© वैष्णवी कुलकर्णी
ऋषी - " वेदू , खरंच तू जशी आहेस ना तशीच आम्हाला आवडते. खरी, निर्मळ आणि कुठलाही दिखावा न करणारी आणि हेच तुझे आंतरिक सौंदर्याने भरलेले गुण तुझ्या बाह्य सौंदर्यावर मात करतात. कोणाला पटो वा न पटो , पण आम्ही दोघं तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि ऋग्वेद उद्या थोडा मोठा होईल तेव्हा तुला सवड मिळेलच की तुझा बांधा पुन्हा सुडौल करण्यासाठी, काय ?
तेव्हा तूर्तास तरी मला माझी *गबरू* बायको पसंत आहे."
असे म्हणून ऋषीने तिचे गालगुच्चे घेतले.
वेदांगी एक खूप प्रेमळ , समजूतदार पण तेवढीच अल्लड आणि अवखळ मुलगी , आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घेणारी आणि इतरांना देखील वाटणारी.
आपल्या गोड बोलण्याने आणि बोलक्या डोळ्यांनी समोरच्याच्या मनाचा अलगद ठाव घेणारी , भरभरून बोलणे आणि खळखळून हसणे प्रिय असणारी अशी वेदु गेल्या काही दिवसांपासून मात्र निराशेच्या गर्तेत सापडल्यासारखी झाली होती.
आयुष्य भरभरून आणि आपल्याला वाटतं तसच जगावं या विचाराची ठाम पुरस्कर्ती असलेली वेदांगी आज मात्र एका न्यूनगंडामुळे त्रासली होती.
झालं असं होतं की वेदांगी ६ महिन्यांपूर्वीच एका गोड मुलाची आई झाली होती. मातृत्वाचं मिळालेलं दान तिने मनापासून स्वीकारलं होतं. आपलं आईपण खूप एन्जॉय करत होती ती.
झालं असं होतं की वेदांगी ६ महिन्यांपूर्वीच एका गोड मुलाची आई झाली होती. मातृत्वाचं मिळालेलं दान तिने मनापासून स्वीकारलं होतं. आपलं आईपण खूप एन्जॉय करत होती ती.
बाळाच्या उठण्याच्या , झोपण्याच्या , भुकेच्या वेळा अगदी चपखलपणे सांभाळत होती. पण या सगळ्यांत मात्र एक आई वावरत होती. वेदांगी कुठेच नव्हती.
आईपण सांभाळता सांभाळता तिचं स्वतःकडे दुर्लक्ष करणं , स्वतःच्या खाण्याच्या , झोपण्याच्या वेळेकडे कानाडोळा करणं या गोष्टी आता तिच्या अंगाशी येऊन तिचं वजन चांगलंच वाढलं होतं आणि हेच तिच्या नैराश्याला आणि मनातल्या न्यूनगंडाला कारण ठरत होतं.
तिने अनेकदा तिच्या नवऱ्यासोबत , ऋषी सोबत आणि तिच्या सासुबाई , मालती ताईंसोबत या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण ऋषी अतिशय साधा आणि वेदांगीवर मनापासून प्रेम करणारा होता तशाच मालतीताई देखील मायाळू होत्या.
त्यामुळे ते दोघे अनेकदा तिची समजूत घालत की असे नकारात्मक विचार नको आणत जाऊस मनात , तू जशी आहेस तशीच छान आहेस.
तेवढ्यापुरती वेदांगी शांत होई , पण अनेकदा तेच तेच विचार तिच्या मनात उफाळून येत असत.
लहानपणापासून वेदांगी अगदीच सडपातळ नसली तरी खूप जाड देखील नव्हती.
लहानपणापासून वेदांगी अगदीच सडपातळ नसली तरी खूप जाड देखील नव्हती.
लग्नात मध्यम बांधा असूनही अतिशय देखणी दिसणारी वेदू आता आवाक्याबाहेर चाललेल्या आपल्या वजनाला आटोक्यात ठेवण्यासाठी मनात खूप इच्छा असून देखील काहीच करू शकत नव्हती.
कारण एक तर तिच्या सासूबाईंकडून , मालतीताईंकडून अधिक वेळ घरातली कामे करणे शक्य होत नसे. त्यामुळे लहानग्या ऋग्वेदला सांभाळणे , घरातली कामे करणे , आल्या गेल्या पाहुण्यांचे बघणे यात तिला २४ तास देखील कमी पडत होते मग स्वतः कडे ती लक्ष कशी देणार ?
एका रविवारी ऋषीची गावातच राहणारी नलूमावशी नेहमीसारखी त्यांच्याकडे आली होती. लहानग्या ऋग्वेदला आणि इतर सगळ्यांना भेटण्यासाठी. वेदांगीने खूप मनापासून तिचे आगत - स्वागत केले.
एका रविवारी ऋषीची गावातच राहणारी नलूमावशी नेहमीसारखी त्यांच्याकडे आली होती. लहानग्या ऋग्वेदला आणि इतर सगळ्यांना भेटण्यासाठी. वेदांगीने खूप मनापासून तिचे आगत - स्वागत केले.
दुपारच्या जेवणासाठी तिने मावशीला आवडतो तसा खास बेत केला होता. खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांची जेवणं झाली अन् सगळे बैठकीच्या खोलीत येऊन बसले. वेदांगीने ऋग्वेदला त्याची भूक शमवून झोपवले आणि ती हॉलमध्ये आली.
तिला आलेली पाहताच नलूमावशी म्हणाली , " वेदांगी , एक सांगू का? वाईट नको वाटून घेऊस, पण अगं जरा स्वतः कडे बघ , काय अवस्था करून घेतली आहेस तू ? किती जाड झालीयेस बाळंतपणानंतर ? लग्नात कित्ती छान दिसत होतीस तू ? एवढं वजन वाढू देणं चांगलं नाही गं !

तू ना, आता रोज १ तास व्यायाम करत जा , सूर्यनमस्कार घाल आणि जरा डायेट कर म्हणजे जरा बारीक होशील. आमचा ऋषी बघ बरं कित्ती फिट आहे ते, उद्या तुम्हाला दोघांना बघून कोणी असं म्हणायला नको की काय वरणभात जोडा आहे असं !"आणि स्वतः च्या असल्या शेलक्या विनोदावर नलुमावशी स्वतःच खळखळून हसली.
ऋषी आणि वेदांगीच्या सासूबाईंना नलुमावशीचं हे बोलणं अजिबातच आवडलं नाही. वेदांगीला तर रडूच कोसळणार होतं पण तिने महत्प्रयासाने स्वतःला सावरलं आणि ती बळेबळेच हसली.
मालतीताई : " नलू , अगं आपली बाळंतपण झाली नाहीत का ? आणि आपल्याला सुद्धा या समस्येचा सामना करावा लागला होताच ना ! पण आपण मार्ग काढलाच की नाही यातून ? तशीच वेदू देखील मार्ग काढेल.

आणि ती मुळात खूप सुडौल आहे गं, फक्त आता बाळंतपणानंतर स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे तिचं वजन वाढलंय हे तुला वेगळं सांगायची गरज आहे का ?
तुला सांगते नलू , अगं साखरपुडा आणि लग्नं झालं तेव्हा किती सुंदर दिसत होती माझी वेदू , स्वत:च्या दिसण्याची आणि व्यक्तिमत्वाची खूप काळजी घेते हां ती. तिला आत्ता गरज आहे ते यातून बाहेर पडायला थोडा वेळ देण्याची."
ऋषी म्हणाला , " आणि मावशी , अगं तिच्यावर कामांचा किती मोठा डोंगर असतो , घरातली कामं बघायची , ऋग्वेदकडे बघायचं , आई जास्त कामं करू शकत नाही पण बसल्या बसल्या ती ऋग्वेदला सांभाळते , पण म्हणून वेदांगीची जबाबदारी कमी होत नाही ना !

आणि त्यात आला गेला पै पाहुणा ,त्याची सरबराई हयात सद्ध्या ती अडकलीय, नाहीतर माझी वेदांगी एकदम फिटनेस फ्रिक आहे बरं का !"
येणाऱ्या पाहुण्यांचा ऋषीने मारलेला टोला नलूमावशीच्या बरोबर लक्षात आला आणि तो विषय तिथेच संपवून ती सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून सटकली.
येणाऱ्या पाहुण्यांचा ऋषीने मारलेला टोला नलूमावशीच्या बरोबर लक्षात आला आणि तो विषय तिथेच संपवून ती सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून सटकली.
नलूमावशीला निरोप देऊन सगळे घरात आले आणि वेदांगीच्या अश्रूंचा बांध फुटून ती हम्साहम्सी रडू लागली.
"ऋषी , मी अगदीच बेढब दिसायला लागले आहे ना , तुम्हाला नाही शोभत मी आता. इतर बायका बघा कशा सुडौल दिसतात आणि मी किती बेडौल दिसते. खूप अजागळ आहे ना मी ? आणि आता काही दिवसांमध्ये लोकं तुम्हाला बोलतील की तुझी बायको तुला अजिबात शोभत नाही म्हणून. "
ऋषी - "ए वेडाबाई , अगं तू पुन्हा सुरू झालीस ? अगं , मावशीचं बोलणं काय एवढं मनाला लाऊन घेतेस ? ती आधीपासून तशीच आहे. स्वतःचं काय जळतं ते बघायचं नाही आणि दुसऱ्याच्या घरात आगी लावायच्या. पण तिचं तोंड बंद केलं ना मी आणि आईने ? आणि आम्ही दोघे तुला काही बोलतोय का ?

अगं , आमच्या दोघांसाठी तुझ्या दिसण्यापेक्षा तुझं असणं जास्त महत्वाचं आहे. चेहऱ्याचं सौंदर्य काय गं , आज आहे तर उद्या नाही , पण मनाचं औदार्य आणि सुंदरता जी तुझ्याकडे आहे , ती सगळ्या बायकांकडे नसते. आणि इतर सुडौल बायकांचं काय घेऊन बसलीस ?
त्यांच्याकडे खंडीभर नोकर असतील , पण वेळप्रसंगी आपल्या घरच्यांच्या अडीअडचणींमध्ये घरातली गृहलक्ष्मीच कामी येते."
मालतीताई - " हो ना , आणि तुझं हे कर्तव्य तू न कंटाळता नेहमीच अगदी आनंदाने पार पाडतेस बाळा. आम्हाला खूप अभिमान आहे तुझा की इतक्या छान पद्धतीने तू आपलं हे छोटंसं घरकुल सांभाळते आहेस.
मालतीताई - " हो ना , आणि तुझं हे कर्तव्य तू न कंटाळता नेहमीच अगदी आनंदाने पार पाडतेस बाळा. आम्हाला खूप अभिमान आहे तुझा की इतक्या छान पद्धतीने तू आपलं हे छोटंसं घरकुल सांभाळते आहेस.
नको मनाला लाऊन घेऊ तिचं एवढं. तू कशी दिसतेस त्यापेक्षा तू कशी आहेस याला आमच्यालेखी मोल आहे आणि तू खूप गुणी आणि गोड आहेस गं बाळा , कायम अशीच हसतमुख आणि गोड बनून रहा ,
लोकं काय ? दोन्ही बाजूंनी ढोल बडवतात. पण आपण मात्र आपल्याला पाहिजे ते आणि पटतंय तेच करायचं असतं. अश्रू पुस पाहू तुझे , मला माझी लेक हसणारीच आवडते बरं का , अशी मुळूमुळू रडणारी नाही."
ऋषी - " वेदू , खरंच तू जशी आहेस ना तशीच आम्हाला आवडते. खरी, निर्मळ आणि कुठलाही दिखावा न करणारी आणि हेच तुझे आंतरिक सौंदर्याने भरलेले गुण तुझ्या बाह्य सौंदर्यावर मात करतात. कोणाला पटो वा न पटो , पण आम्ही दोघं तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि ऋग्वेद उद्या थोडा मोठा होईल तेव्हा तुला सवड मिळेलच की तुझा बांधा पुन्हा सुडौल करण्यासाठी, काय ?
तेव्हा तूर्तास तरी मला माझी *गबरू* बायको पसंत आहे."असे म्हणून ऋषीने तिचे गालगुच्चे घेतले.
मालतीताई कौतुकाने लेकरांचं हे प्रेम बघून , त्यांच्या प्रेमात व्यत्यय नको म्हणून हसत हसत बाहेर निघुन गेल्या तर वेदांगी ऋषीच्या मिठीत निर्धास्तपणे विसावली.
तिच्या मनात दाटून आलेले नैराश्याचे मळभ आज ऋषीने आणि मालतीताईंनी आपल्या प्रेमाने आणि समजूतदारपणाने दूर सारले होते आणि हे समाधान वेदांगीला एका निराळ्याच सकारात्मकतेकडे घेऊन निघाले होते.
© वैष्णवी कुलकर्णी
© वैष्णवी कुलकर्णी
सदर कथा लेखिका वैष्णवी कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.