तिचं मातृत्व

©सौ. प्रतिभा परांजपे



आज पूर्वीची लगबग चालली होती. आजचा दिवस तिच्या साठी खास होता.

आज ती आपलं नृत्य आपल्या आवडत्या नर्तकी मधुमती समोर पेश करणार होती .

आई---,' कार्यक्रम बरोबर अकरा वाजता सुरू होणार आहे, मधुमती मेडम येणार आहे परिक्षक म्हणून'.
"अग बया मधुमती म्हणजे त्या-- प्रसिद्ध नृत्यांगना टीव्हीवर येतात त्या??

" हो मग ,--तेव्हा तुला यायचेच आहे . सर्व प्रतियोगींच्या पालकांना निमंत्रण दिले आहे."

"अगं एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये माझ्यासारख्या अडाणीचं  काय काम?"

'तू माझी माय आहेस ना एवढं पुरेसं आहे. तुझी सीट नंबर पंधरा आहे. माझे लक्ष असेल तू जर नाही आलीस तर!'

' तर काय??'

" मी प्रतियोगितेत डांस करणार नाही, सांगून ठेवते"

"अगं बया "असं नको करू एवढी तयारी झाली आहे, मास्टरजींचा तुझ्यावर विश्वास आहे."

'तुला यावेच लागेल आधी मला वचन दे,'

"बरं बेटा मी येईन नक्की, आता जेवण कर आणि शांत झोप तुला आरामाची गरज आहे. "

चंदाने आपल्या मुलीला, पूर्वीला वचन दिले, पण मनात चलबिचल होत होती, एकीकडे मुलीचे कौतुक पाह्यची इच्छा तर दुसरीकडे मनात चिंता .

तिला पाहून लोकं पूर्वीला कायबाय बोलायचे आणि त्याचा परिणाम तिच्या नृत्यावर व्हायचा, पण लेकीचा आनंद आणि कौतुक पहायची ही इच्छा होती..

रात्रभर झोप येत नव्हती. तिला मागचे सर्व आठवू लागले.

चंदा तेव्हा लहान वयाची होती. नेहमीप्रमाणे दिवसभर काम करून रात्रीच्या लोकलने माहीमला आपल्या वस्तीकडे येत होती. आज फार काही कमाई झाली नव्हती.

डब्यात एक दोनच पॅसेंजर होते तेही टवाळखोर दिसतं होते. ट्रेन थांबली तशी चंदा दाराकडे जाऊ लागली अचानक लहान बाळाच्या रडण्याचा आवाजाने तिचे लक्ष गेले .

एक छोटीशी बच्ची चिरगुटा मध्ये बर्थ खाली रडत होती. कोणीतरी सोडून गेलेले दिसत होते. आजुबाजुला कोणी नव्हते.

'आपल्याला काय मतलब' असा विचार करत चंदा दारापर्यंत आली, तेवढ्यात दोन गुंड मवाली डब्यात चढताना दिसले, ती पटकन मागे धावली व बाळीला पदराखाली घेऊन आपल्या छाती ला लावून बसली.

तिच्या छातीला लागताच बाळीचे ओठ तिच्या स्तनाला चोखू लागले, दूध नव्हते तरीही ती बच्ची शांत झाली. तो तिच्या ओठांचा स्पर्श चंदाला जणू मातृत्व देउन गेला.

त्याच क्षणी तिने तिला आपली बेटी मानले व वस्ती वर घेऊन आली.  सर्व हकीकत तिने सांगितली.
मावशी, अक्का सर्वांना तिने सांगितले" ही आपली लेक आहे पूर्वी, आपण हिला सांभाळणार."

"अगं आपलं पोट भरण जड जातंय आपण हे असे आणखीन वर ही जिम्मेदारी,??'

"मावशी--" देवानं तिला माझ्या पदरात घातले, काहीतरी विचारच केला असणार. मी हिला खूप शिकवेल"

"पहा बाय ,आम्ही काय बोलू.??

तेव्हापासून चंदा पूर्वीची आई झाली.

पूर्वीला दिवसभर संभाळून आपला रोजचा धंदा संभाळणे म्हणजे चंदाची तारेवरची कसरत होती.

मावशी व अक्का घरीच असत त्या थोडं फार लक्ष देत पण त्यांना ही पोरगी कटकट वाटत असे.

बरेचदा 'सोडून ये ग हिला कशाला जीव लावतेस' म्हणून ही पाहिलं .

त्यातून ही कुणाची ?कुठली? पळवून तर नाही आणली? म्हणून पोलिस त्रास देणार अशी भीतीही घातली.

मग चंदाने सदू हवालदाराला सगळं सांगून 'आता ही लेक माझी हाय' म्हणून विनंती केली. तेव्हा त्याने पैसे घेऊन तोंड बंद ठेवले.

पूर्वी पाच सहा वर्षाची झाली. तिला चंदाने शाळेत घातले.

आता खरी परीक्षा होती. शाळेच्या हेड बाईंना तिने पालकाच्या जागी आपले नांव घालण्याची विनंती केली .बाई समजूतदार होत्या. 
काही कायदेशीर बाबी पाहून त्यांनी चंदाला पूर्वीची पालक म्हणून फार्म भरून दिला.

पाहता पाहता पूर्वी मोठी होत गेली.

आता शाळे मध्ये तिच्या मैत्रिणी व इतर मुले तिच्या आईला पाहून कुजबुजत.

