©® ज्योती रानडे
पहाटेच्या काकड आरतीचे सूर कानावर आले म्हणून मंगला काकूंनी डोळे उघडले.
मंगला काकूंनी सर्व आन्हिके उरकून काठापदराचे तलम पिवळं नऊवारी लुगडं नेसायला काढलं. त्याचे चंदेरी काठ हाताने सरळ करून ते लुगडं त्या चापून चोपून नेसल्या. रूपेरी केस विंचरून त्याचा एक छोटासा अंबाडा बांधला. त्यात सवयीप्रमाणे दोन मोगऱ्याची फुलं अडकवली.
“देव कधी भेटतो होय? ते ही आपल्या सारख्याला? आपण थोडेच तुकाराम- रामदास आहोत?” या पलिकडे कुणी उत्तर देत नसे. “काय हा वेडेपणा!” हा भावही काकूंनी बरेचदा अनुभवला होता.
कल्पवृक्ष काॅलनीत राहायला आल्यापासूनच त्यांनी आपल्या अवती भोवतीचा परिसर जमेल तसा सुधारण्याचे व्रत घेतले होते व आज वयाच्या सत्तरीमधे देखील ते व्रत चालू ठेवले होते.
पहाटेच्या काकड आरतीचे सूर कानावर आले म्हणून मंगला काकूंनी डोळे उघडले.
'उठा-उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख..' ऐकता ऐकता त्यांनी रिद्धी सिद्धीच्या नायकाला अंथरूणातूनच हात जोडले. कराग्रे वसते लक्ष्मी.. म्हणत त्या उठल्या व देवघरात आल्या.
देवघरातील प्रभू श्रीरामाच्या प्रसन्न चेहऱ्याकडे बघत त्या खाली बसल्या.
देवघरातील प्रभू श्रीरामाच्या प्रसन्न चेहऱ्याकडे बघत त्या खाली बसल्या.
“श्रीरामा, आजवर सारे आयुष्य तुझ्या आधाराने जगले. जप, तप, व्रतवैकल्य करताना आणि तू दिलेल्या आयुष्याला सामोरं जाताना सत्तरी कधी आली कळलच नाही.. आता एकच इच्छा आहे की तू सगुण रूपात येऊन दर्शन द्यावस. आता किती दिवस उरलेत कुणास ठाऊक! पण तू भेटत नाहीस. रागावले आहे बरका मी तुझ्यावर!”
श्रीरामचंद्र हा त्यांचा सखा, सोबती होता आणि जन्मभरीच्या श्वासा इतुके अखंड राम नाम मोजियल्यामुळे त्याच्याशी फार वेगळं नातं होतं.
श्रीरामचंद्र हा त्यांचा सखा, सोबती होता आणि जन्मभरीच्या श्वासा इतुके अखंड राम नाम मोजियल्यामुळे त्याच्याशी फार वेगळं नातं होतं.
त्याच्यावर रागावणं, रुसणे, फुगणं कधी मधी चालू असायचं. श्रीरामालाही त्याची सवय असावी. कारण त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य त्यांच्या रागाने कधीच लोपलं नव्हतं.
दुखणाऱ्या गुडघ्यावर हात ठेवत त्या उठल्या. “आई आई ग…रामराया! तुझे गुडघे दुखतात का रे? बाबा रे, तुझं घोंगडं निर्गुणाचं..न झिजणारं पण आमचं घोंगडं मात्र सगुणाचे.. झिजणारं..असं म्हणून गेले माऊली. असं का केलस रे?” उठताना मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे ते सुंदर रूप डोळ्यात साठवून घेतले आणि म्हणाल्या, "रागवत नाही रे तुझ्यावर पण एवढी एक इच्छा पूर्ण होईल का? माझी म्हातारीची बडबड सुरु राहते पण तुझ्याकडून एक नाही की दोन नाही.”
दुखणाऱ्या गुडघ्यावर हात ठेवत त्या उठल्या. “आई आई ग…रामराया! तुझे गुडघे दुखतात का रे? बाबा रे, तुझं घोंगडं निर्गुणाचं..न झिजणारं पण आमचं घोंगडं मात्र सगुणाचे.. झिजणारं..असं म्हणून गेले माऊली. असं का केलस रे?” उठताना मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे ते सुंदर रूप डोळ्यात साठवून घेतले आणि म्हणाल्या, "रागवत नाही रे तुझ्यावर पण एवढी एक इच्छा पूर्ण होईल का? माझी म्हातारीची बडबड सुरु राहते पण तुझ्याकडून एक नाही की दोन नाही.”
मंगला काकूंनी सर्व आन्हिके उरकून काठापदराचे तलम पिवळं नऊवारी लुगडं नेसायला काढलं. त्याचे चंदेरी काठ हाताने सरळ करून ते लुगडं त्या चापून चोपून नेसल्या. रूपेरी केस विंचरून त्याचा एक छोटासा अंबाडा बांधला. त्यात सवयीप्रमाणे दोन मोगऱ्याची फुलं अडकवली.
कानात टपोऱ्या मोत्यांच्या सासुबाईंनी केलेल्या कुड्या घातल्या. स्थूल बांधा, गव्हाळ वर्ण, मध्यम उंची आणि सर्वांवर प्रेम करणाऱ्या मंगलकाकू आख्ख्या कॅालनीमधे काकू या नावाने प्रसिद्ध होत्या.
त्यांचे यजमान केशवराव ७५ वर्षाचे होते. ते काकूंना त्यांच्या कामात जमेल तेवढी मदत करत असत. मुलगा परदेशी होता व मुलगी मुंबईला होती.
त्यांचे यजमान केशवराव ७५ वर्षाचे होते. ते काकूंना त्यांच्या कामात जमेल तेवढी मदत करत असत. मुलगा परदेशी होता व मुलगी मुंबईला होती.
चारचौघांसारखा कभी खुशी कभी गम असणारा काकूंचा संसार ठीक चालला होता पण एकच खंत होती.. श्रीराम प्रभू भेटला नव्हता. जाणवला होता, भासला होता पण भेटला नव्हता. पण देव कसा भेटेल ही गोष्ट कधी कुणाला बोलली की ते हसण्यावारी नेत. टर देखील उडवतं.
“देव कधी भेटतो होय? ते ही आपल्या सारख्याला? आपण थोडेच तुकाराम- रामदास आहोत?” या पलिकडे कुणी उत्तर देत नसे. “काय हा वेडेपणा!” हा भावही काकूंनी बरेचदा अनुभवला होता.
शेजारच्या गोखले आजी खवचटपणे म्हणत, “मंगला, खरंच कधी आला राम तर मला बोलव बरका. ह्यांना पेन्शन मिळेल का विचारायचे आहे.” त्यावर बर्वे वहिनी म्हणत,” अहो आता पेन्शनच्या घोळात रामाला ओढू नका. काय बाई मागणं हे.. कसलं हे ऐहिकात रमणं म्हणत त्या गुडघेदुखी जाऊ दे असं मागुया म्हणत.
जोशी काका पक्के नास्तिक होते. ते म्हणत,”अहो देव बिव काही नसतं. सगळं मानव निर्मित कुभांड आहे!” पण काकूंना परमेश्वराची आस ठेवण्यात काही चूक आहे असे कधीच वाटले नाही.
कल्पवृक्ष काॅलनीत राहायला आल्यापासूनच त्यांनी आपल्या अवती भोवतीचा परिसर जमेल तसा सुधारण्याचे व्रत घेतले होते व आज वयाच्या सत्तरीमधे देखील ते व्रत चालू ठेवले होते.
कॅालनी मधे धुणभांडी करणाऱ्या शांतीच्या नवऱ्याला चहाची गाडी घेऊन देण्याची कल्पना त्यांचीच. ड्रायव्हरच्या मुलीला, सुमाला, शिवणाचे मशिन घेऊन देणाऱ्या काकूच. कॅालनीच्या मिटींग्ज मधे “अरे घरटी १००/२०० रूपये टाका रे पटपट ..फार नाही हो मागत. ५००० चं शिवणाचे मशिन सुमाला घेऊन देऊ सर्वजण. बिचारीला चार पैसे मिळतील. नवऱा वाईट निघाला ही काय तिची चूक? पटतय ना?” म्हणून काकूंनी खड्या आवाजात सवाल केला की साऱ्या कॅालनीला माहित असायचं की शिवणाचे मशिन सुमाला मिळणारचं.
