© सौ. अनला बापट
"छे ग, उगीच भलती आशा ठेवूच नकोस" वाटले जणू त्याचे डोळे असे बोलत होते.
'आणि हो ते खरे पण होते..गेले कित्येक वर्ष आपण दोघे वाटच पाहत आहोत मुलांची ..आज येतील उद्या येतील करत..कितीतरी महिने वर्ष उलटले..पण मुलं काही आली नाही.' मनातच तिने त्याला उत्तर दिले.
गेले दोन वर्ष त्यांच्यात असेच संभाषण होत होते. कारण दोन वर्षापूर्वी त्याला पक्षघात झाला आणि तो बोलायचे चालायचे बंदच झाला.
तिला त्याच्या डोळ्यात मुलांच्या भेटीचे मृगजळ पण नेहमीच दिसायचे. ती त्याला अशी आशा ठेऊ नकोस म्हणून नेहमीच समजवायची..पण त्याची तृष्णा...त्याच्या जिवंतपणी तरी पूर्ण नाही झाली.
"आता आले तरी काय?" ती फोटो कडे पाहून म्हणाली.
एवढ्यात दारावर कोणीतरी ठक ठक केले .तिने दार उघडले.
दोन पोरं, एक बारा तेरा वर्षाचा आणि एक विसीच्या जवळपासचा. दोघे एकदम आत शिरली.
"ग्रँड मा?... यू आर माय ग्रँड मॉम..राईट?" त्या दोघांपैकी एकाने तिच्याकडे लक्ष देऊन पाहून म्हटले.
"येस.. इफ यू आर माय संस सन.."
"मी रोहित विवेक दामले" दुसऱ्याने आपला हात पुढे करत तिला म्हटले.
"म्हणजे हा विवेकचा मुलगा आहे तर" मनात तिच्या आले.
"बरं तुझे आई वडील कुठे आहेत? एकटे आलाय का इथे?"
"हो आम्ही दोघे एकत्र एकटे आलो आहोत..आम्हला तुझा मेसेज कळला होता..ग्रँड पाच्या डेथ चा"
"तुम्ही एकटे कसे आणि कशाला आला?"
"ती एक गम्मत आहे...आम्हला तुझा मेसेज कळला..मी ह्याला..sorry ह्याची ओळख करून देतो, हा जिमी विनायक दामले..म्हणजे विनायककाकाचा मुलगा. ह्याला मराठी फक्त समजत, बोलता येत नाही..कारण ह्याची आई मराठी नाहीना."
"बरं मग" तिला आत्ता सूना कोण कश्या आहेत ह्या पेक्षा ही मुले इथे कशी आली ते माहीत करून घ्यायचे होते.
"तर आम्ही तो डेथमेसेज आपल्या व्हिसा ॲप्लिकेशन मधे टाकून आमचा व्हिसा क्लिअर करवला आणि आलो इथे.."
"अरे पण तुम्हाला तर काहीच माहीत नाही ना इथले? असे कसे सोडले तुमच्या आई बाबांनी तुम्हाला?"
"त्यांनी कुठे सोडले..आमचे आम्ही आलोय..तुला भेटायला"
"येस,ग्रँड मा.."जिमी ने पण रोहितच्या सूरात सूर पुरवला.
"कारण आम्हाला तुझ्या बरोबर काही दिवस राह्याचे आहे ,तुझ्या तोंडून गोष्टी ऐकायच्या आहेत आणि हो मस्त मस्त आईटम खायचे पण आहेत"रोहित पुन्हा म्हणाला.
आता तर तिला आनंदाने आकाश ठेंगणे वाटायला लागले.
"मुलं नाही आली तरी काय..आपल्याला हवे असलेले नातू आले ना!" म्हणत ती त्याच्या फोटो जवळ गेली. मुलांना जवळ बोलवून दोघांकडून नमस्कार करवला.
मग पुढचे पाच सहा दिवस सगळे विधी करण्यात गेले. रोहित मोठा नातू म्हणून तिने सगळे विधी त्याच्या कडून करवून घेतले.
