©® मृणाल शामराज.
भाग 3 इथे वाचा
ऑफिस सुटलं..
"चला मॅडम.."
"सर काहीतरीच काय.."
"आज उत्सवमूर्ती..ना तू..."
गाडी तिनं एका आडबाजूला असलेल्या बंगलीवजा घराजवळ घ्यायला लावली.
कुठे नेतेय ही...
"या ना सर."
त्यानी गाडी पार्क केली. तो तिच्या मागे गेला.
अगत्य.. घराचं नाव होतं.
बाहेरच्या अंगणात पाच सहा लाकडी बाकडी आणि खुर्च्या होत्या. मंद दिवे होते. ती त्याच्याबरोबर आत गेली.
तिथेही अशीच व्यवस्था हॊती. छोटशी, टुमदार पण स्वच्छ अशी जागा हॊती ती.
"नमस्कार काका.."
"ये ग, शरयू.. खूप दिवसांनी आलीस."
"हो, काका. कामात बीझी होते मी. काकू कशा आहेत.."
श्री बघत होता.
सत्तरीच्या जवळपास वयाचे ते गृहस्थ. हाताखाली कामाला दोन चटपटीत मुलं..आत किचन मधे दोघी काम करत होत्या.
हिचे नातेवाईक असतील का हॆ.. तो संभ्रमात..
"काका.. हॆ आमचे सर... तुमच्या कडचं खास थालीपीठ खायला आणलंय ह्यांना..."
"अरे, वा.. बसा ना."
"काका, काकू कशा आहेत?"
"छान.. आत आहे बघ."
"सर.. या ना.. बाहेर बसू यात." बाहेरच कोपऱ्यातलं एक छानस टेबल तिनं निवडलं.
काउंटरवर रेडिओ चालू होता.त्याचे मंद सूर सगळीकडे पसरले होते.
ती उतरणारी संध्याकाळ..
स्वच्छ घरगुती वातावरण.. आणि रेडिओवर ऐकू येणारे रफीचे सूर..
"सर.. दोन मिनिट हं.. काकूंना भेटून येतें.."
ती आत गेली. त्याला एकटा बघून काका बाहेर आले.
"नमस्कार. मी देशपांडे. तुम्हाला प्रश्न पडला ना..काय नातं आमचं शरुशी.."
त्यानं मान हलवली.
"माणुसकीचं नातं आहे हॆ.. एकदा आमची ही ठाण्याला गेली हॊती बहिणी कडे..लोकल मधुन उतरली आणि पाय घसरला आणि जोरात पडली.उठता येईना. शरु स्टेशनवर हॊती.
तिनं तिला बाजूला घेतलं,आधार देऊन स्टेशनच्या बाहेर आणलं. डॉक्टर कडे नेलं.
मला फोन केला. आम्हाला नंतर घरी आणून सोडलं.
"अहो..आम्ही दोघेच राहतो.. ही मदत आम्हाला खूप मोलाची वाटली.एवढंच नाहीतर मधुन मधुन फोन करून खुशाली विचारात असते आमची.."
तिचा हा नवा पैलू श्रीला कळला. कशी अजब मुलगी आहे ही..
"काका.. काय सांगताय.." शरु बाहेर येतं म्हणाली.
"काही नाही ग.. तुझं थोडंसं.."
"कौतुक हो ना काका?" शरु हसत म्हणाली.
तोपर्यंत ताटलीत केळीच्या पानात ठेवलेलं खरपूस थालीपीठ..कैरीच लोणचं, वाटीत लोणी आणि दही..
आणि दुसऱ्या मोठ्या वाटीत केशराच्या काड्यांनी नटलेला खरवस..
"वा.. थालीपीठ... कसला खमंग वास येतोय.. मला खूप आवडतं हॆ..." श्री म्हणाला.
"सर.. सुरु करा. आवडतंय का बघा."
"अप्रतिम चव आहे.. आणि खरवस पण सुंदर."
श्री मन लावून खात होता.
शरु कौतुकानी बघत हॊती. काकांनी परत येऊन आग्रहानी वाढलं.
श्री बघत होता.
घरगुती हॉटेल.इतकं छान असू शकत. एवढाले पैसे देऊन सुद्धा मोठाल्या हॉटेलमधे ही चव नाही मिळणारं.
"काय बघतेस ग निरखून..."
"सर.. आवडलं तुम्हाला.."
"खूप.. आता आईला घेवून येतो एकदा.."
"सर.. मॅडमना पार्सल घेवू का.."
"चालेल की..."
"काका.. एक पार्सल द्याल.." बिल काउंटर वर जावून शरुनी पैसे काढले..
"बेटा.. हॆ काय.."
"नाही.. काका.. सरांना माझ्याकडून पार्टी हॊती आज.. रागवू नका. पैसे घ्या."
दोघं बाहेर पडले.
"शरु.. थँक्स. खूप आवडलं मला." ती हलकेच हसली.
"निघते सर..."
तो तिच्या पाठमोऱ्या आकृतिकडे बघत होता मुग्ध होऊन...
******

"शरु ..."
"अं... काय सर.."
"मी काही कामासाठी लंडनला जातोय दुपारी.. हॆ काही अती महत्वाचे पेपर आहेत. ड्राइव्हर तुला घरी नेईल. ते आईकडे दे फक्त."
"हो, सर."
"आज निघालो तेव्हा आईची तब्येत बरी नव्हती. डॉक्टर येणार होते. पण मला जाणं गरजेचे आहे."
"सर.. तुम्ही निर्धास्त जा. मी जाते तुमच्या घरी."
दुपारी तो लंडनला गेला.
ऑफिस सुटलं तसं शरु गाडीतून श्रीच्या घरी निघाली.
ड्राइव्हरनी गाडी एका आलिशान बंगल्यापुढे उभी केली.
बापरे... एवढा मोठा बंगला...
"या.. ना... ताई.." ड्राइव्हर तिला आत घेऊन गेला. ती आत आली.
केवढा प्रशस्त आहे हा दिवाणखाना.. ही झुंबर...हॆ रेशमी आवरण ल्यायलेले सोफे... ही घराची रंगसंगती..
मधूनच डोळ्याला शांतवणारी हिरवी शोभेची झाडं... मालकीणीच्या रसिकतेची दाद द्यावी असं सर्व...
"या.. बाईसाहेब..."
तिनं दचकून आजूबाजूला पहिलं.
बाईसाहेब..इथं तर दुसरं कुणी नाही.. मी..
"चला ना.. वहिनीसाहेब तिकडे आहेत."
ती त्यांच्याबरोबर अर्धवर्तुळकार जिना चढू लागली.
तिची नजर खाली वळली.. ते खालच हिरवं कार्पेट मन वेधून घेतं होतं.
पाचूचा गालिचा अंथरल्या सारखं... जिन्याचे ते रुंद लाकडी पायदंड.. त्याच्या वरून चालताना होणारा टक.. टक.. आवाज...कोपऱ्यातल्या त्या कोरीव स्त्रियांच्या संगमरवरी मुर्ती..
इकडे उजवीकडे... पहिली खोली..
त्यानं नॉक केलं..
"या.." आतून आवाज आला....काहीसा ओढलेला..
"ये.. ग.. "तेवढं बोललं तरी त्यांना थकवा आला.
"मॅडम.. तुम्ही आराम करा."
"हो, ग.. तेच करतेय.. पण असं पडूनही कंटाळा आलाय.वासूकाका.. तुम्ही गेलात तरी चालेल."
"मॅडम... हॆ पेपर सरांनी दिलेत..महत्वाचे आहेत".ती म्हणाली
"ठेवं तिथे ड्रॉवरमधे."
"आई ग.. डोकं खूप दुखतय.. चक्कर येतेय.."
"डॉक्टरांना बोलवायचं का.."
"अगं येतीलच ते एवढ्यात.."
"मी डोकं चोपू का.. देते हं चोपून म्हणजे बरं वाटेल तुम्हाला..." ती हलक्या हातांनी डोकं चोपू लागली.
किती मऊसूत हात आहेत हिचे..
आपल्याला एक मुलगी असती तर..त्यांना हसू आलं.
मुलगी.. आपला तर मुलगा.. त्याला आपण आजारी पडलो की काही उमजत नाही. हुशार आहे.. पण खूप हळवा.. असं काही त्याला सुचलं नसतं.
विचार करता करता त्यांना झोप लागली.
शरू जरा टेकली. प्रशस्त बसली.
केवढी ही बेडरूम...हलका निळा रंग..त्याला साजेसे पडदे..हलक्या निळ्या रंगावर नाजूक फुलं असलेली बेडशीट..
आपलं सगळं घरं पण या खोली एवढं नाही.
तिथं बाजूला होतं ते पुस्तकं तिनं घेतलं.
हा लेखक तर आपल्याला किती आवडतो..बाबांना इंग्रजी साहित्य वाचायचं खूप वेडं..त्यामुळे शरूला पण वाचन खूप आवडायचं. तिनं ते वाचायला घेतलं.
तेवढ्यात डॉक्टर आले.
"मॅडम.. कशा आहात."
"नाही बरं वाटतं अजून.. चक्कर येतेय खूप.."
त्यांनी ब्लड प्रेशर तपासलं.
शरुला त्यांच्या कपाळावर पडलेल्या दोन आठ्या जाणवल्या.
"विश्रांती घ्या. दगदग करू नका. एक इंजेक्शन देतो. लवकर बरं वाटेल."
ते बाहेर आले.
शरु पण बाहेर आली.
"डॉक्टर.. कसं आहॆ ?"
"तुम्ही कोण? इतक्या वर्षात पहिलं नाही."
"मी ह्यांच्या ऑफिस मधे आहे."
"थोडी काळजी वाटते. ब्लड प्रेशर वरखाली होतंय. आधीच त्यांना हार्टचा त्रास आहे. बघू मी श्री शी बोलतो."
त्यांनी श्रीला फोन लावला. सर्व सांगितलं.
"येतो मी.. श्रीशी बोलणं झालंय. मी एक नर्स पाठवून देतो."
"बरं. धन्यवाद डॉक्टर."
काय करू मी... जावू कसं घरी.. इथं थांबावं वाटतंय.. पण.. काय करू..
अरे सरांचा फोन येतोय वाटतं..
"हॅल्लो!."
"शरु.. कुठे आहेस तू.."
"मी तुमच्या घरी आहे सर.."
"शरू.. आई.."
"झोप लागलीय त्यांना."
"मी इकडे यायलाच नकॊ होतं." त्याचा आवाज कापरा झाला होता.
"सर..आता रात्री नर्स येईल. पण कोणीतरी आपलं हवं ग जवळ.."
"सर.. मी थांबू का.."
"थांबू शकशील का ?तुझ्या घरी.."
"मी सांगते फोन करून.."
"तुझे आभार कसे मानू मी.."
"सर.. मैत्रीण म्हणता ना मला.. मग.."
"हो.. नाही मानत.. मी लवकरात लवकर निघतो इथून..तरी उदया संध्याकाळ होईल घरी पोचायला."
"सर.. तुम्ही येईपर्यंत मी इथेच थांबते. काळजी करू नका.."
"बरं. बाय. थोडयावेळानी परत फोन करतो."
नर्स आली. तिनं त्यांना औषधं दिली.
"मॅडम.. थोडी पेज खालं का?"
"नकॊ ग काही.. इच्छा नाही."
"मी करून आणते.. बघा मला जमते का?" त्यांना बोलण्यात गुंतवून तिनं पेज खाऊ घातली.
"बरं वाटतंय ग!. तरतरी आली"
"पोटात काही नव्हतं बराच वेळ तुमच्या..."
"झोपता आता.."
"अगं दिवसभर झोपूनच आहे.."
"डोळे मिटून पडा शांत.. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय."
"दिवसभर झोपून तर आहे मी...तुला गाणं येतं.. एखादं.."
"मॅडम.. मी शिकले नाही आहे.. पण कॉलेजच्या स्नेहसंमेलनात म्हटलंय मी.."
"म्हण ना मग."
"हसू नका हं मला.."
"म्हण ग.."
'श्रावणात घननीळा बरसला...'
किती नाजूक आवाज आहे हिचा.. त्या तिच्याकडे बघत होत्या.
"आवडलं का.."
"खूपच छान!.".आपल्या विचारांना आवरत मालिनीताई म्हणाल्या.
"झोपा आता..जरासं लटक दरडावत शरु म्हणाली. दोघी खदखदून हसल्या.
त्यांना झोप लागली.
तिनं घरी फोन करून इथं थांबणार असल्याच सांगितलं.
आई म्हणालीच.". अगं.. असं अनोळखी ठिकाणी कशी राहणार..कोणकोण आहे त्यांच्या घरी?"
"अगं.. कुणी नाही म्हणून तर थांबतेय मी.. काळजी करू नकोस.. विश्वास आहे ना माझ्यावर... उदया संध्याकाळी सर आल्यावर येतें."
तिनं फोन ठेवला.
श्रीला फोन करून सर्व सांगितलं.आणि मगाच पुस्तकं वाचायला घेतलं
"बाईसाहेब..."
"वासुकाका मला शरू म्हणा. तुमच्याहून खूप लहान आहे मी.."
ते आपुलकीने हसले.
"चल.. बेटा.. वाढलंय. भूक लागली असेल."
"मी.. जेवण.." तीला खूपच अवघड वाटलं.
श्रीदादांचा फोन आला होता.. तुम्हाला जेवून घ्यायला सांगितलंय त्यांनी.
सर.. त्यांच्या हॆ लक्षात आलं..किती वेगळी आहेत.. हॆ दोघं.. माय., लेक.एवढी श्रीमंती आहे, पण दोघेही किती साधे..
ती स्वयंपाक घरात आली..नीट, नेटकं.. प्रशस्त..मधोमध मोठं डायनिंग टेबल .. तिला नवल वाटलं..घरात माणसं दोन..एवढं मोठं टेबल..
तिला आठवलं घरी एवढया लहान जागेत..सगळे एकत्र जेवण करत.दाटी होई पण गप्पांच्या नादात ते लक्षात पण येतं नव्हते. सुलूला किती आवडेल इथे..काहीतरीच विचार करतेय मी..ती कशाला येईल इथे..
वासुकाकांनी गरम गरम जेवायला वाढलं..
वा.. आज आयत जेवण..गरमगरम..ती भुकेजली हॊती.पोटभर जेवली.
परत श्रीचा फोन आला..
"सर, मॅडम, जेवून शांत झोपल्यात. काळजी करू नका. मी आहे इथे.."

ती खुर्चीवर बसून मालिनीताईनंकडे बघत हॊती..
केतकी गोरा वर्ण..थोडंसं अपर नाक.. नाजूक जिवणी.. बरेचसे पांढरे झालेले केस...आणि चेहरा.. संपन्नतेची झाक असलेला.. पण करारी..अंगावर साधीशी पण भारी साडी..
खूप माया दाटून आली तिच्या मनात.. हलकेच उठून त्यांच्या पायाजवळची शाल तिनं त्यांच्या अंगावर टाकली
त्यांनी कूस बदलली..परत शांत झोपल्या.
नर्सला पण डुलकी लागली हॊती.तिनं हातातलं पुस्तकं खाली ठेवलं. दिवा मालवला.
तसं अलगद टिपूर चांदणं अंथरल्यासारखं पसरलं आत..
ती बाहेर आली.
खोलीला लागूनच हा प्रशस्त वरांडा होता..हवेतला सुखद गारवा तिला नकळत जाणवला.
तिनं पदर खांद्यावरून ओढून घेतला..किती सुंदर दिसतोय हा चंद्र..ती तिथल्या कठड्याला रेलली..
तो बंगल्याचा परिसर..ती निरव शांतता..
सर.. अचानक तिला श्री आठवला..
एवढी श्रीमंत माणसं ही.. अन आपण आपल्यात सामावून घ्यायला निघालो.. मोदक काय दिले.. थालीपीठ काय खायला घातलं. मूर्ख कुठली मी..उदया सर आल्यावर सॉरी म्हणायचं त्यांना...
इकडे श्री हॉटेल मधे बसून विचार करत होता..
कशी असेल आईची तब्येत.. आपण इकडे आलोच नसतो तर..पण असं कसं चालेल..
नशीब शरू आहे म्हणून..पैसे लाख असोत शेवटी मदतीला माणूसच लागतो.. माणसात अजूनही माणुसकी आहे.
शरु.. आजकाल आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथेच येऊन का थांबतय..
असं काय आहे तिच्यात...नाही.. नाही.. म्हणत मी तिच्यात अडकतोय..
अरे.. मान्य कर..हेच सत्य आहे..तिचा प्रांजल, भाबडेपणा, बाणेदारपणा.. वागण्यातला खरेपणा आपल्याला तिच्याकडे ओढतोय..हो, ती आवडतेय मला..आजकाल तिच्या शिवाय चैन पडत नाही..पण तीचं काय..
श्रीमंतीला भुलेल अशी नाही ती.. आणि मलाही नकॊ तशी बायको..
कसं विचारावं तिला..

पहाटेच मालिनीताईना जाग आली. अर्धवट पेंगुळलेली नर्स पटकन उभी राहिली.
त्यांनी खुणेनीच तिला शांत राहायला सांगितलं.
त्या शरु कडे बघत होत्या. किती अवघडून झोपली आहे ही.. केवढा समजूतदारपणा आहे हिच्या कडे.. परिस्थितीनी दिलेलं शहाणपण असावं हॆ..ती रैना.. बालिश, पोरकट..सगळा लाडिकपणा.. कसं जमलं असतं श्रीशी तिचं.. ही किती गोड आहे... श्रीला पण आवडतेय..जाणवतंय ते..
पण.. अगदीच सामान्य घरातली आहे ही.. कसं जमेल हॆ सारं तिला..अगं.. काय विचार करतेस हा..तू नाही का एका खेड्यात वाढलीस.. तुझं लग्न झालं तेव्हा काय होतं तुमच्याकडे..
हळू हळू श्रीच्या बाबांनी नाही का हॆ सगळं उभं केलं..तू नाही का झालीस या परिस्थितीशी ऍडजस्ट.. ही तर शिकलेली आहे.चांगल्या संस्कारात वाढलेली..हीच श्रीला साथ देऊ शकेल..
बोलावंच त्याच्याशी आल्यावर..
"मॅडम.". त्या भानावर आल्या.
"झाली का झोप?फ्रेश वाटतंय ना?"
"हो, ग.. खूपच बरं वाटतंय."
वासुकाका चहा घेवून आले.
दोघींच्या गप्पा मग खूप रंगल्या.
"अगं, शरु.. लासलगाव माझं आजोळ..दर सुट्टीला जायचं आजीकडे..विहिरीत पोहायचं ..चिंचेच्या झाडावर चढायचं..लगोरी.. खोखो किती खेळायचो काय सांगू...गीतेचे अध्याय काका म्हणून घ्यायचा..अजून आठवतोय सहावा अध्याय..'यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति..तस्याहं न....
पुढं काय बरं.. आठवत नाहीये.."

"प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति..."
"बरोबर.. हेच..अगं!पण तुला कसं आलं.."
"माझी आजी म्हणत असे नेहमी..ऐकूनऐकून पाठ झाले काही श्लोक.."
हॆ ही माहिती आहे हिला..गप्पा मारत जेवण झालं.
संध्याकाळी श्री आला..
"आई.. कशी आहेस?"
"कशी दिसतेय?"
"नेहमीसारखीच फ्रेश.."
"ह्याचं क्रेडिट शऱूला.. किती काळजी घेतली माझी.."
"काय म्हणू तुला.. थँक्स.."
"सर.."
" नाही ग बाई.. नाही म्हणत."
"सर, मॅडम, निघू का मी.."
"हो, घरी वाट बघत असतील ना.."
"थांब एक मिनिट.. ड्राइव्हर सोडेन तुला."
"नकॊ.. जाईन मी."
"आज ऐकणार नाही तुझं.. हॆ सोडतील तुला घरी."
"बरं येतें."
कार चाळीजवळ उभी राहिली.एवढी मोठी गाडी.. कुणाकडे..पाच सहा जण चाळीतून बाहेर डोकावले.
तीनचार, मुलं बाहेर खेळत हॊती ती पळत तिकडे गेली.

शरु अजून बाहेर येतं हॊती गाडीतून तोपर्यंत ताई.. ताई.. करत एक तिच्या मागून गाडीत डोकवला. एक जण ड्राईव्हर जवळच्या खिडकीतून वाकून बघू लागला. शरुला एकदम लाजिरवाणं वाटलं ते.
"चला.. रे..ड्राइव्हर काका, धन्यवाद."
"अगं.. शऱू.. कोणाची ग गाडी?"शेजारच्या काकूंनी तिला विचारलंच.
"ऑफिसची हॊती काकू.."
ती घरात आली.
"काय ग, बरंय का मॅडमना.."
"हो, आई. सर, आलेत आत्ता."
तिला आज इतके वर्षात प्रथमच आपलं घर इवलंस वाटलं.. केविलवाण..
गप्पा मारत जेवण झाली. आज फक्त शरु बोलत हॊती, सगळे ऐकत होते. तो बंगला.. तिथल्या गोष्टी..
सगळ्यांना एखादी गोष्ट ऐकत असल्यासारखं वाटतं होतं.
"अगं, एवढ्या मोठ्या टेबलवर तू एकटीच बसली हॊती जेवायला..." राज म्हणाला.
"ताई.. मला बघायचं ग.."
"हो, जावू हं एकदा.." तिनं समजवलं..
किती खोटं आश्वासन देतोय आपण.. आपणच परत जावू की नाही ते माहिती नाही आपल्याला..बिचारी सुलू..
दुसरा दिवस उजाडला.
"आई.. कशी आहेस?"
"आज खूपच बरं वाटतंय मला."
"चेहऱ्यावरून जाणवतंय मला ते.. "
"पोचली का शरयू नीट.."
"हो.. ड्राईव्हर सांगून गेला मला."
"कुठे राहते ती श्री.."
"ठाण्याला, एम जी रोड वर.".
"बिचारी.. खूप गुणी मुलगी आहे.." मालतीताई म्हणाल्या.
"हो खरंच.. तो सांगत होता, एका चाळीत राहते ती.."
"परिस्थिती कशी असो, पण संस्कार चांगले आहेत तिचे.."
"आई.. आवरतो, उशीर होईल मला. डॉक्टर येतील एवढ्यात."
"बस,थोडा वेळ..,बोलायचंय तुझ्याशी."
"बोल ना.."
"श्री.. शरयू कशी वाटते तुला.."
"आई.. कसं सांगू.. खरंच खूप आवडते ती मला.. मी हॆ नाकारत होतो.. पण हॆ सत्य आहे."
"अरे, बोल ना तिच्याशी."
"अगं, ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे. तिला आवडेल का मी विचारलेलं.."
"अरे.. विचारून बघ.. ती कसं बोलेल तुझ्याशी."
"बरं. प्रयत्न करतो."
आज तो ऑफिसमधे जरा लवकरच आला होता. शरु त्याच्या पाठोपाठ आलीच.
अजून स्टाफ यायचा होता.
"दत्तू.. शरयू मॅडमना आत पाठव. जरा महत्वाचं काम आहे. इतर कुणाला आत पाठवू नकोस."
"हो, सर."
"येऊ का?"
"ये, ना.."
तो स्तब्ध होऊन बघत होता. कसं बोलू..
"सर... काय झालं? मॅडम.. त्यांची तब्येत. काही काळजीचं.."
"नाही.. छान आहे ती आता.."
"मग.. बोलाना सर.."
तिची तीच टपोरी उत्सुक नजर..."शरयू.. माझ्याशी लग्न करशील..माझी होशील का.."
"सर!" तिचे डोळे विसफारले..
काय ऐकतोय आपण हॆ.. सर विचारताहेत.. आपल्याला..
तो एकटक तिच्याकडे बघत होता.. हिला नाही का आपल्या सारखं वाटत..
"शरु बोल ना मी वाट पाहतोय.."
बुजऱ्या डोळ्यातून एक स्पष्ट वेगळेपण त्याला जाणवून गेलं.
"प्लीज, गैरसमज करून घेवू नका. मला थोडा वेळ द्या."
"चालेल. शांतपणे विचार कर. मी वाट पाहतोय."
रोजच्या प्रमाणे ऑफिस रूटीन सुरु झालं.
आज ती खूप शांत, शांत हॊती. ती श्रीशी पण मोजकंच बोलत हॊती.
त्याला काय झालं कळत नव्हतं. चुकलं का आपलं..मैत्रीची लक्ष्मणरेषा आपण ओलांडतोय का..

तो अस्वस्थ झाला.
ऑफिस संपलं.
शरु घरी निघाली थोडीशी आधीच. आज कुणी बरोबर नव्हतं. रोजचाच रस्ता पण आज संपत नव्हता.
सर कुठे.. आपण कुठे...रुप, शिक्षण, परिस्थिती.. सगळ्यात जमीन अस्मानाचा फरक..
निर्णय हा सारासार विवेकानीच घ्यावा लागेल.
असं काय पाहिलं त्यांनी माझ्यात.. मी तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.
ती रेंगाळतच घरी आली.
"काय ग.. आज अशी घुमी घुमी का? आल्यापासून पाहतेय."
"काही नाही ग.. जरा बरं वाटत नाहीये.."
"बघू.. अगं किती तापली आहेस.. जा.. झोप बघू.." रात्रभर ती बेचैन हॊती.
माझं लग्न झालं तर कसं होईल.. राजा, सुलू.. इतकी हुशार आहेत.
बाबांच्या पगारात दोघांची शिक्षण.. लग्न.. त्यात हॆ इतके श्रीमंत.. आभाळाला ठिगळ लावण्यासारखं आहे हॆ..
नाही.. नाही. माझा फायदा बघण्याइतकी स्वार्थी मी नाही.
नाही सांगू या का त्यांना..
"अगं.. शरू.. उशीर होईल.. अजून उठली नाहीस."
"बरं वाटतं नाहीये ग.. झोपते जरा."
"बघू.. चांगलाच ताप आहे. जावू नकोस आज. डॉक्टर कडे जावू."
"दत्तू.. शरु मॅडमना बोलावतोस का."
"आल्या नाहीत आज त्या.फोन आला होता."
"बरं.."
काय झालं असेल.. आवडलं नाही का तिला..मी विचारायलाच नकॊ होतं...तो बेचैन झाला.
दोन दिवसांनी ती आली.. थोडीशी सुकलेली.
"काय झालं.. कुठे होतीस दोन दिवस..मला चैन नव्हतं."
"सर.. ताप होता मला.. त्याच्याकडे न बघताच ती म्हणाली.
"आता कशी आहेस?"
"बरं आहे."
"अगं..इकडे बघ ना.. सांग तुझ्या मनात काय आहे."

"बोल स्पष्टपणे.. घाबरू नकोस."
"कसं सांगू..
"सर.. मी एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे. चाळीत दोन खोल्यात राहणारी.. आम्ही तिघ भावंड.. वडील बेताचं कमवणारे..भावंडांची शिक्षण चालू आहेत. माझी त्यांना गरज आहे.नाही सर.. नाही.. नकॊ."
तिच्या डोळ्यात पाणी तरारलं.
"अगं, मी करीन ना मदत."
"नाही. नकॊ.. मला ते पटणार नाही. आपल्या जबाबदाऱ्या आपण घ्याव्या."
"आपण ह्यातून मार्ग काढू.. ठीक आहे."
"अं.."
"तू तुझा सगळा पगार तुझ्या घरी द्यायचा.. चालेल का तुला.."
तिनं आश्चर्यानी वर पाहिलं..
"कळलं का काही वेडाबाई.. असं केलं की प्रश्नच सुटले ना सगळे." शरू खुदकन हसली.
डोळयांतून ओघळलेले ते दोन आसू. आणि नुकतचं उमटलेलं ते निष्पाप हसू..
तो ऊनपाऊसाचा खेळ, तो हरकून पहात होता. हळूच ते आसू पुसण्याचा क्षणिक मोह त्यानी आवरला.
"काय.. मग मॅडम. हो ना.."
तिनं लटक्या रागानी त्याच्याकडे पहात मान हलवली.
दोघेही मनमोकळं हसले.
"आई.. अगं आई.. कुठं आहेस?"
"अरे.. हो.. हो.. येतेय."
"हॆ रे काय.. अचानक लवकर आलास आज?"
"आई, बघ.. कोण आलंय?"
"अगं.. बाई.. शरयू... ये ना.." मालिनीताईंना जाणवलं.. दोघेही खूप खूष आहेत आज..
"काय रे.. श्री.."
आईला येस्स.. असा अंगठा दाखवत श्री खळखळून हसला.
"अरे.. असं आहे तर.. काय शरयू..हो आहे ना तुझं.."
"मॅडम.. "ती चक्क लाजली.
"मॅडम.. नाही आता आई म्हणायचं.. हो, ना ग आई."
"हो, तर.. "मालिनीताई खूष होऊन म्हणाल्या. "चला.. मला लेक मिळाली आता.."
ती हळूच त्यांना बिलगली.
"बाळा.. खरं सांग. मनापासून मान्य आहे ना तुला हॆ?"
"आई.. थोडं बोलू का.."
"बोल ना ग.."
"आई.. मी सामान्य घरातली मुलगी तुमच्या या सगळ्या गोष्टींची मला सवय नाही. मी शिकेन सर्व.. पण माझे आई, बाबा, भाऊ, बहीण यांना मी सोडू शकत नाही. ती जबाबदारी आहे माझी.. गरीब असलो तरी स्वाभिमानी आहोत आम्ही. कुठल्याही पद्धतीने त्यांचा अपमान झाला तर मी सहन नाही करू शकणार ते.."
"हो, बाळा.. मी समजू शकते हॆ.. सासरी आलं म्हणजे माहेर तुटत असं नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे. मुलगा काय, मुलगी काय.. आई, वडील ही दोघांचीही जबाबदारी आहे. काठी मारुन पाणी तुटत नसतं ग!
श्रीनी मला सांगितलं सर्व.. त्याचा निर्णय योग्य आहे. तू तुझा पगार त्यांना विनासंकोच दे.. अजूनही काही लागलं तरी, आता आपली दोन्हीही घरं एकच आहेत. खूष ना आता.."
"आई..हो."

श्री आपल्याला बघतोय हॆ जाणवताच ती म्हणाली. "सर.. हा ऑफिस टाइम आहे. काय करतोय आपण?".
"सर.. नाही श्री म्हण.."
"घरी श्री.. ऑफिस मधे सर...बरोबर ना आई.."
"निघू यात का ऑफिसला... श्री." तिनं हळूच म्हटलं. आणि तिघ मनापासून हसले.
"येत्या रविवारी आई, बाबांना घेवून ये ग दुपारी..."
मालिनीताई हॆ सांगेपर्यंत दोघं पायऱ्या उतरून गेली.
माळ्यानी सकाळी बागेत पाणी घातलं होतं.. त्यावर आत येतानाचे श्रीच्या बुटाचे आणि पाठोपाठ शरयूच्या चप्पलचे ठसे उठले होते.मालिनी ताई डोळे भरून तिकडे पहात होत्या..

आज या वास्तूत नारायणाबरोबर सौख्यलक्ष्मीची पाऊले उठली हॊती.. अनेक वर्षांनंतर... आता ही वास्तू खऱ्या अर्थानी बहरणार हॊती... दरवळणार हॊती....
समाप्त
©® मृणाल शामराज.
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.