© सौ. प्राजक्ता पाटील
असाच आदर्श विद्यार्थिनी चा पुरस्कार मुक्ताईला मिळाला. अभ्यासात हुशार असण्याबरोबरच सर्व कलांमध्ये मुक्ताईने पारितोषिके मिळवली होती.
इतकी हुशार असूनही तुला डॉक्टर,वकील का व्हावेसे वाटले नाही ? या सगळ्यांचा प्रश्नावर मुक्ताई च एकच ठरलेले उत्तर असायचे.
प्रसंग-"15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा" अभिमानानं ऊर भरून यावा असाच काहीसा. स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हौतात्म्य पत्करणार्या त्या क्रांतिवीरांच्या स्मृतीस अभिवादन करण्याचा आणि स्वातंत्र्याचा आनंदही व्यक्त करण्याचा.
हा दुहेरी क्षण प्रत्येक शाळा, कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण शालेय स्तरावर मात्र विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे त्यांचा गौरव केला जातो. त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य दिन भारावून टाकतो.
असाच आदर्श विद्यार्थिनी चा पुरस्कार मुक्ताईला मिळाला. अभ्यासात हुशार असण्याबरोबरच सर्व कलांमध्ये मुक्ताईने पारितोषिके मिळवली होती.
म्हणूनच शाळेतल्या शिक्षकांनी आवर्जून मुक्ताईच्या आई-वडिलांना म्हणजेच गौराबाई आणि सोपान यांनाही बक्षीस घ्यायला आणि मुलीचं कौतुक करायला शाळेत बोलावलं होतं.
बक्षीस घेताना आई वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळले. कुठलीही सोयीसुविधा नसताना मुक्ताई वर्गामध्ये पहिल्या नंबरने दरवर्षी पास होत होती.
शिक्षकांनी कौतुकास्पद सुमनपुष्पाचा मुक्ताईवर वर्षाव केल्यामुळे तर आई-वडिलांच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला.
गावच्या सरपंचांच्या घरी सोपान चाकरी घालत होता. सरपंचांना खरोखरीच मुक्ताचा कौतुक वाटलं.
गावच्या सरपंचांच्या घरी सोपान चाकरी घालत होता. सरपंचांना खरोखरीच मुक्ताचा कौतुक वाटलं.
अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे सोपानची झोपडी म्हणजे राहते घर कोलमडून पडल.
सोपान आणि गौराबाई काय करू म्हणून रडत बसणाऱ्या जोडप्यांपैकी नव्हते. त्यांनी रात्र जरी शाळेच्या आवारात जागून काढली असली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी नव्या उमेदीने झोपडी उभारण्यासाठी कंबर कसली.
गावभर वाऱ्याच्या वेगाने पसरलेली ही बातमी सरपंचाच्या कानावर आली.
सरपंच त्यांच्या गाडीतून सोपान च्या घरी पोहोचले. मग काय सरपंचानी लागलीच सोपानला सामान भरून आपल्या शेतातील वाड्यावर राहायला जा असं मोठ्या हक्काने सांगितलं.
वरवर जरी सरपंचानी केलेली मदत घ्यावी वाटत असली तरी त्यामागे त्यांचा कोणता हेतू नसेल ना ? हा एकच विचार सोपान आणि गौराबाई करत होते.
वरवर जरी सरपंचानी केलेली मदत घ्यावी वाटत असली तरी त्यामागे त्यांचा कोणता हेतू नसेल ना ? हा एकच विचार सोपान आणि गौराबाई करत होते.
कारण आजवर सरपंचांनी हेतूशिवाय कोणाला मदत केलेली त्या दोघांना तरी आठवत नव्हतं.
पण यंदा मुक्ताईच दहावीचं वर्ष होतं. आपल्या झोपडीत वार्यामुळे जाणारी लाईट असो किंवा पावसामुळे झोपडीत साचणारं तळं असो. एवढ्या साध्या सुविधा देण त्यांना शक्य नव्हतं, जेवढ्या सरपंचांच्या शेतातील वाड्यात मिळणार होत्या आणि जरी असला सरपंच काही हेतू तर अधिकची काम करून घेणे हाच असू शकेल.
तसंही आपण कष्टाला घाबरणारे नाहीयोत. त्यामुळे पोरींच्या शिक्षणासाठी आपण जाऊया राहिला हा विचार त्या दांपत्याने केला.
सोपान कोंबड्याची बाग ऐकू येण्याअगोदर शेतात राबतो आणि दिवस मावळतीला झुकलयावर थांबतो हे सरपंचाच्या घरातल्या सगळ्यांना माहीत होत.
सोपान कोंबड्याची बाग ऐकू येण्याअगोदर शेतात राबतो आणि दिवस मावळतीला झुकलयावर थांबतो हे सरपंचाच्या घरातल्या सगळ्यांना माहीत होत.
कारण सरपंचाने केलेली मदत सोपान साठी लाख मोलाची होती.
दहावीत चांगले गुण प्राप्त करून मुक्ताई पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेली.
तिच्या लहान भावाला म्हणजे ज्ञानेशला मुक्ताई चांगल्या वाईटाची जाणीव करून नेहमीच द्यायची.
शिक्षणाचे महत्व पटवून देऊन तिने ज्ञानेशलाही अभ्यासात गोडी निर्माण केली होती. मुळात ज्ञानेशही हुशार होताच.
अकरावी बारावी कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारी मुक्ताई सर्व गुणसंपन्न विद्यार्थिनी म्हणून नावारुपाला आली.
शिक्षकी पेशात रस असणारी मुक्ताई उत्तम शिक्षिका बनण्यासाठी डी. एड. महाविद्यालयात विशेष प्रावीण्यासह प्रविष्ट झाली. मनाजोग क्षेत्र निवडल्याचा तिला विशेष आनंद होता.
इतकी हुशार असूनही तुला डॉक्टर,वकील का व्हावेसे वाटले नाही ? या सगळ्यांचा प्रश्नावर मुक्ताई च एकच ठरलेले उत्तर असायचे.
डॉक्टर होऊन रुग्ण आजारी पडल्यावरच सेवा करावी लागते. वकील झाल्यावर कायद्याचे उल्लंघन झाल्यावरच अन्याय झालेल्या आपल्या पक्षाची बाजू मांडावी लागते. पण शिक्षकी पेशा हा एकमेव व्यावसायिक पेशा असा आहे जिथे व्यक्तीला चांगल्या संस्काराने उज्वल भविष्यासाठी संस्कार करत शिक्षकाला घडवावे लागते. म्हणूनच आई इतकं मानाचं स्थान गुरूला असतं.
पुढे योगायोगाने मुक्ताईला तिच्याच गावात शिक्षीका म्हणून नोकरीला लागण्याचा मान मिळाला. शिक्षीका झाल्यावर संस्काराची शिदोरी बहाल करत, मुलांना अभ्यासाबरोबर व्यायामाचे महत्त्व सांगत, मुक्ताईन गावकऱ्यांना स्पर्धा परीक्षेचेही महत्त्व चांगलं पटवून दिले होते.

गावातच नव्हे तर केंद्रीय शाळेतही मुक्ताईच्या नवनव्या उपक्रमांना दाद मिळत होती. शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत होते. त्यामुळे विद्यार्थी संख्येतही वाढ होत होती. याचं सगळं श्रेय मुक्ताईला होतं.
एक दिवस दमूनभागून आलेला सोपान, गौराबाई आणि मुक्ताई सरपंचांच्या मदत म्हणून मिळालेल्या शेतातल्या वाड्यावर जेवत होते.
एक दिवस दमूनभागून आलेला सोपान, गौराबाई आणि मुक्ताई सरपंचांच्या मदत म्हणून मिळालेल्या शेतातल्या वाड्यावर जेवत होते.
तेवढ्यात सरपंच "येऊ का सोपान ?" म्हणत घरात आले.
जेवणाच्या ताटाची सावरासावर करत मुक्ताने सरपंचांना पाट टाकला. सोपान पाणी घेऊन आला गौराबाईनी सरपंचासाठी चहा टाकला.
मदतीमुळे कृतज्ञ असलेले कुटुंब लाचार मात्र नव्हते. हे सरपंचाना चांगलं ठाऊक होतं. तरीही त्यांनी आपल्या मुलासाठी मुक्ताईचा हात मागताना जराही विचार केला नाही. हे त्यांचं दुर्दैव.
सतत नशेत धुंद असलेला, परस्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहणारा, बिघडलेला एकुलता एक आपला मुलगा मुक्ताई मुळे माणसात येऊ शकेल याची मला खात्री आहे.
सतत नशेत धुंद असलेला, परस्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहणारा, बिघडलेला एकुलता एक आपला मुलगा मुक्ताई मुळे माणसात येऊ शकेल याची मला खात्री आहे.
त्यामुळे मी केलेली मदत केवळ मुक्ताई माझी सून व्हावी यासाठी होती. असे सरपंचांनी सांगितल्यावर कधी वर मान करून न बोलणारा सोपान मात्र आता गप्प बसला नाही.
"आवळा देऊन कोहळा काढत आहात. कधीही कोणाला मदत न करणारे तुम्ही आम्हाला मदत करू पाहताय त्यावेळी आम्हाला संशय तर आला होता. पण तुम्ही आम्हाला शेतात जास्त राबवाल असं वाटलं होतं.
पण तुम्ही तर आमच्या लेकीला स्वतःच्या हाताने दुःखात लोटायला सांगताय. परिस्थितीवर मात करून स्वतःच्या हिमतीवर नाव मिळवणारी माझी स्वाभिमानी लेक मी तुमच्या घरी कधीच देणार नाही.
पण तुम्ही तर आमच्या लेकीला स्वतःच्या हाताने दुःखात लोटायला सांगताय. परिस्थितीवर मात करून स्वतःच्या हिमतीवर नाव मिळवणारी माझी स्वाभिमानी लेक मी तुमच्या घरी कधीच देणार नाही.
माफ करा आम्हाला. गरीबांना मदत करणारे नाही तर आवळा देवून कोहळा काढणारे जास्त भेटतात हे याआधी फक्त ऐकलं होतं आज तुम्ही ते प्रत्यक्ष दाखवून दिलं."
मुक्ताई मात्र सोपान आणि सरपंच यांचा संवाद ऐकत होती. सरपंचाचा मुलगा रोहन हा मुक्ताई चा बालपणीचा मित्र होता.
अभ्यासात हुशार नसला तरी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा मानसिकतेचा मुलगा वाईट वळणावर कसा काय पाऊल ठेवू शकतो ? या विचाराने मुक्ताई बैचेन झाली.
सोपान च्या या निर्भीड वक्तव्यावर विषय न वाढवता सरपंच खाली मान घालून निघून गेले.
कारण सोपान सरपंचांना म्हणाला, "मुलगी शिक्षिका झाली, तरी पूर्वीचे दिवस आम्ही विसरलो नाही आजही तुमचा वाडा सोडून झोपडीत राहण्याची आमची तयारी आहे. उद्याच मी वाडा सोडतोय."
सरपंचाच आवळा देवून कोहळा काढणं सोपानच्या चांगलं जिव्हारी लागल होत.
सरपंचाच आवळा देवून कोहळा काढणं सोपानच्या चांगलं जिव्हारी लागल होत.
डोळ्याच्या कडा पुसत सोपान आणि गौराबाई सामान भरु लागले. गावातच भाड्याच्या खोलीत राहायचं मुक्ताईने आई-बाबांना सुचवलं.
मुक्ताईचं विचारचक्र अजूनही थांबल नव्हत. दोन-चार दिवसांनी न राहवून तिने आईला विचारल, "आई, तुला आठवतं जेव्हा माझी वही भरलेली होती एकही पान शिल्लक नव्हतं मग उद्या सरांचा मार खावा लागेल म्हणून मी रडत होते. तेव्हा रोहनने त्याची नवी कोरी वही मला दिली होती."
"हो गं, आहे माझ्या लक्षात कशी विसरेन मी ?" आई म्हणाली.
" मग आज रोहन असा कसा वागू शकतो ? बाबा जे मघाशी बोलले ते खरे आहे का ?"
" मग आज रोहन असा कसा वागू शकतो ? बाबा जे मघाशी बोलले ते खरे आहे का ?"
" हो ग खर आहे ते सगळं. तू जास्त विचार नको करूस. आपला आणि सरपंचाचा संबंध आता कायमचा संपला."
आज मुक्ताई शाळेत गेली तिला रोहनचा तो बेंच रोज दिसायचा पण आज तिला कीव आली की संताप कोण जाणे पण तिला त्या बेंच कडे पाहवेनासे वाटू लागले.
शाळा सुटल्यावर घरी येताना अचानक तिला रस्त्यात मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत रोहन भेटला. काय आश्चर्य त्याने मुक्ताईला चक्क सॅलूट केला. त्याला न पाहिल्यासारखे करून मुक्ताई घरी पोहोचली.
मुक्ताई ला तिची मैत्रीण भेटली गप्पा मारता मारता अचानक रोहनचा विषय निघाल्यावर ती गप्प बसली.
मुक्ताई ला तिची मैत्रीण भेटली गप्पा मारता मारता अचानक रोहनचा विषय निघाल्यावर ती गप्प बसली.
मुक्ताई ला मात्र रोहनच सत्य जाणून घ्यायचं होतं.
मैत्रिणीच्या घरच्यांचं सरपंचाच्या घरी येणं-जाणं होतं. त्यामुळं तिनं खरं काय ते कारण सांगितलं.
दहावीत असतानाच रोहनची आई देवाघरी गेली. त्यानंतर रोहनच्या वडिलांनी दुसरे लग्न करून सावत्र आई घरी आणली. त्यानंतर प्रत्येक गोष्टीत मानसिक त्रास देऊन तिनेच रोहनला हा मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त केलं आणि हे अगदी खर आहे. आणि रोहनबद्दल खोट्या अफवा तीच पसरवत आहे. तो स्त्रियांचा सन्मान करतो हे सत्य आहे.
मुक्ताईन रोहनशी बोलायचं ठरवलं. एकदम नाही तर हळूहळू त्याला सुधारायचं ही मनाशी पक्की खूणगाठ बांधली.
मुक्ताईन रोहनशी बोलायचं ठरवलं. एकदम नाही तर हळूहळू त्याला सुधारायचं ही मनाशी पक्की खूणगाठ बांधली.
सुरुवातीला मुक्ताईला प्रतिसाद न देणारा रोहन आता मात्र चांगलाच मद्यपानापासून दूर झाला.
एक स्त्री एखाद्या व्यक्तीला घडवू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुक्ताई होय.
दहावी नापास झालेला रोहन शेतात राबून भरघोस उत्पन्न घेत होता. श्याम का भुला अगर सुबह को वापिस आये तो उसे भुला नही. असं म्हणत मुक्ताईने रोहनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मुक्ताईच्या आई-बाबांनाही रोहनचा सार्थ अभिमान वाटला.
रोहनने सरपंचांना मुक्ताईशी लग्न करण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा सरपंच म्हणाले "तिचा आपल्या संपत्तीवर डोळा आपण तुझ्यासाठी मोठी स्थळं पाहू. "
तेव्हा रोहन म्हणाला, "तुम्ही मदत केलीच नव्हती, तुम्हाला तर केवळ कोहळा हवा होता. पण निस्वार्थपणे मैत्रीखातर मदत करणारी मुक्ताई तुम्हाला स्वार्थी कशी वाटू शकते ?"
मुलाच्या या परखड वक्तव्याने सरपंचांना आपली चूक समजली आणि त्यांनी सुनेच्या रूपानं मुक्ताई घरी आणली.
समाप्त
© सौ. प्राजक्ता पाटील
सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.