© वैदेही जोशी
कामावरून येताना बाजाराचा फेर फटका मारायचा...एक दोन दुकानात थोडावेळ दिवसभराच्या काय काय घटना हे जाणून घ्यायचं..आणि घरी यायचं हा महेशचा नित्यक्रम.
" मंदा..चहा टाक ग...मी आलोच फ्रेश होऊन.." दारातूनच चप्पल काढत महेश ने आवाज दिला.
हो...म्हणतं मंदाने चहाचे आधण गँसवर ठेवले...दोन कप चहा व्हायला असा कितीसा वेळ लागतो? महेश फ्रेश होऊन कपडे बदलून डायनिंग टेबल पाशी आला.
शांतपणे सगळं बोलून झालं कि पुन्हा दोघं आपापल्या कामाला लागायची..
"मंदा...ऐक ना."
"हंं...ऐकतेय"
"असं नाही.. नीट लक्ष देऊन ऐक. आज आठवडा बाजारात ना...भोपळे विकायला एक म्हातारी आली होती."
"बरं..बोला..ऐकतेय मी" हातातले काम बाजूला ठेवत मंदा म्हणाली.
"काय म्हणाली? "
"अगदी माझं हेच झालं. मी विचार करुन करून शेवटी त्या म्हातारीलाच विचारलं...तेव्हा तीने कृती करुन दाखवली...थांब तुला तसच दाखवतो. समोर उभी रहा...हात पुढे करं...आता हातावर मी ही साखर ठेवतो..ती खाण्यासाठी तोंडाकडे ने."
मंदाने तसं करताच..महेशने पटकन...तीच्या कोपरावर हात मारला...साखर तोंडात न जाता खांद्यावरून मागे सांडली.
"हे असं....नशीब करत....अस म्हणाली ती...काय झालं असेल ग?
मला राहून राहून तीला विचारावं वाटत होतं...पण...तीच्या पुढ्यात चार भोपळे होतै...ते ती आलेल्या गि-हाईकांना दाखवत होती..मग मी कसा वेळ घेणार तीचा?"
आता मात्र मंदापण विचारात पडली...हाताने दुसरं काम करायला घेतलं खरं पण डोक्यात मात्र तोच विषय फिरुन फिरुन येत होता.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महेश पुन्हा बाजारात त्याच जागेवर ती म्हातारी आजी आहे का बघायला गेला.
मंदा ला ठाऊक होते... आता हा तीची भेट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही... त्यामुळे तीने त्याला अडवलच नाही.
"आरं माझ्या लेकरा आत ये...मग देतू तूला पैसं.." त्यांचा त्यांचा संवाद सुरू ..
महेश बसलेल्या खूर्ची वरुनच सारं ऐकत होता..मनातून नाराजी दाखवत पोरगा तीथच उभा.
" तुम्ही पण आजीकडं पैसे मागायला आलात काय?"
अचानक आलेल्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं महेशला समजलं नाही... तो काही बोलणार..इतक्यात सोमूच बोलायला लागला.
" मला माहित हाय...माज्यासाटी आजी दरवेळीस कुणाना कुणाकडून पैसे घेते..आणि मग माळवं विकुन त्यांचे पैसे परत देते... तुमचं किती रुपये हायत? "
या ही प्रश्नाच उत्तर महेश विचार करून देणार...तोवरच सोमू..पुढे ..सुरू झाला " आमी दोगच राहतो इथं...माज्ये आईबाबा न्हाईत असं आजी सांगते...कुट गेले...असं इचारलं तर देवाच्या गावाला एवढच सांगते.
महेश त्याच्या बोलण्याच्या लकबीने गुंग झाला. मानेनच प्रतिसाद देत..त्याच्या चेहऱ्याकडे तो बघत होता.
पण आजीच्या चालीवरुन त्याच्या लक्षात आलं कि पैश्याची जोडणा झालेली दिसत नाही... तरीपण...आजी भराभरा घरात आली. "सोम्या...आरं शांताक्का नव्हती घरात..मग..".
हमसून हमसुन रडायला लागला "काय सांगू नको...दहा दिस झालं...काय सुदीक तू दिलं न्हाईस....ना खायाला काय नवं आणल न्हाईस...ना खेळाय काय आणलस..ना माला दप्तर आणलसं.." डोळ्यातुन गंगाजमुना अखंड वाहत होत्या.
महेश हे सारं तिथच बसून..साक्षीदार बनून पहात होता.
त्यामुळे दिवसभराचा कामाचा शीण निघून जायचा अन् बाजारातील वेगळ्या वातावरणामुळे मन फ्रेश व्हायचं. रुटिन मुळे सुट्टीच्या दिवशी तेवढाच मित्रपरिवार भेटायचा. एरवी पुर्ण दिवस कामाच्या ओझ्याखाली.
" मंदा..चहा टाक ग...मी आलोच फ्रेश होऊन.." दारातूनच चप्पल काढत महेश ने आवाज दिला.
हो...म्हणतं मंदाने चहाचे आधण गँसवर ठेवले...दोन कप चहा व्हायला असा कितीसा वेळ लागतो? महेश फ्रेश होऊन कपडे बदलून डायनिंग टेबल पाशी आला.
दोघांनी एकत्र चहा घ्यायचा हा दंडक..त्यामुळे चहा बिस्कीटांचा आस्वाद घेत..दिवसभराच्या गप्पा सुरु.
मंदा घरी काय काय केलं..कोण आलं गेलं हे सांगायची..आणि महेश कामावरचे ..बाजारातले सगळे किस्से सांगायचा.
शांतपणे सगळं बोलून झालं कि पुन्हा दोघं आपापल्या कामाला लागायची..
"मंदा...ऐक ना."
"हंं...ऐकतेय"
"असं नाही.. नीट लक्ष देऊन ऐक. आज आठवडा बाजारात ना...भोपळे विकायला एक म्हातारी आली होती."
"बरं..मग..."
"काही नाही....तुझं लक्ष नाहीय्ये.." महेश म्हणाला.
"बरं..बोला..ऐकतेय मी" हातातले काम बाजूला ठेवत मंदा म्हणाली.
"तीच्या एका वाक्यानं मनात घर केलय ग... किती सहजपणे बोलून गेली..ती पण माझ्यामात्र ते डोक्यातून काही केल्या जात नाहीय्ये."
"काय म्हणाली? "
"हातावर देऊन कोपऱावर मारू नये..माणसानं. नशिबी तेच हाय ते भोगावं"
"म्हणजै? मला नाही समजलं.."मंदा म्हणाली.
"म्हणजै? मला नाही समजलं.."मंदा म्हणाली.
"अगदी माझं हेच झालं. मी विचार करुन करून शेवटी त्या म्हातारीलाच विचारलं...तेव्हा तीने कृती करुन दाखवली...थांब तुला तसच दाखवतो. समोर उभी रहा...हात पुढे करं...आता हातावर मी ही साखर ठेवतो..ती खाण्यासाठी तोंडाकडे ने."
मंदाने तसं करताच..महेशने पटकन...तीच्या कोपरावर हात मारला...साखर तोंडात न जाता खांद्यावरून मागे सांडली.
"हे असं....नशीब करत....अस म्हणाली ती...काय झालं असेल ग?
मला राहून राहून तीला विचारावं वाटत होतं...पण...तीच्या पुढ्यात चार भोपळे होतै...ते ती आलेल्या गि-हाईकांना दाखवत होती..मग मी कसा वेळ घेणार तीचा?"
आता मात्र मंदापण विचारात पडली...हाताने दुसरं काम करायला घेतलं खरं पण डोक्यात मात्र तोच विषय फिरुन फिरुन येत होता.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महेश पुन्हा बाजारात त्याच जागेवर ती म्हातारी आजी आहे का बघायला गेला.
ती आजी आज आलीच नव्हती...ज्या दुकानाच्या समोर ती बसायची..त्या दुकानदाराजवळ विचारपूस केल्यावर समजलं की शेजारच्या खेडेगावातून ती येत होती.
दरवेळी काही तरी वेगवेगळ्या भाज्या तिच्याकडे असायच्या. नेहमीच एकाच ठिकाणी बसून भाजी विकत असल्यामुळे ज्याला त्याला चेहऱ्याने ती ओळखीची झाली होती..
सलग तिसऱ्या चौथ्या दिवशी ही आजी आली नव्हती म्हणून महेशला उगीच काळजी वाटायला लागली.
सलग तिसऱ्या चौथ्या दिवशी ही आजी आली नव्हती म्हणून महेशला उगीच काळजी वाटायला लागली.
काय झालं असेल? हा एकच प्रश्न सारखा मनात येत होता.
खरतरं भाजी विकायला खूप जणं येऊन बसतात..प्रत्येकाशी थोडच आपण असं बोलतो? किंवा अशी काळजी देखील कुणाची करत नाही... पण मग या आजीबद्दल कशाला उगीच????
पण...त्या प्रश्नाला उत्तर नसताना ही तो शेवटाकडे आला होता...ते काही नाही... आपण आजीची चौकशी करायला हवी...असं मनात ठरवले..
त्या दुकान दाराकडून त्या आजीची आणखी माहिती मिळवून महेश घरी आला...पण त्याचं लक्ष लागत नव्हतं.
त्या दुकान दाराकडून त्या आजीची आणखी माहिती मिळवून महेश घरी आला...पण त्याचं लक्ष लागत नव्हतं.
मनातले सगळे विचार मंदाशी बोलून तो म्हणाला, "मी उद्या तीच्या घरी जाऊन येतोच..त्याशिवाय मला चैन पडणार नाही."
मंदा ला ठाऊक होते... आता हा तीची भेट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही... त्यामुळे तीने त्याला अडवलच नाही.
कारण कुठलीही गोष्ट घटना आयुष्यात विनाकारण होत नाही हे तीला पक्क ठाऊक होतं...त्याचे परिणाम.. पडसाद हे ही ठरलेले विधिलिखित असते...मग उगीच प्रश्न.. उपस्थित करून किंवा मोडता घालून.. किंवा नकार देऊन ही काही फायदा नाही.. हे तीच्या वागण्यातुन तीने अंगिकारले होते.
त्यामुळेच असेल सहजीवनाची पंधरासोळा वर्ष अगदी समाधानाची होती..
ठरल्याप्रमाणे महेश दुसऱ्या दिवशी त्या आजीच्या गावाला गेला.
ठरल्याप्रमाणे महेश दुसऱ्या दिवशी त्या आजीच्या गावाला गेला.
खरतर टू व्हिलरने जेमतेम पंधरासोळा किलोमीटर वरच अंतर पार करायला कितीसा वेळ लागणार? पण आज उगीच ते अंतर खूप वाटत होतं.
आजी घरी असेल का.?..घरी कोण कोण असेल? त्यांना माझं असं..येणं...
पण पुढचे प्रश्न मनातच ठेवत त्याने गाडीच्या वेगात मनाला देखील सामील केले.
पत्ता विचारत विचारत तो अखेर आजीच्या घरी पोचला.
खरतरं खेडेगाव म्हणावं असच गावं होतं ते...सोयीसुविधा होत्या पण शेतकरी कुटुंब जास्त हे रहाणीमानावरुन समजत होतच.
आजुबाजुचा परिसर...शेती...लोकांच्या घरांवरून त्यांच्या जगण्याच्या स्वरूपाचा अंदाज येत होता..भाजीवाली आजीच घर कुठाय? असं फक्त एकदाच विचारावं लागलं.
मेन रस्ता सोडून दोन गल्लीबोळ पार करून एका शेताकडच्या घराजवळ त्याने गाडी थांबवली..
दारापाशी गाडी कुणाची आली म्हणून आजी बाहेर येऊन बघू लागली.
दारापाशी गाडी कुणाची आली म्हणून आजी बाहेर येऊन बघू लागली.
महेशने आजीला ओळखले..अन् हाक मारली.."आजी...तुम्हालाच भेटायला आलोय..."अस म्हणत गाडी उभी केली अन् आजीच्या घरात गेला.
घर म्हणावं का ? कष्टकरी माणसाच्या बाबतीत देव इतका निष्ठूर कसा असू शकतो?
गरीबीची सगळ्या खाणाखुणा ठळकपणे जाणवतील असच घर होतं.. उंबरठ्याच्या आत येतायेता मनातअनेक प्रश्नांनी फेर धरला.
आजीने चेहऱ्यावरून महेशला ओळखले.
आजीने चेहऱ्यावरून महेशला ओळखले.
बसा म्हणाली आणि पाणी आणायला म्हणून आत गेली..
तेवढ्यात एक काळासावळा मुलगा बाहेरून खेळ खेळुन धावत घरात आला.
त्याच्या एकूणच रुपावरुन घरच्या परिस्थिती ची जाणीव होत होती..
".आज्जे..ए..आज्जै...मला पाच रूपे दे..पलिकडच्या गल्लीत गोळावाला आलाय..मला खायाचाय...गोळा..." दारातूनच त्यानं आज्जीला फर्मान सोडलं.
"आरं माझ्या लेकरा आत ये...मग देतू तूला पैसं.." त्यांचा त्यांचा संवाद सुरू ..
महेश बसलेल्या खूर्ची वरुनच सारं ऐकत होता..मनातून नाराजी दाखवत पोरगा तीथच उभा.
पाण्याचा तांब्या महेशच्या हातात देत..आजी म्हणाली, " तुमी बसा.जरा...हा माझा नातू...सोमू. शाळत जातो..तिसरीच्या वर्गात हाय. सोमू..जरा पावन्यांबरोबर बोलत बस..म्या शेजारच्या आक्का कडून तुला पैसं आणून देतो.."
