©® मृणाल शामराज
एकदम मंद जुईचा सुगंध दरवळला. त्यानी वर पाहिलं. हलक्या गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली शरु समोर उभी हॊती. तिचा तो सौम्य हसरा चेहरा.. उत्सुक डोळे..समोरच्याचा वेध घेतं होते. केसात माळलेला तो जुईचा गजरा.. तिला अजूनच प्रसन्नता देतं होता.
"गुड मॉर्निंग सर..""गुड मॉर्निंग मिस.."
"सर मला शरयू म्हटलं तर चालेल."
"ओके शरयू.."
दोघं खुदकन हसले.
बाहेर वाकणकर विनाकारण खाकरला..
शरयू क्षणभर दचकली. श्रीच्या ते लक्षात आलं.
"झाल्या का फाईल तयार?"
"हो. सर. तुम्हाला सरप्राईस आहे. हॆ पहा."
"काय ते?"
तिनं एक पत्र पुढं केलं.
तो ते वाचत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव ती निरखत हॊती.
"वा वा.. किती दिवस मी ह्या क्षणाची वाट पहात होतो. आय गॉट इट."
त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहात होता.
"खूप मोठा प्रोजेक्ट मिळालाय आपल्याला. फक्त दिवसरात्र एक करून हॆ पूर्ण करायला हवं."
"नक्की होईल सर.. आपण सगळे मिळून हॆ पुर्ण करू. नक्कीच करू सर."
आपण सगळे.. हा शब्द श्रीला खूप भावला.
"थँक यू सो मच."
तिचा हात त्यानं अनाहुतपणे हातात घेतला. त्याचा हलका कंप त्याला क्षणभर जाणवला.
"मला खात्री आहे.. नक्कीच आपण हॆ पुर्ण करू हो ना शरयू.."
ती किंचित हसली.
तो खुशीतच घरी आला.
"आई.. ए आई.. कुठे आहेस ?"
"अरे हो.. हो.. काय हॆ लहान मुलासारखं.."
"आई!" त्यानं आईला घट्ट मिठी मारली.
"काय, रे बाळा? सांग ना काय झालं?
"एक ते जमुनालालच! प्रोजेक्ट..मी मागे बोललो होतो ना!"
"काय झालं त्याच ?"
"मिळालं ते आपल्याला.. माझं स्वप्न होतं ग ते.."
"अरे वा.. देवचं पावला. थांब साखर ठेवते देवाला."
"अगं हॆ पेढे आणलेत."
"हं.. हॆ घे दाखवले देवाला."
"आई मी खूप खूष आहे. तू.."
"अरे मी पण.. आता एक छानसी बायको आण म्हणजे झालं.."
"आई.. तू परत.. ती रैना.."
"नाही रे.. मला ही जाणवलं ते काही आपल्याला जमणार काम नाही.. तुला आवडेल तशी आण.. मला खात्री आहे. तू तुला साजेशी, योग्य मुलगीच निवडशील."
आता दोघांच्या ऑफिसच्या गप्पा सुरु झाल्या.
मालिनी, श्रीची आई,श्रीच्या बाबांबरोबर ऑफिस मधे जायची. त्यांच्या पश्चात तिनं ऑफिस सांभाळलं होतं. आता श्री नीट बघतोय म्हटल्यावर ती बाजूला झाली हॊती.
ऑफिसचा स्टाफ तिच्या परिचयाचा होता. पण हल्ली सारखं शरयू हॆ नाव श्री कडून कानावर येतं होतं.
श्रीचा चोखंदळपणा त्या जाणून होत्या. ह्या मुलीत काहीतरी स्पार्क असल्याशिवाय श्री तीच कौतुक करण शक्य नाही हॆ त्यांना माहिती होतं. एकदा ऑफिसला जावू या म्हणजे तिची भेट होईल त्यानी ठरवून टाकल.
शरु घरी पोचली तेव्हा नेहमी पेक्षा बराच उशीर झाला होता.
"काय ग ?आज इतका उशीर ?"
"आई, अगं नवीन प्रोजेक्ट मिळालाय. दिवाळीपर्यंत काम पूर्ण करायचंय. उशीर होईल थोडे दिवस."
"अगं, स्वयंपाक मला उरकत नाही एकटीला."