कॉलनी मध्ये धुणे भांडी करणाऱ्या बायकांच्या मुलांच्या शिकवण्या घेण्याची कल्पना त्यांचीच.
त्यांच्याकडे केरवारे करणाऱ्या पारूचा मुलगा श्रीपाद तर उत्तम ह्रदयरोग तज्ञ बनला होता. त्याच्या मेडिकल च्या फी साठी कॅालनीच्या लोकांना आवाहन करून पैसे जमवलेल्या काकूंचा श्रीपाद कायमचा ऋणी होता. काकूंमुळे कल्पवृक्ष कॅालनी नावाप्रमाणे मनातील गोष्टी पुरवणारी कॅालनी बनू लागली होती.
काकू रंजल्या गांजलेल्यांना कधीच विन्मुख पाठवत नसतं आणि या सेवेत त्या रमून जात.
पण आज सकाळपासून मात्र काकूंचे मन श्रीराम दर्शनासाठी व्याकूळ झालं होतं. हट्टी पण झालं होतं.
पण आज सकाळपासून मात्र काकूंचे मन श्रीराम दर्शनासाठी व्याकूळ झालं होतं. हट्टी पण झालं होतं.
नसेना का आमची पात्रता समर्थ रामदासांएवढी म्हणून काय आम्ही अशी इच्छा पण नाही ठेवायची म्हणत त्या स्वयंपाक घरात आल्या.
दर रविवारी येणं जाणं खूप असतं म्हणून त्यांनी शिरा करायला घेतला. साजूक तुपात परतलेल्या रव्याच्या वासाने घर पवित्र झाल्यासारखं वाटलं. बेदाणे, बदाम, काजू युक्त शिऱ्यात साखर, वेलची पावडर व केशर घालून त्यांनी गॅस बंद केला.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्या गॅस बंद करून बाहेर आल्या. बघावं तर दारात दशरथ नंदन रघुवीर राम उभा होता. “ ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं..” पिवळा पितांबर, जांभळा शेला, गळ्यात मोत्यांच्या माळा..नील कमलासारखे शरीर..“देवा आलास?” त्या भारावून गेल्या.
“काकू, अग मी आशिष आहे! ..त्या भानावर आल्या.

शेजारचा आठवीतला आशिष शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रभू श्रीराम बनला होता.
“माते इक्ष्वाकू कुळातील मी दशरथ पुत्र राम आपल्याला नमन करतो” म्हणत आशिष नाटकीपणाने पुढे वाकला. काकूंनी त्याला जवळ घेतलं.
“माते इक्ष्वाकू कुळातील मी दशरथ पुत्र राम आपल्याला नमन करतो” म्हणत आशिष नाटकीपणाने पुढे वाकला. काकूंनी त्याला जवळ घेतलं.
“अरे खरा रामच दारात आला असं वाटलं रे. थांब आत्ताच शिरा केलाय. दोन घास खा आणि निघ” म्हणत त्यांनी त्याला घाईने थोडासा शिरा दिला.
“काकू फसलीस ना!” म्हणत हसत आशिष बाहेर पडला.
“अगबाई, रामाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा राहिला या गडबडीत! असुदे. दिसतेय सगळं त्याला!” काकूंच्या मनात आलं.
त्या आत आल्या आणि जेवायची ताटे घेऊन त्यांनी केशवरावांना जेवायला बोलावले.

जेवण संपे संपेपर्यंत कॅालनीतला डॅाक्टर शशांक मुलाच्या १२ वी च्या निकालाचे पेढे द्यायला आला.
शशांक त्यांच्या मुलाचा मित्रच होता. काकूंकडे लहानपणी शिकवणीला यायचा.
“अहो डॅाक्टर आज काम नाही का?” केशवराव त्याला विचारत होते.
“अहो डॅाक्टर आज काम नाही का?” केशवराव त्याला विचारत होते.
मंगलाताई लगबगीने बाहेर आल्या. “छान बातमी दिलीस हो शशांक. शिरा खाऊन जा.” त्या म्हणाल्या.
शशांक म्हणाला, “काम बाजूला ठेवून पेढे द्यायला आलोय काका! गप्पा मारता मारता काही वेळाने तो काकांना म्हणाला, “काका पावलावर थोडी सूज वाटते आहे. बघू का?”
केशवराव म्हणाले, “बघ की. अरे, कालपासून घशाशी पण येत आहे फार...आणि थोडी धाप लागतेय.. काय करू सांग.” शशांकचा चेहरा बदलला.
“काका मी आत्ता श्री च्या क्लिनिक मधे चाललोच आहे म्हणून चला माझ्याबरोबर! काळजीचे कारण नाही पण बोलू एकदा श्रीपाद बरोबर.” शशांकने लगेच श्रीपादला फोन केला.
“काकू, मी काकांना घेऊन जातोय श्री कडे” ते दोघे बाहेर पडले.
काकूंना वाटलं - “कालपासून हे सारखे ॲसिडिटी चा फार त्रास होत आहे म्हणत आहेत पण दाखवून या म्हटलं तर ऐकत नव्हते. बरं झालं शशांक आला ते! “
त्यांचा बसल्या बसल्या डोळा लागला. काही वेळाने शशांकच्या फोनमुळे त्यांना जाग आली.

“काकू काकांची Angioplasty आजच करायचं ठरवलय. काळजी करू नका. Heart Attack आला नाही त्यांना हे महत्वाचं. आधीच लक्षात आलंय हा मोठा फायदा आहे. मी गाडी पाठवतो. शांतपणे या.”
मंगलाताई गडबडल्या. देवघरात जाऊन श्रीरामासमोर हात जोडले. “श्रीरामा सांभाळ रे बाबा!” म्हणाल्या व त्या गाडीतून हॉस्पिटल मधे पोचल्या.
मंगलाताई गडबडल्या. देवघरात जाऊन श्रीरामासमोर हात जोडले. “श्रीरामा सांभाळ रे बाबा!” म्हणाल्या व त्या गाडीतून हॉस्पिटल मधे पोचल्या.
हॅास्पिटलच्या लॅाबीमधे बसून त्या श्रीराम जयराम जय जय रामाचा जप करत शशांकची वाट बघत बसल्या.
लॉबीमध्ये केर काढणारा एक साठीतील कर्मचारी काकू जवळ आला.
लॉबीमध्ये केर काढणारा एक साठीतील कर्मचारी काकू जवळ आला.
“ताई,सगळं उत्तम झालं असेल” म्हणाला. काकूंनी त्याच्याकडे बघून कृत्रिम हास्य केलं. कुणाचा कोण हा पण बिचारा धीर द्यायचा प्रयत्न करत आहे.
“अरे आत्ता तर ह्यांना आत नेलय.. तुला काय माहित उत्तम झालं का ते?” हे विचारायला त्या वळल्या पण तो तिथून निघून गेला होता.
“कुठे गेला एवढ्यात?” म्हणून काकूंनी इकडे तिकडे बघितलं पण तो दिसला नाही.
काही वेळाने श्री आणि शशांक बाहेर आले.
काही वेळाने श्री आणि शशांक बाहेर आले.
श्री ने वाकून काकूंना नमस्कार केला. “काकू उत्तम झाली प्रोसिजर. मी औषधं लिहून देतो. हा सदू घेऊन येईल. तुम्ही काकांजवळ बसा.”
“अरे काय हे श्री! एवढा मोठा डॅाक्टर तू. मला कसला नमस्कार करतोस? “ काकूंनी श्री ला मिठी मारली. त्याला पुढचा पेशंट बघायला जायची घाई होती.
“अरे काय हे श्री! एवढा मोठा डॅाक्टर तू. मला कसला नमस्कार करतोस? “ काकूंनी श्री ला मिठी मारली. त्याला पुढचा पेशंट बघायला जायची घाई होती.
