© सुनिता चौधरी

कीती आक्रोश होता तीच्या त्या आवाजात !
तीच्या त्या आक्रोशाने भर रस्त्याचा तो सगळा परीसर दुमदुमला होता. अगदी रस्त्याच्या मधोमध ती रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या त्याच्या त्या थंड पडलेल्या शरीराला कुरवाळत होती.
त्याच्या रक्ताने ती माखली होती आणि... "उठ रे किश्या, मला सोडून जाऊ नको" म्हणत पटापटा ती त्याच्या चेहऱ्याला मुके घेत होती.
आत्ताच उठेल! ह्या आशेने ती त्याच्याकडे केवीलवाण्या नजरेने पहात होती आता तिच्या डोळ्यांपुढे काळोख जमला होता तरी त्याच्याकडे ती पहातच राहीली होती.
आत्ताच उठेल! ह्या आशेने ती त्याच्याकडे केवीलवाण्या नजरेने पहात होती आता तिच्या डोळ्यांपुढे काळोख जमला होता तरी त्याच्याकडे ती पहातच राहीली होती.
अचानक अंगात थंडी भरून आली आणि दूर कुठूनतरी अस्पष्टसा आवाज येत राहीला
'अग् एsssss कोमलsssssss .........
कीती ही थंडी! अन् त्यात ह्या आईने आज सकाळीच जोशी काकूच्या बागेतून फुलं आणायला पाठवलं म्हणत आईवर तनतन , राग करत कोमल हुहुहुहुहुहु करत काकडत जोशी काकूच्या बागेकडे झपाझप निघाली.
इतक्यात कोणितरी मागून आवाज दिला , "अग् ए कोमल" ....... कोमलने मागे वळून पाहिलं तसं शेजारच्या आळीतला किश्या म्हणजेच कुशल तीला आवाज देत होता.
त्याच्या हाकेने ती थांबली; तसा माकडटोपी, स्वेटर घातलेला कुशल तिच्याजवळ धापा टाकत आला.
'काय रे किश्या ! एवढ्या सकाळी कुठे निघालास'?......
अग् आईने जोशीकाकूच्या बागेतून ताजी फुलं आणायला सांगितलीत. आज चतुर्थी आहे ना, मग बाप्पाला जास्वंदीची फुलं नको का ? म्हणून निघालोय बघ तिकडंच ......,पण तू कुठं निघाली?....
'आरे ,मी पण तिकडच चाल्लीये. चल सोबत जाऊन फुलं काढून आणू , खुप थंडी भरलीये मला'! असं म्हणत कोमल काकडत होती.
कोमलने स्वेटर घालूनही तीची थंडी जात नव्हती म्हणून किश्या ने तिला स्वतः चा स्वेटर कोमल नको म्हणत असतानाही काढून दीला आणि तिला घालायलाही लावला.
किश्याचा स्वेटर घालून कोमलला आता जरा, बरं वाटत होतं.
मग दोघं गप्पा मारत बागेतली फुलं काढून घराकडे निघाले.
घराजवळ पोहोचताच कोमलने किश्याचा स्वेटर घरातलं कोणी बघायच्या आत पटकन काढून दिला. त्याला थॅक्यू आणि बाय करत ती घरात पोहोचली आता स्वेटर काढूनही तिची थंडी कमी झाली होती.
किश्याच्या अश्या प्रेमळ स्वभावाने तीला आतूनच ऊब मिळाली होती.
दहा वर्षाची ही दोघं, कुशल आणि कोमल दोघं जवळच रहायचे. म्हणून त्यांची ओळख होती.
कोमल नाही पण कुशल जेंव्हा-जेव्हा तीला पहायचा तेंव्हा-तेंव्हा आवर्जून बोलायचा. शाळेतून येता जाता किंवा इकडे तिकडे जाता-येताना दोघांची भेट व्हायची.
काही दिवसांनी आता अभ्यासाच्या निमित्ताने दोघं एकमेकांच्या घरी येत जात होते.
पण कोमल च्या घरी कुशल चं येणं घरात सगळ्यांनाच खटकायचं कारण तो त्यांच्यापेक्षा खालच्या जातीचा होता पण त्या दोघांच्या बालमनात फक्त निरागसताच होती हे त्या मोठ्यांना कसं समजेल?
कुशल कधी त्याला मिळालेलं चाॅकलेट तिच्यासाठी जपून ठेवायचा तर घरात काही वेगळी डिश बनवली असेल तर तिच्यासाठी तो ते चोरून आणायचा.
कधी जोक करत तीला तो हसवायचा तर कधी तीच्या गरजेच्या वेळी मदत करायचा.
एव्हाना दोघांची मैत्री अगदी घट्ट झाली होती. आणि त्याचबरोबर समाजातल्या त्या चार लोकांना ती खटकूही लागली होती.
एक दिवस तर चक्क त्या अजाणत्या वयात कोमल ने कुशलसाठी मार खाल्ला.
"परत त्या कुश्यासोबत बोललीस तर तंगडे तोडीन",म्हणत कोमलचे बाबा तीला मारत होते आणि त्यातच तिच्या मोठया भावानेही तीला चोप दिला.
ती रडत होती मग आईने तीला समजावलं की,
"अग् ,अशा मुलाबरोबर का बोलतेस? त्याची लायकी आहे का आपल्याबरोबर रहायची"?
कुठे तो अन् कुठे आपण .......
कितीही शिक्षीत झालो तरी,...जात नाही ती ...."जात " ......बरोबर ना? ..........
कुशलच्या घरचेही त्याला हेच समजावत होते.
"अग् ,अशा मुलाबरोबर का बोलतेस? त्याची लायकी आहे का आपल्याबरोबर रहायची"?
कुठे तो अन् कुठे आपण .......
कितीही शिक्षीत झालो तरी,...जात नाही ती ...."जात " ......बरोबर ना? ..........
कुशलच्या घरचेही त्याला हेच समजावत होते.
जातीची धग प्रथमच कुशलला जाणवली होती. पण, त्या दोन कोवळ्या जिवांना तर फक्त प्रेमाची ऊब दिसत होती.
दिवस जात होते तशी दोघं मोठी होत गेली.
घरातला विरोध अजुन कडक होत गेला आणि आता दोघांनाही समजून चुकलं होतं की, आता त्यांच्या मैत्रीने प्रेमाची जागा केंव्हाच घेतली आहे.
म्हणूनच आता चोरून भेटण्यातली मजा काही वेगळीच होती.काॅलेज संपल्यावर आधी नोकरी करत लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
एकमेकांसोबत जगण्याची स्वप्नं ते रंगवू लागले, आणि त्यात हरवून जायचे. मिळालेले क्षण कसे हातातून निसटून जायचे त्या दोघांनाही कळायचं नाही पण परतणं तर भागच होतं.
जाताना कुशल तीला मिठीत घ्यायचा आणि हलकेच तीच्या कपाळावर ओठ टेकवत तिला तो हिम्मत द्यायचा.
जड झालेल्या पायाने ती दोघं निघायची आणि पुन्हा भेटण्याच्या क्षणासाठी आतूर होत आला दिवस ढकलायची.
आता काॅलेज संपणार होतं म्हणून आधीच एका ठिकाणी नोकरीचं बोलून कुशलने रजिस्टर लग्नासाठी नोंदणी केली.
कुशलने पैशाची तजवीज करून कोमलसाठी एक मंगळसूत्र आणि नथ घेतली, त्यासोबतच हिरव्या रंगाची एक सुंदर साडीही घेतली.
आपली कोमल हे सगळं घालून कशी दिसेल या कल्पनेनेच तो मोहित झाला. आणि त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागला.
इकडे कोमलही आपल्या होणा-या लग्नाने हुरळून गेली होती आणि आयुष्यभरासाठी किश्याच्या त्या प्रेमळ ऊबेसाठी आतुर झाली होती.
आज दोघांची आतुरता संपणार होती. पेपर सुटल्यावर दोघांनी कोणाला समजायच्या आतच पळ काढला होता.
एका मैत्रिणीकडे लग्नासाठी तयार होऊन ती दोघं रजिस्टार आॅफीसला पोहोचली.
थोड्याच वेळात आता आपण एकमेकांचे होणार ह्या भावनेने ती दोघं एकमेकांना बघत होती.
सगळी कागदोपत्री कामं होऊन, सही झाली आणि कुशलच्या नावचं मंगळसूत्र कोमलच्या गळ्यात पडलं. दोघांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते त्यातच ते बुडाले अन् एकाएकी काय झालं हे, .....
अचानक कोमलचा भाऊ ,वडील आणि भरपूर गुंड आले.
सगळी कागदोपत्री कामं होऊन, सही झाली आणि कुशलच्या नावचं मंगळसूत्र कोमलच्या गळ्यात पडलं. दोघांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते त्यातच ते बुडाले अन् एकाएकी काय झालं हे, .....
अचानक कोमलचा भाऊ ,वडील आणि भरपूर गुंड आले.
कुशलच्या केंसांना पकडून त्याला खेचतच त्यांनी आॅफीसपासून दूर आणलं. त्याच्या गळ्यातला हार काढत जातीविषयक एक सणसणीत शीवी हासडत त्याला सगळे तुडवत होते.
कोमल बाबांच्या पायात पडून विनवणी करत होती पण तिलाही त्यांनी मारत-मारत कोप-यात फेकलं.
ती परत उठून येऊ लागली तेवढ्यात गुंडांपैकी एकाने धारदार मटन कापायचा सुरा काढला आणि तीची डोळ्याची पाती लवायच्या आतच कुशलच्या मानेवरून तो सुरा सरकन फिरवला.
त्याचवेळी कुशलचं डोकं क्षणात बाजूला पडलं आणि झटके देत कुशलचं शरीर भर रस्त्यावर धाडकन आपटलं.
ती जिवाच्या आकंताने पळाली तिने कुशलचं डोकं घेतलं आणि त्याच्या शरीराला जोडायचा मुर्ख प्रयत्न करायला लागली.
ती त्याला कुरवाळत होती त्याचं शरीर नसलेलं डोकं हातात घेत त्याचा मुका घेत होती. रक्ताचं थारोळं साचलं होतं.
छद्मी हसत कोमलच्या घरचे त्याच्यावर थुंकत कोमलला लाथ मारत जिंकल्याच्या अविर्भावात निघून गेले.
गर्दी वाढत होती पण कोणी मदतीला पुढे आलं नाही.
ती तिच्या किश्याच्या रक्ताच्या उबेत न्हाईली होती. लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या किश्याचं शरीर थंड पडलं होतं.
त्याला कुरवाळत कोमलची शुध्द हरपत होती. तीची नथ कुशलच्या रक्तात माखली होती, गळ्यातलं मंगळसूत्रं मात्र चकाकत होतं आणि तिच्या कानात .......
"अग् ए कोम्म्मल्"! ...... चा आवाज घिरट्या घालत होता, आणि दूरवर कुठेतरी गाणं वाजत होतं ......
"अग् ए कोम्म्मल्"! ...... चा आवाज घिरट्या घालत होता, आणि दूरवर कुठेतरी गाणं वाजत होतं ......
"जीव दंगला, गुंगला, रंगला असा,
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा,
गहिवरला श्वास तू ".........
#समाप्त .....
©Sunita Choudhari.
आजची स्टोरी आपल्या आससपास घडतीये आणि आपण अजूनही जाती-धर्मात अडकत चाललोय ......पण आता आपण आपल्यापासून एक सुरूवात करूयात, माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणूस बनूनच राहूयात ......जाती-धर्माच्या पुढे जाऊन एकमेकांशी निखळ नातं जोडूया..
सदर कथा लेखिका डॉ सुनिता चौधरी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!! 📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.