दिवसांच्या विधी संपल्या, ती दमली होती पण आनंदीत होती की त्याच्या इच्छे प्रमाणे त्याच्या रक्तानेच सगळे विधी केले म्हणून.
त्या संध्याकाळी रोहित म्हणाला, "आता आम्हाला जावे लागेल कारण आमची शाळा आणि इतर क्लासेस आहेत"
"हो बाळा,मला कळतंय..तुम्ही जाऊ शकता परत"
"मी उद्याचे बुकिंग करतो.." रोहित म्हणाला.
"ठीक आहे"
दुसऱ्या दिवशी ती एअरपोर्टवर त्यांना सोडायला जाणार होती पण फ्लाईट खूप उशीरा असल्याने रोहितने तिला "आम्ही जाऊ आमचे..टॅक्सी करून तू नको येउस एवढ्या रात्री"सांगून येऊ दिले नाही.
दुसऱ्या दिवशी तिला घर खायला उठले होते.."पांच सहा दिवसातच तिला मुलांची सवय झाली की काय?" असे वाटले तिला.
पण तिने मनावर ताबा घेऊन दोन दिवस अजून काढले..मग मात्र तिला वाटले की आपण जावे मुलांकडे.
तिने तसे फोन केले मुलांना.
"बरं वेळ मिळाला की येतो तूला घ्यायला"दोघांनीही हेच उत्तर दिले.ती वाट पाहू लागली.
जवळ जवळ सहा महिने असेच गेले. मुलांना अजून वेळ मिळाला नव्हता.
पण आश्चर्य म्हणजे जे दोघे नातू आजोबांच्या क्रिया करायला धावत आले होते ते पण तिच्या मेसेज ला उत्तर देत नव्हते.
तिला आता एकटे राहायची सवय झाली होती..आताशा मुलांचे फोन पण महिन्यात एखादेवेळी येत होता जणू ते आईला तिथे घेऊन जायचे विसरूनच गेले होते.
अश्यात..तिच्या मैत्रिणीचा फोन आला. माझ्या बरोबर येशील का जरा डॉक्टर कडे. तिने लगेच हो म्हटले.."उद्या उठून मला पण अशी गरज पडू शकते ना?"नवऱ्याच्या फोटोला पाहून ती म्हणाली. जणू नवरा उत्तर देणारच होता.
त्या मैत्रिणीबरोबर हॉस्पिटल मध्ये शिरताना तिला शेजारून कोणी तरी अगदी जवळचे गेल्यासारखे वाटले..कोणी मुलगा नर्स होता, असे त्याच्या कपड्यावरून वाटले.
तीने लगेच छातीत जोरात कळ येते आहे असे नाटक केले. तो मुलगा धावत आला तिला मदत करायला..आणि तिला ओळख पटली.."अरे हा तर माझा रोहित?"
"काय रे तू इथेच आहेस, मग घरी का नाही राहत?", तिच्यातील आजी त्याला ओरडली.
"आजी तुमचा काहीतरी गैरसमज..", तो म्हणत होता तेवढ्यात तिच्यातल्या आजीने त्याच्या कानच धरला.
"का रे बदमाश...आजीला सांभाळावे लागेल म्हणून इथे राहतोस ना?"
तेवढ्यात ही गडबड ऐकून डॉक्टर बाहेर आले.
"अहो काकू, तो तुमचा नातू नाहीये..माझ्याकडे काम करणारा संजू आहे" डॉक्टर म्हणाले.
"काय..ही दोन्ही पोरं.."ती अजून पुढे सांगणार तोच डॉक्टरांनी तिला अडवले.
"आत चला सांगतो सगळे"
ती आणि मैत्रीण ,दोघी डॉक्टरांच्या मागे मागे आत त्यांच्या केबिनमधे गेल्या.
"काकू, मी काकांचा इलाज खूप वर्ष केला होता त्यामुळे मला त्यांच्या मनातले बरेच काही कळायचे..आणि काही गोष्टी ते त्यांच्या वाकड्या तोकड्या अक्षरात लिहून मला सांगायचे.
तिने हळूच उठून डॉक्टर आणि संजुला डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिले आणि घरी आली.
फोटो समोर उदबत्ती लावून म्हणाली,"तुम्हाला मेली, मेल्या नंतर पण माझी काळजी आणि ती ...आपली मुलं...नुसती मृगजळ ...हो.."
फोटोतले डोळे पण पाणावले आहेत असे तिला वाटले.
© सौ. अनला बापट
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
त्याच्या फोटोला हार घालून तिने दिवा लावला..नैवेद्याचे ताट ठेवले..आज त्याला जाऊन आठवा दिवस होता.."उद्या बहुतेक येतील मुलं" त्याला सांगत असावे असे ती फोटो समोर बोलली.
"छे ग, उगीच भलती आशा ठेवूच नकोस" वाटले जणू त्याचे डोळे असे बोलत होते.
'आणि हो ते खरे पण होते..गेले कित्येक वर्ष आपण दोघे वाटच पाहत आहोत मुलांची ..आज येतील उद्या येतील करत..कितीतरी महिने वर्ष उलटले..पण मुलं काही आली नाही.' मनातच तिने त्याला उत्तर दिले.
गेले दोन वर्ष त्यांच्यात असेच संभाषण होत होते. कारण दोन वर्षापूर्वी त्याला पक्षघात झाला आणि तो बोलायचे चालायचे बंदच झाला.
फक्त त्याचे डोळे बोलायचे आणि ती त्याच्या अर्थ काढून तशी वागायची.
तिला मात्र त्याचे बोललेले अगदी बरोबर कळायचे ..आणि का नाही कळणार..गेल्या साठ वर्षांपासून एकत्र होते दोघे.
तिला त्याच्या डोळ्यात मुलांच्या भेटीचे मृगजळ पण नेहमीच दिसायचे. ती त्याला अशी आशा ठेऊ नकोस म्हणून नेहमीच समजवायची..पण त्याची तृष्णा...त्याच्या जिवंतपणी तरी पूर्ण नाही झाली.
"आता आले तरी काय?" ती फोटो कडे पाहून म्हणाली.
एवढ्यात दारावर कोणीतरी ठक ठक केले .तिने दार उघडले.
दोन पोरं, एक बारा तेरा वर्षाचा आणि एक विसीच्या जवळपासचा. दोघे एकदम आत शिरली.
नीट लक्ष देऊन पाहिले तर ही तर आपलीच नातवंडं.
मनातून खूप आनंद झाला आणि खूप वाईट पण वाटले..तो असता तर..किती सुखावला असता.
"ग्रँड मा?... यू आर माय ग्रँड मॉम..राईट?" त्या दोघांपैकी एकाने तिच्याकडे लक्ष देऊन पाहून म्हटले.
"येस.. इफ यू आर माय संस सन.."
"मी रोहित विवेक दामले" दुसऱ्याने आपला हात पुढे करत तिला म्हटले.
"म्हणजे हा विवेकचा मुलगा आहे तर" मनात तिच्या आले.
"बरं तुझे आई वडील कुठे आहेत? एकटे आलाय का इथे?"
"हो आम्ही दोघे एकत्र एकटे आलो आहोत..आम्हला तुझा मेसेज कळला होता..ग्रँड पाच्या डेथ चा"
"तुम्ही एकटे कसे आणि कशाला आला?"
"ती एक गम्मत आहे...आम्हला तुझा मेसेज कळला..मी ह्याला..sorry ह्याची ओळख करून देतो, हा जिमी विनायक दामले..म्हणजे विनायककाकाचा मुलगा. ह्याला मराठी फक्त समजत, बोलता येत नाही..कारण ह्याची आई मराठी नाहीना."
"बरं मग" तिला आत्ता सूना कोण कश्या आहेत ह्या पेक्षा ही मुले इथे कशी आली ते माहीत करून घ्यायचे होते.
