© अपर्णा देशपांडे
" माधवी s ,माझी लाल फाईल कुठे ठेवलीस ? "
" तिथेच ड्रॉवर मध्ये बघ न ."
" आई , युनिफॉर्म प्रेस झाला ?"
" हो s ठेवलाय कॉट वर . चल दूध घ्यायला ये लवकर ."
" नाही सापडतय ग फाईल !"
माधवी धावत आली आणि खालच्या ड्रॉवर मधील फाईल काढून ठेवली .
" अरे , तूच नाही का काल ठेवलीस "
" अरे यार ! तुझ्या कसं ग सगळं लक्षात रहातं ?"
" अरे s माझी पोळी जळेल !!" ,ती आत धावली .
" बाबा , रिपोर्ट कार्ड वर सही ...."
"अरे आई ला सांग ना , चालते आई ची ......तशी आईचीच चालते म्हणा सगळी कडे .." मंदार आणि छोट्या अर्णव ने लगेच टाळी दिली एकमेकांना .
"काय उगाच जोक मारताय सकाळी सकाळी , आज मावशी बाई सुटीवर आहेत .मला मदत करणं राहिलं बाजूला !!"
" अग , हो s तुझं प्रेझेंटेशन आहे न आज ? श s sट !! मी मदत करिन म्हणालो आणि रात्री डोळाच लागला माझा ."
" म्हणजे ते राहिलंय मंदार ?? उफफ !
"ठीक आहे , मी पोहोचल्यावर बघते . अर्णव , हा तुझा टिफीन . मंदार , तुझ्या युनिफॉर्म चं बटन लावून ठेवलंय सक्काळीच . "
" असं फिल्मी स्टाईल नि लावायचं होतं ग , असा मी उभा , मग तू लगेच जवळ येऊन सुई दोरा हातात वगैरे .."
" हो का ? तोड ते बटन पुन्हा , मी रविवारी 'तसं ' लावून देते ." ह्यावर दोघेही हसले .
" येतो मी माधवी , ऑल द बेस्ट !! ते उरलेलं काम पूर्ण करून टाक हं . बाय ! "
मंदार आणि अर्णव गेल्यावर आत जाऊन तिने आधी लॅपटॉप उघडला . तिचं प्रेझेन्टेशन पूर्ण तयार होतं . शेजारी स्टिक नोट होती , ' लव यु ' लिहिलेली .
असाच होता मंदार . मिश्किल , आनंदी , समजूतदार आणि खूपच काळजी घेणारा .
अर्णव च्या जन्मानंतर माधवीला जॉईन करायच्या वेळी आई आली होती मदतीला . पण तरीही त्याने मोठी सुट्टी घेतली. आई ला सगळं समजेपर्यंत घरीच राहिला . सहाच महिन्यात माधविला प्रमोशन मिळालं . त्याच्या पेक्षा तिचा पगार जास्त होता , पण कुठेही किंचितही स्पर्धा नव्हती मनात, होते फक्त कौतुक.
स्वतः चं आवरून ती डबा घेऊन बाहेर पडली . समोरच्या फ्लॅटची सानिया नुकतीच उठून पेपर घ्यायला बाहेर आली होती .
" हाय ! गुड मॉर्निंग !! " माधवी म्हणाली .
" ऑफिस ? "
" हो ग , भेटू संध्याकाळी .बाय ."
" बा s य !! गुड डे डिअर !!"
ही सानिया म्हणजे एक अजब रसायन होतं .
बिनधास्त ,आपल्या मर्जीने जगणारी . पंचतारांकित हॉटेल मध्ये अडमिनिस्ट्रेशन ऑफिसर असल्याने तिला रात्री घरी यायला बराच उशीर होई .
मग कुण्या कुलीग ने ड्रॉप केलं की लगेच सोसायटीत कुजबुज . तिची रहाणी अर्थातच मॉडर्न होती . तिच्या नोकरीची गरजच होती ती . मंदार आणि माधवीशी तिचे छान संबंध होते .
एक दोनदा अर्णव ला शाळेत ड्रॉप पण केले होते तिने .
ऑफिस मध्ये माधवीचे प्रेझेन्टेशन जोरदार झाले . व्ही .पी सरांनी खूप तारीफ पण केली . खूप समाधान वाटले तिला. तिने लगेच मंदारला कॉल केला .
" हा माधवी , कसं झालं ?"
" अरे , फर्स्ट क्लास !! सर खुश . तुमची मेहेरबानी बाबा , आमचं काय .."
" समीर कुठाय ? "
" आज भेटला नाही , पण असेल त्याच्या केबिन मध्ये . का रे ? "
" हरामखोराने उद्या आपल्याला लंच ला बोलावलं होतं ,आणि चार दिवस झाले स्वतः गायब आहे . "
" मी बघते , बाय "
समीर म्हणजे मंदारचा बालमित्र . माधवीच्याच कंपनीत मार्केटींग डिव्हिजन ला होता . तिने समीरला फोन लावला .
" हाय मॅड ! "
" तू काय आम्हाला लंच ला बोलावलं होतंस ? "
" अरे , हो ! पण आता मीच यावं म्हणतोय ....ती सानिया असेल न, तीला पण बोलाव ना ! "
" समीर !! सुधर रे , सुधर जरा . नाहीतर लग्नच कर न तिच्याशी . "
" तिचा असेल ना कुणी...."
" रिअली ? तिला ...नाहीये कुणी बॉयफ्रेंड !! "
" बरं जाऊदे ! मी येतो उद्या . बाय ." नंतर कामात तो विषय माधवी विसरून गेली .
माधवी प्रचंड कामात असतांना सारखा एक फोन येत होता .
सायलंट वर असला तरी तिची चीड चीड होत होती . शेवटी तिने फोन उचलला .
" हॅलो माधवी ? .."
".............."

"तुला सांगितले ना प्रकाश , मला पुन्हा फोन नाही करायचा म्हणून ."
" तू सांगितलं आणि मी ऐकलं ,असं झालं होतं का कधी ? " तो खी खी हसत म्हणाला .
" तुला काय काम आहे माझ्याशी ? "
" का s म ? अं s काम तर खूप आहे . भेटायचंय . "
" मुळीच नाही . पुन्हा मला फोन करू नको ,मी पोलीस कॅम्पलेंट करीन . "
" ओहो s , मॅडम रागावल्या ? ..ब s रं , उद्या करतो ."
तिच्या कपाळावर घाम जमला होता . घशाला कोरड पडली . तिने कसे बसे सहा वाजेपर्यंत काम रेटले आणि निघाली .
तिच्या अपेक्षेप्रमाणे मंदार लवकर आला होता . दर शुक्रवारी तो पाचपर्यंत घरी येत असे . तिचा चेहरा बघूनच तो उठला ..
" काय झालं माधवी ? प्रशांतचा फोन होता का ? "
" तुला कसं कळालं ?" तिला आश्चर्य वाटलं
" तो गेला आठवडाभर मला कॉल करतोय ."
" काय ?? ..तू हे मला आत्ता सांगतोय ? "
" मी त्याला म्हणालो , की कायद्याने तुम्ही वेगळे झाले आहात , आता कॉल का करतोय ?"
माधवीला रडू फुटले .." मंदार , तो अर्णव ची कस्टडी मागेल ...हो ..मला भीती आहे की तो अर्णवची "
" असा कसा मागेल ? आणि आपण बरे देऊ ? तू काळजी नको करुस ग ! हा काहीच नाही करु शकत . "
त्याने प्रेमाने माधविला जवळ घेतले .
मावशीबाईंनी कॉफी आणली . नजर कुठेतरी खोल रुतवून ती कॉफी घेत होती .
" माधवी , इतका विचार का करतेय तू ? तो काही करू शकत नाही . मी आहे न ! "
" मी किती नशीबवान आहे मंदार की तू मला भेटलास ..किती साफ मन आहे तुझं . "
" तू झाडू मारतेस ना रोज , मग साफ़च असणार ."
" शी ! काहीही हं .'
" आपल्यात इतकं सामंजस्य आहे , विश्वास आहे ..आता बघ . जरी तू मला एखाद्या मुलीच्या मिठीत बघितलं तरीही
गैरसमज थोडी ना करून घेणारेस ?"
तिला काही क्षण लागले समजायला ... ..अन मग ओरडली ....
" यु !!! " आणि तिने त्याला उशी फेकून मारली .
" बघ बदलला किनई तुझा मूड !!! "
बेल वाजली . दारात सानिया उभी होती , अर्णवला घेऊन .

क्रमश:
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

सगळ्या वाचकांना मनापासून धन्यवाद
उत्तर द्याहटवा