© अनुजा धारिया शेठ
बस स्टॉपवर उभी असताना कावेरीला अचानक मानस दिसतो. तिला समजेना हा इथे कसा?
ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो सपशेल दुर्लक्ष करतो. कावेरी ला धक्का बसतो.
हा काय असा मला ओळखलं का नाही याने..... कोणत्या विचारात होता... की स्वतःच्या मैत्रिणीला ओळखले नाही याने... (हा थोडी जाडी झाले मी आता पण न ओळखता यावी एवढी पण नाही) मनात म्हणाली ती.
उद्यां जातेच घरी आणि खबर घेते याची..... ह्या वेळेला मी खूप सुटटी घेऊन आले.... सगळ्यांना भेटते पण पहिली खबर ह्याची घेते.
कावेरी आणि मानस लहान असल्या पासून एकत्र वाढले, खूप घट्ट मैत्री होती. काही लपवायचे नाही एकमेकांपासून..... कॉलेजला गेल्यावर मात्र दोघांची साइड वेगळी.....मानसने इंजिनीरिंग केले....आणि हिने B.com करून मग M.B.A केले.... त्यामुळे थोडा दुरावा आला मैत्रीमध्ये पण रोज रात्री जेवल्यावर शतपावली करायला सोबत जायचे.
सगळ्यांना वाट्त होते आता हे लग्न करणार. पण त्यांच्यामध्ये फ़क्त मैत्री होती.....मानसला ऋतू आवडायची....त्याने कावेरीला सांगितले तसे....ऋतू आणि मानस यांच प्रेम कावेरी ने जमवून दिले..
तसे थोडे थोडे कावेरी आणि मानस लांब झाले....आणि मग् कावेरीचे लग्न ठरले....लग्नाला ते दोघेही आले होते.
लग्न झाले मग् अजून बोलणे कमी झाले.....
तिच्या लग्नाला ह्या सगळ्यात सहा महिने होऊन गेले. पण तीच्या नवऱ्याची बदली लगेच झाली म्हणून गेल्या ६ महिन्यात ती माहेरी आलीच नव्हती....आणि मानस पण तिला आता आठ दिवसात एकदाच फोन करायचा.
तसा तिचा नवरा एकदम फ्रेंडली होता....तरी पण नको असे मानस बोलायचा....ती पण बिज़ी झाली होती.
एकदा मानसने फोन वर सांगितलं की त्याने घरात ऋतू चा विषय काढला होता....जास्त कॊणी चिडले नाही...भेटायला घेऊन ये बोलले.
तेव्हा कावेरीला खूप आनंद झाला. आता ती वाट बघत होती मानसच्या फोनची....कि काय सांगतोय??
घरचे काय म्हणतात?? म्हणजे लग्नाच निमित्त घेऊन ती पण आईकडे आली असती.
पण फोन येतं नाही ती फोन करते तर लागत नव्हता....वाट बघणं हा एकच पर्याय होता...आणि फोन आला तो म्हणाला काऊ, आमचे लग्न ठरले.
आई बाबा सगळ्यांनी परमिशन दिली....तूला नक्की यायचंय....
तिला पण खूप आनंद झाला...आता मला पण आईकडे जायला मिळेल....तिने तारिख विचारली....तर तो म्हणाला नाही काढली....पण काढू लवकरच....कळवतो तूला.....आणि त्याने फोन ठेवला.
तिच्या नवऱ्याला सुटटी मिळण शक्य नव्हते....त्याने तिला जायला सांगितलं.
पण तारिख ठरेल तेव्हा ती जाईल ना....आता तिने आईला फोन केला....आग आई मानस आणि ऋतू चे लग्न ठरले....आता मी येईन.....आई म्हणते आग आम्हाला काहीच माहिती नाही....तुझे लग्न झाले आणि त्याचं नवीन घर त्यांनी घेतलंय ना तिकडे तें शिफ्ट झाले....
कावेरी म्हणते, मला काहींच बोलला नाही तो...आई म्हणते आग ते जाउदे तू कशी आहेस आणि कधी येतेस....आग ते मी तूला कळवते मग....त्याचा फोन आला की....
आणि कावेरी मनात विचार करते. मला काहीच कस बोलला नाही....शिफ्ट झाला तें.....परत विचार करते....लग्नाच्या टेन्शनमध्ये विसरून गेला असेल....जाऊ देत....फोन आला की विचारते..
आणि ती परत तिच्या कामात बिज़ी होते....आता पहिली दिवाळी आलेली असते....त्यामुळे ती माहेरी जाणार म्हणून खुश असते.... सगळ्यांना भेटणार म्हणून.....स्पेशल म्हणजे मानस आणि ऋतू ला.....त्याचं लग्न एवढ्यात नाही म्हणुन काय झालं....एक गिफ्ट घेऊन जाऊ असे ठरवते mआणि सर्व तयारी करते.....आकाश ...तिचा नवरा पण तिच्या सोबत घरी येतो.
पहिल्या दिवाळीचे निमित्त घेऊन ती आईकडे येते आणि 2 दिवस राहून जवळच अर्ध्या तासाच्या अंतरावर सासरी गेली.... आकाश गेला की परत माहेरी येणार होती.... त्यामुळे ती खूप खुश होती....तिला खूप वेळ मिळणार होता सगळ्यांसोबत.
