© वर्षा पाचारणे.
"आजपासून दगदग नाही की कसली धावपळ नाही"... "तुमच्यासोबत आजपासून मीही रिटायर्ड लाईफ जगणारे... जेवढं शक्य असेल तेवढं भटकायचं, खायचं, प्यायचं, पुस्तकं वाचायची, मित्रमंडळी जमवायची , आणि उरलेलं आयुष्य भरभरून जगायचं"... मालती आज्जींना किती बोलू आणि किती नको असं झालं होतं.
"माझी बायको सकाळी उठल्यापासून तुमचं सारं काही नीटनेटकेपणाने करत असूनही तुम्ही मात्र तिच्या कामात अजून भर घालता.. तिने सगळा स्वयंपाक केलेला असतानाही पुन्हा दुपारी वेगळी भाजी करून खाता.. त्यामुळे दुपारची शिल्लक राहिलेली भाजी तिला पुन्हा रात्री खावी लागते...
रिटायरमेंट चा सोहळा संपून घरी आल्यानंतर आज मालती आज्जी आणि जीवन आजोबा एका वेगळ्याच विश्वात वावरत होते..
कारणही तसंच होतं... लग्न झाल्यापासून अगदी गरिबीत दिवस काढले होते.. पै पै जमवून संसार उभा केला होता... जीवन आजोबा सरकारी नोकरीत असल्याने आयुष्याची संध्याकाळ पेन्शनवर मजेत घालवता येणार ही मात्र खात्री होती.

मोठा मिहीर आणि धाकटी मिथिला दोघेही कमावते झाले होते... मिथिला लग्न करून सिंगापूरला सेटल झाली. आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणून तिच्याकडे आता अजिबात फुरसत नव्हती. गेल्या दहा वर्षात लेकीचं तोंडंही पाहायला मिळालं नव्हतं.
'व्हिडिओ कॉल वरून जे काही पाच-दहा मिनिटे दिसेल तेवढंच आपलं सुख मानायचं', असं आजी-आजोबांनी ठरवलं होतं... मिहिरचं देखील लग्न झालं होतं..
'आपल्या आयुष्यात जी काही हौस झाली नाही, ती सुनेची पुरवायची म्हणून मालती आजींनी लग्नात अगदी पोटच्या लेकीप्रमाणे सुनेला काय हवं, काय नको ते घेऊन दिलं होतं.
सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली ऐश्वर्या तशी फारच फटकळ स्वभावाची निघाली.. त्यात मालती आजींचा स्वभाव अतिशय शांत असल्याने घरात वादविवाद नको म्हणून सुरुवातीपासूनच त्यांनी ऐश्वर्याला कुठल्याच प्रकारे काही बोलण्याचा प्रयत्न केला नाही.
ऐश्वर्याची चूक असली तरी मालतीबाई सारे काही सांभाळून घेत होत्या..
'सासूने जरी आईप्रमाणे जीव लावला, तरी ती सासुच असते' असं डोक्यात ठेवून सासरी पाऊल ठेवलेली ऐश्वर्या दिवसभर तिच्या खोलीत बसून असायची.
'सासूने जरी आईप्रमाणे जीव लावला, तरी ती सासुच असते' असं डोक्यात ठेवून सासरी पाऊल ठेवलेली ऐश्वर्या दिवसभर तिच्या खोलीत बसून असायची.
दिवसभराचं ठरलेलं काम अगदी घड्याळाच्या ठोक्यावर करणारी ऐश्वर्या अगदी सकाळी आठ वाजताच दुपारचं जेवण बनवून ठेवायची.. दुपारी तो गार झालेला वरण भात खाताना जीवन आजोबांची मात्र फार चिडचिड व्हायची.
'आपण तिघे घरातच असतो.. कोणाला कुठे बाहेर जायचं नसतं, मग एवढ्या लवकर अन्न शिजवून ठेवायची काय गरज आहे ?', असं त्यांनी अनेकदा ऐश्वर्याला समजावून पाहिलं, परंतु "दिवसभर काय त्या स्वयंपाक घरातच अडकून पडू का?", असं म्हणत ऐश्वर्याने तिथल्यातिथे विषय संपून टाकला.
कुठल्याही भाजीला फक्त कापलेला लसूण आणि जिरे मोहरीची फोडणी घालून परतायची एवढीच काय ती ऐश्वर्याची रेसिपी... कधी कसले वाटण घाटण नाही की भाज्यांना खमंग रुचकर चव नाही.
कुठल्याही भाजीला फक्त कापलेला लसूण आणि जिरे मोहरीची फोडणी घालून परतायची एवढीच काय ती ऐश्वर्याची रेसिपी... कधी कसले वाटण घाटण नाही की भाज्यांना खमंग रुचकर चव नाही.
आयुष्यभर गरिबी असली तरी चविष्ट खाण्याची सवय लागलेल्या आजी-आजोबांना आता या वयात मात्र मन मारून जे समोर येईल ते खावं लागत होतं.
"अगं, आज माझ्यासाठी जरा पिठलं-भाकरी करतेस का?", असं म्हणत आजोबांनी दुपारी मालती आज्जीला झणझणीत पिठलं करायला सांगितलं.
गरमागरम पिठलं, ज्वारीची भाकरी, कांदा, मिरचीचा ठेचा आणि सोबतीला ताकाची वाटी असा झक्कास बेत जमून आला होता... मालती आज्जींनी ऐश्वर्याला आवाज दिला.
"ऐश्वर्या, चल बाळा, गरमागरम पिठलं भाकरी खाऊन घेऊयात".. ऐश्वर्या निमूटपणे तिच्या खोलीतून बाहेर आली आणि सकाळी आठ वाजता केलेला वरण-भात पुढ्यात घेऊन खाऊ लागली.
आजी म्हणाल्या ,"अगं, आपण सगळे मिळून वरण-भात पण खाऊ आणि पिठलं भाकरी पण खाऊ"... पण का कोण जाणे, सासूने दुपारी स्वतःच्या हाताने काहीतरी केलं म्हटल्यावर ऐश्वर्या आतल्याआत रागाने धुमसत होती.
शांतपणे जेवण करून ती पुन्हा खोलीत गेली... जेवण झाल्यानंतर फक्त स्वतःचंच ताट घासून ठेवायचं असा तिने लग्नानंतर सुरुवातीपासूनच नियम केला होता... त्यामुळे मालती आज्जीला तिचं आणि आजोबांचं ताट घासणं अगदीच गरजेचं होतं.
दुसऱ्या दिवशीपासून ऐश्वर्याने फक्त मिहिरसाठी भाजी चपाती करण्याचं काम सुरू केलं... त्याच्या टिफिन साठी भाजी चपाती बनवताना ती शौर्यासाठी आणि तिच्यासाठी दुपारच्या दोन चपात्या बनवून त्या झाकून वेगळ्या ठेवून द्यायची.

सुरुवातीला मालती आजींना वाटलं तिची तब्येत बरी नसेल म्हणून तिने तिघांपुरत्या चपात्या केल्या.. मग आजीने आपल्या छोट्या नातीला शौर्याला विचारले ,
"काय गं बाळा, आईचं डोकं दुखतंय की काय? तिची तब्येत बरी नाही का?"...
शौर्या म्हणाली ,"नाही आज्जी, बरी आहे की आई"... "का गं, तू असं का विचारते?"...
"काय गं बाळा, आईचं डोकं दुखतंय की काय? तिची तब्येत बरी नाही का?"...
शौर्या म्हणाली ,"नाही आज्जी, बरी आहे की आई"... "का गं, तू असं का विचारते?"...
आता एवढ्याश्या लेकराला काय सांगणार, म्हणून आज्जी म्हणाली ,"नाही गं, असच सहज विचारलं"...
मालती आज्जी निमूटपणे स्वयंपाक घरात गेली आणि परातीतला पिठाचा गोळा बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. मोजून दोन चपात्या होतील एवढा पिठाचा गोळा शिल्लक ठेवला होता.
मालती आज्जी निमूटपणे स्वयंपाक घरात गेली आणि परातीतला पिठाचा गोळा बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. मोजून दोन चपात्या होतील एवढा पिठाचा गोळा शिल्लक ठेवला होता.
आजींनी डोळ्यातलं पाणी पुसत आजोबा आणि स्वतः पुरत्या चपात्या केल्या.. त्यानंतर मात्र असं रोजचं सारच काम ऐश्वर्या वेगवेगळे करू लागली.
एक दिवस अचानक भांडणांमध्ये ,'मला जास्त काम जमणार नाही', असं सांगून तिने कामाला बाई लावून टाकली.
आता यावर घरात कोणीच आक्षेप घेणारं नव्हतंच, पण तरीही ऐश्वर्या काही केल्या सुखासमाधानाने नांदत नव्हती.
मिहिर ऐश्वर्यासाठी ऑफिसवरून येताना बॅगमध्ये गपचूप खाऊ घेऊन यायचा. ही सवय त्याला कधी आणि कशी लागली ते मात्र काही कळलच नाही.
