माझी होशील का? ( भाग 3)

 ©® मृणाल शामराज.

भाग 2 इथे वाचा

तिचा चेहरा प्रफुल्लीत झाला होता. केसांच्या बटा चेहऱ्यावर विखूरल्या होत्या.
डोळे विसफारून ती बाहेर पहात हॊती.
बापरे.. केवढ्या उंच इमारती ह्या.. मोठाल्या गाड्या.. लोकं पण किती उच्चभ्रू..
मोठी.. मोठी.. दुकान...त्यात लावलेले ते भारी कपडे..
कसं असेल ह्यांच आयुष्य..
आणि श्री बघत होता तिच्या कडे.

किती साधी आहे ही..हॆ सगळं बहुतेक पहिल्यांदाच बघतेय..सोज्वळ, साधं रुप आहे हीच,आत बाहेर काही नाही.
झोकात वळणं घेवून गाडी कलानिकेतनपाशी उभी राहिली तिथला माणूस पुढं आला.
कारची किल्ली घेवून तो कार पार्किंगला घेवून गेला.
आत येताच मॅनेजर पुढे आला.
"या.. जोशी सर.. आज तुम्ही.. मॅडम नाही आल्या?"
"नाही.. आज तिच्यासाठी साडया घ्यायच्या आहेत. सरप्राईस आहे तिला.."
"वा.. वा.. या न!नुकताच नवीन स्टॉक आलाय. ही स्मिता.. हिला जोशी मॅडमचा चॉईस माहिती आहे. छान साडया दाखव त्यांना.."

"या.. सर.. मॅडमचा चॉईस माहिती आहे मला . नेहमी इथूनच साडया घेतात त्या.. या.. बसा.."
"फंक्शनल दाखवू का साडया सर.."
"फंक्शनल दाखवा."
"नो बजेट.. भारीतली दाखवा.. सिल्कची.."
शरु बघत हॊती. केवढं हॆ दुकान.. किती भारी साड्या आहेत.
आणि ह्या सेल्सगर्ल,बापरे.. ह्यांच्या अंगावर पण किती भारी साडया आहेत..
किती आरसे.. लाईटस्

स्मिता विचार करत हॊती. कोण ही सुमार मुलगी ह्यांच्या बरोबर? अंगावर कसली ती सुती साडी.. कसली विटकी पर्स..तिनं नाक मुरडलं.
शरुनी ते पाहिलं.ती ओशाळली. छे.. चुकलं आपलं..इथं यायलाच नकॊ होतं.
तिचा तो सुकलेला चेहरा, श्रीनी पाहिला.
"शरयू.. आज साडी तू निवडायची.. तिला असं तसं आवडत नाही. तुच सुचव."
स्मितानी ते ऐकलं. ही कुणी तरी खास दिसतेय.

"मॅडम.. " शरुनी इकडेतिकडे पहिलं. आजूबाजूला कुणीच नव्हतं. म्हणजे मला मॅडम म्हणाली तर ही..
तिच्या चेहऱ्यावर हसू आलं.
स्मिता एकसोएक साडया दाखवत हॊती.
शरु मन लावून बघत हॊती. आवडलेल्या चार पाच साडया त्यांनी बाजूला काढल्या.
त्यातल्या दोन श्रीनी निवडल्या.
एक कांजीवरम.. एक ओरिसा..."सर.. ही पण छान आहे.. चंदेरी..नाजूक बुट्टी.. भरजरी बॉर्डर..
ही पण घ्या. मॅडम ना नक्कीच आवडेल.."

पण हा रंग.. श्री म्हणाला.
"एक मिनिट..मी ह्या मॅडमच्या अंगावर टाकून दाखवते."
"माझ्या?
"या, ना.. इकडे आरशासमोर.."
तिनं ती लाल चुटुक चंदेरी शरुच्या अंगावर लावली.
वा.. किती सुंदर दिसतोय आपण.. आपणच आहोत का कुणी वेगळं..आरशातलं प्रतिबिंब बघत शरु पुटपुटली.
इतक्यात तिला लक्षात आलं श्री पण निरखून बघतोय आपल्यकडे.

वा.. किती खुलतेय ही साडी हिला.. ओळखूच येतं नाहीये ही..
ती साडी तिनं काउंटर वर ठेवली.
फोन आला म्हणून श्री जरा बाजूला गेला होता.
शरु त्या साडीवर अलगद हात फिरवत हॊती.
परवा एका मासिकात तिनं एका मॉडेलनी नेसलेली हीच साडी पहिली हॊती. तिला ते आठवत होतं.

"झालं.. फायनल.. ह्या तीनही साडया द्या."
मॅनेजर पुढे आले.
"व्यवस्थित गिफ्ट पॅक करून द्या. आज मॅडमचा वाढदिवस आहे."
"तुम्हाला कसं माहिती?" श्री चकित होऊन म्हणाला.
"आमच्यकडे नोंद असते सर."
"थँक यू सो मच.. जोशी सर."ते साडया घेवून बाहेर आले.
फुटपाथवर एक बाई फुलं विकत हॊती.
"सर.. आले हं." शरु तिच्या कडे गेली.

ताजा, रसरशीत सोनचाफा दरवळत होता.
तिनं तो हिरव्या पळसाच्या पानात बांधून घेतला. त्या बाईच लहान मुलं तिची साडी ओढत रडत होतं.
"का ग रडतोय हा?"
"त्याला फुगा हवाय.. मिळणारं किती मला.. त्यात हयाला वीस रुपयाचा फुगा दिला तर कसं.."
शरुनी पर्स मधुन वीसची नोट काढली.
तिला देतं म्हणाली.."घेवून दे ग त्याला.. रडवू नकोस."
श्री हॆ सारं लांबून पहात होता.

"सर.. हॆ माझ्या कडून मॅडमना द्याल का ? वाढदिवसाची छोटीशी भेट.."
श्री बघतच राहिला..
किती छोटया छोटया गोष्टी लक्षात ठेवते ही..
दुसऱ्याला देण्यात आनंद वाटतो हिला.
"नक्कीच. आवडेल तिला खूप."
"निघू या का सर.."
"हो. पण कॉफी घेवू यात कुठेतरी.."त्यानं छानश्या कॅफेपुढे कार उभी केली.

तिला परत खूप दडपण आलं.
"ये ना.."
"सर.. मी एक विचारु?"
"हं.."
"मी आज तुमच्या बरोबर कॉफी घेते. पण मला ना असं कुणाकडून काही घायला आवडत नाही. मी तुम्हाला इतक्या महागडी कॉफी देऊ शकणार नाही. पण मी काही करून आणलं तर खाल का तुम्ही?"
"अगदी आवडीनं.. नक्की आण. तुझ्यावर ते उधार.."
"ओके."
"आता तरी कॉफी घेशील ना.." मग गप्पा मारत त्यानी कॉफी घेतली.

"निघू का सर.. घरी वाट पहात असतील."
"सोडू का घरी तुला.. उशीर झालाय."
"नकॊ.. नकॊ.. "ती गडबडीनं म्हणाली "जाईन मी."
"ओके बाय".

"आई.. अगं.. आई.. कुठं आहेस ?"
"आले.. रे.. किती बोलावतो आहेस. इतका मोठा झाला पण.."
"हॅपी बर्थडे आई."
"मला वाटलं विसरलास तू.."
"आई.. असं शक्य आहे का?"तो गहिवरला.
"माझं बाळ ते.."
"अगं.. एवढा घोडा झालोय.. तरी बाळचं."
दोघं खदखदून हसले.
"हॆ बघ.. काय आणलंय तुझ्यासाठी.."

"साड्या.. आणि तू..?"
"बघ ना उघडून.."
"अगं बाई.. किती सुंदर.. नाजूक बुट्टे..सुंदर रंगसंगती..अरे.. तुला कधीपासून साड्यातलं कळायला लागलं इतकं?"
"आई.. सांगू तुला.. शरयू हॊती बरोबर.."
"शरयू.. कुठेतरी ऐकलंय नाव.."
"अगं, मधे मी सांगितलं होतं ना तुला.. त्या जमनालाल प्रोजेक्टच्या वे"ळेस खूप छान काम केलंय तिनं..
"पण मला तर आठवत नाही आहे ती.."

"अगं मी यायच्या आधी काही महिने आधी लागलीय ती. तुझ्या तब्येतीमुळे तू आलीस नाही एवढ्यात ऑफिसला.."
"हो रे खरंच.. आता पुजेला येईन."
"आणि हो.. हॆ राहिलं.." त्यानं सोनचाफयाची पुडी आईकडे दिली.
त्यांचे डोळे पाणावले.
"श्री.. अरे मला खूप आवडतो चाफा म्हणून तुझे बाबा नेहमी आणायचे. तू पण लक्षात ठेवून आणलंस.."
"आई मी नाही.. शरुनी दिलं."
"कोण?" त्या मिस्कीलपणे म्हणाल्या.
" काही नाही ग.." तो थोडा गोंधळला.
मग ऑफिसच्या गप्पा निघाल्या.

मालिनीताईच्या लक्षात आलं की ह्याच्या बोलण्यात तिचा विषय जास्तच येतोय. तिला नक्की भेटूयात.. त्यांनी मनोमन ठरवलं.
शुक्रवारी पुजा आहे ऑफिस मधे.. जेवण पण.. बोनस द्यायचा ना त्या दिवशी. दिवाळी आलीच आता.
"हो.. नक्की.. आपल्या या यशात स्टाफचा सहभाग मोठा आहे. देऊ यात चांगला बोनस.."
"बरं मी फ्रेश होऊन येतो.."
"अरे, तो बॉक्स कसला राहिलाय..दाखवला नाहीस.."
"आई.. अगं.. अगं.."
"काय..?"
"तो शरयू साठी.. तिनं छान काम केलं म्हणून.."
"नक्की म्हणूनच ना.." त्या हसून म्हणाल्या."तुझं काही खरं दिसतं नाही मला.."
गालातल्या गालात हसत श्री आपल्या खोलीत आला.

फ्रेश होऊन तो बाल्कनीत आला. दिवाळी तोंडावर आली हॊती. हवेत सुखद गारवा होता.
आजूबाजूला सगळीकडे लाईटस् झगमगत होते. आकाशातली ती सुरेखशी चंद्रकोर मंदपणे लुकलूकत हॊती.
त्याला तिच्या कडे बघून शरयू आठवली. अशीच सौम्य, सात्विक.
कुठेही दिखावा नाही.
ते उत्सुकतेनी भरलेले स्वच्छ, नितळ टपोरे डोळे..आरपार भेद घेणारे.. मन तर किती मोठं..
अगदी सामान्य घरातली दिसते..पण चांगले संस्कार लपत नाहीत.
कशी पटकन फुलं घेवून आली वाढदिवस आहे म्हटल्यावर.

त्या बाईच्या मुलाला फुग्यासाठी वीस रुपये काढून दिले पटकन. आपण कॉफी देऊ केली तर आपल्याला काहीतरी घेवून येतें म्हणाली.
अशीही लोकं आहेत या जगात..कृतज्ञता हा एक सद्गुण आहे आणि तो तिच्याजवळ आहे.
आणि ती रैना.. कुठे ही कुठे ती..
खरंच आई म्हणते तसं आपल्याला शरु आवडते का..
सारखे ती भोवती असल्याचे भास का होताहेत..
लग्न नकॊ म्हणणारे आपण आता आपल्याला तिच्याशिवाय करमत नाही आहे. काय आहे हॆ.. प्रेम..
नाही.. नाही..

"श्री.. वाढलंय, जेवायला."
"आलो, ग.."

"अगं, काय हॆ?,दोन नारळ.."
"आई.. अगं मोदक करून न्यावे म्हणतेय ऑफिसमधे.. तांदुळाची पिठी आहे ना.."
"हो, आत्ताच दोन दिवसापूर्वी दळून आणलीय. काय विशेष ग.."
मग शरुनी आईला सगळं सांगितलं.
"आई, मी बरोबर करतेय ना ?"
"हो, बाळा! कुणाच फुकट काही घेवू नये. जरा जास्तच कर. तुझे उकडीचे मोदक खूप छान होतात. आपणही बरेच दिवसात खाल्ले नाही."
"होय आई.. उद्या पहाटे उठून करते."
पहाटे उठून तिनं सारण तयार केलं. पांढरी शुभ्र उकड काढून सुंदर कळ्यांचे भरपूर मोदक तयार केले. घरी मोजकेच ठेवून तिनं दोन डबे भरून घेतले. ऑफिस मधे नेण्यासाठी.

लोकल मधे चढताना तिनं त्या डब्यांना जीवाजूक सांभाळलं.
"काय ग.. आज काय आणलं आहेस एवढं? "
"गंमत आहे.. लंचटाइम मधे मिळेल.."
"सर.. येऊ का.."
"ये ना.."
"सर.. हॆ घरी न्याल का?"
"काय आहे?"
"तुम्हाला ट्रीट.. कॉफीची.." ती गोड हसत म्हणाली.
"अरे.. वा. मस्तच की."

ऑफिस routine सुरु झालं. लंच टाइम मधे शरुनी सगळ्यांना मोदक दिला.
हसत त्यांच्या गप्पा चालू होत्या.
"सर.. तुम्ही.."दत्तू म्हणाला.
"अरे.. तुम्ही इथे मोदक खाताय आणि मला?"
"सर.. तुम्ही इथे खाणार?"
"का मी काही वेगळा आहे.."
"नाही.. देते."
"काय सुरेख झालाय.. तुम्ही केलात?"
"हो, सर."
"आज.."
"हो, पहाटे उठून.."
"ग्रेट.. चालू दे तुमचं."

तो विचार करत होता. किती सुरेख चव आहे..किती रेखीव..एवढ्या गडबडीत पण..
तरीच इतकी सुंदर बोट आहेत हिची.. कलाकार दिसतेय.
ऑफिस सुटताना त्यानं दत्तूला आठवणीनी डबा गाडीत ठेवायला सांगितला.
"अरे, श्री... किती सुंदर मोदक आहेत हॆ.. किती आणलेस.. आवडतात तुला माहिती आहे.. पण एवढे."
"अगं, शरयूनी दिले."
मग त्यानी ती कॅफेतली गोष्ट त्यांना सांगितली.
किती बाणेदार आहे मुलगी.. त्यांना खूप कौतुक वाटलं.
या श्रीमंती विश्वातले ते लटके आभास त्या रोज बघत होत्या. आपल्या श्रीला अशीच बायको हवी. नकळत त्यांना वाटून गेलं.

आज ऑफिस छान सजवलं होतं.. खूप वर्षांनी पुजा हॊती आज.
दिनकर सर, श्रीचे बाबा गेल्यानंतर मालिनी ऑफिस बघत हॊती. श्री तेव्हा शिक्षणासाठी परदेशात होता.
तो परत आला.
मालिनीच्या दाबून ठेवलेल्या दुखण्यानी मान वर काढली.
श्री व्यवस्थित ऑफिस संभाळतोय म्हणून तिनं आता ऑफिस मधलं लक्ष काढून घेतलं होतं. श्री रोज घरी गेल्यावर तिला सगळं सांगतच होता. आज बरेच महिन्यांनी ती ऑफिस मधे येतं हॊती.
सगळं ऑफिस फुलांनी सजलं होतं.
दाराशी सुंदरशी रांगोळी काढली हॊती.
पूजेची तयारी नीट मांडून ठेवली हॊती. सगळे आज छान नटून आले होते. चेष्टा मस्करी चालली हॊती.

"सर आले.. मॅडम आल्या.."
सगळे एकदम शांत झाले.
"मिसेस जोशी.. कशा असतील त्या?"

शरु विचारात पडली.
"अरे.. एकदम शांत का झालात. चालू दे तुमचं.. आज मी रागवणार नाही." श्री म्हणाला.
सगळे हसले.
"मॅडम.. या ना किती दिवसांनी आलात."
"हो. वाकणकर. कसे आहात तुम्ही?"
"मी छान."
ह्या.. मिसेस जोशी. मी समजत होते.. शरुला खुदकन हसू फुटलं.
तिनं श्री कडे बघितलं. तो तिच्याकडेच बघत होता.
किती उमदा दिसतं होता तो.

मरून रंगाचा सिल्कचा झब्बा.. गळ्यात जाड सोन्याची साखळी पायात कोल्हापुरी..उंच, भरदार बांध्याच्या श्रीला ते शोभून दिसतं होतं.
"आई.. ही शरयू.."
"असं.. तू का ती.. खूप ऐकलंय श्री कडून.."
शरुनी भुवया उंच करून श्री कडे पहिलं.
"अगं.. चांगलंच ग. परवचा प्रोजेक्ट नीट आणि वेळेवर पार पडायला तुझी खूप मदत झाली ना.."
शरु मोहक हसली. किती गोड आहे ही मुलगी..
नाजूक.. हसरी.. सावळा रंग आहे.. पण किती नितळ.. सरळ नाक, डोळे तर कोरीव.. बोलके.
दाट केस. राहणीमान साधारणच आहे मात्र..

"मॅडम.. या, ना. बसा." आवाज ही गोड आहे.
उगाचच श्री सांगत नसतो हिच्या बद्दल.
"सर.." श्री तिच्याकडेच बघत होता.
सोनसळी रंगाची जरीची साडी...दाट केसात माळलेला भरगच्च अबोलीचा गजरा..
गळ्यात मोत्याचा लांब सर.. कपाळावर लाल कुंकवाची टिकली.डोळ्यात रेखलेलं काजळ..
कमालीची सुंदर दिसतं हॊती ती आज...

"सर.. ऐकताय का.. गुरुजी आलेत."
पुजा सुरु झाली.
श्री मन लावून पूजा करत होता.
मालिनी शरुकडून ऑफिस मधील गोष्टी समजावून घेतं हॊती.
शरुची सांगण्याची पद्धत, लक्षात ठेवलेली सर्व माहिती.. हॆ करतांना तिथं असलेलं तीच चौफेर लक्ष त्या बघत होत्या.
पूजा संपत आली.
"प्रसाद आणा.". गुरुजी म्हणाले. अरे.. बापरे.. सगळे हॆ विसरलेच होते.
"एक मिनिट.. आले हं मॅडम." शरु पटकन आत जावून एक डबा घेवून आली.
"हा प्रसाद.. मी करून आणलाय..वर केळी पण ठेवलीत."

श्रीनी तिच्या कडे समाधानानी पहिलं.
मालिनीला पण तिचं खूप नवल वाटलं.
किती लक्षात ठेवून आणला ही नी.. आपल्याला कसं सुचलं नाही हॆ..
पुजा पार पडली.
मॅडमनी भरघोस बोनस जाहीर केला. सगळे खूष झाले.
"शरयू..जरा केबिन मधे ये.." मालिनी म्हणाली.
"ये.."
"काय मॅडम.."
"हॆ बघ.. तुझ्या साठी.. खास.."
त्यांच्या हातात एक बॉक्स होता.

"मॅडम.. हॆ काय.. नकॊ. बोनस दिलात ना."
"असू दे ग.. खूप छान काम केलंस तू. ह्या महिन्यापासून तुझा पगारही वाढवला आहे."
"थँक्यू मॅडम." शरु खूप खूष झाली.
आता आई, बाबा किती खूष होतील. त्यांचे आनंदी चेहरे तिच्या डोळ्यसमोर आले.आणि तो शोकेस मधला सुलूला आवडलेला ड्रेस..
जाताना तो घेऊनच घरी जायचं.. तिनं ठरवून टाकलं.
पुढचा समारंभ हसतखेळत पार पडला.
घरातल्या सगळ्यासाठी छान, छान गिफ्ट घेवून शरु घरी आली.

सगळे खूप खूष झाले. पगारवाढ झाली कळताच बाबांच्या डोळ्यात पाणी आलं.
आईनी देवाला साखर दाखवली.
सुलू तर नवीन ड्रेस घालून मिरवत हॊती घरभर.
शरुनी हळूच तो बॉक्स उघडला. ती चकितच झाली..ती लाल चंदेरी साडी..
जाहिरातीतल्या मॉडेलच्या अंगावर हॊती तशी..आपल्याला खूप आवडलेली..
एवढी महाग..दहा हजाराची..आपल्यासाठी.

"अगं शऱू.. किती सुंदर.. महागाची असेल ना ही.."
तिनं मान डोलवली.
हळूच नाजूक हात फिरवत राहिली ती किती तरी वेळ तिच्यावर..
ह्या वर्षी दिवाळी खूप आनंदात गेली.. नंतरही दोन दिवस ऑफिसला सुट्टी हॊती. शरुुला अजिबात करमत नव्हतं घरी.
सुट्टी संपली.
ऑफिसच रूटीन परत सुरु झालं. वाकणकर आताशा बिचकून असायचा तिला.
पण तरी तिच्या सगळ्या गोष्टींवर लक्ष होतं त्याचं.

आज ती खूप खूष हॊती. एम कॉमचा रिझल्ट लागला होता. छान मार्कांनी पास झाली हॊती ती.
पेढे घेवून केबिन मधे गेली ती.
"सर.. पेढा."
"कसला.."अरे.. ही खूप आनंदात दिसतेय.. लग्न ठरलं वाटतं हीच..असू दे..
आपल्याला का वाईट वाटतंय..खरंच ही आपल्याला आवडायला लागली आहे का..
"सर.. मी एम कॉम छान मार्कांनी पास झालेय.."
"हुश्श.. वा.. अभिनंदन. पार्टी पाहिजे आता.."

"सर.. मी देईन ती पार्टी चालेल तुम्हाला?"
"का नाही !"
"संध्याकाळी जावू सर.. चालेल का?"
"नक्कीच.. तुझा आनंद साजरा करायला आवडेल मला.." तो हलकेच हसत म्हणाला.
तिचे डोळे आनंदानी लकलकत होते.

क्रमश:

©® मृणाल शामराज.

सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने