तडजोड

© वैदेही जोशी




" निघ... ऊठ इथून... आणि नजरेसमोरून चालता हो माझ्या.

आजपासून तु माझ्यासाठी मेलास आणि मी तुझ्यासाठी.. एकटीने संभाळेन संसार . तस ही काही जगाच्या वेगळं करणार नाही मी.. जे जगात घडतय तेच माझ्या घरी...याचच फक्त वाईट वाटतय मला..

तोंडात शिवी येते..पण देऊ शकत नाही...पोर समोर आहेत..

तुला तुझा मान नाही ठेवता आला..पण त्यांचा बाप तू म्हणून मला ठेवायलाच पाहिजे..

माझ्या बा न मला तेवढ शिकवलय...

ऊठ....नायतर मी पण काठी जिथं लागेल तिथ मारेन.

काशीबाई मोठ्याने ओरडत होती.

तीचा नवरा मान खाली घालून उभा होता. 

तो काहीतरी बोलेल आणि काशीबाई पुन्हा तोंड सोडेल असं वाटत असतानाच दत्ताराम गप्पपणे निघून गेला.

काशीबाईचा चेहरा एकदम बदलला..घरात तरातरा निघून गेली.

घरात कामाचा ढीग तसाच पडला होता.

10 वर्षाचा नितीन आणि 5 वर्षाची माली दोघ घरातच होती. 

धुणं भांडी स्वयंपाक सारं करुन मुलांना शाळेत सोडायच होतं.

शाळेत बाईंना सारं सांगायच होतं..

शाळेतल्या सोनवणे बाईंशी काशी सगळं बोलायची..

आजचा सारा प्रसंग तीला त्यांना सांगायलाच हवा होता.

डोक्यात विचारांचे वादळ आणि डोळ्यातून धारा अखंड सुरु होत्या..हातान काम आणि तोंडाने बडबड चालूच होती..

इतक्या वर्षाच्या संसाराची एका मिनिटात होळी झाली तर कसं चालेल? तीच मन तयार होतच नव्हतं..पण तोंडाने तर बोलून बसली होती.

अडाणी नव्हती फार शिकलेली पण नव्हती.

प्रसंग घडून गेला की नंतर त्यावर विचार कर करून तीच डोके भणभणून जातं.

घड्याळ आपल्या गतीने चालत असतं.

भराभरा काम आटपून काशी पोराना घेऊन शाळेत जाते.

पोर आपल्या वर्गात निघून जातात..काशी भिरभिरत्या नजरेने सोनवणे बाईंना शोधते.

तेवढ्यात बाई समोरुन येताना दिसतात..काशीला मनातून बर वाटतं.

ती बाईना हाक मारते.

सोनवणे बाई तीच्या जवळ येऊन काय झालं असं विचारतात.

तेवढ्यात जनगण मन सुरू होतं.. बाई सावधान स्थितीत उभ्या राहतात.

त्यांच बघून काशी देखील पदर खोचलेला सोडून..नीट उभी राहते.

राष्ट्रगीत संपल. 

पण बाई पटकन म्हणाल्या...काशीताई...थोडावेळ थांबायला लागेल तुम्हाला..मी प्रार्थना होईपर्यंत बोलू शकणार नाही. आपण नंतर बोलू. तुम्ही थांबा .

काशी हो म्हणाली .

मुले एकसुरात परिपाठ म्हणत होती.

प्रार्थना सुरू झाली... "हमको मन की शक्ति देना जयविजय करे . ."..ती प्रार्थंना काशी ने ऐकली .आणि बाई ना नंतर भेटू..असा विचार करून घरी परत निघाली.

बाई बाहेर येऊन बघून गेल्या. काशी बाहेर नव्हती.

मग त्या ही आपल्या कामाला निघून गेल्या.

काशी घरी आली ...डोक्यात विचारचक्र सुरु च होते. 

नवरा सक्काल पासून गेला होता....तो परत आलाच नव्हता.

आता तिला काळजी वाटू लागली. रागा च्या भरात नवऱ्याला बोलली खरी...पण दुपार जस जशी ढळू लागली तस तिला चिंता वाटू लागली.

संध्याकाळपर्यंत वाट पाहू.नाहीतर मुलांना आणा यला जाऊ तेव्हा बघू.

हात ने काम आणि डोक्यात विचार पक्का करत ..ती घड्याला कडे लक्ष ठेवून होती. 

वेळ निघून जात असते..प्रसंग घडत असतात...परिणाम फक्त काळ ठरवतो.

तसच काहीस काशी मनात ठरवून होती.

मुलांना शाळेतून आणून शेजारणी कडे ठेवली..त्यांचे खाणे पिणे केले..आणि नवऱ्याला शोधायला बाहेर पडली. 

अर्थात तिला माहीत होत तो कुठे असणार. ती मन घट्ट करून त्या गल्लीत शिरली.

विचारत विचारत तिच्या घराकडे वळली.

तीच नाव घ्यावं तर मनात राग येत होता.

नाही घ्यावं तर नवरा सापडणार कसा? 

तिने भेटलेल्या कुणाला तरी विचारावं म्हणून शेवटी तीच नाव घेतलेच... गोदाबाई कुठे राहते?

दोन घर पार करून ती गोदाबाईच्या घरासमोर येऊन उभी राहिली.

हाका मारून ...कुणी बाहेर येते का पहावे म्हणून ती पाच मिनिट थांबली..

एवढ्यात तिच्या पेक्षा ६/७ वर्षांनी लहान एक बाई पुढे आली..हसतमुख....काळी पण दिसायला नेटकी होती.

एक क्षणभर तिला ही ती छान वाटली. तिने विचारले.. गोदा बाई कुठायत...?

मीच की....बोला काय काम आहे... ती बाई म्हणाली..

तिचे शांत बोलणे काशीला एकदम वेगळे वाटले.

तुमच्याकडे माझा नवरा आला य का? 

सकाळी भांडण करून घराबाहेर पडलाय तो अजून घरी परत आलाच नाही..

तुमचे नाव सतत तोंडात असते त्याच्या ...म्हणून..

त्या बाईने काशीबाई कडे नीट पाहिले...आणि हसत म्हणाली हो...या घरात...

तिच्या हसण्याचा खरतर राग आला तिला....

आपला नवरा असा कुणाकडे जातो ...ती त्याला आवडते.हे कुठल्याच बायकोला आवडत नाही..मुळात सुरुवातीला हे मन मान्यच करत नाही.

अर्थात हे कुठल्या समाजात घडते ..त्यावर सगळे अवलंबून असते..आणि त्यावरच ठरते.

या सगळ्या नात्याची गुंतागुंत किती....परिणाम काय..आणि त्याची बोंबाबोब किती..हे ही ठरते... 

तळागाळात या साऱ्या गोष्टी वेगळ्या पातळीवर घडतात.

तिथले जग ही वेगळेच असते..कधी कधी तिथे अपेक्षेपेक्षा खूप वेगळे घडते.. 

माणूस सगळी कडे सारखाच असला तरी आजूबाजूच्या...सगळ्या गोष्टींचा त्याच्या वर जो परिणाम होतो...त्यानुसार तो घडतो....वाढतो.... बिघडतो...

काशी काही न बोलता..घरात गेली...

घरात गेल्यावर तिने सभोवार नजर फिरवली ..

घर टापटीप आणि व्यवस्थित लावले होते...

घरात भिंतीवर एक फोटो होता .त्याला हार घातलेला होता..

सगळ्या घराकडे नजर फिरवून ती मनातल्या मनात तर्क लढवत होती.. काय असेल..कोण असेल ही....नवऱ्याला आपल्या का अडकवले असेल..का वागते ती अशी....

घरात बाकी कुणीच दिसत नाही...

म्हणजे मी जे ऐकले...तपासून शोधून खरे खोटे केले..ते...

इतक्यात ती पाण्याचा ग्लास घेऊन आली . 

"ताई बसाना, मी सांगते काय आहे ते सगळ" 

मग गेल्या वर्षा त काय काय घडलं ते सारं तीने काशीला सांगितले काशीला काय बोलाव ते समजेना . 

ती गप्पपणे ऐकून घेत होती . 

सगळ बोलून झाल्यावर ती गोदा रडू लागली.

 काशीला काही समजत नव्हत का य बोलाव काय करावं? पाण्याचा घोट घेत ती म्हणााली . " माझा नवरा आला की पाठवून दे घरी . बाकी मला काय करायचं ते मी करेन.

रात्री गोदा दत्ताराम ला घेऊन घरी आली. 

काशीबाई ने त्या दोघांना घरात घेतले. 

पोर झोपली होती. 

 काही न बोलता दत्ताराम जेवला आणि पोरांजवळ झोपायला गेला . 

काशी आणि गोदा एकत्र जेवायला बसल्या . 

काशी मधेमधे नजरेने गोदाच निरीक्षण करत होती. दोघी जेवल्या आणि आवरून काम करूलागल्या . 

त्या दिवसापासून गोदा काशीबाई जवळच राहलागली. 

तीचा जन्माची कहाणी काशीच्या अनुभवी नजरेला आणि मनाला पटली होती

एका बाईच मन,  दु :ख,  वेदना सगळं बाईच वाटून घेऊ शकते . 

हे तीला ही माहिती होत , नाही तीने आपल्या कृतीतून ते अनुभवले व अनुभवाला दिले होते. 

आपला नवरा वाटून घेता येत नाही हे जरी खरं असलं तरी जुन्या राजाराण्याांच्या गोष्टी तीने ऐकल्या वाचल्या होत्या. 

बाईने ठरवले तर ती वाट्टेल ते करू शकते . 

हेही ती जाणून होती. म्हणूनच गोदाला संसारात अर्धा वाटा दिला. 

पण आपल्या मुलांना सुरक्षित करायला ती विसरली नाही .

दत्ताराम आता बापाच कर्तव्य समाधानाने करत होता.

संसार तडजोडी वरच फुलतो .. मग आपले समाधान आपला मान आपणच जपायला हवा हे काशीने संभाळले. 

आज पोरांच्या शाळेत सोनावणे बाईंना भेटायला पुन्हा जाणार होती ती .. 

 मुद्दाम प्रार्थनेच्य वेळी : तीला ती प्रार्थना पुन्हा ऐकायची होती 

" दुसरों के जय से पहले खुद की जय करे ,


© वैदेही 
जोशी

सदर कथा लेखिका वैदेही जोशी यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने