©® सौ. हेमा पाटील.
"आज नाही सांगितले ना मगाशी "..
"अगं आज आज्जीचा बर्थडे आहे ना ! जाऊया ना गं आपण "..
"मग काय झाले ? परवाच जाऊन आलो ना रे "....
"अगं ती आपल्या जवळ रहात नाही ना आता ! मग तिचा बर्थडे कोण सेलिब्रेट करणार?चल ना गं "..
"होमवर्क पूर्ण झाला का ? जा. होमवर्क झाला की ,2nd and 3rd lesson वाचून काढ "..
हिरमुसल्या तोंडाने अद्वैत आपल्या रुममध्ये परतला.
"मम्मा चल ना गं "..

Six'th standard मध्ये शिकत असलेल्या अद्वैतने खुर्चीवर बसून होमवर्क करण्यासाठी वही पुढ्यात घेतली ,पण त्याचे अभ्यासात लक्ष लागेना.
आज्जीचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला.
चार महिन्यांचा असल्यापासून तो आज्जीच्या सानिध्यात होता. आज्जीचे अन् त्याचे बाॅंडींग खूप मजबूत होते.
आज बालपणापासूनच्या आठवणी त्याच्या नजरेसमोर फेर धरून नाचू लागल्या.
आज बालपणापासूनच्या आठवणी त्याच्या नजरेसमोर फेर धरून नाचू लागल्या.
अगदी छोटा असतानाही तो आज्जीजवळच कायम असायचा.
आज्जी छान छान गोष्टी सांगायची ,आवडीचा खाऊ करुन घालायची.आंघोळ घालून तयार करायची.अन आजारी पडलो तर तिचा जीव इतका खालीवर व्हायचा की ,तिला जेवायचीही शुद्ध नसायची.
बालवाडीत जायला मला नको वाटायचे तर सुरवातीला ती तेवढा वेळ तिथेच बसून असायची.
मला सवय लागल्यावर मग ती सोडून यायची. आताही सकाळी फिरायला जाण्याचे निमित्त करून ती सकाळी माझ्यासोबत शाळेपर्यंत यायची.अन दुपारी शाळेतून घरी आणायला मला ती हवीच असायची.
रस्त्याने चालत येत असताना तिला शाळेतील घडलेल्या घटना,गमती मला सांगायच्या असत.ती ही कधीच ऐकायचा कंटाळा करायची नाही. घरी आल्यावर जेवून तिच्या कुशीत तिला बिलगून झोपणे हा रोजचाच परिपाठ होता.
दिवेलागणीच्या वेळी शुभंकरोती अन् सकाळी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तीच म्हणून घेत असे.
तिचे बोट धरुनच तर या जगात चालायला शिकलो होतो ,अन् आता अचानक तिला आयुष्यातून असे वजा करणे अद्वैतच्या पचनी पडत नव्हते.
पण हे ही करायला तिनेच तर भाग पाडले होते . अचानक दूर झालेल्या आज्जीच्या सहवासातील आठवणी त्याच्या मनात वारंवार घोळत.
पण अचानक एक दिवस पप्पांनी सांगितले की, उद्यापासून आज्जी दुसरीकडे रहायला जाणार आहे.आपल्यासोबत रहाणार नाही. हे ऐकून त्याला काहीच अर्थबोध झाला नाही.
पण अचानक एक दिवस पप्पांनी सांगितले की, उद्यापासून आज्जी दुसरीकडे रहायला जाणार आहे.आपल्यासोबत रहाणार नाही. हे ऐकून त्याला काहीच अर्थबोध झाला नाही.
पण पप्पांना अधिक काहीही न विचारता त्याने आज्जीकडे धाव घेतली.
आज्जी बॅग पुढ्यात घेऊन कपडे भरत होती.
अद्वैत आज्जीसमोर जाऊन बसला."आज्जी ,तू कुठे निघालीस?"
या अद्वैतच्या प्रश्नावर ," "मी माझ्या घरी चालले बाळा "..असे आज्जीने सांगितले.
"काहीही काय गं आज्जी ..तुला कुठे आहे दुसरे घर ? मी कसे पाहिले नाही आजपर्यंत?"
"आता बघशील बाळा ! तू येशीलच की मला भेटायला तिकडे ! या शहरातच आहे."
"नाही.मला सोडून तू कुठ्ठेही जायचे नाहीस.."असे म्हणत अद्वैत आज्जीच्या कुशीत शिरून मुसमुसायला लागला.

आज्जीने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत त्याची समजूत घातली पण तो गप्प गप्पच झाला.
सकाळी उठल्यावर तो शाळेत निघाला तेव्हा आज्जीने त्याला जवळ घेतले व सांगितले, "मम्मी पप्पांना त्रास देऊ नकोस हं बाळा ! व्यवस्थित रहा ."
सकाळी उठल्यावर तो शाळेत निघाला तेव्हा आज्जीने त्याला जवळ घेतले व सांगितले, "मम्मी पप्पांना त्रास देऊ नकोस हं बाळा ! व्यवस्थित रहा ."
पण हे सांगताना आज्जींचे डोळे भरुन आले हे पाहून अद्वैत रडू लागला.
"आज्जी ,नको ना गं जाऊस मला सोडून.."
'पण चल , वेळ होतोय' असे म्हणत मम्माने त्याला बाहेर काढले आणि तो पहिल्यांदाच आजीशिवाय एकटाच स्कूलमध्ये गेला.
अजूनही आजीसोबत स्कूलला येतो म्हणून मुले त्याला चिडवत ,पण तरीही त्याच्यावर काही परिणाम होत नसे .मात्र आज एकटे चालताना त्याचे डोळे सारखे भरुन येत होते. दिवसभर ही त्याचे कुठेही लक्ष लागले नव्हते.
त्यानंतर तो जेव्हा एकटाच आज्जीशिवाय घरी आला तेव्हा धावतच आज्जीच्या रुमकडे गेला .पण आज्जी तिथे नव्हती...आता रोजच असणार नव्हती....
या विचारांमध्ये बराच वेळ हरवलेला अद्वैत मम्माच्या आवाजाने भानावर आला. "झाला का होमवर्क पूर्ण "?त्याने वहीच्या कोर्या पानाकडे पहात सांगितले , " नाही मम्मा. करतो ."

"आवरुन घे लवकर होमवर्क,अन् दूध प्यायला ये".असे मम्मीने सांगितले.
अद्वैतच्या डोक्यात एक कल्पना आली.आपली पिग्मी आपण फोडूया का आज ? आज्जीचा वाढदिवस साजरा करायचा नाही असे मम्मा म्हणाली.
अद्वैतच्या डोक्यात एक कल्पना आली.आपली पिग्मी आपण फोडूया का आज ? आज्जीचा वाढदिवस साजरा करायचा नाही असे मम्मा म्हणाली.
मग आपण या पिग्मीच्या पैशांतून केक घेऊन जाऊयात आज्जीसाठी ! हा विचार मनात आला तसा अद्वैतने पटकन होमवर्क पूर्ण केला.
अन आपला पैसे साठवण्याचा मातीचा गल्ला घेऊन तो हळूच आपटला. त्यातील पैसे ,नोटा पाहून त्याच्या डोळ्यासमोर आज्जीचा चेहरा तरळला.
दूध पिऊन तो खेळायला जातो असे मम्माला सांगून खाली आला अन् जवळच असलेल्या केक शाॅपकडे त्याने आपला मोर्चा वळवला.
दूध पिऊन तो खेळायला जातो असे मम्माला सांगून खाली आला अन् जवळच असलेल्या केक शाॅपकडे त्याने आपला मोर्चा वळवला.
आज्जीच्या आवडीचा पाईनअॅप्पल केक घेऊन सरळ रिक्षा करुन तो सहोदर वृद्धाश्रमात पोहोचला.