त्यामुळे आल्या आल्या ती कुठेच गेली नाही कि कोणाला फोन केला नाही. दिवाळी झाली, सासरी गेली २ दिवस...आणि आकाश नोकरीच्या ठिकाणी गेला होता. आणि ती आज परत आईकडे येतं होती तेव्हा बस स्टॉपवर उभी असताना हे सगळे झाले.
तेवढ्यात बस आली आणि ती आईकडे गेली....तिच्या डोळ्यासमोर सारखा मानस येतं होता.....असा का वागला??? ती आईला बोलली सर्व आज बस स्टॉप वर जे झालं तें.
तर आई म्हणाली आग त्याचे लग्न ठरले तू बोललीस, म्हणून फोन केला मी मागच्या आठवड्यात आणि सांगितलं कि काऊ येणार आहे. तर मानसला पण पाठवा दिवाळीमध्ये. जोडीने आला तरी चालेल, तर त्याची आई सांगत होती की १५ दिवसापूर्वी त्या मुलीचा accident झाला, आणि ती गेली.... तेव्हा पासून मानस बोलत नाही आहे.... डोक्यावर परिणाम झाल्यासारखा वागतोय.
कावेरीला धक्का बसला. ती लगेच निघाली.आई आलेच मी...
आग थांब....आई हाक मारेपर्यंत कावेरी गाडी घेऊन गेली.... तिला त्याच नवीन घर शोधून काढून मग् जावं लागणार होते....साधारण एरिया माहीती होता...एकदा बोलता बोलता त्यानेच सांगितलं होता....ती शोधत घरी पोहचली....काकूंनी तिला मिठी मारली.... काऊ बघू ना कस करतोय हा?? काहीच बोलत नाही. कावेरी त्याच्याशी बोलायला गेली, पण तो काहीच बोलला नाही....त्याने दार लावुन घेतले.... काकू सगळे सांगत होत्या....तिने तें ऐकून घेतले. आणि काही तरी ठरवून ती घरी आली.
आता ती रोज जात होती, पण त्याच्यासोबत न बोलता ती त्याच्या आई आणि बहिणी सोबत गप्पा मारायची.... ती आणि मानस लहान असताना...कसे खेळायचे, कसे भांडण करायचे, सगळे हसायचे... एकदा एक किस्सा मुद्दामून तिने खोटा सांगितला, लगेच तो म्हणाला....ए गप खोट सांगूं नको हा..आणि तो बोलू लागला....
खूप दिवसांनी तो हसला, बोलला....सगळ्यांना बर वाटले.... कावेरी नी 4दिवसात त्याला बोलते केले.... बोलता बोलता त्यांनी मन मोकळे केले त्याचे....
ऋतू चा accident ला तो स्वतःला जबाबदार समजत होता. त्याने तिला बोलावलं नसते तर.. असे त्याचे म्हणणे होते.... काऊने त्याला समजावून सांगितलं, कि जे तिच्या नशिबात होते तें झाले. तू नसते बोलावलेस तरी तें होणाऱ होते. फ़क्त जागा वेगळी असली असती एवढंच.... त्याला तें पटले.... तो स्वतःला दोष देत होता त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाला होता, तो तिने बोलुन बोलुन परत आणला. शेवटी मैत्री जिंकली....
तो म्हणाला काऊ I Love You....खरच आपल्या मैत्रीच प्रेम जिंकले. तू नसती तर मी परत उभा राहूं शकलो नसतो....
कावेरी हसते....आणि त्याच्याकडून प्रॉमिस घेते की, कोणतेही संकट आले तरी स्वतःला दोष न देता तो खंबीर उभा राहील. इकडे आकाश न्यायला येतो. म्हणून कावेरीची आई तिला फोन करते.... मानस तिला सोडायला येतो तेव्हा आकाशला सगळे सांगतो.
आकाश म्हणतो खरच तुमच्या मैत्रीमधील प्रेम बघून मला पण वाट्ते कि मला पण अशी एक तरी मैत्रीण हवी होती पण देवाने माझी इच्छा बायकोच्या रुपाने पूर्ण केली.
गप्पा सुरू असताना कावेरी चक्कर येऊन पडते.
दोघेही तिला आतमध्ये घेऊन येतात....आणि Dr ना बोलावतात....आणि Dr गोड बातमी देतात.......
आणि मग् आकाश म्हणतो आता मला माझी मैत्रीण म्हणून मुलगी हवे बर का कावेरी...
सगळे हसतात शेवट गोड होतो.
मैत्रीमध्ये देखील असे प्रेम असते.
एक मुलगा आणि मुलगी मध्ये नितळ मैत्री असू शकते आणि त्यातून वाटणार प्रेम हे देखील नितळ असते.
हे दाखवायचा हा छोटासा प्रयत्न केला आहे ह्या कथेमधून... कथा पूर्ण काल्पनिक आहे, आवडली का नक्की सांगा.
©अनुजा धारिया शेठ
सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

तुमच्या इतर कथांसारखीच सुंदर कथा..👌👌 मैत्रीविषयी खुप छान व सुंदर कल्पना मांडली 👍👍🙏🙏
उत्तर द्याहटवाThank you so much!!
उत्तर द्याहटवा