© कविता अमित सुरासे
2020 चा उन्हाळा चालू होता पुण्याचे सरकारी प्रसूतिगृह पेशंटने खचाखच भरलं होतं .
सिनियर डॉक्टर राधा प्रधान. वय वर्ष 32 गेली सहा वर्ष त्या या हॉस्पिटल मध्ये होत्या.
तसे तर स्वतः सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट असून सुद्धा त्यांना लग्नानंतर सात वर्षांनी गर्भधारणा झाली होते त्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागले होते त्यामुळे आणि यावेळी त्यांनी स्वतःची विशेष काळजी घेतली होती आणि दोन महिन्यापूर्वीच त्यांनी हॉस्पिटलच्या आवारातील स्टाफ क्वार्टर्स स्वतःला अलॉट करून घेतले होते.
त्यात हे कोरोना नावाच्या नवीन संसर्गजन्य आजाराचे दिवस होते . पुण्यात भीतीचे वातावरण होते .
कडक लॉक डाऊन जाहीर झाल्यामुळे बाहेर कशाचेही आवाज नव्हते. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते.
पण डॉक्टरांच्या हातात काही नव्हतं.
2020 चा उन्हाळा चालू होता पुण्याचे सरकारी प्रसूतिगृह पेशंटने खचाखच भरलं होतं .
प्रसूतिगृह असल्यामुळे शक्यतो प्रसूतीसाठी आलेल्या मतांचा भरणा जास्त असे.
सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे केस पेपरचे दहा रुपये सोडल्यास इतर कुठलाही खर्च पेशंटला येत नसे.
सर्व प्रकारची योग्य ट्रीटमेंट त्यांना येथे मोफत मिळत होती अगदी सिझेरियन ऑपरेशन सुद्धा ,फक्त हॉस्पिटल त्या तुलनेने लहान असल्यामुळे फक्त दोन ओटी होते आणि ती ऑपरेट करण्यासाठी काही ठराविक दिवस होते .
म्हणजे जर तुमचं प्लॅन सिजर किंवा गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशन असेल तर तुम्हाला तिथे करायला हरकत नाही पण तसं नसेल तर तुम्हाला जवळच्या मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागत असे.
पुण्यातील जाराश्या दुर्लक्षित गरीब वस्त्यांच्या जवळ असणाऱ्या ह्या हॉस्पिटलमुळे कितीतरी महिलांना आधार झाला होता.
माथाडी कामगार किंवा तत्सम कामे करणारे आणि दिवसाला हातातोंडाची गाठ पडेल इतकेच जेमतेम जमवू शकणाऱ्या लोकांसाठी महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ह्या हॉस्पिटलमुळे निकाली निघाला होता.
रोज OPD मध्ये महिलांची रीघ लागे .
डॉक्टर आणि सोबतीला सगळ्या महिला परिचारिका आणि आया असा स्टाफ सारे सांभाळत असे .
पण वयस्कर डॉक्टर दामले आणि सराफ यांनी रात्रीच्या रुग्ण देखरेखीचे काम नवीन डॉक्टरांना सोपवले होते .
सिनियर डॉक्टर राधा प्रधान. वय वर्ष 32 गेली सहा वर्ष त्या या हॉस्पिटल मध्ये होत्या.
आज पर्यंत कित्तेक सिजेरियन ऑपरेशन केली होती त्यांनी ,पण आता त्या स्वतः गर्भवति असल्याने आणि त्यातून नववा महिना लागल्यामुळे तर स्वतः नियोजित सिजेरियन साठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या होत्या.
तसे तर स्वतः सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट असून सुद्धा त्यांना लग्नानंतर सात वर्षांनी गर्भधारणा झाली होते त्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागले होते त्यामुळे आणि यावेळी त्यांनी स्वतःची विशेष काळजी घेतली होती आणि दोन महिन्यापूर्वीच त्यांनी हॉस्पिटलच्या आवारातील स्टाफ क्वार्टर्स स्वतःला अलॉट करून घेतले होते.
त्यात हे कोरोना नावाच्या नवीन संसर्गजन्य आजाराचे दिवस होते . पुण्यात भीतीचे वातावरण होते .
त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पेशंट असताना एकापेक्षा अधिक नातेवाईकांना पेशंट जवळ थांबण्याची परवानगी नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर प्रधान यांचे अकरा वाजता सिझेरियन असणार होते.
मिलिटरी मध्ये सेवा देणारे डॉक्टर आठवड्यातून दोन दिवस येऊन काही पेशंट चेक करून त्यांचे सिजेरियन करत असत.
डॉक्टर प्रधान यांना तेच ऑपरेट करणार होते
आज सकाळपासून नैसर्गिक प्रसूतीसाठी तीन जणी दवाखान्यामध्ये दाखल झाल्या होत्या.
आज सकाळपासून नैसर्गिक प्रसूतीसाठी तीन जणी दवाखान्यामध्ये दाखल झाल्या होत्या.
हॉस्पिटलचा जुनाजाणता नर्स स्टाफ आणि एक नवीन डॉक्टर तिकडे लक्ष ठेवून होते प्रसूती नैसर्गिक असल्याची संभावना असल्यामुळे तसे काही चिंतेचे कारण नव्हते.
फक्त त्यातील एका रुग्णाचे कोरोना पोसिटीव्ह रिपोर्ट आल्याने शक्य ती सगळी काळजी घेतली जात होती.
कडक लॉक डाऊन जाहीर झाल्यामुळे बाहेर कशाचेही आवाज नव्हते. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते.
अशातच नॉर्मल डिलिव्हरी साठी ऍडमिट झालेल्या त्या पोसिटीव्ह पेशंटच्या बाळाच्या हृदयाच्या ठोक्याची गती कमी होत होती .
गर्भातील सर्व गर्भजल निघालेले होते बाळ कोरडे पडत होते त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या .
त्याची माता घाबरी घुबरी झाली होती पाहिलटकरीन नसली तरी वय जेमतेम तेवीस चोविस असावे तिचे नाव फराह शेख होते .
रात्रीचे बारा वाजत आले होते.
हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी हलवण्यासाठी ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नव्हती.
हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी हलवण्यासाठी ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नव्हती.
पेशंट बरोबर असलेल्या त्यांच्या आईंना काही समजत नव्हतं त्या दोघी मायलेकी खूप साध्या आणि कमी शिकलेल्या वाटत होत्या, त्यांचे म्हणणे पडले जर का पहिली प्रसूती नैसर्गिक झाली दुसरी प्रसूती सिझेरियन होता कामा नये .
पण डॉक्टरांच्या हातात काही नव्हतं.
त्यांनी मोठया हॉस्पिटलला फोन लावला पण तिकडे सुद्धा खासगी वाहने बंद होते आणि रुग्णवाहिका उपलब्ध व्हायला वेळ होता .
अशावेळी घाबरतच डॉक्टर प्रधान यांना उठवले प्रधान सुद्धा अवघडलेल्या अवस्थेत होत्या.
अशावेळी घाबरतच डॉक्टर प्रधान यांना उठवले प्रधान सुद्धा अवघडलेल्या अवस्थेत होत्या.
बरोबर त्यांची आई देखील होती त्यांना ह्या अवस्थेत आपल्या लेकीने आराम करावा असे वाटत होते शिवाय पेशन्ट कोविड पोसिटीव्ह होता म्हणूनच इतक्या वर्षांनी नातवाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या त्यांना आपल्या मुलीचा निर्णय चुकीचा वाटत होता.
त्यांनी डॉक्टर प्रधानांना अडवण्याचे प्रयत्न केले पण तरीही डॉक्टरांनी एवढ्या रात्री येऊन शक्य ती सर्व काळजी घेउन पेशंटला चेक केले आणि त्याच्या लक्षात आले की बाळाची नैसर्गिक प्रसूती होऊ शकत नाही आणि अजून जास्त वेळ घेतला गेला तर मातेच्या वाढलेला बीपी आणि बाळाच्या हृदयाचे मंद ठोके यामुळे त्यांना वाचवणे कठीण जाऊ शकते.
सगळी परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर प्रधानांनी मिलिटरी डॉक्टर दाते ह्यांना फोन करून बोलावून घेतले आणि ओटी तयार ठेवायला सांगितले पण दाते तेव्हा देहूरोड कॅम्पला होते त्यांनी लगेच येण्याची तयारी दाखवली तरी त्यांना पोहोचायला दोन तास लागले असते .
शेवटी स्वतःच्या अवघडलेल्या अवस्थेत त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
ऑपरेशनची तयारी करत असताना त्यांच्या लक्षात आले की त्यांना स्वतःला सुद्धा थोडा लेबर पेन सुरू झाल्या सारख वाटतय दुसरे डॉक्टर येईपर्यंत ,इतका वेळ समोरच्या पेशंटला ताटकळत ठेवणे शक्य नव्हते कारण ही परिस्थिती खूप अवघड झाली होती.
शेवटी डॉक्टर राधा प्रधान यांनी धीर करून ऑपरेशन करायचं ठरवलं पेशंटला ओटीमध्ये नेले गेले.
डॉक्टर प्रधान पी पी इ किट घालून आवश्यक ती काळजी घेऊन ओटीमध्ये जायला निघाल्या पण मनात धास्ती होतीच .
त्यांनी आपल्या पोटावर हात ठेवून दीर्घ श्वास घेतला आणि आत प्रवेश केला.
ड्रीप वगैरे लावून इंजेक्शन घेऊन बीपी नॉर्मल करण्याचा प्रयत्न चालू झाला .
ड्रीप वगैरे लावून इंजेक्शन घेऊन बीपी नॉर्मल करण्याचा प्रयत्न चालू झाला .
जमेची बाजू म्हणजे हिमोग्लोबिन आणि शुगर हे नॉर्मल होते.
पण घाबरल्यामुळे आणि कळा घेऊन थकल्यामुळे फराहचा बीपी कमी होत नव्हता.
डॉक्टर प्रधान यांनी फराहला आणि तिच्या आईला समजावून सांगितला तेव्हा पंधरा-वीस मिनिटांनी तिचा बीपी थोडा नॉर्मलला झाले .
बीपी शुगर सगळे रिपोर्ट सगळं काही बघून त्यांनी भूलतज्ञना भूल देण्याचा इशारा केला आणि अवघ्या काही वेळातच बाळाचा रडण्याचा आवाज ओटीमधून बाहेर आला.
आपले कौशल्य पणाला लावत स्वतःच्या ह्या अवस्थेतपण राधा प्रधान यांनी आपले काम चोख केले पण स्वतःला सुरू झालेल्या वेदनेमुळे उभ राहण्यात देखील त्रास होत होता .
त्यांनी असिस्टंट डॉक्टरला क्लोजिंग प्रोसिजर करायला सांगितले आणि स्वतः लवकरात लवकर बाहेर येऊन चेंज करून विलगीकरणात गेल्या.
दाते डॉक्टर साधारण रात्री चारच्या सुमारस पोहोचले प्रसुती झालेल्या मातेला आणि त्याच्या बाळाला तपासले योग्यवेळी स्वतःची पर्वा न करता घेतलेला ऑपरेशनच्या निर्णयामुळे बाळ आणि त्याची आई सुखरूप होते बाळाच्या आईचा रिपोर्ट जरी पोसिटीव्ह होता तरी बाळाचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले.
दुसऱ्या दिवशी डॉक्टर प्रधानांची कॉविड टेस्ट झाली आणि प्रसूती देखील झाली त्यांनी एक गोंडस बाळाला जन्म दिला सुदैवाने त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले तरी त्यांनी स्वतःला पुढचे पंधरा दिवस विलीग ठेवले .
बाळाच्या आजीने आणि आईने डॉक्टर प्रधानांचे खूप आभार मानले ह्या घटनेला आता एक वर्ष झाले प्रसूतीनंतर 3 महिन्यांनी डॉक्टर प्रधान पुन्हा रुजू झाल्या त्यांच्याकडे लहान मुल असल्याचे कारण आणि रजाही शिल्लक असताना ह्या जागतिक महामारीत देखील रुग्णसेवा करू लागल्या.

आपल्या तान्ह्या बाळाला घरी ठेऊन मन घट्ट करून कितीतरी कोरोना पोसिटीव्ह मातांच्या प्रसूतीवेळी त्यांनी योगदान दिले.
साधनसामुग्रीची कमतरता , मनुष्यबळाची कमतरता या सगळ्यातून वाट काढून अठरा-अठरा तास काम करून आपल्या रुग्णांना सेवा देणाऱ्या ,आपल्या वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सतत आपल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या त्यांच्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या या वैद्यकीय पेशाला आणि त्यातल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा.
©®कविता अमित सुरासे
(सदर कथा काल्पनिक असली तरी वास्तवात असे डॉक्टर आपल्याला नक्कीच सापडतील)
©® कविता अमित सुरासे

सदर कथा लेखिका कविता अमित सुरासे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.