"काकू, तुमच्यामुळे श्री क्लिनिक उभे आहे. माझ्या ऑफिसमध्ये तुमचा आणि काकांचा फोटो आहे त्याला रोज नमस्कार करूनच माझा दिवस सुरु होतो. काका यातून व्यवस्थित बाहेर पडतील. जा भेटा त्यांना!" म्हणून तो गेला आणि काकूंना आपण लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा सर्वाना सावली देणारा वटवृक्ष झाला आहे असं वाटलं.
काकूंनी खोलीत आणलेल्या काकांकडे बघितले.
काकूंनी खोलीत आणलेल्या काकांकडे बघितले.
त्यांच्या डोळ्यातले पाणी बघून काका म्हणाले, “ अग सगळं वेळेवर झालय. आता डोळ्यात पाणी कशाला? ९०% ब्लॅाक झालेली आर्टरी मोकळी केली बघ आपल्या श्री ने! अग हो.. तुझा श्रीराम माझ्या जवळ उभा होता असं वाटलं बघ. अगदी तोच मुकुटधारी राम, पिवळं पितांबर अन जांभळा शेला घेतलेला. तुझ्या फोटोत आहे ना तसा!”
काकू काकांकडे एकटक बघत होत्या. सरळ साधे केशवराव मितभाषी आणि सज्जन होते.
काकू काकांकडे एकटक बघत होत्या. सरळ साधे केशवराव मितभाषी आणि सज्जन होते.
छान केला त्यांनी संसार! कधी कशाची तक्रार केली नाही. ह्यांना ॲाप्रेशन थिएटरात चित्रातला मुकुटधारी राम भेटला? अगबाई!
पण तो विचार चेहऱ्यावर न दाखवता त्या म्हणाल्या “अहो मी घरून गरम गरम मुगाची खिचडी घेऊन येते.. काकू म्हणेपर्यंत तो केर काढणारा कर्मचारी तिथे आला व म्हणाला,” ताई मी आहे इथं सोबतीला.. तुम्ही जाऊन या घरी.”
त्या घरी आल्या. मन काहीसं बघीर झालं होतं.
त्या घरी आल्या. मन काहीसं बघीर झालं होतं.
डाळ तांदूळ घेऊन त्यांनी खिचडी टाकली व श्रीरामा समोर येऊन शांत बसल्या. समई लावली व हात जोडले.
“प्रभू सकाळी मी तुम्ही सगुण रूपात दर्शन देत नाही म्हणून तुमच्यावर रागावले होते. देवा मला माफ करा. मला थोडं थोडं समजायला लागलंय.
तुम्ही आज मला आशिष, शशांक, श्री, कर्मचारी या सर्व रूपात दर्शन दिलत.
“प्रभू सकाळी मी तुम्ही सगुण रूपात दर्शन देत नाही म्हणून तुमच्यावर रागावले होते. देवा मला माफ करा. मला थोडं थोडं समजायला लागलंय.
तुम्ही आज मला आशिष, शशांक, श्री, कर्मचारी या सर्व रूपात दर्शन दिलत.
मी रत्नजडित मुकुट घातलेल्या चित्रातल्या रामाला शोधत होते म्हणून आजवर मला तुझं दर्शन होत नव्हतं. पण आज हॅास्पिटलच्या लॅाबीमधे दोन तीन तासात मला तुझं विश्वरूप दर्शन झालं.
कधी तू डॅाक्टर असतोस, कधी नर्स, कधी वार्डबॅाय असतोस तर कधी झाड लोट करणारा कर्मचारी असतोस.
कधी ओळखीचा असतोस तर कधी अनोळखी. कधी लहानात लहान असतोस तर कधी मोठ्यात मोठा असतोस..पण तू सतत आमच्या बरोबर असतोस हे खरं!
सात आंधळ्यांनी हत्तीच्या ज्या भागाला हात लावला त्या भागासारखा हत्ती असतो असे त्यांना वाटले. तसाच तू प्रत्येकाला वेगळा दिसतोस.. वेगळा भासतोस..
पण देवा जगात जिथे जिथे चांगुलपणा आणि सच्चेपणा आहे तिथे तिथे तू आहेस. तू सद्गुणांच्या रूपात जीवामधे वास करतोस असं मला वाटतं. दया, दान, क्षमेमध्ये जो आनंद निर्माण होतो तो तू आहेस.. भक्ती, शांती, करुणा यामधून मिळणारा दिलासा तू आहेस.