आज्जीच्या रुमकडे गेला तेव्हा आजी कपड्यांच्या घड्या घालत होती.
"आज्जी ",अशी जोरात हाक मारत अद्वैत आज्जीच्या कुशीत शिरला.अचानक आलेल्या अद्वैतला पाहून आज्जीला आश्चर्य वाटले अन् खूप आनंदही झाला.
"आज्जी मी तुझ्यासाठी केक घेऊन आलोय.आज तुझा बर्थडे आहे ना "..
"कशाला रे बाळा..अन् आईबाबांना न सांगता आला आहेस होय "?
" मग काय करु ? स्कूलमधून आल्यापासून मम्माच्या मागे लागलो होतो,चल ना गं आज्जीकडे ! तर नाही म्हणाली.मग तुझा बर्थडे कोण साजरा करणार? म्हणून आलो."
"अन् पैसे कुठून आणलेस ?"
"अगं माझेच आहेत हे साठवलेले"..
"आता या वयात कसले बर्थडे साजरे करायचे रे ? असे आईबाबांना न सांगता परत कधीही एकटे यायचे नाही बरं का " !
"हो आज्जी..पण इथे तुझा वाढदिवस कोण साजरा करणार? म्हणून आलो." हे ऐकताना आज्जीच्या चेहर्यावर आनंद पसरला आहे हे अद्वैतला समजले,अन आपण योग्य निर्णय घेतला असे त्याच्या बालमनाला वाटले.
"हो आज्जी..पण इथे तुझा वाढदिवस कोण साजरा करणार? म्हणून आलो." हे ऐकताना आज्जीच्या चेहर्यावर आनंद पसरला आहे हे अद्वैतला समजले,अन आपण योग्य निर्णय घेतला असे त्याच्या बालमनाला वाटले.
आज्जी अन् तिथे सोबत रहाणार्या सर्वांसोबत केक कापून आज्जीला केक भरवताना त्याला आनंद झाला.आज्जीच्या चेहर्यावरूनही आनंद ओसंडून वाहत होता हे पाहून त्यालाही खूप आनंद झाला. थोडावेळ थांबून तो घरी परतला.
घरी आल्यावर मम्माने सांगितले ," चल आवरुन घे.आज आपल्याला एका फंक्शनला बाहेर जायचे आहे.पप्पा अर्ध्या तासात पोहोचतील ".
घरी आल्यावर मम्माने सांगितले ," चल आवरुन घे.आज आपल्याला एका फंक्शनला बाहेर जायचे आहे.पप्पा अर्ध्या तासात पोहोचतील ".
मम्माचाही बेस्ट बेटा होता तो ! हातपाय धुवून मम्माने काढून ठेवलेले कपडे घातले अन् तो शांतपणे सोफ्यावर बसला.
पप्पांचा फोन आला की ," मी वर येत नाही, तुम्हीच खाली या"..हे ऐकून ते दोघे खाली गेले.
गाडीत मम्मा अन् पप्पांच्यात काहीतरी चर्चा चालू होती,पण अद्वैत मगाशी आज्जीला भेटून आलेल्या स्मृतींमध्येच दंग होता .
हाॅटेल कृष्णा समोर गाडी उभी राहिली.अद्वैतला आठवले ,खूपदा आपण आज्जीचा वाढदिवस इथेच साजरा करायचो...पण आज ?
मम्मा सोबत तो आत शिरला.आत शिरल्यावर त्याला जे दिसले ते पाहून तो विस्मयचकित झाला व त्याला खूप आनंद झाला. कारण सगळीकडे आज्जीच्या बर्थडे निमित्ताने आज्जीचे सर्वांसोबतच्या फोटोंचे बॅनर्स लावले होते.

आज्जीच्या खूप सार्या मैत्रिणी अन् शहरात रहाणारे नातेवाईक तिथे जमले होते . हे सगळे पाहून अद्वैत आश्चर्यचकित झाला.
तेवढ्यात आज्जी अन् तिच्या वृद्धाश्रमातील सोबती सगळेजण गाडीतून आले. ते हाॅटेलबाहेर आले की फोन करण्याची सुचना दिलेली असल्याने आज्जी हाॅटेलबाहेर आल्याचा फोन व्यवस्थापकाने केला.
जमलेले सगळेजण मम्मा व पप्पांसोबत बाहेर आले.बाहेर आज्जीच्या अंगावर सर्वांनी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत Happy Birthday to you ! चा गजर केला.
आज्जीला तोपर्यंत काही माहीतच नव्हते.वृद्धाश्रमाच्या संचालकांनी आज संध्याकाळी आपल्याला हाॅटेलमध्ये जेवायला जायचे आहे असे सांगितले होते. पण इथे आल्यावर असे जोरदार स्वागत झालेले पाहून आज्जी एकदम गोंधळून गेली.
तेवढ्यात आज्जीला पाहून अद्वैत धावतच आज्जीकडे गेला.
आज्जी म्हणाली , " माझ्या लेकाने मला न सांगता इथे माझ्या मैत्रिणींना अन् नातेवाईकांना बोलावून वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचे मला सरप्राईज दिले , मुलाची, सुनेची माझ्यावरची माया पाहून मला खूप भरुन आले , पण माझ्या दुधावरच्या सायीने मगाशी जो केक आणला तो माझ्यासाठी खूप मौल्यवान होता.माझे संस्कार वाया गेले नाहीत याचा खूप आनंद झाला व कृतकृत्य झाले.
आज्जीकडूनच त्याने केक नेलेले गुपित उघड झाले,पण पप्पा व मम्माला ते ऐकून अधिकच आनंद झाला.
आज्जीकडूनच त्याने केक नेलेले गुपित उघड झाले,पण पप्पा व मम्माला ते ऐकून अधिकच आनंद झाला.
मम्माने प्रेमाने त्याला जवळ घेत सांगितले,बाळा , सरप्राईज द्यायचे होते म्हणून तुलाही दुपारी सांगितले नव्हते.पण तेवढ्या वेळात आपल्या मम्माच्या बद्दल आपल्या मनात वाईट विचार आले होते याचे अद्वैतला वाईट वाटले.
यावर पप्पा आज्जीला म्हणाले , "तुझाच हट्ट होता की ,मला आता सगळ्यातून अलिप्त व्हायचे आहे.मी वृद्धाश्रमात रहायला जाते.तुला किती समजावून सांगितले तरी तू ऐकलेच नाहीस ".
"बरोबर आहे . वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल केलीच पाहिजे ".असे आज्जी म्हणाली.

पण ते ऐकून अद्वैतने एकच घोशा लावला ,"आज्जी ,चल ना गं घरी.मला तुझ्याकडून खूप खूप गोष्टी ऐकायचेत ".
हे ऐकून आज्जी म्हणाली , "बरं..बाळा.चार दिवस येते .पण नेहमी नेहमी असा हट्ट करायचा नाही हं..अन् वाढदिवसाला आईबाबांना न सांगता इथून पुढे परत कधी यायचे नाही हं..हे मान्य केलेस तरच येईन ".
अद्वैतने जोरजोरात मान हलवत मानेनेच होकार दिला.
अद्वैतने जोरजोरात मान हलवत मानेनेच होकार दिला.
अद्वैतच्या आनंदाने फुललेल्या चेहर्याकडे पाहून सगळेच खुष झाले.
आज्जीसोबत पुन्हा एकदा केक कापून आज्जीला औक्षण करताना आज्जीसोबत पूर्ण कुटुंबाच्या चेहर्यावर जे समाधानाचे तेज पसरले होते ते पाहून सर्वांचे डोळे आनंदाने पाणावले व सर्वांनी आज्जीला शतायुषी भव असा आशिर्वाद दिला ...
इति हेमा उवाच.
होकार
मन झाले विरागी
©® सौ. हेमा पाटील.
सदर कथा लेखिका सौ. हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
मन झाले विरागी