©® सौ.दिपमाला अहिरे.
आज त्यांच्या छोटेखानी घरात मोठा आनंद साजरा होत होता कारण एक सुंदर परी त्यांच्या घरी जन्माला आली होती. आणि तिचे बारसे होते.
जोशी दांपत्य, वसुधा आणि मनोज खुपच खुश होते. तसा त्यांचा मोठा मुलगा बिपीन दोन वर्षांचा होता आणि आता त्याच्या पाठीवर मुलगी झाली होती.
आज तिचे बारसे होते. तिचे नाव मोठ्या कौतुकाने दोघांनीही प्रेरणा ठेवले होते.
जोशी दांपत्य म्हणजे दोघेही मुके आणि बहिरे होते. एका सामुदायिक विवाह योजनेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांची ओळख झाली. दोघेही एकमेकांसारखे आणि अनुरूप असल्याने दोघांचेही लग्न जमले.

एकमेकांच्या इशाऱ्याने दोघांचाही संसार फुलत होता. पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनात त्यांच्या संसारवेलीवर दोन सुंदर फुलेही आली होती.दोघांना एकाच गोष्टीचे समाधान होते.की, दोन्ही मुले चांगली होती. बोलु आणि ऐकुही शकत होती.
मोठ्या मुलाच्या जन्माच्या वेळी एवढा आनंद झाला नव्हता जेवढा दोघांनीही आपल्या मुलीच्या जन्मानंतर झाला होता. कारण लेकीच्या रुपात आपल्या घरी लक्ष्मी आली आहे आणि या लक्ष्मीच्या येण्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, चिंता दुर होतील असे त्यांना वाटत होते..
मुलीचे गोंडस रूप पाहून दोघांनीही बोलता येत नव्हते पण त्यांच्या डोळ्यात तो आनंद ओसंडून वाहत होता.
आणि मुलगी खरोखरच इतकी गोंडस आणि सुंदर होती की, आजुबाच्या बाया आणि नातेवाईक सर्वच कौतुक करत असत. अगदी नक्षत्रा सारखे रुप आहे. जोशी दांपत्य आपली परीस्थिती हालाखीची असुनही दोन्ही मुलांना अगदी लाडाकोडात वाढवत होते.
मनोज एका कापड दुकानात सेल्समन चे काम करायचा. उरलेल्या वेळेत त्यांना थोडेफार वायरमनचे काम यायचे ते करायचे. कुणी पंखा फीट करायला सांगितले, मोटर दुरुस्त करायला सांगितले तर ते करुन द्यायचे. त्यातुन थोडेफार पैसे मिळायचे. वसुधा घर सांभाळून उरलेल्या वेळात शिलाईनचे काम करायची. त्यातून थोडेफार पैसे मिळायचे अशा पद्धतीने त्यांचे दिवस निघत होते. दोघांनीही बोलण्याचा आणि ऐकण्याच्या त्रासामुळे बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत असे.
पण मुलांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दोघेही रंगवत होते.आणि त्या परीने मेहनतही करत होते. आपले दोघी मुलं शिकुन सवरुन मोठे होऊन नक्कीच आपली परीस्थिती बदलतील याची दोघांना खात्री होती.
मुलाने, बिपीन ने चांगले शिक्षण घेऊन नौकरी ला लागावे असे दोघांनीही वाटत होते.त्यासाठी दोघं नवरा बायको काटकसर करून थोडे थोडे पैसे ही जमा करत होते.

प्रेरणा आणि बिपीन दोघांनीही चांगल्या शाळेत शिकायला टाकले होते..
बिपीन ला ट्युशन ही लावले होते. कारण तो अभ्यासात थोडा कच्चा होता. त्याचे डोके चालत नसे.खरं तर त्याचे अभ्यासात मनच लागत नसे.
चौथीच्या वर्गात असतांनाच तो नापास झाला होता. त्यामुळे नातेवाईक आणि शेजारी पाजारी कधी कधी बोलत ही असत " या मुलाचे काही खरे नाही.. बिचाऱ्या गरीब आईबापाचे कष्टाचे पैसे वाया घालवेल हा फक्त.."
आईवडिलांना तर काही कळत नसे. कोण काय बोलतोय ते पण प्रेरणा सर्व ऐकायची.
बिपिन भविष्यात काही करेल की, नाही याची काही शाश्वती दिसत नव्हती. कारण शेवटी म्हणतात ना "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात."