ह्यांच्या ९०% ब्लॅाक झालेल्या आर्टरी ची काळजी घेण्यासाठी शशांक होऊन आलास..ज्या क्षणी माझ्या मनात वेडेवाकडे विचार आले त्या क्षणी तू तो कर्मचारी बनून मला धीराचे शब्द सांगितलेस..

मला वाटलं देवा, मी नैवेद्य दाखवायला विसरले.. पण आशिष च्या रूपात तू नैवेद्य पण घेतलास हे मला आत्ता कळतंय.
काकूंच्या डोळ्यातून भक्ती, भावना आणि कृतज्ञता अश्रू बनून वहात होती.
काकूंच्या डोळ्यातून भक्ती, भावना आणि कृतज्ञता अश्रू बनून वहात होती.
अष्टसात्विक भाव जागे होऊन मन भरून आलं होतं. आमच्या प्रत्येक प्रार्थनेला धावून मदतीस येतोस..आणि तरी देखील कित्येक प्रश्न सतत पाठपुरावा करत असतात...
तव नामाची माळ माझिया क्लेश मनाचे जाळी
पण असशील ना रे माझ्या जवळी माझ्या अंतःकाळी।।
नचिकेताचा अंश असे मी, ब्रह्म ज्ञान ओंजळी
पण देशील ना धीर भ्रमित मनाला त्या शेवटच्या वेळी?।।
तव नामाची माळ माझिया क्लेश मनाचे जाळी
पण असशील ना रे माझ्या जवळी माझ्या अंतःकाळी।।
नचिकेताचा अंश असे मी, ब्रह्म ज्ञान ओंजळी
पण देशील ना धीर भ्रमित मनाला त्या शेवटच्या वेळी?।।
हे सतत मनात येणारे सारे प्रश्न आता संपले रामा..आता कशाची ही काळजी नाही!
कधीही लिखाण न करणाऱ्या काकूंच्या हृदयातून भक्ती रस कवितेच्या रूपात पाझरू लागला. सतत वाटणारी अंतःकाळाची भीती त्या भक्तिरसात विरघळून गेली.
दिलीस बकुळी, चाफा, तुळशी, सर्वोत्तम तू माळी
फुलवलास रे वेलू मोगरा, जो जाईल गगनावेरी।।
जीवन रथ हा अशाश्वताचा, वारू मनाचे उधळी
पण सावरशी मज, मी अडखळता, त्या उदास कातरवेळी।।
केशवरावांना ॲाप्रेशन थिएटरात मुकुटधारी राम कसा भेटला असेल याचे उत्तर मिळालं.

सर्वव्यापी म्हणजे काय थोडंसं कळू लागलं होतं. ज्याने एवढा मोठा विश्वाचा पसारा मांडला त्याला काय कठीण आहे? त्यांना खुदकन हसू आलं. गरम खिचडी डब्यात भरून त्या हॉस्पिटल ला जायला उठल्या.
बघावे तर दारात आशिष पहिलं बक्षीस मिळालं हे सांगायला रामरायाच्या वेषात आला होता.
बघावे तर दारात आशिष पहिलं बक्षीस मिळालं हे सांगायला रामरायाच्या वेषात आला होता.
त्याला जवळ घेत काकू म्हणाल्या, "रामराया, किती रे तुझी तळमळ तुझ्या भक्तांसाठी!"
आशिष म्हणत होता, "अग, मी आशिष! काकू अशी कशी फसतेस ग?
काकू हसून म्हणाल्या, "राजा तू फसलास.. मी नाही!"
चित्रातला मुकुटधारी राम हा सोहळा बघत कौतुकाने हसत होता!
©® ज्योती रानडे
आशिष म्हणत होता, "अग, मी आशिष! काकू अशी कशी फसतेस ग?
काकू हसून म्हणाल्या, "राजा तू फसलास.. मी नाही!"
चित्रातला मुकुटधारी राम हा सोहळा बघत कौतुकाने हसत होता!
©® ज्योती रानडे
सदर कथा लेखिका ज्योती रानडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.