"तर आम्ही तो डेथमेसेज आपल्या व्हिसा ॲप्लिकेशन मधे टाकून आमचा व्हिसा क्लिअर करवला आणि आलो इथे.."
"अरे पण तुम्हाला तर काहीच माहीत नाही ना इथले? असे कसे सोडले तुमच्या आई बाबांनी तुम्हाला?"
"त्यांनी कुठे सोडले..आमचे आम्ही आलोय..तुला भेटायला"
"येस,ग्रँड मा.."जिमी ने पण रोहितच्या सूरात सूर पुरवला.
"कारण आम्हाला तुझ्या बरोबर काही दिवस राह्याचे आहे ,तुझ्या तोंडून गोष्टी ऐकायच्या आहेत आणि हो मस्त मस्त आईटम खायचे पण आहेत"रोहित पुन्हा म्हणाला.
आता तर तिला आनंदाने आकाश ठेंगणे वाटायला लागले.
"मुलं नाही आली तरी काय..आपल्याला हवे असलेले नातू आले ना!" म्हणत ती त्याच्या फोटो जवळ गेली. मुलांना जवळ बोलवून दोघांकडून नमस्कार करवला.
मग पुढचे पाच सहा दिवस सगळे विधी करण्यात गेले. रोहित मोठा नातू म्हणून तिने सगळे विधी त्याच्या कडून करवून घेतले.
मधे मधे मुलांचे फोन येत होते,पण दोन्ही नातवंडं त्यांच्या वडिलांना न सांगता आली आहेत ते माहीत असल्यामुळे ती नातवांबद्दल मुलांबरोबर बोलायचे टाळत होती..
"कशी आहेस,आता तरी एकटी आहेस तर इथेच येऊन रहा" अश्या सगळ्या गोष्टी दोघे करत होते, पण त्या वरवर आहेत हे तिला त्यांच्या तुरळक बोलण्यावरून जाणवत होते.
म्हणून ती बघुया,करते विचार असे काही तरी सांगून त्यांच्या तिथल्या आमंत्रणाला टाळत होती.
दिवसांच्या विधी संपल्या, ती दमली होती पण आनंदीत होती की त्याच्या इच्छे प्रमाणे त्याच्या रक्तानेच सगळे विधी केले म्हणून.
त्या संध्याकाळी रोहित म्हणाला, "आता आम्हाला जावे लागेल कारण आमची शाळा आणि इतर क्लासेस आहेत"
"हो बाळा,मला कळतंय..तुम्ही जाऊ शकता परत"
"मी उद्याचे बुकिंग करतो.." रोहित म्हणाला.
"ठीक आहे"
दुसऱ्या दिवशी ती एअरपोर्टवर त्यांना सोडायला जाणार होती पण फ्लाईट खूप उशीरा असल्याने रोहितने तिला "आम्ही जाऊ आमचे..टॅक्सी करून तू नको येउस एवढ्या रात्री"सांगून येऊ दिले नाही.
दुसऱ्या दिवशी तिला घर खायला उठले होते.."पांच सहा दिवसातच तिला मुलांची सवय झाली की काय?" असे वाटले तिला.
पण तिने मनावर ताबा घेऊन दोन दिवस अजून काढले..मग मात्र तिला वाटले की आपण जावे मुलांकडे.
तिने तसे फोन केले मुलांना.
"बरं वेळ मिळाला की येतो तूला घ्यायला"दोघांनीही हेच उत्तर दिले.ती वाट पाहू लागली.
जवळ जवळ सहा महिने असेच गेले. मुलांना अजून वेळ मिळाला नव्हता.
पण आश्चर्य म्हणजे जे दोघे नातू आजोबांच्या क्रिया करायला धावत आले होते ते पण तिच्या मेसेज ला उत्तर देत नव्हते.
तिला आता एकटे राहायची सवय झाली होती..आताशा मुलांचे फोन पण महिन्यात एखादेवेळी येत होता जणू ते आईला तिथे घेऊन जायचे विसरूनच गेले होते.
अश्यात..तिच्या मैत्रिणीचा फोन आला. माझ्या बरोबर येशील का जरा डॉक्टर कडे. तिने लगेच हो म्हटले.."उद्या उठून मला पण अशी गरज पडू शकते ना?"नवऱ्याच्या फोटोला पाहून ती म्हणाली. जणू नवरा उत्तर देणारच होता.
त्या मैत्रिणीबरोबर हॉस्पिटल मध्ये शिरताना तिला शेजारून कोणी तरी अगदी जवळचे गेल्यासारखे वाटले..कोणी मुलगा नर्स होता, असे त्याच्या कपड्यावरून वाटले.
त्या दोघी ओ पी डी मधे बसल्या होत्या..तेवढ्यात पुन्हा तोच मुलगा आला..हिला पाहून आपले तोंड लपवायाचा प्रयत्न करत होता..ते हिच्या लक्षात आले.
तीने लगेच छातीत जोरात कळ येते आहे असे नाटक केले. तो मुलगा धावत आला तिला मदत करायला..आणि तिला ओळख पटली.."अरे हा तर माझा रोहित?"
"काय रे तू इथेच आहेस, मग घरी का नाही राहत?", तिच्यातील आजी त्याला ओरडली.
"आजी तुमचा काहीतरी गैरसमज..", तो म्हणत होता तेवढ्यात तिच्यातल्या आजीने त्याच्या कानच धरला.
"का रे बदमाश...आजीला सांभाळावे लागेल म्हणून इथे राहतोस ना?"
तेवढ्यात ही गडबड ऐकून डॉक्टर बाहेर आले.
"अहो काकू, तो तुमचा नातू नाहीये..माझ्याकडे काम करणारा संजू आहे" डॉक्टर म्हणाले.
"काय..ही दोन्ही पोरं.."ती अजून पुढे सांगणार तोच डॉक्टरांनी तिला अडवले.
"आत चला सांगतो सगळे"
ती आणि मैत्रीण ,दोघी डॉक्टरांच्या मागे मागे आत त्यांच्या केबिनमधे गेल्या.
"काकू, मी काकांचा इलाज खूप वर्ष केला होता त्यामुळे मला त्यांच्या मनातले बरेच काही कळायचे..आणि काही गोष्टी ते त्यांच्या वाकड्या तोकड्या अक्षरात लिहून मला सांगायचे.
तुम्ही आठवा, ते वारले त्याच्या दोन दिवसा अगोदर मी त्यांना पाहायला आलो होतो..तेव्हा त्यांनी मला एक कागद दिला. तो हा कागद. ज्यावर मोडक्या तोडक्या अक्षरात आपल्या मुलांनी केलेली उपेक्षा लिहिली होती.
त्यांना तुमची खूप काळजी होती..तुम्ही खूप दुखी होणार मुले नाही आली तर हे त्यांच्या लक्षात आले होते.
म्हणून माझ्या कडून वचन घेतले की असे काहीतरी कर की तिला माझ्या जाण्यानंतर त्रास नाही होणार, म्हणून मीच संजू आणि माझ्या मुलाला म्हणजे जिमिला तुमच्याकडे पांच सहा दिवस तुमचे नातू बनवून पाठवले होते.
त्याअगोदर आजोबांच्या खोलीत असलेले तुमच्या नातवांचे फोटो पण मीच बदलले होते..मला माफ करावे",असे म्हणून डॉक्टर हात जोडून उभे राहिले.
तिने हळूच उठून डॉक्टर आणि संजुला डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिले आणि घरी आली.
फोटो समोर उदबत्ती लावून म्हणाली,"तुम्हाला मेली, मेल्या नंतर पण माझी काळजी आणि ती ...आपली मुलं...नुसती मृगजळ ...हो.."
फोटोतले डोळे पण पाणावले आहेत असे तिला वाटले.
© सौ. अनला बापट
सदर कथा लेखिका सौ. अनला बापट यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...