"थोडे दिवस सुलूला घे मदतीला. आणि हो, माझी एम कॉम ची परीक्षा पण आलीये तोंडावर. एकच विषय राहिला आहे. तो आता काढायचाचचं आहे. राजला सकाळी पाणी भरायला सांग."
आईची कुरकुर सुरु झाली. तिनं दुर्लक्ष केलं.
"ताई, अगं तुझा हा ड्रेस छान आहे. नवीन का ?"
"हो. नवीन चार ड्रेस शिवलेत.ऑफिस मधे सगळेच चांगले येतात."
"किती खर्च वाढलाय तुझा.." आई म्हणाली.
शरु काही बोलणार इतक्यात बाबा म्हणाले,
" घेवू देतं ग,लागतात. केवढं कष्ट करतंय लेकरू.. तिला काही बोलू नकोस."
"आई, उद्यापासून मी दूध, पोळी खाऊन जाईन. खूप काम असतं ग. भूक लागते."
आईनी होकारार्थी मान हलवली.
शरुला आठवलं सर म्हणाले होते.
'मागितल्याशिवाय काही मिळत नाही.' ती मनापासून हसली.
कामाचा व्याप वाढला होता. वेळेच बंधन होतं. दिवाळीपर्यंत काम पूर्ण करून द्यायच होतं. श्रीनी आज मिटिंग बोलावली हॊती. सगळा स्टाफ हजर होता.
"तुम्ही सगळे मान लावून काम करताय. पण वेळेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे.कुणी या बद्दल काही सुचवू शकतंय का? "
"सर.. मधलं काही डिलीट करून पूर्ण केलं तर.. सगळे बारकावे बघितले जातात असं नाही." वाकणकर म्हणाला.
"सर.. मी बोलू का?" शरु म्हणाली.
"आपण ओव्हरटाईम करू यात.पण काम नीट करून देऊ यात. एकदा आपण त्यांना फसवू शकू, पण अशाने आपण त्यांचा विश्वास गमावू. आणि त्याचा परिणाम आपल्याला मिळणाऱ्या पुढच्या कामावर होईल. असं आपलं मला वाटतंय."
वाकणकरनी चिडून तिच्या कडे पाहिलं.
"हो.. तुम्ही अगदी बरोबर बोललात. शरयू." वाकणकरनी चमकून त्याच्याकडे पाहिलं. पण तो बोलण्यात व्यस्त होता.
"ओव्हरटाईम चालू करा. काम लवकर पुर्ण होईल ह्याचा प्रयत्न करा. शरयू.. तुम्ही ह्यात लक्ष घाला."
वाकणकर जळफळला. शरयूच वाढतं प्रस्थ त्याला जाणवत होतं.
आज पर्यंत ऑफिस मधे त्याचा शब्द खाली पडला नव्हता.
काम जोरात सुरु झालं.
शरुचं सगळीकडे लक्ष होतं
तिनं प्रत्येकाची खुबी हेरून त्याला तसं काम दिलं. गोड बोलून ती त्यांच्याकडून काम करून घेतं हॊती.त्यांना हवी ती मदत ती करत हॊती.
एक दिवस वाकणकरला काही तरी तिनं सांगितलं तर तो डाफरला.
"आली मोठी शहाणी.. साहेबांची चमची.. मला शिकवतेय.."
"काय ते नंतर बोलू.. ते काम आत्ता पुर्ण करून दया. "तिनं सुनवलं.
दत्तू कडून श्रीला ऑफिस मधे काय चाललय ते कळतं होतं.
दोन, तीनं दिवसात काम संपायला हवं होतं.
"दत्तू.. शरयू मॅडमना सांग. मी बोलवलंय."
"सर.."
"या.."
"कुठपर्यंत आलं आहे काम ?"
"सर.. झालंय."
"एकदा डोळ्याखालून घाला सर."
"ओ. के. आज तुम्ही थांबा जरा.आपण पुर्ण चेक करूयात. मग जा."
"बरं. सर."
श्रीनी लॅपटॉप उघडला. तो बघत होता.
सगळं कसं नीट. पॉईंट टू पॉईंट.
सगळं एकदम ओ. के. तेही दोन दिवस आधी.
"शरयू.. कमाल आहे तुझी.."
"अं.. काय म्हणाले सर.. तुझी."
त्यांच्याही लक्षात आलं ते.

"चालेल ना.. आजपासून आपण दोस्त." शरु खुदकन हसली
"हो."
"अरे.. किती रात्र झाली.. कसं जाणार ? सोडू का?"
"नकॊ,नकॊ.. मी जाईन."
"नीट जा."
बाहेर वाकणकर होताच.
"मी सोडतो."
"काही नकॊ. मी जाईन."
ती त्याच्या समोर निघून गेली. फार माज आलाय हिला, बघतोच.
"आई.. सगळं काम पूर्ण झालंय ग. वेळेच्या आधी." श्री आईला खूष होऊन सांगत होता.
"खरंच, कौतुक आहे. स्टाफ इतकं मन लावून काम करतोय."
"अगं, शरयूनी सगळं खूप छान हॅन्डल केलं. खरं कौतुक तर तीचं करायला हवं."
त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली त्यांना.
शरयू..हा कधीपासून एकेरी बोलायला लागला,काही तरी मुरतंय खरं.
"आई.. ह्या प्रोजेक्ट मधे आपल्याला चांगलाच फायदा होतोय. आपण स्टाफला ह्या वेळेस छान बोनस देऊ या का ?"
"नक्कीच. एक पुजा घालूयात आपण ऑफिस मधे."
आज रविवार.. खूप दिवसांनी शरु आज निवांत हॊती.
ऑफिसचा व्याप कमी झाला होता. परीक्षा पण झाली हॊती. अपेक्षेपेक्षा पेपरही खूप छान गेला होता. आज सगळेच घरी होते. दिवस कसा छान गेला होता.
"आई, जरा बाहेर जावून येऊ का मी आणि सुलू ?"
"जा, पण वेळेत घरी या. आम्ही दोघं बाहेर जाणार आहोत. स्वयंपाक करायचा आहे तुला.."
"हो, ग. येतो लवकरच."
त्या दोघी बाहेर पडल्या.
दिवाळी तोंडावर हॊती. बाजारपेठ फुलून गेली हॊती. दोघी उत्सुकतेनी सगळं बघत होत्या.
शरु सुलुच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत हॊती.
"ताई.. तो बघ ना लाल ड्रेस.. किती सुंदर आहे."
दोघी शोकेस जवळ गेल्या. सुलू काचेच्या अगदी जवळ जावून तो बघत हॊती, अगदी मन लावून..
शरुनी हळूच कोपऱ्यात असलेलं त्याच प्राईस टॅग बघितलं..
बापरे. आठशे रुपये.. सुलूच लक्ष अजून ड्रेसवरच होतं..
आपण किती छान दिसू ह्यात..
शरु हळूच हसली. घेवू हं तुला वेडाबाई. पगार होईलच आता.. ह्या दिवाळीला घेऊच या हा ड्रेस हिला..
दोघीही रमल्या होत्या बाजारात.

इकडे आई बाबांना म्हणत हॊती, "आता शरयूच्या लग्नाचं बघायला हवं. दिवाळी झाली की सुरु करू यात.."
बाबा म्हणाले."बरं बघू. "
"चहा टाक ग."
दाराची कडी वाजली.अगबाई.. मुली आल्या पण.
"कोण पाहिजे."
"नेने.. इथेच राहतात ना?"
"हो.. आपण ?"
"मी श्याम वाकणकर. मिस. शरयूच्या ऑफिस मधे, त्यांचा डिपार्टमेंटल हेड आहे."
"या.. या.. ना." बाबांनी त्यांना आत बोलवलं.
आईनी भरकन पलंगावरचा पसारा उचलला.
"बसा ना.. काय काम काढलंत?"
वाकणकर बघत होता. दोन छोट्या खोल्या, तिथलं सामान.
त्याला साऱ्या परिस्थितीचा अंदाज आला. आईही विचार करत हॊती,काय बरं काम असेल ह्यांच. पोरीनं ऑफिस मधे काही घोटाळा तर नाही केला.
"जरा बोलायचंय मला.." वाकणकर चाचरत म्हणाला.
"बोला ना.."
"मी शाम वाकणकर. वय एकोणतीस. राहणार भांडुपला. मी आणि आई दोघचं राहतो. वन बीएचके. फ्लॅट आहे माझा. गावाकडे घरं, शेती आहे. शरयूला लग्नाची मागण्यासाठी मी आलो आहे."
आई, बाबा बघतच राहिले.
मुलगा बरा आहे. डोळ्याला जाड चष्मा आहे. थोडं पोट सुटलंय एवढंच.
पण घरं चालून एवढं चांगलं स्थळ आलंय..
"अहो.. आम्ही अजून विचार नाही केला तिच्या लग्नाचा."
"बघा.. मला काही नकोय. फक्त नारळ आणि मुलगी."
आता आईचे डोळे चमकले.
ती म्हणाली. "चहा घ्याल ना?" आईनी पोहे केले. चहा झाला.
"निघू का मग.. कळवा मला लवकरच." तो उठून दाराशी गेला.
तोपर्यंत शरु आणि सुलू घरी आल्या.
"तुम्ही.. इथे.. पत्ता कुणी दिला तुम्हाला?"
"बरं.. येतो. कळवा मला."
तो घाईनी निघून गेला.
"बाबा.. ही पीडा इथे का आली हॊती?"
"अगं.. तुला मागणी घातली आहे त्यांनी. पोरी नशीब काढलंस.."
"काय.. त्याची एवढी हिंमत.."
"बाबा.. अतिशय नालायक माणूस आहे हा. माझं लग्न नाही झालं तरी चालेल. पण ह्याच नाव काढू नका."
शरु संतापानी थरथरत ठामपणे म्हणाली.
"मूर्ख आहेस.. "आई म्हणाली.
"असू दे. मला ह्याच्याशी लग्न करायचं नाही."
"भिकेचे डोहाळे लागलेत कार्टीला.. नकॊम्हणे.. इथे बापाची सावकारी उतू जातेय जशी."
"आई.. नकॊ ना ग.. नाही म्हणजे नाहीच."
सोमवार,सकाळ झाली.परत तेच चक्र सुरु.
पण आता एक दिवस ती..एक दिवस सुलू.. एक दिवस राजा.
पाणी भरायची वाटणी झाली. डब्ब्याबरोबर आता तिलाही गरम पोळी आणि दूध मिळू लागलं.
तीला पटलं सर म्हणतात ते बरोबर.. नाही मिळालं तर मागून मिळवावं.
लोकलला नेहमीप्रमाणे गर्दी.. आज ती चष्मेवाली समोरच बसली आहे..
तेच रोखून निरखणं.. वाकणकरसारखी तिची चष्म्यातून अंगभर रेंगाळणारी नजर..शी....
"काय हो..? आपली काही ओळख आहे का..?" तिनं त्या बाईला विचारलं.
ती बाई या अनपेक्षित प्रश्नानी हादरली.
"नाही.. नाही."
"मग.. रोज असं का रोखून बघता?"
"नाही.. असं. काही नाही.". तिनं नजर वळवली.
परत म्हणून तिनं शरुकडे बघितलं नाही.
शरु मनोमन हसली.. येस्स्स्सस..आता मिशन वाकणकर..
ती आज जरा लवकरच ऑफिसला पोचली.
"दत्तू.. चहा देणार का गरमगरम.."
"आणतो ताई.. आज काय विशेष?
"कळेल रे लवकरच.."

हळूहळू सगळे आले.
सरांनी सांगितल्यापासून सगळे वेळेवर येतं होते.
वाकणकरनी हळूच शरुकडे बघितलं...हुश्य...ही चिडलेली दिसतं नाहीये..
काम झालं वाटतं माझं..भिकारडी.. मिजास करत हॊती.
होऊ दे लग्न.. दाखवतो हिला..अरे.. इकडेच येतेय ही..
त्यानं शर्ट उगाचच ठीक केला.
ती जवळ आली. गोड हसली.
हाय... किती सुंदर दिसतेय..आता ही माझीच.
"काय.. वाकणकर.. काल माझ्या घरी आला होतात."
सगळे आता त्या दोघांकडे बघत होते.
"हो.."
"हो काय.. लाज वाटते का काही..मला मागणी घालायला आलात..वय काय तुमच? काका शोभता माझे.
माझ्या नादी लागायचं नाही."
"कोण करणार तुझ्याशी लग्न? ऐपत आहे का बापाची ?"
एक खडकन थोबाडीत वाजवत शरु म्हणाली.
"माझा बाप काढायचा तुमचा संबंध नाही. आणि माझं बघायला मी खंबीर आहे. माझ्या नादी लागलात तर याद राखा.."
ती तडतडतच जागेवर आली.
