हळव्या कोप-यांना तिने, तिच्या लाडक्या भाचीसाठी, पर्णवीसाठी मोकळं करायचं ठरवलं होतं..
मुलीचं लग्न झाल की.. माहेरी तिचं अस्तित्व तिच्यासोबत येतं नी तिच्या सामानासोबतच जातं... तिच्या मनात दडलेले माहेरचे कोपरे काळाच्या पल्लाड बदलले दिसतात.

माझं माझं करताना तिचं त्या माहेरी काहीच उरलेलं नसतं... आपलं अस्तित्व माहेरच्या चार भिंतीत शोधताना.. तिला ते सापडेलच ह्याची काहीच हमी तिला नसते..
अनेकदा ती दुखावली ही जाते. प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याच्या चार शब्दांनी.. तिला आपलंस करायला हरकत ती काय..
© शुभांगी मस्के
सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

सुंदर..
उत्तर द्याहटवाBetting more doesn't improve your possibilities of winning, so it's fantastic not to bet max on this type of|this type of|this kind of} sport. This type is pretty straightforward in that when you bet a small quantity, you'll win a small quantity; bet a large quantity, you'll win a large quantity -- nevertheless it doesn't effect the number of instances you win. If you are on the lookout for a coin tray, you may be on the lookout for some time. Some casinos have reverted back to coin usage in the excessive restrict areas, because it takes less time 1xbet to play cash that it does to insert paper.
उत्तर द्याहटवा