सोमुचा चेहरा खुलला...तो बरं म्हणून तीथच बसला.. आजी घराबाहेर पडली..
सोमू महेशकडे तुम्हीकोण? या नजरेने बघत होता.
सोमू महेशकडे तुम्हीकोण? या नजरेने बघत होता.
" तुम्ही पण आजीकडं पैसे मागायला आलात काय?"
अचानक आलेल्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं महेशला समजलं नाही... तो काही बोलणार..इतक्यात सोमूच बोलायला लागला.
" मला माहित हाय...माज्यासाटी आजी दरवेळीस कुणाना कुणाकडून पैसे घेते..आणि मग माळवं विकुन त्यांचे पैसे परत देते... तुमचं किती रुपये हायत? "
या ही प्रश्नाच उत्तर महेश विचार करून देणार...तोवरच सोमू..पुढे ..सुरू झाला " आमी दोगच राहतो इथं...माज्ये आईबाबा न्हाईत असं आजी सांगते...कुट गेले...असं इचारलं तर देवाच्या गावाला एवढच सांगते.
दुसऱ्याच्या मळ्यात राबुन ..माळवं विकुन...धुणीभांडी करुन माजी आजी जेवाय देते...आजी म्हनते...गरीब मानस देवाची लाडकी असतात...त्यांना काय वाईट होऊ नये..म्हनून देव जास्तीच पैसे..सुख देत न्हाई..नायतर मंग ती देवाला इसरत्यात"
महेश त्याच्या बोलण्याच्या लकबीने गुंग झाला. मानेनच प्रतिसाद देत..त्याच्या चेहऱ्याकडे तो बघत होता.
जे आहे ते सगळं..खर खरं सांगायचं...बोलायचं..इतकाच त्या निरागस मनाचा आचार...हेच खरं बोलणं..आजी येईपर्यंत पाहुण्यांशी आपणच बोलत बसायला हवं..आपलच काम आहे ते..अशा आविर्भावात सारं चालू होतं.
आजी पलिकडच्या गल्लीत गेलीय..म्हणजे नक्की कुठल्या हे त्याला ही माहिती नव्हतं.
आजी पलिकडच्या गल्लीत गेलीय..म्हणजे नक्की कुठल्या हे त्याला ही माहिती नव्हतं.
आता या माणसाचे आणि माझ्या गोळ्याचे पैसे आणायला वेळ तर लागणारच...असा मनात विचार करुन...तीथच दरवाज्यापाशी तो बसला.
हेतू हा कि आजी आलेली दिसली की पैसे घेऊन पळायला बरे...गारे गार..गोळा घ्यायला.
परत एकदा त्याने विचारले, "तुमचे किती पैसं हायत?"
महेश म्हणाला, "का रे.. तू देणार का?"
महेश म्हणाला, "का रे.. तू देणार का?"
तशी मान जोरात नकारार्थी हलवत म्हणाला, "नाय...चार भोपळे आजुन हायत घरात....तेच दे म्हनल असतं आजीला..ते घ्या आन् जावा ...परतच्याला आनी काय तरी दिलं आसतं"
एकदम समजुतदार माणसासारखं कधीतरी वागाय पाहीजे...आजीच वाक्य आता आटवलं..." जे आहे ते...असं बोलून पुन्हा दाराकडं लक्ष देत तो म्हणला इतक्यात आजी येताना दिसली.
पण आजीच्या चालीवरुन त्याच्या लक्षात आलं कि पैश्याची जोडणा झालेली दिसत नाही... तरीपण...आजी भराभरा घरात आली. "सोम्या...आरं शांताक्का नव्हती घरात..मग..".
तीच वाक्य पुरं होत न होतं..तेवढ्यात सोमू ने रडायला सुरुवात केली..
हमसून हमसुन रडायला लागला "काय सांगू नको...दहा दिस झालं...काय सुदीक तू दिलं न्हाईस....ना खायाला काय नवं आणल न्हाईस...ना खेळाय काय आणलस..ना माला दप्तर आणलसं.." डोळ्यातुन गंगाजमुना अखंड वाहत होत्या.
आलेल्या माणसासमोर काय नको...म्हणून आजी सोमूला जवळ घेत म्हणाली. "आणतो रं राज्या."
आता महेश ला अवघडल्या सारखं झालं...खरतर तो आजीची विचारपूस करायला..चौकशी करायला..एवढी गाडी हाकत आला होता...मनाची घालमेल थांबावी म्हणून.
आता महेश ला अवघडल्या सारखं झालं...खरतर तो आजीची विचारपूस करायला..चौकशी करायला..एवढी गाडी हाकत आला होता...मनाची घालमेल थांबावी म्हणून.
पण इथं सहजपणे घडणाऱ्या घटनेतून मनाला आणखीच . तरीही तो बसुन राहीला...कधी कधी..आपण कळसुत्री बाहुली कशी आहौत..हे नियती इतके सहज दाखवून देते..समोर घडणाऱ्या प्रसंगाकडे अलिप्त पणे पाहतोय..बास...
सोमूच्या रडण्याचा आवाज आता शब्दात बदलू लागला.
सोमूच्या रडण्याचा आवाज आता शब्दात बदलू लागला.
"आज्जे...तु कायम म्हणतीस ना..देवाकडं हात जोडुन मागितलं तर देव देतो...मग गेले महिनाभर मी रोज देवाकडं एक दप्तर मागतोय...तर आजुन देवाला द्याया जमलं न्हाई काय?
शाळा चालु होवून चार महिनं लोटलं...त्या रम्या..दाद्या कडं नवं चोख दप्तर हाय। ..तुला कवापासून सांगतोय...तर म्हनलीस...भोपळं येईस्तवरं थांब...आता तर आठ दिस झालं भोपळं काडुन...बाजारात जावून बी आलीस...तरी.." शब्द थांबले आणि सूर सुरू झाला.
आता मात्र आजीचे पण डोळे भरून आलं.
आता मात्र आजीचे पण डोळे भरून आलं.
"चार महिनं राबलो..निगुतीन निगा केली..जशी जमतील तशी माळवं करुन बाजारात इकुन आलो.
शेळ्या माकडांपासुन वेल वाचाय हवा म्हनून साडी गूंडाळून भोपळ्याकडं तेल घालून ध्यान ठेवलं...पन...परवाच्या बाजारात....केलेल्या कष्टाला बी मोलं नाय.
माज्या नातवाचं दप्तर किती रुपयाला म्हनून दुकानदाराला इचारुन भोपळ्याच भावं लावलं...पन मायबाप भोपळं विकत घेनाऱ्यांनी अर्ध्या रूपयाचं बी मोलं केलं न्हाई. कष्टापरी केल्यालं कष्ट बी कुनाला दगसलं न्हाई...राखणारा कसा राखतो..वाढवतो..याच बी मोलं न्हाई...माझ्या मनाला बरं वाटना...ऊर भरून ईत व्हता...म्हनून चार भोपळं इकून आलेलं पैस घेऊन घरी आलो.
वाटत येताना दप्तरवाल्या दुकानदाराला इचारलं...कितीला रं.. देनार..शाळेचं दप्तर...त्यानं सांगितलेलं आकड्या एवढ बी पैसं आलं नव्हतं पदरात.
वाटत येताना दप्तरवाल्या दुकानदाराला इचारलं...कितीला रं.. देनार..शाळेचं दप्तर...त्यानं सांगितलेलं आकड्या एवढ बी पैसं आलं नव्हतं पदरात.
सोमूचा चेहरा सारका डोळ्यासमोर येत व्हता...पण डोळ्यातल्या पाण्यानं पुढच दिसाय बंद झालं...झाला बाजार बास झाला..म्हनून घरी आलो...तवा पासून मनच व्हईना बाजारात जायाला....पोरं माजं आस लावून बसलय.
देवापुडं हात जोडून मागितलं की देव आपल्याला देतो..मीच सांगितलय त्याला...पन ते हात दुसऱ्या कुनाचे असतात..आन ती वेळ बी दुसरा कोन मनात आनील तवा येते....हे त्याला कसं समजावू? हातावर देवून...कोपरावर मारनारी माणसं जोवर हायीत..तोवर कष्टकऱ्यांच्या... आनी गरिबांच्या पोटाला आनी पाठीला देवाचा आशीर्वाद मिळायचा नाय...हेच खरं."
डोळ्यांना पदर लावत आज्जी सोमूच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाली, "कवा तरी तुच मोठा होवून दुसऱ्या च्या हातात देणारा हो...मग माझं कष्ट फिटलं बग."

आपण आलो याचं कुठे तरी त्याला समाधान होत.
सोमूच्या हातावर गोळ्यासाठी पैसे ठेवुन...तो आजी ला म्हणाला " आजी...येतो मी...उद्या आमच्या गावच्या बाजारात चारी भोपळे घेऊन ये.
देवानं हातावर देऊन तोंडात घास घालायला पण माणसाला शिकवलय...सोमुच्या पाठीवर दप्तराचा आशीर्वाद... तो देवच देईल"
समाप्त
© वैदेही जोशी
सदर कथा लेखिका वैदेही जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.