©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
एके दिवशी सकाळी आकाश बेडरूममध्ये कुणाशीतरी फोनवर बोलत होता आणि त्यातली काही वाक्य साक्षीला ऐकू आली.
'हा गं मी सात वाजता पोचतोय, नेहमीच्याच कॅफेमध्ये,' .....हे ऐकून साक्षीला धक्काच बसला.
( नेहमीच्याच कॅफेमध्ये ) म्हणजे हा नेहमी कोणत्या मुलीला भेटतो असे विचार तिच्या मनात येवू लागले.
साक्षी मिडलक्लास घरातली एक मुलगी, शिक्षण पंधरावी …दिसायला मात्र खूप सुंदर , त्यामुळेच श्रीमंत आकाशने तिच्या त्या दिसण्यावरचं भाळून एका मित्राच्या लग्नात साक्षीला पहिले आणि तिला मागणी घातली होती.
आणि मग सहा महिन्यांनी त्यांचे लग्न झाले.
आकाशचा स्वतःचा खूप मोठा बंगला, स्वत:ची कार होती, घरी दोन नोकर होते.
साक्षीलाही त्याने एक वेगळी गाडी घेवून दिली होती. घरी स्वयंपाक करायला देखील एक बाई होती, सगळं अगदी सुखवस्तू होतं.
पण आज सकाळी आकाश फोनवर बोलत असलेली वाक्य तिच्या डोक्यात घोळत होती.... तिला काय करू सुचत नव्हते. मग तिने ठरवले आज आकाश ऑफिसमधून निघण्याच्या वेळेवर जावून गुपचूप तिथे लपून राहावं आणि ह्या गोष्टीचा छडा लावावा.
सहा वाजण्याआधीच तिनं तिची गाडी काढली आणि ती निघाली.

ती आकाशच्या ऑफिस जवळ जावून लपून राहिली, तिने स्कार्फने तिचा चेहरा झाकला होता.
आकाश साडे-सहाच्या दरम्यान खाली आला. त्याने त्याची गाडी काढली आणि तो निघाला.
साक्षीने त्याचा पाठलाग केला.
थोड्याच वेळात तो एका कॅफेजवळ पोचला, त्याचवेळी एक साधारण पंचविसीतली मुलगीही तिथं आली.
ती आणि आकाश हातात हात घालून दोघं अगदी सहजपणे कॅफे मध्ये गेले. साक्षी थोडावेळ बाहेरच गाडीमध्ये बसून होती.
त्यानंतर अर्ध्या तासाने दोघं निघाले, साक्षीने पुन्हा पाठलाग केला आणि त्यानंतर दोघं एका हॉटेलमध्ये गेले, रीसेप्शन मधून आकाशने एक चावी घेतली आणि ते दोघे सरळ वरच्या मजल्यावर गेले.....
आता मात्र साक्षीला रडू आले.. स्वत:ला कसंबसं सावरलं तिनं.
आता मात्र साक्षीला रडू आले.. स्वत:ला कसंबसं सावरलं तिनं.
ती काही वेळ गाडीत बसून राहिली आणि मग घरी येऊन जोरजोरात रडू लागली.
बराच वेळ रडल्यावर ती शांत झाली आणि विचार करू लागली.
बराच वेळ रडल्यावर ती शांत झाली आणि विचार करू लागली.
लग्न झाल्यानंतरच्या ह्या तीन वर्षात ती कुठेच कमी पडली नव्हती, मी आकाशची खूप काळजी घेते, त्याला काय हवं नको ते सगळं बघते. तरीही आकाशला अशी दुसरी स्त्री का आवडावी? मी जरी खूप मॉडर्न राहत नसले तरी मी खूप सुंदर आहे.
थोड्या वेळाने साक्षीने तिच्या चुलत बहिणीला ( शरयू ) ला फोन लावला. शरयू तिची बहिण आणि खूप चांगली मैत्रीण पण होती....साक्षीने सर्व हकिगत शरयूला सांगितली.
शरयूने साक्षीला समजंवत म्हटलं, ‘‘तू शांत हो आधी रडू नकोस. स्वतःला सावर बघू....चूक त्या आकाशची आणि इथे तू त्याच्या नावाने रडत् बसली आहेस.... आकाशला चांगला धडा शिकव त्यापेक्षा.... पोलिसात तक्रार कर सरळ."

साक्षी बोलू लागली, "तू बोलते आहेस ते खरं आहे पण मी असं नाही करू शकणार…या श्रीमंत जगण्याची ह्या सगळ्या सुखसोयींची मला सवय लागलीय… शिक्षण पण पंधरावीचं आहे. मी कुठला हि कोर्स सुद्धा केला नाही …मला असा पटकन् निर्णय घेता येणार नाही. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, तोच असा वागला. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. " असं बोलून साक्षीने रडत फोन ठेवला...
साक्षी आठवू लागली, यापूर्वीही दोन वर्षापूर्वी काव्या नावाच्या एका मैत्रिणीचे त्याला सतत फोन येत होते, पण तेव्हा साक्षीने विचारल्यावर आकाशने तिची क्षमा मागितली होती. आणि बोलला होता त्याची मैत्रीण काव्या अमेरिकेत असते आता इथे आलीय तर रोज फोन करते, भेटत असते असं.

पण तेव्हा साक्षीने ते मान्य केले. कारण ती आकाशवर मनापासून प्रेम करत होती...आणि तिचा आकाशवर खूप विश्वास होता.. त्याच्यामुळेच त्यावेळी तिने तो विषय खूप लाईटली घेतला.
पण आज आकाश आणि त्या मुलीला हॉटेलमध्ये जाताना बघून तिला त्याचा खूप राग आला. कारण आज जे काही होतं, ती फक्त वासना होती. शारीरिक सुखाची ओढ होती.
पण आज आकाश आणि त्या मुलीला हॉटेलमध्ये जाताना बघून तिला त्याचा खूप राग आला. कारण आज जे काही होतं, ती फक्त वासना होती. शारीरिक सुखाची ओढ होती.
हॉटेलमध्ये ते दोघे एका रुममध्ये ह्याची तिला कल्पनाच करवत नव्हती.
आकाश रात्री उशीरा साडे- अकरा च्या दरम्यान घरी आला...जणू काहीच घडलं नाही असं वागत होता.
आकाश रात्री उशीरा साडे- अकरा च्या दरम्यान घरी आला...जणू काहीच घडलं नाही असं वागत होता.
"अगं साक्षी आजची मीटिंग खूपच लांबली गं, तुला फोन करायला सुद्धा वेळ मिळाला नाही बघ म्हणून (लेट होईल, तू जेवून घे ) ..... असा नुसता मेसेज केला मी, तू जेवलीस ना". आकाश असं साक्षीला विचारत होता पण तिचं आज त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.
आणि मग तिने अचानक एक प्रश्न विचारला, "कुठे होती मीटिंग?"
आकाश बाचकला...साक्षीने ते बघितले.... थोड्या वेळाने तो बोलला... ऑफिसमध्येच होती.
दुसर्या दिवसापासून साक्षी बददली, तिने आकाशशी बोलणे कमी केले..
दुसर्या दिवसापासून साक्षी बददली, तिने आकाशशी बोलणे कमी केले..
तिने अजून एकदा ह्या सगळ्या विषयाची शहानिशा करून बघू असे ठरवले.
ती सतत दोन – तीन दिवस त्याच्या ऑफिसबाहेर तो सुटण्याच्या वेळेआधीच जावून गुपचूप लपूण त्याच्यावर लक्ष ठेवत असे. आकाश रोजच त्या मुलीला भेटत असे.
आतां मात्र काय करावं असं साक्षीला झालं होत. हे एवढं मोठं घर सोडायचं, घटस्फोट घेवू का.... पण मग जगू कशी, नोकरी केली असती पण आता एवढ्या वर्षाच्या गॅपनंतर लगेच नोकरी कशी मिळेल.
आतां मात्र काय करावं असं साक्षीला झालं होत. हे एवढं मोठं घर सोडायचं, घटस्फोट घेवू का.... पण मग जगू कशी, नोकरी केली असती पण आता एवढ्या वर्षाच्या गॅपनंतर लगेच नोकरी कशी मिळेल.
माहेरी तशी गरिबीच होती, वडील साध्याशा कंपनी मध्ये नोकरीला होते, त्यांनचंचं कसं बसं भागत होत त्यात.. त्यात मी कुठे माहेरी जावू..
आईला सांगून बघू का... अशा विचारात तिने आईला फोन केला ..
आईला सांगून बघू का... अशा विचारात तिने आईला फोन केला ..
आई सगळं ऐकून म्हणाली, "अग गर्भश्रीमंत माणूस आहेत जावई, त्यांच्या मीटिंग असतीलचं ना... तू नको ते विचार करू नकोस. एवढी श्रीमंती, सगळं सुखवस्तू , सुखासीन आयुष्य असताना हे नको ते खूळ काय आलंय तुझ्या डोक्यात?"
आईला जावयाची श्रीमंती जास्त महत्वाची वाटली.. साक्षीने फोन ठेवला ..... रात्रभर ती तळमळत होती…काय करावं साक्षीला समजत नव्हतंं.
शेवटी एक महिन्याने तिचा निर्णय झाला...... तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.
शेवटी एक महिन्याने तिचा निर्णय झाला...... तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.
आकाशला धडा शिकवणारचं असा तिने निश्चय केला. त्याला स्वत:च्या श्रीमंतीचा माज आहे… ती श्रीमंती तशीच त्याला राहूदेत ... असा तिने विचार केला.
आकाशने पुन्हा क्षमा मागितली तर ती डळमळेल म्हणून त्याला न सांगताच ती घराबाहेर पडली.
घर सोडलं आणि आता माहेरी जाणं शक्य नाही… काय करायचं ? बराच वेळ साक्षी विचार करत रेल्वे स्टेशनवर बसली होती...तेवढ्यात तिला शरयूचा फोन आला. ‘‘कुठं आहेस साक्षी ?"
"मी घर सोडून निघालेय....…’’ साक्षी बोलली.....
शरयू बोलली, "तू आताच्या आता माझ्या घरी ये तू, स्टेशनवर किती वेळ बसून राहणार आहेस ?"
साक्षीने आल्याबरोबर शरयूला मिठी मारली आणि म्हणाली, "जे काही रडणं आहे ते फक्त आज. यापुढे मला फक्त लढायचं आहे. स्वत:ला सिद्ध करायचं आहे."

शरयू म्हणाली, "काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत आणि तुला माहितच आहे मी सध्या चाळीशीत असूनहि कायम बिनलग्नाचीचं राहणार आहे. माझ्या या गोष्टी घरी न पटल्याने मी घर सोडून इथे ह्या रूमवर एकटीच राहते आहे . मी तुझ्या पाठीशी आहे, तू माझ्याकडे राहा."
आकाशने त्या दिवशी घरी गेल्यावर साक्षी घरी नाही बघून तिला फोन केला तिने त्याला शांतपणे सगळं तिने बघितलेले सांगितले.
आकाशने त्या दिवशी घरी गेल्यावर साक्षी घरी नाही बघून तिला फोन केला तिने त्याला शांतपणे सगळं तिने बघितलेले सांगितले.
आकाश तिचं हे स्पष्टीकरण ऐकून सुन्न झाला. त्याने साक्षीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पुन्हा अशी चूक होणार नाही असं सतत बोलू लागला. पण साक्षी तिच्या निर्णयावर ठाम राहिली.... ती बधली नाही... ती पुन्हा घरी गेली नाही.
साक्षीने पंधरा दिवस सतत अनेक कंपनीमध्ये मुलाखती दिल्या... आणि देवाच्या कृपेने तिला एका ठिकाणी रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली, तिने ती नोकरी स्वीकारली.
काही दिवस गेले अन् साक्षीला जाणवलं की ती आई होणार आहे. डॉक्टरांकडे तपासून घेतल्यावर तिला रडायलाच यायला लागलं....ती घाबरीघुबरी झाली. शरयूने तिला धीर दिला आणि म्हणाली.... ‘‘हे बाळ आपण दोघींनी वाढवू… तू काळजी करू नकोस, मी आहे ना” असं समजावलं.
असेच दिवस जात होते, साक्षीने आठव्या महिन्यापर्यंत नोकरी केली आणि मग एक महिना रजा घेतली, नवव्या महिन्यात तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

मुलाला सहा महिने झाल्यावर शरयूने तिची नाईट शिफ्ट करून घेतली आणि मग आलटून पालटून दोघी पारसला सांभाळू लागल्या. साक्षी आणि शरयूने त्याला छान पद्धतीने वाढवले.
साक्षीचा आता आकाशशी काहीच संबंध नव्हता.
साक्षीचा आता आकाशशी काहीच संबंध नव्हता.
मधल्या काळात साक्षीचे वडील वारले आणि मग तीन महिन्यांनी आईही वारली. आता तर माहेरचाही संबंध संपला. पण ती स्वत:चं काम आणि तिचा मुलगा यात अगदी रमली होती, आनंदात होती, तिचं कामही जोरात सुरू होतं. मुलाला शाळेत घातले होते.
अभ्यासात मुलगा उत्तम होता, खूप हुशार होता.
इकडे आकाशची मात्र परिस्थिती अगदीच वाईट होती.
इकडे आकाशची मात्र परिस्थिती अगदीच वाईट होती.
कामात दुर्लक्ष झाल्यामुळे त्याला आर्थिक फटका बसला होता,. पैशासाठीचं त्याला जवळ करणारी ती मुलगी त्याला सोडून गेली.
आकाश फारच एकटा पडला होता. त्याला साक्षीची फार आठवण यायची. तिचं प्रेम, साधं वागणं, आठवून तो रडू लागला.
मध्यंतरी शरयू आणि साक्षीने घर बददलं त्यामुळे आकाशला तिचा काहीच पत्ता लागत नव्हता.
एक दिवस असाच तो घरात टीव्ही बघत असताना एका चॅनलवर त्याने लहान मुलांचा एक प्रोग्राम बघितला.
एक दिवस असाच तो घरात टीव्ही बघत असताना एका चॅनलवर त्याने लहान मुलांचा एक प्रोग्राम बघितला.
लहान मुलांचा गायनाचा प्रोग्राम होता तो, त्याने चॅनल बदलता बदलता पटकन एक नाव ऐकले, पारस साक्षी शिर्के असं त्या मुलाचं नाव पुकारण्यात आलं आणि आकाश ते बघतच राहिला.
त्या मुलाबरोबर त्याची आई सुद्धा आली होती तिला स्टेजवर बोलावण्यात आलं, ती साक्षीच होती.
आकाश सोफ्यावरून उठून टीव्ही जवळ गेला त्याने साक्षीला ओळ्खलं...
त्या मुलाच गाणं संपल तेव्हा सर्व परीक्षक उठून टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करू लागले.
आकाशच्या मनात अनेक प्रश्न येवू लागले. हा मुलगा कोणाचा, साक्षीने दुसरं लग्न केलं का...
त्या मुलाने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या साक्षीला स्टेजवर आणलं…आणि म्हणाला ‘‘मला बाबा नाही आहेत पण माझी आईचं माझं स्वर्स्व आहे, ती सिंगल मदर’ आहे... तिच्याच संस्कारामुळे मी आज इथे आहे.’’
साक्षीच्या चेहर्यावर आनंद होता.....,तिच्या नजरेत अभिमान होता....तिच्या चेहऱ्यावरून ती किती सुखात हे दिसत होतंं.
आपण आपल्या गुणी बायकोला सोडून एका मृगजळाच्या मागे धावत राहिलो... आज साक्षी खूप खुश आहे आणि मी एकटाच, असहाय, ....ह्या जाणीवेने आकाशला खूप भरून आलं पण त्याचा आता काहीच उपयोग होणार नव्हता.

समाप्त
©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
सदर कथा लेखिका सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..