© सौ.प्रतिभा परांजपे
शोभा लॉनचे गेट उघडून आत आली. दारात मोटरसायकल पाहून,या वेळेस कोण असेल? असा विचार करत तिने बेल चे बटन दाबले.
दारात तिला पाहून"ही बघ आलीच शोभा" म्हणत, आईंनी तिला आत घेतले..
सोफ्यावर आरामात बसलेल्या शशिकांत ना पाहून तिला चीड आली.
आता हा का बरं आला आहे?
विचार करत ती स्वतःच्या बेडरूममध्ये गेली व आतून दार बंद करून घेत पलंगावर धपकन बसली.
बाहेर शशी ला पाहून तिच्या जिवाचा संताप झाला होता, स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही असे ठरवून ही त्रास होत होता.
शोभा पलंगावर सुन्नपणे बसून राहिली. बाहेरून बोलण्याचे आवाज येण बंद झाले.

बरेच वेळाने मोटरसायकलचा जाण्याचा आवाज ऐकून मग ती दार उघडून बाहेर आली.
रात्रीचे जेवण सासु सुने न गुपचूप केले.
रात्रीचे जेवण सासु सुने न गुपचूप केले.
आई टीव्हीवर मालिका पाहत होत्या. शोभा चे मन त्यातही लागत नव्हते बरेच वेळ मग ती स्वयंपाक घर आवरत बसली.
सासुबाई झोपायला गेल्याचे पाहून तीही बिछान्यात पडली.
झोप तर येणारच नाही माहित होते, शशिकांत का बरं आले होते? आता काय हवे आहे त्यांना?
चार-पाच वर्षांनी त्यांना इतक्या जवळून पाहिलं, किती वाळलेले दिसत होते . विचार करता करता शोभाला शशीकांतची पहिली भेट आठवली.
शोभा ,माहेरची कुमुद साने, दोघी बहिणीतली धाकटी. एक लहान भाऊ. वडिलांचे शिवण्याचे दुकान त्यामुळे दोघी बहिणींना अभ्यासाबरोबरच शिवणाचे कामही छान येत असे.
ताईचे लग्न झाले तेव्हा कुमुद बी.ए.करत होती, तिला बी. एड करायची ही खूप इच्छा होती पण भावाचे शिक्षण व इतर खर्च पाहता तिने शाळेत नोकरी धरली एक-दोन वर्षातच तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली.
शशिकांत यांच्या आईने तिचे रूप पाहून शोभा हे नांव ठेवून आपली सून करून घेतली. शशींची नोकरी बऱ्यापैकी होती. घरी सासू ,सासरे, शशिकांत व शोभा, असे चौकोनी कुटुंब खाऊन पिऊन सुखी.
माहेरून गरीबीची सवय असल्याने शोभाच्या फार अपेक्षा नव्हत्या, फक्त आपले स्वतः चेएक घर असावे ,म्हणून थोडा हातभार या विचाराने ती नोकरी बरोबर शिवण कामही करत असे.
शशींचे खूप प्रेम होते शोभा वर. दोघांचा सुखाचा संसार होता. पुढे मीनल चा जन्म झाला.
पण या सुखा ला अचानक दृष्ट लागली. सासरे कॅन्सरने आजारी झाले त्यांच्या आजारपणात बराच पैसा लागला शशी व शोभाने जमलेले सर्व पैसे खर्च केले, पण तरीही सासरे नाही वाचले.
जवळचा पैसा संपला व कर्जही झाले .तेव्हा परत नव्याने सुरुवात. तशात शोभाला परत दिवस गेले. तिला दगदग सहन होत नसे. घर आणि नोकरी संभाळणे कठीण जात असे.
शशी आताशा घरात फार नसायचे आफिस मधे ओव्हर टाइम असतो म्हणाले, पण तेही तिने सहजच घेतले. घरात सासूबाई होत्या.त्या शोभाची काळजी घेत.
एक दिवस शोभा ची तब्येत खूप बिघडली व मिस केरेज झाले. हा एक मोठा धक्का होता पण त्यालाही एक नियती म्हणून तिने स्वीकारले.

शोभा ची तब्येत आता खूप खालावली ,डॉक्टरांनी तिला सक्तिचा आराम सांगितला. तब्येत सुधारण्यासाठी तिने 15 दिवसाची सुट्टी घेतली.
घरी असताना शोभाला शशिकांत कडून खूप अपेक्षा होत्या , पण या आठ दहा दिवसात तिला जाणवले कि शशी तिच्यापासून दुरावत चालले आहेत. पण तब्येत ठीक नसल्याने तिने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले ,खरेतर तिला आत्ताच त्यांनी जवळ असावे असे वाटत असे .
पुढे सुट्टी संपली, तशी ती परत उत्साहाने कामाला लागली.काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता.
शशीकांतचे आपल्यापासून दूर दूर राहणे हळूहळू शोभाच्या लक्षात येऊ लागले.
एकदा खिशात सिनेमा ची दोन तिकिटे पाहून तिने विचारता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

आता शोभाच्या मनात शंका येऊ लागल्या मग तिने सरळ सरळ शशिकांत विचारता , त्यांनी सांगून टाकले कि ते ऑफिसमधल्या माया बरोबर असतात.
सगळेच उघडकीस आले. त्या नंतर शशिकांत आणखिनच उधळल्या सारखे वागू लागले.
शोभा च्या मनाचा ते जराही विचार करत नसत.
शोभा मनातून खूप दुखावली. तिने सर्व प्रयत्न करून पाहिले. शशिकांत च्या आईने पण खूप समजावून पाहिले. शोभाला बाहेर लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणे कठीण झाले.
काय होईल याचा विचार करता करता आता रात्र रात्र झोप लागत नसे
एक दिवस शशिकांतनी, मी तुला सोडून माया बरोबर राहणारअसे स्पष्ट सांगितले.
शशिकांत ने दुसरे घर घेऊन माया बरोबर राहणे सुरू केले .शोभा हादरूनच गेली,
मीनल मोठी होती आहे ,तिच्या मनावर वाईट परिणाम होणार. असा विचार करून तिने मिनलला नवोदय शाळेच्या हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. घ

रापासून दूर राहिल्यावर मीनल ला या सर्वाचा त्रास व्हायला नको व तिच्या अभ्यासावरही परिणाम व्हायला नको असा विचार करून तिने आपल्या मनाला समजावले.
पुढे एक दिवस शशिकांत ने सही करून डिव्होर्स पेपर आणले
शोभा शाळेत गेलेली होती घरी येताच तिला सासूबाईंनी पेपर्स दाखवले.
हा आणखीन एक धक्का होता, पण त्याबरोबरच तिच्या स्त्रीत्वाचा अपमान होता ,एक फसवणूक होती स्वतःला हवे म्हणून सोडून द्यायचे?

मुलगी, स्वतःची आई कुणाचाही विचार न करता मन मानेल तसेच वागायचे? मग तिने चिडून सही करण्यास नकार दिला. डिव्होर्स पेपर अलमारी अजूनही तसेच ठेवलेले आहे. ह्या गोष्टीला आता चार वर्ष होत आली.
शशीकांतना त्याने काहिच फरक पडला नाही
शोभा ला आता घर चालवण्यासाठी व मिनलच्या शिक्षणासाठी पैशाची गरज होती.

तिने शिवणांचे जास्तीचे काम घ्यायला सुरुवात केली.
एक वर्ष पूर्ण झाले तसे तिने स्वत च बुटिक सुरू केलं. बुटिक चे काम जोमाने सुरू झाले.
आता कुठे तिने स्वतःला जरा सावरले होते नि मधेच हे वादळ परत आले.
सकाळी सासू बाईंनी विषय काढला, "शशी परत यायचे म्हणतोय तुझा काय निर्णय आहे", काल तुझ्याशी त्याला बोलायचे होते कदाचित तो आज परत येईल.
शोभा ने आता मात्र मनाशी नक्की केले एकदाचा सोक्षमोक्ष लावायचा.
संध्याकाळी तिच्या अंदाजाप्रमाणे शशी बॅग घेऊन आलेले होते. यावेळेस ती तिथेच बसली.

सासुबाई पण तिथेच होत्या या दोघांना एकट बोलायला मिळावे म्हणून" मी जरा देवळात जाऊन येते म्हणाल्या"
नको आई तुम्ही इथेच थांबा, मला तुमच्या समोरच बोलायचे आहे असे म्हणताच त्या बसल्या.
शोभाने डिव्होर्स पेपर आणले त्यावर स्वतःची सही करत शशी कडे देत म्हणाली," यावेळेस मी तुम्हाला सोडते आहे इतके दिवस तुम्ही माया ला सोडून स्वतः परत याल या आशेवर मी होते. कधीतरी तुम्हाला खर्या प्रेमाची जाणीव होईल.

पण तुम्ही नाही तिला सोडले ,तिने तुमच्या या दिलफेक स्वभावाला ओळखले व तुम्हाला सोडले आहे. कारण तुम्हाला कुठलेही बंधन नको असते, व आता कुठेच थारा नाही म्हणून तुम्ही इथे आला. पण तुमचा काय भरोसा हो?
परत एखादी कोणी आणखीन छान भेटली तर परत तेच होणार. आता मला हा धरसोडपणा नको आहे. मी खूप स्वप्न पाहिली होती आपल्या सुखी संसाराची पण ती सगळी धुळीला मिळाली, तुम्ही जाऊ शकता पेपर्स वर मी सह्या केल्या आहेत आपला संबंध संपला." असे म्हणत शोभा आत निघून गेली.
शशीने आईकडे पाहिले, आईने त्यांची बॅग स्वतः दाराबाहेर ठेवली ते पाहून शशी समजून गेले व दाराबाहेर पडले तसे दार लावून आई मागे वळल्या.
शोभा मागेच उभी होती. तिला जवळ घेत त्या म्हणाल्या जरी तो माझा मुलगा असला तरीही त्यांच्या या स्वैर वागण्याला मी कधीच पाठिंबा देणार नाही. कारण हा" एका स्त्रीच्या अस्मितेचा प्रश्न आहे " तेव्हा मी सदैव तुझ्या बरोबरच आहे, तू स्वतःला एकट समजू नको.
"आई " --म्हणत शोभा ने त्यांना मिठी मारली.
समाप्त

सदर कथा लेखिका सौ.प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...