मिहिर ऐश्वर्यासाठी ऑफिसवरून येताना बॅगमध्ये गपचूप खाऊ घेऊन यायचा. ही सवय त्याला कधी आणि कशी लागली ते मात्र काही कळलच नाही.
आई-वडिलांना न देता फक्त आपल्या बायको मुली पुरता खाऊ आणणं त्याच्या मनाला कसं पटत होतं, हेच मालती आणि जीवन आजोबांना कळत नव्हतं.
'गरीबीतही आपण आपल्या मुलांची कसलीही हौस अपुरी ठेवली नाही, तरीही या वयात आज आपल्याला अशी वागणूक मिळते', या विचाराने जीवन अजोबा कासावीस व्हायचे. हळूहळ जीवन आजोबांचं या सार्या प्रकारामुळे जेवण अतिशय कमी झाले. धष्टपुष्ट असलेले जीवन आजोबा तब्येतीने खालावत चालले होते.
बाहेरच्या मंडळींशी घडाघडा बोलणारी सुनबाई घरात मात्र सासू-सासर्यांबरोबर चकार शब्द म्हणून बोलत नव्हती.
बाहेरच्या मंडळींशी घडाघडा बोलणारी सुनबाई घरात मात्र सासू-सासर्यांबरोबर चकार शब्द म्हणून बोलत नव्हती.
न राहून शेवटी मालती आज्जींनी एक दिवस ऐश्वर्याला विचारलं ,"ऐश्वर्या आमचं काही चुकतंय का?... तू दिवसभर तुझ्या खोलीत बसून असते, आमच्याशी बोलत नाही.. आमचं जेवण आम्ही करतो, तुझं जेवण तू करते... तुला आमच्या कुठल्या गोष्टी खटकत आहेत का?"... "तसं असेल तर तू सांग... आम्ही बदल करू आमच्यात"... या वयात फक्तं चार प्रेमाच्या शब्दांची गरज असते"...
त्यावर अगदी कसंतरी हसत ऐश्वर्या म्हणाली ,"नाही, असं काहीच नाही आणि मी पहिलंच सांगितलं होतं मला जास्त काम जमत नाही, म्हणून मी जमेल तेवढेच काम करते", असं म्हणून ती पुन्हा तिच्या खोलीत निघून गेली.… यावर काय बोलणार म्हणून आजी आजोबा मात्र एकमेकांकडे नि:शब्दपणे बघत राहिले.
"अगं ऐश्वर्या, यांना थोडंसं दूध गरम करून देतेस का?... आज त्यांची तब्येत बरी नाही आणि मला पण खूप पित्त झालंय.. मी माझ्या चपात्या नंतर करेल, फक्त तेवढे दूध गरम करून दे".

मालती आज्जीनी असं म्हणताच ऐश्वर्या म्हणाली , "आई आता दूध फक्त शौर्या पुरतेच राहिले आहे आणि तेही तिला चार वाजता झोपेतून उठल्यावर घ्यायला लागेल, त्यामुळे तुम्ही बाबांना एक दुधाची पिशवी आणायला सांगा", असं म्हणत छान पैकी नट्टापट्टा करत ऐश्वर्या गाडीला किक मारून माहेरी निघूनही गेली.
आता तास-दीड तास तरी ती काही घरी येत नाही, म्हणून मालती आज्जी मात्र अंगात त्राण नसतानाही डेअरीत जावून दूध घेऊन आल्या. आधीच पित्त झाल्याने त्यांना उलटी आल्यासारखं वाटत होतं. उभं राहण्याचेही त्राण अंगात शिल्लक नव्हते.
अशातच दुधाची पिशवी फोडताना थोडे दूध किचन ओट्यावर सांडलं. आधी दूध तापवावं आणि मग ते साफ करावे या विचारात असताना आज्जींनी दूध तापवून आजोबांना दिलं आणि या साऱ्या गडबडीत त्या ओट्यावर सांडलेलं थोडंसं दूध साफ करायच्या विसरल्या..
ऐश्वर्या आणि शौर्या दीड-दोन तासांनंतर घरी आल्या.. स्वतःचं ताट वाढून घेत ऐश्वर्या आणि शौर्या रूम मध्ये जाऊन जेवल्या. परंतु किचन ओट्यावर सांडलेले दूध साफ करावे असंही तिच्या मनात आलं नाही, की सासू-सासर्यांची तब्येत बरी आहे की नाही, याबद्दल काडीमात्र विचारपूस तिने केली नाही.

उलट दूध तसंच ओट्यावर राहू दिलं. संध्याकाळी मिहिर घरी आल्यानंतर ऐश्वर्याने त्याला काय सांगितलं कोण जाणे, परंतु मिहिर आई-बाबांबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत एकही शब्द बोलला नाही.
आपल्या दुखण्याखुपण्यात कोणीतरी बरोबर असावं, अश्या वयात लेक आणि सुनेकडून मिळणारी अशी वागणूक म्हणजे कुठल्याही छळवणूकीपेक्षा कमी नव्हती. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली होती..
दुसऱ्या दिवशी सकाळी मालती आज्जी स्वतःच लेकाशी बोलायला गेल्या, पण ऑफिसच्या गडबडीत असल्याचा कारण दाखवून त्याने आजही बोलणे टाळले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मालती आज्जी स्वतःच लेकाशी बोलायला गेल्या, पण ऑफिसच्या गडबडीत असल्याचा कारण दाखवून त्याने आजही बोलणे टाळले.
दोन-तीन दिवसांनी क्षुल्लक कारणावरून वाद घालत मिहिर आई बाबांना नको तसं बोलू लागला.
"माझी बायको सकाळी उठल्यापासून तुमचं सारं काही नीटनेटकेपणाने करत असूनही तुम्ही मात्र तिच्या कामात अजून भर घालता.. तिने सगळा स्वयंपाक केलेला असतानाही पुन्हा दुपारी वेगळी भाजी करून खाता.. त्यामुळे दुपारची शिल्लक राहिलेली भाजी तिला पुन्हा रात्री खावी लागते...
आणि परवा दिवशी दुधाची पिशवी आई तुला फोडता येत नसेल तर तु ऐश्वर्याला सांगायचंस ना ... संध्याकाळी मी घरी येईपर्यंत किती त्या किचन ओट्यावर घाण करून ठेवली होती".. हे जर असंच सगळं वेगळं करायचं असेल, तर आम्ही वेगळेच राहतो ना".. असं म्हणत मिहिरची बडबड चालू होती.
त्याची बडबड चालू असताना ऐश्वर्य मात्र शांतपणे सोफ्यावर बसून होती..
मग मात्र मालती आज्जींचा संताप अनावर झाला.. एरवी शांत असणारी आपली बायको चिडलेली पाहून जीवन आजोबा त्यांना शांत करू पाहत होते...
"अगं, काही बोलू नकोस... आपलेच दात आणि आपलेच ओठ असं म्हणायचं आणि शांत बसायचं", असं म्हणत आजोबा आज्जींना घेऊन रूममध्ये जाऊ लागले.. पण आज मात्र आज्जींनी सारं काही स्पष्टपणे बोलायचं ठरवलं होतं..
"हे बघ मिहिर तुझी बायको तुला काय सांगते हे माहीत नाही ,परंतु तुमच्या दोघांपुरता स्वयंपाक ती करते.. तू ऑफिसला गेल्यानंतर ती दिवसभर खोलीत जाऊन बसते.

आमच्या दोघांच्या वाटणीचे चपातीचे पीठही ती तसंच परातीत ठेवते.. मग मला भागच पडतं चपात्या करणं. घरात दुपारी जेवायला आम्ही तीन-चार जण असूनही सकाळची राहिलेली अर्धी वाटी भाजी किती पुरणार, म्हणून तिला अनेकदा दुसरी भाजी कर असं सांगितलं, तर ती राहिलेली भाजी तुम्ही दोघेच जण खा असं म्हणत, ती रागाने नुसताच वरण-भात खाते.
आमच्यामुळे ती अर्धवट जेवायला नको म्हणून शेवटी मी आणि बाबा दुपारी अनेकदा दूध आणि चपाती खातो.. यावरही तुला काही बोलायचं असेल तर तू बोलू शकतोस... आजीने असं बोलताच मिहिर तावातावाने ऑफिसला जाताना 'मला काही बोलायचंच नाही', असं म्हणत निघूनही गेला..
आपल्यामुळे मुलाला असं ऑफिसला जाताना चिडचिड करावी लागली, म्हणून पुन्हा मालती आज्जींचं मन मात्र दिवसभर स्वतःला दोष देत राहिलं.
आपल्यामुळे मुलाला असं ऑफिसला जाताना चिडचिड करावी लागली, म्हणून पुन्हा मालती आज्जींचं मन मात्र दिवसभर स्वतःला दोष देत राहिलं.
'दोष नक्की कुणाचा? नशिबाचा की आपला?', या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना शेवटपर्यंत सापडलं नाही... 'आपलं म्हातारं वय मुलासाठी अडगळ बनून राहील', असं त्यांना आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं..
