माती
©अपर्णा देशपांडे
गच्च भरलेले कॉलेज चे आवार. सळसळत्या उत्साहातील तरुण विद्यार्थी , आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या , अतिशय अफाट बुद्धीमत्ता असलेल्या जान्हवी मॅडम .
ह्या वयातही तरुणांना लाजवेल अशा गतीने त्यांचा कामाचा झपाटा होता.
' होमी भाभा सायन्स कॉलेज ' च्या भौतिक शास्त्र विभागाच्या त्या मानद सल्लागार . अतिशय प्रयोगशील आणि तितक्याच कडक वृत्तीच्या.
असे असूनही विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या बद्दल कमालीचा आदर होता , आणि त्याचे कारणही तसेच होते .
भौतिकशास्त्र हा वाचून शिकण्याचा विषय नाही , तो प्रयोगातून , दैनंदिन जीवनातील विज्ञान सूत्रातून , छोट्या छोट्या यंत्रांच्या अभ्यासातून शिकावा हे त्यांचे मत .
म्हैसूर च्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ची नोकरी सोडून ठिकठिकाणी 'प्रयोगातून विज्ञान' हा उपक्रम राबवण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता . अवघड व्रतच ते .
नंतर त्यांनी आपल्या मूळ गावी मानद म्हणून , एक सल्लागार म्हणून कॉलेज जॉईन केलं होतं .
कॉलेजमध्ये त्यांनी असंख्य यंत्रे , उपकरणे जमवली होती , ह्यातून त्या विषय सोपा करून शिकवत .
अनेक शाळांमधून प्रयोगातून विज्ञान हा उपक्रम त्यांनी राबवला होता . स्वतः भौतिक शास्त्रात डॉक्टरेट असूनही शालेय जीवनातच विज्ञानाचा पाया पक्का व्हावा म्हणून त्या अतिशय तळमळीने झटत होत्या .
त्या सजवलेल्या व्यासपीठाकडे बघत असतांना पुन्हा त्यांचे डोळे भरून आले .
त्या सजवलेल्या व्यासपीठाकडे बघत असतांना पुन्हा त्यांचे डोळे भरून आले .
गेल्या दोन आठवड्यात असंख्य वेळा त्यांचे डोळे ओसंडून वाहिले होते . त्या नकळत पुन्हा भूतकाळात गेल्या .
बाल विद्यामंदिर येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धा होत्या .
बाल विद्यामंदिर येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धा होत्या .
संपूर्ण राज्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या . जान्हवी मॅडमला खास पाहुण्या आणि परिक्षक म्हणून बोलावले होते .
त्या ज्या कक्षात बसल्या होत्या तिथे एक सातवीतला मुलगा आला . धीटपणे समोर येऊन म्हणाला , " मॅडम , ह्या प्रदर्शनात फक्त आठवी नववी च्याच मुलांनी भाग घायचा असे सांगितले सरांनी . मी सातवीत आहे म्हणून माझ्या प्रयोगाला त्यांनी परवानगीच दिली नाही . " छोटासा , सावळा , तरतरीत तो ...डोळ्यात प्रचंड ताकद..
छाप पडली एकदम .
" काय बनवलेस तू ? दाखव . "
छाप पडली एकदम .
" काय बनवलेस तू ? दाखव . "
त्याने लगेच एक खोके ओढत आणले .
त्यात माती भरलेला एक मोठा ट्रे होता .त्याने खोक्यातून एक छोटे ट्रॅक्टर बाहेर काढले . ते त्या माती वर ठेवले .
मॅडम उत्सुकतेने बघतच होत्या .
इतक्यात शाळेचे एक शिक्षक आत आले आणि ओरडले ,
" पुन्हा आलास तू ? अरे , तू ह्या वयोगटात नाही बसत !! सांगीतले न एकदा ? "
जान्हवी मॅडमचे सगळे लक्ष त्या ट्रॅक्टर कडेच होते .
त्यांनी बघितले , तो छोटा मुलगा सरांना विनंती करत होता ..फक्त काही सेकंद बघा असे..
मॅडम चटकन म्हणाल्या ,
" सर प्लिज !! बुद्धधीमत्तेला कुठे नियमांच्या चौकटी असतात ? ती तर अमर्यादित , बंधनातीत आहे . घेऊ द्या भाग त्याला . उलट क्वचितच कुणी काही नवीन उत्स्फूर्त प्रयोग करत असेल तर त्याला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे . ह्या प्रयोगशीलतेचीच तर वानवा आहे आपल्याकडे. त्यातही मातीशी नाळ असणारी प्रयोगशीलता ! "
" सर प्लिज !! बुद्धधीमत्तेला कुठे नियमांच्या चौकटी असतात ? ती तर अमर्यादित , बंधनातीत आहे . घेऊ द्या भाग त्याला . उलट क्वचितच कुणी काही नवीन उत्स्फूर्त प्रयोग करत असेल तर त्याला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे . ह्या प्रयोगशीलतेचीच तर वानवा आहे आपल्याकडे. त्यातही मातीशी नाळ असणारी प्रयोगशीलता ! "
ह्या बोलांनी उत्साहित होऊन त्या मुलाने सगळे समोर मांडले.
त्याच्या हातात एक कंट्रोलर होता.
त्याने कळ दाबताच त्या ट्रॅक्टरने ट्रे मधील माती नांगरायला सुरुवात केली.
त्या प्रयोगाच्या तोडीचा एकही प्रयोग तिथे नव्हता . बाकी प्रयोग सगळे फारच बाळबोध होते .
स्पर्धेचे पहिले बक्षीस तर त्याने जिंकलेच आणि नंतर....
" मॅडम ! ..मॅडम!" एका प्राध्यापकाच्या
हाकेने त्या भूतकाळातून बाहेर आल्या.
" मॅडम ! ..मॅडम!" एका प्राध्यापकाच्या
हाकेने त्या भूतकाळातून बाहेर आल्या.
" मॅडम , प्रो. राजेंनी तुम्हाला ऑफिस मध्ये येण्याची विनंती केलीये ."
जराश्या नाखुषीनेच मॅडम ऑफिसमध्ये गेल्या .
" बोला सर . काय म्हणता? "
" मॅडम श्रीयुत शिवप्रसाद यांना नक्की जाहीर झालाय न , हा .. अत्यंत मानाचा एडीसन पुरस्कार?..नाही , आपण कार्यक्रमाच्या जाहिरातीत तसं नमूद केलंय , म्हणून विचारलं ."
" काय राजे सर ! हे विचारायला तुम्ही मला इथे बोलावलंत ?.. अहो , एक काय अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत त्याला . जर्मनीच्या विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केलीये त्याला."
" समजून घ्या मॅडम... ते ...कॉलेज कमिटी च्या लोकांना ...जर ...तर ..जरा.." ओशाळ वाणं होत सरांनी बरीच मखलाशी केली .
" वर्तमान पत्र , टी.व्ही बातम्या , फेसबुक , सगळीकडे बातमी होती न सर ! कमालच करताय ! फक्त एडिसन पुरस्कारच नाही , त्याला यंगेस्ट जिनिअस , अचिव्हर ऑफ द इयर , डॉ.भाभा अवॉर्ड आणखीही काय काय अवॉर्डस मिळाले आहेत ." मॅडमनी खुलासा केला .
सरांचं समाधान झालेलं दिसलं .
मॅडमना चिडच आली .
'काडीची कुवत नसलेले दांभिक माणसं आपला डंका वाजवतात आणि हे कमिटीचे लोक त्यांना उचलून धरतात . पण खऱ्या बुद्धीमत्तेचा आदर करतांना मात्र ह्यांना 'प्रूफ' हवा'.
डॉ. शिवप्रसाद चं आगमन झालं . मुलांनी भव्य स्वागत केलं . आल्याबरोबर त्याने आधी जान्हवी मॅडम ना वाकून नमस्कार केला . मॅडमचा ऊर अभिमानाने भरून आला होता .
डॉ. शिवप्रसाद चं आगमन झालं . मुलांनी भव्य स्वागत केलं . आल्याबरोबर त्याने आधी जान्हवी मॅडम ना वाकून नमस्कार केला . मॅडमचा ऊर अभिमानाने भरून आला होता .
त्याने आधी मॅडमची भौतिक शास्त्राची प्रयोगशाळा बघितली .
तुटपुंज्या फंडातून इतकी मोठी लॅब उभी करणाऱ्या मॅडम चं त्याला कौतुक वाटलं .
"तुला अगदीच बाळबोध वाटत असतील नाही ही उपकरणं ? " मॅडमनी विचारलं .
" नाही मॅडम . साधनांना जिज्ञासेची जोड कशी द्यायची हे तुम्हीच शिकवलं मला .
'संशोधन ही एक तपस्या आहे शिव . ह्यात ज्ञानाचा आणि जिद्दीचा कस लागणार ह्याची सतत जाणीव
ठेव ' हे तुमचं वाक्य कोरलंय मनावर .
ठेव ' हे तुमचं वाक्य कोरलंय मनावर .
"तुला अजून लक्षात आहे? त्या तत्वांची कास अजून सोडली नाहीस शिव!"
" तुम्ही रिटायर झाल्यावर ह्या वयातही पदरचे पैसे मोडून आपली तपस्या चालू ठेवलीय न मॅडम? तुम्ही देखील तुमच्या ध्येयाची कास सोडली नाहीत न!"
उत्तरादाखल मॅडम ने त्याला खांद्याला थोपटले . खरंच होतं ,
मॅडमनी तर हजारो मुलांसाठी अनेक प्रयोग राबवले होते . असंख्य कॉलेज , शाळांमधून फिरल्या , पण तल्लख जिज्ञासूंची मात्र वानवाच होती . काही तुरळक अपवाद वगळता कुणी त्यांची कळकळ समजूच शकलं नाही .
हाच एक हिरा निघाला , ज्याला अशाच एका मार्गदर्शकाची गरज होती .
मॅडम ला शिव च्या रुपात हिरा सापडला होता . शिव ला दहावी नंतर मोठ्या शहरात शिकायला पाठवावे म्हणून मॅडम नि त्याच्या वडिलांचं मन वळवलं होतं , आणि त्याची फिस पण भरली होती .
" किती काळानंतर येतोय इथे शिव?"
" बाबा गेले तेव्हा एकदा आलो होतो इथे . तुम्ही इथे नव्हता . मग आईला माझ्यासोबत घेऊन गेलो , पण ह्या मातीतलं खोड तिथे रुजलं नाही . दोनच महिन्यात गेली ती पण . "
" ह्या मातीची ताकदच तशी आहे . इथूनच तर देशाला एक मौल्यवान रत्न मिळालं ."
संवाद पूर्ण झाला नाही , कारण
कुणीतरी त्यांना कार्यक्रमासाठी बोलवायला आलं होतं .
कुणीतरी त्यांना कार्यक्रमासाठी बोलवायला आलं होतं .
मग त्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं . कार्यक्रम खूप छान झाला .
सगळे विद्यार्थी मंतरल्या सारखे ऐकत होते . तरुण , तरतरीत सावळी मूर्ती आणि चेहऱ्यावर ज्ञानाचे तेज.
बोललाही तितकेच सुंदर.
फक्त पुस्तकी शिक्षण न घेता विज्ञान व्यवहारात कसं आणता येईल , त्याचा समाजाला कसा उपयोग होईल ...
तरुण भारतीय विद्यार्थ्यांनी कसे नवीन प्रयोग केले ..
जसे ....पोलियुरेथ्रेन पासून मजबूत , वजनाला हलका कृत्रिम पाय बनवला , सूक्ष्म ड्रोन , किंवा नवीन अँप्स कोणकोणते बनवले ...असं आणि ह्यावर कायकाय बोलला डॉ.शिव . बोलतांना अनेकदा त्याने जान्हवी मॅडम चा उल्लेख केला .
भाषणा नंतर तो विद्यार्थ्यांशी बोलला , चर्चा केली .
सगळ्यांवर जबरदस्त प्रभाव टाकून , मुलांना संशोधनास प्रेरित करून तो घरी जाण्यास निघाला . नंतर निवांत भेटायला येतो असे सांगून त्याने मॅडम चा निरोप घेतला .
जवळपास बारा वर्षानंतर तो इथे आपल्या गावी आला होता .
त्याच्या रहाण्याची सोय जवळील शहरातील मोठ्या हॉटेल मध्ये केली होती , पण त्याला आपलं गाव पुन्हा एकदा अनुभवायचं होतं . बालपणी च्या आठवणीत काही काळ रामायचं होतं .
त्याचे छोटेसे पत्र्याचे घर असलेली गल्ली , तिथला पार , पायवाटेने जाऊन लागणारी शाळा , आणि त्याची अभ्यासाची आवडती जागा ..छोटेसे सार्वजनिक वाचनालय .
इतक्या वर्षात बरेच बदल झाले होते गावात . शाळेची इमारत , भोवतालचा परिसर ..सगळं बदललं होतं .
वाचनालय जाऊन तिथे कुठलंसं ऑफिस निघालं होतं .
" इथे थांबा जरा ." त्याने गाडी थांबवली .
समोर छोटंसं मारुतीचं मंदिर होतं . फारसा बदल नव्हता . बाजूने फक्त प्रदक्षिणा घालण्या पुरता ओटा बांधला होता.
आपसूक त्याची नजर रस्त्याच्या उजव्या बाजूला वळली . त्याच्या आठवणीतील कुंड तिथे होतं , पण पाण्याचा स्रोत पूर्ण आटला होता . सगळीकडूनच निसर्गाची मुस्कटदाबी होतेय ....आणि माणूस सैतानासारखा त्याची गळचेपी करतच जातोय ..त्याने एक सुस्कारा सोडला .
" शिवप्रसाद ना रे तू ?" एक वयस्क आजी विचारत होत्या . त्याने निरखून बघितले , पण ओळखायला नाही आलं . कसं येणार ? दहावीत गाव कायमचं सोडलं होतं ...जवळपास पंधरा वर्ष झाली होती . मध्ये अगदी घाईघाईत येऊन गेला होता , बस!
" अरे , मी कृष्णा काकी ! तू गावात येणार म्हणून सांगत होती राधा . गाडी दिसली म्हणून मी ओळखलं ."
"काकी , राधा कुठे असते आता ?"
" आहे की इथंच . शेत सोडून कुठं जाणार? त्या टाकीला वळसा घालून जा , आणि विचारा . " काकी म्हणाल्या , पण
आता त्यांच्या बोलण्याकडे शिव चं लक्ष नव्हतं . कितीतरी वर्षांनी राधाला भेटण्याचा योग आला होता .
नऊवीपर्यंत एकाच वर्गात होतो आपण . वर्गात ..वर्गातच नाही तर अख्या शाळेत , नाही नाही , अख्ख्या तालुक्यात शिव आणि राधाच्या तोडीचं कुणीच नव्हतं .
वर्गात शिवाच्या बुद्धीला खाद्य आणि 'टसल' फक्त राधाच देऊ शके .
एकदा विज्ञानाचं कुठलंसं पुस्तक घेऊन आली होती . बराच अभ्यास केलेला होता तिने .
म्हणाली ,
" मला पण सायन्स मध्ये रिसर्च करायची इच्छा आहे . ह्या मोठ्या लोकांनी किती अफाट काम केलंय . आपण नुसतं त्यांचं काम वाचत असतो . त्यात आपल्याकडून भर मात्र शून्य ! "
" मला पण सायन्स मध्ये रिसर्च करायची इच्छा आहे . ह्या मोठ्या लोकांनी किती अफाट काम केलंय . आपण नुसतं त्यांचं काम वाचत असतो . त्यात आपल्याकडून भर मात्र शून्य ! "
" काय रिसर्च करायचाय तुला ?"
" शेतातील मातीचा कस कसा वाढवायचा ...शेतकऱ्याला आपापली वीज कशी बनवता येईल ...नांगरणी , पेरणी आणि सगळ्याच कामासाठी साधे ,सोपे कमी किमतीतील मशिन्स बनवायला हवीत .."
"सर , ....सर!!..जायचं न ?" ड्रायव्हर विचारत होता .
शिव गाडीत बसला . पाच मिनिटात गाडी एका घरासमोर थांबली . मात्र शिवला उतारावसंच वाटेना .
त्याच्या मनात अनेक आठवणी घोंगावत होत्या .
'आयुष्य कसं असतं नाही ?
Radha deserves much much better than this !!
'आयुष्य कसं असतं नाही ?
Radha deserves much much better than this !!
आपली नऊवीची परीक्षा झाली होती , आणि आपण मागच्या अंगणात गवतचारा कापत होतो .
अचानक राधा धावत तिथे आली होती ...घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं होतं ....लग्न ! गगनाला भिडायचं स्वप्न बघणाऱ्या तिच्या पंखांना कचकचून बांधणारी लग्नगाठ ! खूप रडली होती ती ....आणि आठवड्यातच लग्न झालं देखील . '
जड पावलानी तो गाडीतून उतरला . अगदी छोटंसं घर ...समोर सारवलेलं अंगण ...कामट्याचं कुंपण, आणि काठाने अबोली ची झाडं .
अंगणात एका कोपऱ्यात एक छोटासा मुलगा काहीतरी पसारा मांडून बसला होता .
शिवची उत्सुकता चाळवली .
पिटुकला उठून उभा राहिला .
" हे काय बनवतोय ?"
पिटुकला उठून उभा राहिला .
" हे काय बनवतोय ?"
" वर खाली होणारी दुर्बीण!" भोकरे पाणीदार डोळे त्याच्यावर रोकत छोटा बोलला .
"बघू मला "
शिव ने बघितलं . सायकल मध्ये हवा भरणारा पंप , जत्रेत मिळणारी उकलत जाणारी , पुन्हा गुंडाळल्या जाणारी पुंगी , आणि त्याच्या टोकावर एक छोटा आरसा . असं काहीसं . आजूबाजूला आणखी बरंच काय काय होतं ...दुरून चूल फुंकण्याची नळी , गवत कापण्याच्या कात्री चं छोटं मॉडेल ,सगळं कचऱ्यापासून बनवलं होतं .
आफ्रिकन देशात फिरतांना त्याला अशीच कचऱ्यातून अफाट प्रयोग करणारी मुलं भेटली होती ; पण भारतातही?
पाठीमागे बांगडी वाजली .
त्याने वळून बघितलं. सावळी , कृश , छापून तेल लावून बसवलेले केस......... ही ? राधा ?.....आपल्याशी विज्ञानावर वाद घालणारी ....
" शिव? ....बापरे ! किती वर्षानी! अरे , महिना झाला तुझ्या येण्याची चर्चा सुरू आहे गावात ." ती.
"राधा तू ? तशी कुठे भेटली असतीस तर ओळखलंच नसतं तुला मी! किती वेगळी दिसतेय !"
" तू तर त्या फॅरेडे ( शास्त्रज्ञ ) च्या फोटो सारखा दिसतोय . मोठा माणूस झालास रे! "
ती तर सहज बोलली ,
ती तर सहज बोलली ,
पण आत खोलवर रुतलं त्याला . वाटलं म्हणावं , राधा कदाचित तू माझ्या पुढे गेली असतीस .
पण म्हणाला ,
" हा तुझा मुलगा न ? अफाट आहे."
" करत असतो कायकाय . ओम , नमस्ते कर काकांना , आणि तुझी बियाणं दोरी दाखव ."
नमस्ते म्हणून ओम आत धावला , आणि एक मोठी दोरी , रिंग आणि छिद्राचं टोपलं घेऊन आला .
शिव कौतुकाने बघत होता .
" करत असतो कायकाय . ओम , नमस्ते कर काकांना , आणि तुझी बियाणं दोरी दाखव ."
नमस्ते म्हणून ओम आत धावला , आणि एक मोठी दोरी , रिंग आणि छिद्राचं टोपलं घेऊन आला .
शिव कौतुकाने बघत होता .
शेताच्या दोन बाजूला स्टँडचा आधार घेऊन मोठी दोरी पुलीच्या सहाय्याने ओढत त्याला बांधलेल्या टोपलीतून बियाणं टाकायची सोपी कल्पना मांडली होती , सात वर्षाच्या मुलाने !!
एक ओळ झाली की फक्त स्टॅण्ड सरकवायचा . लगेच दुसऱ्या बाजूने सुरू होऊन पुढची ओळ!! साधं , सोपं आणि अतिशय उपयुक्त .
शिव ने खूष होऊन त्याला एक पुस्तक दिले बक्षीस म्हणून .
" तुझी बुद्धी मिळालीय त्याला . तुला कल्पना नाही राधा , हा मुलगा अफाट आहे . अग , त्याला .."
मध्येच रोकत ती म्हणाली ,
" नाही ! बस! तू जा शिव !! नसते स्वप्नं नको दाखवूस ! ...तू जा शिव!"
" राधा , अग ,
" नाही ! कथेत वाचायला ठीक असतात ह्या गोष्टी! हातातोंडाची गाठ पाडण्यासाठी राबणाऱ्या ह्या हातांना असल्या स्वप्नांचे डोहाळे परवडत नाहीत . जा तू ."
पुढे बोलून उपयोग नव्हता . नाईलाजाने शिव तसाच माघारी फिरला .
संध्याकाळ झाली होती . मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं पडून गव्हाच्या लवलवत्या ओंब्या सोनेरी झाल्या होत्या .
भरत , राधाचा नवरा शिवला कारपर्यंत सोडवायला आला होता .
आपली बायको राधा किती हुशार आहे , पण तिच्या नशिबात फक्त चूलच आली हे कबुल केलं होतं भरतने .
त्याचा हात प्रेमाने थोपटून शिव कार मध्ये बसला . पाठोपाठ
जान्हवी मॅडम चा फोन आला .
जान्हवी मॅडम चा फोन आला .
" हॅलो शिव , जाऊन आलास राधाकडे ? भेटला ओम?"
" हो ..कमाल आहे मॅडम . त्या पोराची झेप उंच जाणार नक्की . पुढच्या वर्षीपासून प्रो. कर्णिक च्या विज्ञान शाळेत शिकेल तो , राधा पण तयार झालीये . "
" तू फार मोठी रक्कम दिलीस त्यांना शाळेसाठी ....सर आत्ताच बोलले मला . "
" ह्या मातीचं ऋण आहे मॅडम ...ते असं पैशात फेडता येणार नाही...त्यासाठी असें कुठे कुठे दडलेले अनेक ओम शोधावे लागतील ! "
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