वाकणकर घाम पुसत खाली बसला. आज त्याची हॊती नव्हती ती पणाला लागली हॊती.
"दत्तू.."
"आलो, साहेब."
"आपण शुक्रवारी इथे पूजा करणार आहोत. सगळी तयारी करून घ्या."
"हो, साहेब."
"काय.. आज सगळं एकदम शांत आहे. काम करून दमले का सगळे ?"
"नाही.. साहेब. "तो चाचरत म्हणाला.
मग..त्यानी घडलेलं सर्व सांगितलं.
वा.. सुधारणा आहे हिच्यात.. धीट झालीये. त्याला हळूच हसू आलं.
"शरयू.. मॅडमना आता पाठव."
"हो साहेब.."
"येऊ का सर.."
"ये ना.."
"सर.. काही काम आहे का ?
"तसं म्हटलं तर आहे.."
"सांगा..ना."
"मला एक साडी घ्यायची आहे.. सरप्राईस आहे. मला मदत करशील."
"हो.. करीन ना.. काय विशेष.."
"वाढदिवस आहे.."
"मिसेस जोशीचा का.."
"हो..".
तो बघत होता. तिच्या चेहऱ्यावर नकळत आठ्या आल्या. नाकाचा शेंडा फुरु्फूरत होता.
"काय झालं.?"
"काही नाही सर.."
का उगाचच राग आला आपल्याला.. मिसेस जोशी. म्हटल्यावर, काय होतंय आपल्याला ?
तिला जाणवलं,
सर रोखून बघताहेत आपल्याकडे, मिस्कीलपणेहेच का ते खत्रूड सर.. ह्यांना हसताही येतंय तर..
"निघू यात का?"
"हो, सर."
ती पर्स आणायला आपल्या जागेवर गेली. पर्स उचलली तसं शेजारी बसणाऱ्या सारिकानी खुणेनी विचारल..
"कुठे ?"
"येतें ग.. जरा सरांबरोबर चालले आहे."
"मजा आहे तुझी! "सारिकानी भुवया उंचवून.. ओठ मुडपून खुणेनीच सांगितलं.
ती निघाली.
सर गाडी काढायला आधीच बाहेर गेले होते.
"दत्तू.. त्या फाईल हलवू नकोस. मी आल्यावर बघते.." म्हणतं ती दाराकडे गेली.
मागून उगाचच खाकरल्याचा आवाज आला, तसं तिनं मागे पाहिलं. वाकणकर तिच्याकडेच बघत होता.
तिकडे दुर्लक्ष करत ती बाहेर येऊन उभी राहिली.
क्षणात एक काळी oudi तिच्या समोर उभी राहिली.
त्यानं काच खाली केली आणि तिला आत बसायची खूण केली. आता तिला प्रश्न पडला..
पुढं बसू की मागे..
पुढंच दार त्यानी वाकून उघडलं. "शरयू.. ये.. इथे बस."
ती दबकत आत बसली.
एवढया मोठ्या गाडीत, किंबहुना कार मधेच ती पहिल्यांदा बसत हॊती.
"सर.. दार.."
"अगं लागलंय नीट.. आरामात बस.."
ती निवांत झाली आणि आरामशीर विसावली सीटवर.
हळूच तिनं निरीक्षण सुरु केलं. अगं बाई.. एवढी मोठी गाडी. सीट पण कसे छान आहेत.
किती प्रशस्त..कुणाचा धक्का नाही..ते घाणेरडे घामाचे वास नाही.आणि ती चष्मेवाली..ती खुदकन हसली.
"काय.. ग?
"काही नाही सर.. असंच."
आता ती खिडकीला गाल लावून बाहेर पहात हॊती.
त्याला गंमत वाटली.
आता गाडी महालक्ष्मीच्या रोखानी जावू लागली.
"तुला बाहेरच बघायचय का? काच खाली कर ना मग.."
"अं.."
"थांब.. करून देतो मी."
तो खिडकीकडे झुकला. त्याचे ते कुरळे केस..
तिला नकळत स्पर्शून गेले..
किती दाट केस आहेत ह्यांचे..
खिडकी उघडली. मोकळं वारं आत भिरभीरू लागलं.
तो काचेतून हळूच तिच्याकडे बघत होता.

क्रमश:
©® मृणाल शामराज.
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

ही कथाही अवश्य वाचा