दर दिवसाला होणारी ही घुसमट वाढतच होती... ना कोणाला सांगता येत होतं, ना सहनही करता येत होतं अशी अवस्था झाली होती.. कुठलीही गोष्ट खायची इच्छा झाली तरीही मन मारून जगण्याची वेळ आली होती.
दर दिवसाला होणारी ही घुसमट वाढतच होती... ना कोणाला सांगता येत होतं, ना सहनही करता येत होतं अशी अवस्था झाली होती.. कुठलीही गोष्ट खायची इच्छा झाली तरीही मन मारून जगण्याची वेळ आली होती.
म्हातारपणी लहान मुलांसारखं भाजी पोळी ऐवजी वेगवेगळा खाऊ खाण्याची अनेकदा इच्छा या आजी-आजोबांना व्हायची.. परंतु स्वतःची नात आणि सून समोर खाताना पाहून देखील त्यांना मात्र स्वतःच्याच घरात परक्यासारखं बसावं लागत होतं.
निवांतपणे आरामात जगावं असं वाटत असतानाच पुन्हा सगळीच काम अंगाशी येत होती.. आयुष्यातला निवांतपणा अनुभवावा असं वाटत असताना आयुष्य मात्र पुन्हा त्याच ३६० अंशात फिरलं होतं.
छंद जपावे, मित्रमैत्रिणींशी गप्पाटप्पा कराव्यात, असं वाटत असताना आता जगणंच नकोसं वाटू लागलं होतं... पण त्यातही एक मात्र हक्काचा आधार होता.... दोघांनाही एकमेकांचा.
कधीकधी जीवन आजोबा हळवं होत आज्जीला म्हणायचे "आपल्यातलं कोण आधी जाईल हे माहीत नाही, पण जर माझ्या आधी देवाने तुला नेलं, तर मी मात्र सरळ आत्महत्या करून मोकळा होईल... कारण तुझ्या एवढा खंबीर मी नाही.. असल्या परिस्थितीत आणि अशा घरात जगणं मला खरंतर आत्ताही असह्य होतं, पण केवळ तुझ्याकडे बघून मी दिवस काढतोय".. असं म्हणताना जीवन आजोबा आज एखाद्या लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडले.

मालती आज्जीनी देखील एखाद्या लहान मुलाला समजवावे त्याप्रमाणे आजोबांची समजूत घातली खरी परंतु स्वतःच्या मनाचं काय?... आजोबांना आधार देताना त्या मात्र मनातून पुरत्या खचल्या होत्या.
आयुष्याची काय स्वप्नं बघितली होती आणि कुठल्या वळणावर येऊन पोहोचलो, या विचारांनी आज्जी हतबल झाली होती.
आयुष्याची काय स्वप्नं बघितली होती आणि कुठल्या वळणावर येऊन पोहोचलो, या विचारांनी आज्जी हतबल झाली होती.
आयुष्यात सासुरवास न भोगलेली मालती आज्जी आज मात्र या सुनेच्या काचाने आतल्या आत तिळतिळ तुटत होती... सतत वाद होण्यापेक्षा आणि सुनेने माहेरी निघून जाण्याची धमकी देण्यापेक्षा आज आज्जी-आजोबांना हा त्रास निमुटपणे सहन करण्याशिवाय काहीच पर्याय दिसत नव्हता.
जिथे लेकालाच आपली बाजू कळत नाही तिथे सुनेकडून तरी काय अपेक्षा करणार असं म्हणत दोघंही आलेला दिवस कसातरी कंठत होते... हा आधारवड असली नसलेली ताकद एकवटून उभा असलेला दिसला, तरीही एखादा छोटासा घावही त्याला उन्मळून पाडण्यासाठी पुरेसा ठरणार होता.
वाचकहो, अनेकदा आपण सासू-सुनांच्या कथा वाचतो किंवा टीव्ही सिरीयल मधून पाहतो.. सासुरवास सहन करणारी सून अनेक ठिकाणी पाहायला मिळतेच, पण त्याचसोबत अनेक ठिकाणी वृद्ध जोडप्यांना मिळणारी तिरस्काराची वागणूक देखील पहावयास मिळते. आयुष्याच्या संध्याकाळी जर जोडीदाराची साथ असेल तर कुठल्याही संकटावर मात करण्याची थोडीतरी ताकद ही वृद्ध मंडळी दाखवू शकतात. अशा या आधारवडांना खऱ्या अर्थाने वेळीच सावरण्याची काळाची गरज आहे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
अत्यंत वास्तववादी कथा
उत्तर द्याहटवा