इतर मुलांप्रमाणे आपल्याला बाबा नाही , घरात ही मावशी,अक्का विचित्र वागताना वाटायच्या.

मग ती शाळेत जायला कंटाळा करु लागली . अभ्यासात ही तिच चित्त एकाग्र होत नसे.

तिलाही बरेच प्रश्न पडत असत .

इतर मुलांचे आईबाप व आपली आई यातला फरक तिला कळू लागला.

अक्का, मावशी त्यांची रहाणी, ते टाळ्या वाजवून नाचणे तिला ते सर्व विचित्र वाटत असे, ती चंदाला विचारी .मग चंदाने तिला प्रेमाने खरखरं सर्व सांगितल.

आता पूर्वीला ही सत्य परिस्थिती व चंदाच्या प्रेमाची जाणीव झाली .

पूर्वी अभ्यासात तर हुशार होतीच पण तिला नृत्याची विशेष आवड होती.

चंदाने तिला नृत्य शिकायला म्हणून क्लासला घातले. हळूहळू पूर्वी एक एक पायरी चढत चढत नृत्य कलेत प्रवीण झाली.


सकाळच्या सूर्याची लाली जशी हळूहळू वाढत जाते व त्याचे तेज जाणवू लागते, त्याच प्रमाणे पूर्वीच्या कलागुणांची प्रभा हळूहळू पसरू लागली.

वस्तीवरील लोक आपल्या लेकी कडे वाकड्या नजरेने पहात नाही न या करता चंदा डोळ्यात तेल घालून पूर्वीकडे लक्ष देत असे.

पूर्वी आता नृत्यकलेत पारंगत झालेआंतरशालेय नृत्य स्पर्धेत नेहमी प्रथम पुरस्कार मिळू लागला .आणि आज , तिला महाविद्यालयीन वार्षिक समारोहात नृत्य करायचे होते.

इतर कलाकारांनी आपले नृत्य सादर केले त्या नंतर पूर्वीचे नांव अनाउन्स झाले.

पूर्वी स्टेजवर आली. तिने नृत्य करायला सुरुवात केली.

चंदा डोळे भरून पूर्वीचे नृत्य पाहत होती तिची चिमुकली आज किती मोठी झाली. आज तिची मेहनत सार्थकी लागली होती.

नृत्य संपल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला ते पाहून चंदाच्या डोळ्या त आनंदाश्रू आले .

कार्यक्रम संपल्यावर मुख्य अतिथी मधुमती देवींनी पूर्वीच्या नृत्याचे भरभरून कौतुक केले व तिला आपल्या डांस गृप मधे येण्याचे निमंत्रण दिले.

त्यांच्या भाषणातून त्या म्हणाल्या" आपल्या नृत्य प्रवासात आपल्या आईचा फार मोठा वाटा असतो" मलाही माझ्या आईने च प्रेरणा दिली तिच्या मुळे मी इथं पर्यंत पोहोचले."

पुरस्कार वितरणाची घोषणा होताच कार्यक्रमाच्या संचालकांनी पूर्वीचे नांव घोषित केले.

ते म्हणाले, "पूर्वी ने आमच्या या महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. अभ्यासाबरोबरच तिने नृत्य कलेतही प्राविण्य मिळवले. आमच्या विद्यालयाला तिचा अभिमान आहे तरी तिने मेडल घेण्यासाठी स्टेजवर यावे."

पूर्वी स्टेजवर येऊन म्हणाली, "सर्व प्रथम मी आपल्या महाविद्यालयातिल सर्व गुरु जनांना तसेच माझे नृत्य गुरू यांना वंदन करते. आज जे मला मॅडल मिळणार आहे ते मी आपल्या आईच्या हस्ते घेऊ इच्छिते ..हे मेडल, ही ट्राफी माझ्या आईच्या माझ्यावर च्या विश्वासाची जीत आहे. तिच्या मेहनती मुळे मी इथं वर पोहोचले."

तेव्हा मग संचालकांनी पूर्वीच्या आईला स्टेजवर येण्याची विनंती केली .

चंदाचा विश्वासच बसत नव्हता, तिचे पाय जड झाले सर्वांसमोर जाणे अवघड वाटू लागले तेव्हा मात्र पूर्वी ने स्टेजवरून खाली येत चंदा चा हात धरला व तिला स्टेजवर आणले.

सर्व प्रेक्षक आश्चर्याने चंदाकडे पाहत होते, पुर्वी म्हणाली" माझी आई ही जरी जगा साठी एक किन्नर आहे तरी माझ्यासाठी तीच सर्वकाही आहे .

आज मी तिच्यामुळेच आपल्यासमोर आहे. जिने मला जन्म दिला तिला मी नकोशी होते पण हिने मला जीवन दान दिले मला या माझ्या आईचा अभिमान आहे '.

'जन्म न देताही तिने जो मातृत्व भाव माझ्यासाठी दाखवला अगदी विपरीत परिस्थितीत ही न घाबरता तिने माझे संगोपन केले आणि मला इथ पर्यंत आणल त्याचा हा सन्मान आहे." असे म्हणताच सर्वप्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दोघींचे कौतुक केले.. 

आज चंदातल्या मातृत्वाचा जगा समोर सन्मान झाला.

समाप्त
©सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा

संध्याकाळ


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने