©® नंदकुमार पंडित वडेर.

रात्रीचे साडेदहा वाजले होते. सदामाळी नेहमीप्रमाणे आमच्या घरी आला. त्याला तिसर्या पाळीसाठी अकरा वाजता गिरणीत जायचं होत. जास्तीचा व शिल्लकीतला पैसा अडका त्याला त्याच्या बैठकीच्या खोलीत ठेवणं कधिच सुरक्षित वाटायचं नाही. तो आमच्या घरी सुरक्षित शिल्लक राहावी म्हणुन आणून ठेवायचा.
बैठकीची खोली ही गावकरी लोकांची भजनी मंडळाची सामायिक खोली होती.

पाच पन्नास लोकांचा अहोरात्र सदैव या ना त्या कारणाने राबता असायचा.
पावसाळा सोडून इतर सर्व रात्री बाहेरच्या चौकातल्या फुटपाथवरच आपआपली पथारी पसरत असतं.
दर महिन्याकाठी मिळणार्या पगारातले थोडे व ओव्हर टाईमच्या भत्त्यातले काही ज्यादाचे पैसे तो आमच्या घरी सुरक्षित शिल्लक राहावी म्हणुन आणून ठेवायचा. आईबाबांवर त्या सर्व सोलापूर गिरणीकामगारांचा गाढा विश्वास होता. यासाठी आईने प्रत्येकाकरिता कडीचे पितळी डबेच केले होते.

सदामाळ्याप्रमाणे इतरही काहीजण त्यात लागेलं तसे त्यांच्या पैश्यांची ठेव-काढ करत असायचे.
प्रत्येकाचा आपआपला स्वतंत्र कारभार असे. आई फक्त तो डबा सुरक्षित ठेवण्या च काम इमाने इतबारे करत
असे. त्या डब्यातून काय नि किती असतील याची उत्सुकते पोटी सुध्दा डबा उघडून पाहत नसे.
त्या रात्री देखिल सदामाळी अभिरामासोबत आमच्या घरी त्याच करिता आला होता. अभिराम दारातच उभा राहिला. सदाला नि त्याला जाण्याची फारच घाई होती. सदाने आत येऊन आपल्या डब्यात कांही रुपयांचे बिंडोळे ठेवले,डबा बंद केला व होता त्याठिकाणी तसाच ठेवून निघुन गेला.
एक दोन दिवस तसेच गेले.

तिसया दिवशी सकाळीच सदामाळी घरी आला.आपला तो डबा उघडून ते पैश्याचे बिंडोळे काढले व तेथेच बसून तो मोजू लागला.
एकदा दोनदा तीनदा त्याने ते बिंडोळे मोजून पाहिले पण हिशेब बरोबर लागत नव्हता. सतत शंभर रुपयाची कमी भासत होते.
सर्वच नोटा शंभराच्या होत्या. दोन दिवसापुर्वी ठेवलेल्या त्या पैश्यातून शंभर रुपयेच कमी लागत होते.सदा चक्रावुन गेला. या पुर्वी कधिच असे घडले नव्हते.
त्या काळात शंभर रुपये म्हणजे फारच मोठी रक्क्म वाटायची. मग सदाने हि गोष्ट आईजवळ बोलून दाखविली. आईनेही सदाला आपण किंवा आपल्या घरातल्या कुणीच त्या डब्याला अजिबात हात लावला नसल्याचे सांगितले व ते खरेही होते.
आम्ही दोघे लहान भाउ व आई बाबा या चौघाखेरीज घरात ईतर कुणाचा वावर नसायचा.
बाबांची भिक्षुकीचा व्यवसाय जरी असला तरी मिळणार्या मिळकतीत घर समाधानाने चालत होते. तेव्हा असा वाम मार्गाने कधिसुध्दा जाण्याचा प्रश्नच आला नाही.
सदामाळ्याला या गोष्टीची पुर्ण कल्पना होती.
तरीपण शंकेने त्याचे मन ग्रासून गेले. “काकी एक डाव जरा आठवुन बघा कि हो ,तुम्हाला कश्याची एकदम नड पडाया नि त्याच वक्ताला घरात तुमाच्या कड तेव्ह्ढ पैसं नसाया म्हणूनश्यान ह्या डब्यातले शंभराची नोट
काढून घेतली नसलं कश्यावरून….”
काढून घेतली नसलं कश्यावरून….”
”छे! छे! सदा कुठलीही नड वगैरे सोड पण तुमच्या डब्यानां तुमच्या अपरोक्ष आम्ही हलवत
सुध्दा नाही.कदाचित तु मागे ठेवतानाच शंभर रुपये कमी ठेवले गेले असतील असावेत. तू थोडा शांतपणे आठवून पहा म्हणजे तुझ्या लक्षात येईल....”
सदामाळ्याची परोपरीने समजावणी करून पाहिली पण व्यर्थ.
सुध्दा नाही.कदाचित तु मागे ठेवतानाच शंभर रुपये कमी ठेवले गेले असतील असावेत. तू थोडा शांतपणे आठवून पहा म्हणजे तुझ्या लक्षात येईल....”
सदामाळ्याची परोपरीने समजावणी करून पाहिली पण व्यर्थ.
त्याला शंभर रुपायांचा फटका चांगलाच जिव्हारी बसला होता. आणी त्याकरिता आमच्या कुटुंबालाच त्याने जबाबदार धरले होते..
” हे,बघ,सदा! मी शपथ घेऊन सांगते, एव्हढेच काय माझ्या या दोन लहान लेकरांची सुध्दा हवीतर शपथ घेऊन सांगते की तुमच्या त्या पैश्यांना आम्ही कुणी कधीच हात लावत नाही.
आजपर्यंत तुम्ही इतक्याजणांनी माझ्याकडे विश्वासाने कि सारे व्यवहार करत आलात.त्या विश्वासाला कधीच तडा जाउ दिला नाही. पण आजच कशी ही विपरित घटना घडली हेच कळेनास झाल आहे मला....”
सदामाळीचं कशा कश्यानेही समाधान होईना.

तो त्या गमावलेल्या शंभर रुपयाच्या चिंतेतच व्यग्र होता आणि शेवटी न राहवून तो म्हणाला,”काकी म्या सुदिक परवाच्याला पैश्याचं बिंडोंळ अभिरामाकडून मोजूनच आणलं होतं. आता पतूर या डब्याच्या कडीला कवाच कुलूप घालत नव्हतो,कारण तेव्हढा आपला तुमच्यावर लई विश्वास होता. पण आज तो इश्वास काकी तुमच्याकडून तुटला कि हो...
पैसे घेतल्याला एक डावं लक्षात राहिलं नसलं. होत कवा तरी असं...कुनास ठाव किती वेळा आमच्या डब्यातलं पैसे वापरले गेले नसतील कश्यावरुन..त्या डब्यास्नी काय कुलूपानी बंद कुठ केलेलं असतया....” वगैरे वगैरे सदामाळी बरळतच राहिला..
आई त्यावर जरा चढ्या आवाजात म्हणाली,…
“हाँ! सदा! थांब तू इथेच ,पायरी सोडून असा बेताल बडबडू नकोस. तुझा आमच्यावर पैसे चोरल्याचा आळ आहे ना मग ठिक आहे.आता माझ्याकडे तेव्हढे पैसे नाहीत.पण हे गळ्यातले मंगळसुत्र गहाण ठेवुन संध्याकाळ पर्यंत तुझे हरवलेलेशंभर रुपये मी परत करते. मग तर झालं. पण फिरुन तू या घराची पायरी चढू नकोस.तुझा आमचा स्नेहभाव आज इथेच संपला ...”
सदामाळ्याच्या बुध्दीला गळतीच लागली होती. तो फिरुन म्हणाला,” आजच संध्याकाळ पतूर पैसं तेव्हढं द्यायच बघा म्हणजे झालं..नाही तर फिरुन नवं वायदं देशिला काय ? म्या संध्याकाळच्या सातच्या टायमाला हथं येउन पैसं घेऊन जाईन... राम राम....”
सदामाळी बाहेर पडला. कोणासही एका शब्दानं न बोलता गुमानं खोलीवर गेला.

इकडे आईबाबांनी गळयातले मंगळसुत्र सोनाराकडे गहाणवट ठेवले व शंभर रुपयांची तजवीज करून ठेवली. संध्याकाळच्या सातच्या ठोक्याला सदामाळी येऊन पैसे घेऊन गेला.
ती वेळच अशी होती कि कोण कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.
एक अबोलपणाचा काळाकुट्ट अंध:कारच सर्वत्र पसरलेला असावा असं वाटत होतं.
दिवेलागणीचा एक मिण मिणता दिवा त्याचा क्षीण आश्वासक उजेड अंधारात आशा पल्लवित करु पाहत होता.
रात्री सदामाळी नि अभिराम झोपण्यासाठी चौकाच्या फुटपाथवर आले. आपाआपली पथारी पसरुन एकमेकांशी बोलत बसले.
रात्री सदामाळी नि अभिराम झोपण्यासाठी चौकाच्या फुटपाथवर आले. आपाआपली पथारी पसरुन एकमेकांशी बोलत बसले.
बोलता बोलता मध्येच अभिरामाने आपल्या बंडीच्या खिश्यातुन शंभराची नोट काढली आणि सदाला म्हणाला,” सदा हे परवाच्या तुला दिलेल्या पैश्यातले शंभर रुपये...”
सदा बावचळला,” तुझ्याकडून कसले शंभर रुपये राहिले होते परवा?”..
सदा बावचळला,” तुझ्याकडून कसले शंभर रुपये राहिले होते परवा?”..
अभिराम म्हणाला,” मी तुला पैसे दिले त्यादिवशी मला माझ्या दम्याच्या औषधासाठी थोडे पैसे कमी पडले, तर तुच म्हणालास की आधी औषध खरेदीकर शंभर रुपये काय मागाहुंन देशील. मग ती औषध घेउन मी दोन दिवस गावाकडे नाही का गेलो ! त्यानंतर आजच आपल्या दोघांची गाठ पडतेय,आठवणी सरशी म्हणुन तुझे पैसे परत देतोय..”
अभिरामाच्या त्या खुलाश्याने सदामाळ्याला चांगलाच दरदरून घाम फुटला.
अभिरामाच्या त्या खुलाश्याने सदामाळ्याला चांगलाच दरदरून घाम फुटला.
आजच्या दिवसातल्या त्याच्या बेताल वागण्याचे संपूर्ण रामायण त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागले.
तो अभिरामाला म्हणाला,” अरं गड्या! ह्या शंभर रुपयाच्या घोळात माझ्या कडून मोठा इस्कोट झाला बघ.मला काय बी आठवनां आन त्या देवावानी माय बापांवर म्या वंगाळ,चोरीचा आळ घेतला. माझं पैसे त्यानी दिलं खर पण मला त्या घराचं दरवाजं कायमचं बंद झालं लेका. बुधीची दैना दैना झाली. आता एक काम करुया ऊद्या सकाळी सकाळी तु आणि मी असाच त्या काकींच्या कड जाउंन म्या फक्त पाय धरून माफी मागतो आन तु तुझा हा खुलासा त्यानां सांग म्हंजी मला थोड बरं वाटलं ,नाहीतर ह्या मनाची हि रुख्ररुख काही शांत व्हायची नाही..”
अभिरामला सारा प्रकार कळताच तो देखिल सकाळी येण्यास तयार झाला. आणखी पाच-दहा मिनिटे असेच दोघे बोलत बोलत झोपी गेले.
मध्यरात्रीच्या दोन अडीचच्या सुमारास एक धड्डाम असा मोठा आवाज झाला.
अभिरामला सारा प्रकार कळताच तो देखिल सकाळी येण्यास तयार झाला. आणखी पाच-दहा मिनिटे असेच दोघे बोलत बोलत झोपी गेले.
मध्यरात्रीच्या दोन अडीचच्या सुमारास एक धड्डाम असा मोठा आवाज झाला.
त्यासरशी असंख्य किंकाळ्या,माणसांचे,बायकांचे,मुलांचे रडण्याचे,विव्हळण्याचे मोठ मोठाले आवाज परिसरात दुमदुमले.
एक भला मोठा ट्रक चौकाच्या फुटपाथवर चढून दहा-विस फुटापर्यंत भरधाव वेगात येउन भिंतीवर आदळला होता. त्या फुटपाथवर जी काही पंधरा वीस माणसं झोपली होती त्यातली पाच सहा जण जागेवरच गेली होती.
ऊरलेली गंभिर जखमी अवस्थेत होती.त्या गेलेल्या पाचसहा जणामध्ये सदामाळी नि अभिराम देखिल होते.हे दोघे दगावल्याचं आम्हाला फार उशिराने कळाल. बाकिच्या सहकार्याच्या मदतीने पुढचा सर्व सोपास्कार झाला. सदामाळ्याचं बिर्र्हाड गावाकडं होतं. गावाकडेच त्याचा उत्तरविधी झाला.
सदामाळ्याच्या बायकोची शेवंताची केविलवाणी अवस्था झाली अस कळाल.
सदामाळ्याच्या बायकोची शेवंताची केविलवाणी अवस्था झाली अस कळाल.
पुढे कधीतरी तिची प्रत्यक्ष भेट होईल असे वाटल नव्हते.
या घटनेला सहा-सात महीने उलटुन गेले आणि अचानक एक दिवस सकाळी शेवंता
सदामाळ्याची विधवा बायको, आमच्या घरी आली. संपूर्ण चेहरा निस्तेज दिसत होता.
या घटनेला सहा-सात महीने उलटुन गेले आणि अचानक एक दिवस सकाळी शेवंता
सदामाळ्याची विधवा बायको, आमच्या घरी आली. संपूर्ण चेहरा निस्तेज दिसत होता.
बोलताना आवाज फार भावूक झाला होता.
आल्या आल्या तिने सर्वात आईचे पाय घट्ट धरले आणि ओक्साबक्सी रडत रडत म्हणाली,” आवं काकी यानां एक डावं माफ करा कि हो. यांच्याकडून तुमास्नी नसता डाग लागला. माफी असावी. ह्यांनी गेल्यापासून रोजच माझ्या सपनात येउन मला सांगत्यात कि शेवंता तू काकींच्या कडे जाउन त्या देवावानी मायबापाची माझ्या वतीन माफी माग. त्याना मी सांगितलेला खुलासा कर आणि दर पसरून माफी माग. त्यांनी माफ केल्याबिगर ह्यो जीव वर जायचा नाही,इथच घुटमाळत राहिल. तवा तु फार उशिर न करता अशिच मुंबैला जा. म्या सुधा आज नाहि तर उध्या जाईन असे म्हणत वायदे करत काल पतूर येळ मारुन नेली.
पण या सहासात महिन्यात त्यांनी चैन कसली ती पडू दिली नाही.
रोज रात्री सपनात येऊन हाच धोशा लावत होते. म्हनुन म्या सुदिक काय व्हायचं ते व्हऊदे पन एकदा या गोष्टीची तड लावायचीच अस ठरवून ईथे आले.तवा काकी आम्हाला माफ करा....”
ते ऐकुन काकींच्या डोळ्यात अश्रु डबडबले.
ते ऐकुन काकींच्या डोळ्यात अश्रु डबडबले.
शेवंताला त्यांनी मिठित घेऊन अश्रुंना वाट मोकळी केली, व म्हणाल्या,” मुली,आईबाप आपल्या मुलावर रागवतात तो राग ओठावर असतो,पोटात नसतोच मुळी. पण तो मात्र आमच्यावर चिडून जो गेलाय तो कायमचाच...कां ग गेला? ..मला आणि तुला असा एकट्याला टाकून..!
प्रायश्चित्त घ्यायला एव्हढ्या का दुरवर जातं कोणी.....”
©® नंदकुमार पंडित वडेर.
सदर कथा लेखक नंदकुमार पंडित वडेर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखकाची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.