पण याऊलट प्रेरणा ही अतिशय हुशार होती. अभ्यासात ही आणि इतर गोष्टतही..एक कमालीची उत्सुकता होती तिच्यात कुठलीही गोष्ट शिकण्याची, जाणुन घेण्याची, समजुन घेण्याची तिला नेहमीच घाई असायची..
कमालीचा आत्मविश्वास दिसायचा तिच्यात जो तिच्या वयाच्या इतर मुलांमध्ये तेवढा नसेलच..
दुसरीच्या वर्गात असुनही फाडफाड वाचन तर करायचीच पण पाढेही सर्व तोंडपाठ. तिला कधीच कुठली ट्युशन लावायची गरजच पडली नाही..
शाळेत क्रिडा स्पर्धा असो, चित्रकला स्पर्धा असो, निबंध लेखन असो प्रत्येक गोष्टीत प्रेरणा अव्वल असायची.पण तिचे वकृत्व सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे.
तिच्या वयाच्या मानाने तिचे वकृत्व वाखाणण्याजोगे होते. वकृत्व स्पर्धेत तिचा पहिला नंबर हा ठरलेला असायचा.. शाळेत प्रेरणा सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थी होती.. दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱी प्रेरणा वयाच्या मानाने जास्तच समजुतदार ही होती..
कधी कुणीही आईवडिलांना काही बोलले आणि तीने ते ऐकले तर ती सरळ सरळ बोलुन टाकत असे "माझ्या मम्मी पप्पा ला काही ऐकु येत नाही.तर तुम्ही काहीही बोलणार का? पण मला सर्व ऐकायला येते आणि बोलताही येते. म्हणुन त्यांना काही बोलण्याच्या आधी विचार करा..मी परत तुम्हाला उलट उत्तर देऊ शकते.हे लक्षात ठेवा.."
एवढीशी प्रेरणा एक बडबडी आणि गोंडस मुलगी आहे असे समजून तिच्या बोलण्याकडे हसुन सर्वेच दुर्लक्ष करत असत..
छोटीशी प्रेरणा भावालाही बोलत असे "दादा थोडा अभ्यास करत जा.." पण दिवसभर गल्लीतल्या पोरांसोबत उनाडक्या करत फिरणे,गोट्या खेळणे अभ्यास सोडुन बिपीनला या सर्वच गोष्टी जास्त आवडत होत्या.
वाईट मित्रांची संगत ही नेहमी मुलांना बिघडवत असते असे म्हणतात आणि काही वेळा या गोष्टी खऱ्या होतांना ही दिसतात. बिपीनचे ही काही मित्र तसेच होते. त्यांना शाळा आणि शिक्षणाचे महत्त्व नव्हते.
बिपिन ही त्यांच्या सारखा म्हणून त्याचे मित्रही तसेच होते आणि त्यांच्या सोबत राहुन बिपीन जास्तच वाया जात होता.
आठवीच्या वर्गात असतांनाच याच मित्रांच्या चिथावणी मुळे बिपीन ने आपल्या वर्गातील काही मुलांच्या दप्तरातुन पैसे चोरले होते.
सकाळी शाळा भरल्यानंतर सर्व मुले प्रार्थना साठी मैदानावर गेले होते. बिपीन आणि त्याच्या मित्रांना माहिती होते आज शाळेच्या फी साठी वर्गातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी पैसे आणले असतील.
वर्गात कुणीही नसतांना बिपीन आणि त्याच्या मित्रांनी सर्व विद्यार्थ्यांचे दप्तरं चेक करुन जे जे पैसे सापडले ते सर्व चोरी केले. बिपीनला थोडी भिती वाटत होती.

तो म्हणालाही "अरे आपल्याला कुणी चोरी करतांना पाहिले तर?" पण त्याच्या मित्रांनी त्याच्या कडे दुर्लक्ष केले..
जेवढे पैसे मिळाले तेवढे सर्वांनी वाटुन घेतले पण वर्गातील एवढ्या मुलांचे पैसे एकत्रच गायब झाले.तेव्हा मात्र मुख्याध्यापकां कडुन चोरांची शोधाशोध सुरु झाली..
सर्व मुलांनी पहिले बिपीन आणि त्याच्या ग्रुपची विचारपूस करावी असेच मुख्याध्यापक सरांना सांगितले. कारण टवाळक्या करणारा हा ग्रुप त्यांच्या पुर्ण शाळेत फेमस होता.
मुख्याध्यापक सरांनी या सर्वांची विचारणा करायला सुरुवात केली. एकेकाला चांगला चोप दिला. तेव्हा सर्वांनी बोलायला सुरुवात केली.. चोरलेले काही पैसे ही परत केले..
सर्वांच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले.

बिपीन ने त्याच्या आईवडिलांना काही सांगितले नाही.
शाळेतही सांगितले आईवडील मुकबधीर आहेत. ते नाही येऊ शकत शाळेत..
त्याच शाळेत सहावीच्या वर्गात असलेल्या बिपीन च्या बहिणीला प्रेरणा ला मुख्याध्यापक सरांनी बोलावून घेतले. आणि बिपीन चे सर्व कारनामे सांगितले.
सर बिपिनला म्हणाले "अरे ही तुझी लहान बहीण..तुझ्यात आणि तिच्यात किती फरक आहे?? ती किती हुशार आणि समजदार आहे.. तिच्या कडे बघून तरी काही शिकवण घे?"
बिपिन ने आपल्याच शाळेतील मुलांचे पैसे चोरले हे ऐकून प्रेरणाला खुप वाईट वाटले.

मोठ्या भावाला काय बोलावे?? म्हणून ती मुख्याध्यापक सरांसमोर त्याला काही बोलली नाही..उलट तिच्या भावाच्या चुकीची तिने सरांकडे माफी मागितली.आणि "त्याला शाळेतुन काढु नका.. आपल्या आईवडिलांना या गोष्टीचा खुप त्रास होईल" अशी विणवनी केली.
यापुढे आपला भाऊ असा वागणार नाही. या गोष्टीची खात्री दिली..
बिपिन प्रेरणा ला सांगु लागला "मी चोरी केली. हे मम्मी पप्पांना सांगु नकोस."
तेव्हा प्रेरणा त्याला बोलली. "दादा तु शाळेत चोरी केली.आणि सर्व शाळेसमोर सरांनी तुला मारले, रागावले. ही काही शाळेत पहिला नंबर मिळवण्या सारखी मोठी गोष्ट नाही की, आईवडिलांना सांगितले पाहिजे. पण तु जे वागतोस त्याचा परिणाम आपल्या वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांवर होतो.

ते काबाडकष्ट करून, एक एक पैसा जोडून आपल्याला शिकवतात की,आपण नौकरी ला लागुन त्यांच्या या गरीबीतुन त्यांना बाहेर काढु.. त्यांना ऐकता,बोलता येत नाही..तर त्याचा फायदा घेऊन तु कसाही वागशील?
हे तुला तरी योग्य वाटते का बरं? तु मोठा मुलगा आहेस आणि तुझ्या कडून नक्कीच त्यांना जास्त अपेक्षा आहेत. आणि आपले आईवडील इतरांच्या आईवडिलांपेक्षा थोडे वेगळे आहेत..तरी ते वेगवेगळे कामं करुन, मेहनत करून आपल्याला शिकवतात. त्यांचा विचार करुन आपण सुद्धा डबल मेहनत करून आभ्यास केला पाहिजे.असं नाही वाटत का तुला?"
आपल्या पेक्षा लहान असुनही प्रेरणा मध्ये कमालीची समझदारी आहे हे पाहून बिपीन ला चांगले वाटले आणि स्वतःची लाजही वाटली.

त्यावेळी त्याने प्रेरणा ला शब्द दिला "या पुढे मी असे चुकीचे वागणार नाही..वेळेवर शाळेत जाईल, अभ्यास करेल.."
या गोष्टी किती खऱ्या होतात, बिपिन थोडाफार का असेना पण बदलतो की, नाही याची खात्री प्रेरणाला नव्हती. पण शेवटी कसाही असला तरी मोठा भाऊ आहे. त्याच्या विषयी आदर तिला होता.. आणि बिपिन कसाही असला तरी आपल्या लहान बहिणीसाठी मात्र तो एक प्रेमळ भाऊ होता..
प्रेरणा इतक्या लहान वयात इतक्या समजुतीने वागत होती. कारण आईवडिलांच्या परीस्थिती ने तिला लहान वयातच समजदार बनविले होते असेच म्हणावे लागेल..मुली या मुळातच समजदार आणि खंबीर असतात असे उगाच नाही म्हणत..
प्रेरणा आता आठवीच्या वर्गात गेली आणि बिपीन दहावीला.. बिपीनच्या आईवडिलांना त्याच्या दहावीच्या वर्षाची खूप चिंता होती. प्रेरणाला तर माहिती होते तो पास होणार नाही ते..कारण यावर्षी ही बिपीन ने शाळेत पुर्ण हजेरी लावली नव्हती. त्या उनाड मुलांसोबत तो इकडे तिकडे टुकार पणा करत फिरत होता.
प्रेरणा रोजच भावाला अभ्यास कर.. आभ्यास कर.. सांगत होती. पण त्याने नेहमीच दुर्लक्ष केले.आणि शेवटी जे व्हायचे तेच झाले.

बिपीन दहावी नापास झाला..एक विषय राहिला मराठी. आई वडिलांना खुप वाईट वाटले. पण पुन्हा नव्याने शाळेत ॲडमिशन घेऊन आभ्यासाला सुरवात करण्यासाठी आईवडिलांनी त्याला प्रोत्साहित केले..
पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.. पुन्हा नापास होऊन त्याचे तेही वर्ष वाया गेले..

आता आपण पास होणार नाही. हे बिपीन ला समजले शेवटी त्याने शाळाच सोडली आणि वडिलांबरोबर काम करायला सुरुवात केली. जे त्याच्या आईवडिलांना अजिबात आवडत नव्हते..
मुलाने शिकुन नौकरी ला लागावे हिच त्यांची आधीपासून इच्छा होती.
बिपिन थोडेफार काम करायचा जे काही पैसे मिळायचे ते मित्रांमध्ये पत्ते खेळण्यात उडवुन द्यायचा. काही दिवसात तो दारुही प्यायला लागला.
वाईट संगतीमुळे तो पुर्ण वाया गेला होता..
प्रेरणा आता दहावीत गेली.आभ्यास सांभाळून घरात आईला ही मदत करायची

.शिलाई कामातही हातभार लावायची, स्वयंपाक ही अगदी चविष्ट करायची.. दिसायला ही देखणी होती. समजुतदारपणा तर तिच्यात होताच..
तिला पाहून आईवडिलांना समाधान वाटायचे. पण तिच्या लग्नाची चिंता ही होतीच. दहावीत चांगले मार्क्स पाडण्यासाठी प्रेरणा रात्रंदिवस अभ्यास करत होती.
पण म्हणतात ना काळाने पुढे काय मांडुन ठेवले आहे ते आपल्याला माहित नसते..
प्रेरणाच्या दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी बिपीन आणि त्याच्या मित्रांचे एका मुलाशी कडाक्याचे भांडण झाले आणि ते भांडण इतके वाढले की एकमेकांच्या जिवावर ते उठले..

बिपिन ने त्या मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला आणि तो मुलगा भयंकर जखमी झाला. तो मुलगा एका नगरसेवकाचा मुलगा होता. बिपीन आणि त्याच्या मित्रांवर केस झाली त्यांना जेलमध्ये टाकले...बिपीनच्या एका मित्राने ही बातमी त्याच्या घरी कळवली. तेव्हा बिपीन चे वडील घाईघाईने निघाले.. रस्त्यावर चालतांना एका भरघाव येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली आणि ते जागेवरच बेशुद्ध पडले..
प्रेरणा ला आपला पेपर सोडुन आधी वडिलांना दवाखान्यात टाकावे लागले. मदतीला कुणीही नाही. आई बोलु शकत नाही म्हणुन प्रेरणालाच सर्व पहावे लागले..

मन मोठं करुन तिने आपली परीक्षा देणे टाळले आणि खंबीर पणे आईवडिलांच्या पाठीशी उभी राहिली.
त्यांना धीर दिला. त्यांना सांभाळले..भाऊ जेल मधुन सुटुन येईल आणि आईवडिलांसाठी तो काही करेल याची तिने अपेक्षाच सोडुन दिली होती.
अपघातामुळे वडिलांचा एक पाय पुर्ण गेला होता. ते काहीच करु शकत नव्हते. प्रेरणाने एका कंपनीत काम शोधले. शिक्षण थोडे दिवस बाजुला ठेवावे लागेल हे एव्हाना तिला समजले होते. म्हणुन काम करुन घर कसं चालवता येईल या गोष्टी ला तिने प्राधान्य दिले
प्रेरणा मनमिळाऊ तर होतीच पण आपल्या हुशारीने , आत्मविश्वासाने तिने लवकरच कंपनीत सर्वांची मने जिंकली. आपल्या कामात चोख पणा दाखवुन आपली प्रतिमा ही चांगली बनवली..घर सांभाळून ,आपले काम सांभाळून लवकरच तिने दहावीची परीक्षा ही उत्तीर्ण केली..

मुळातच हुशार असल्यामुळे मराठी,हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषा चांगल्या शिकुन घेतल्या. तिला पाहून कुणालाही खरं वाटत नसे की, ती फक्त दहावी शिकली आहे..
तिच्या खंबीर पणाने तिने आपल्या आईवडिलांना आधार तर दिलाच. पण आपल्या प्रचंड आत्मविश्वासाने आणि इच्छाशक्ती ने आपले घरही सांभाळले होते...
बिपीन चे आयुष्य पुर्ण वाया गेले होते. त्याने स्वतः च्या हाताने ते तसे बनवले होते. आता तर तो आठ आठ दिवस घरीही येत नसे. आपल्या वायबार मित्रांच्या संगतीत पत्ते खेळण्यात आणि दारु पिण्यात तो पुर्ण बरबाद झाला होता..आईवडिल हतबल झाले होते.
काय करावे काहीही समजत नव्हते.. प्रचंड दारु पिल्याने बिपीन चे लिव्हर खराब झाले होते.
प्रेरणाने बऱ्याचदा भावाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकण्याच्या परीस्थिती त नव्हता.
तो दारु शिवाय राहु शकत नव्हता.
प्रेरणा ने स्वतः भावासाठी दवाखान्याच्या पायऱ्या झिजवल्या.. वेगवेगळ्या ट्रस्ट कडुन पैसा जमवून जमवुन त्याचा इलाज केला. ऑपरेशन केले पण शेवटी तो वाचला नाहीच..
आईवडिलांना मोठा धक्का बसला.. एवढ्या कमी वयात आपल्या मुलाचे आयुष्य संपले...प्रेरणा ला खुप वाईट वाटत होते. प्रयत्न करुनही मी माझ्या दादाला वाचवु शकले नाही..
प्रेरणा अशीही एकटीच होती..पण भावाच्या जाण्याने ते एकटेपण तिला जाणवु लागले. आई वडील, नातेवाईक प्रेरणाला लग्न करण्यासाठी आग्रह करत होते..पण प्रेरणा अजुन लग्नासाठी तयार नव्हती. कारण तिच्या आईवडिलांना तिची गरज होती हे तिला माहीत होते..
मेहनतीने न डगमगता, खंबीर पणे प्रेरणा परीस्थिती शी दोन हात करत होती.. आईवडिलांसाठी दोन खोल्यांचे घर बांधले. सोबतच आपले पुढचे शिक्षण ही चालु ठेवले.. त्यामुळे ती कंपनीत सुपरवायझर च्या पोस्ट पर्यंत पोहचली..

लग्नाला जेव्हा स्वतः हुन मागणे येऊ लागले तेव्हा तिने एकच अट ठेवली.
माझे आईवडील हे माझी जबाबदारी आहेत.. लग्नानंतरही मी त्यांना माझ्या जवळ ठेवेल.. आणि मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करेल.. आणि यासाठी मी त्यांचा कुठलाही भार माझ्या नवऱ्यावर टाकणार नाही..मी स्वतः च्या कष्टाच्या पैशाने त्यांचा सांभाळ करेल आणि या गोष्टीचा स्वीकार करून जो व्यक्ती माझ्या बरोबर लग्न करायला तयार असेल त्याच्याशीच मी लग्न करणार.. नाही तर मी आईवडिलांचे आणि माझे आयुष्य बघायला "मी स्वतः खंबीर आहे."
©® सौ.दिपमाला अहिरे.
©® सौ.दिपमाला अहिरे.
सदर कथा लेखिका सौ.दिपमाला अहिरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.