©️®️ सायली जोशी.
"मुलांना काही बोलायचे असल्यास बाहेर जाऊ दे." परेशचे बाबा, राधाच्या आई-वडिलांना म्हणाले.
"हो. आमची काही हरकत नाही. तसेही आपले विचार जुळण्यापेक्षा मुलांचे विचार एकमेकांशी जुळतात का? याचा अंदाज घ्यायला हवा. शेवटी संसार त्यांना करायचा आहे. आपण फक्त त्यांचे मार्गदर्शक. राधा परेशना आपली बाग दाखव. जा दोघे." आई राधाकडे वळून म्हणाली.
तसे दोघेही बाहेर आले.
बराच वेळ दोघांना समजेना, संवाद नेमका कसा सुरु करावा? दोघेही इकडे -तिकडे पाहत बागेत फिरत होते.
"छान आहे तुमची बाग. अगदी नीटनेटकी आहे!" परेश काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला.
"हो. मी आणि माझी लहान बहीण, आम्हा दोघींना बागेत रमायला खूप आवडतं. ही सगळी झाडं आम्ही खास नर्सरीतून आणली आहेत." राधा परेशला निरनिराळी झाडं दाखवत म्हणाली.
"वा! खूप छान. मग झालं तर. मलाही झाडं खूप आवडतात. त्यांची निगा राखायला आवडतं. प्रत्येक झाड आपल्याला काही ना काही सांगत असतं. प्रत्येक फुलांचे रंग, आकार जसे वेगवेगळे असतात, तितकेच सुंदर असतात. नाही का? आमच्या घरातही अशीच सुंदर बाग आहे.
ते बघा, आपल्याला कोणीतरी खिडकीतून बघत आहे." परेश एकदम खिडकीकडे पाहत म्हणाला.
"अहो, ती माझी लहान बहीण आहे. तुम्ही येणार म्हणून तिला खूप गंमत वाटत होती.
त्या उत्सुकतेपोटी ती तुम्हाला पाहायला आली असेल. थांबा मी तिला तिथून जायला सांगते." राधा हसत म्हणाली आणि तिने आपल्या बहिणीला आत जाण्याची खूण केली.
"नको. अहो, असू दे. आता खरी गंमत तर पुढे आहे." परेश राधाला एकटक पाहत म्हणाला.
"ती कसली?" राधा आश्चर्याने म्हणाली.
"मी तुम्हाला आधीपासून ओळखतो." इतकं बोलून परेश तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखू लागला.
"ते कसं काय?" राधा आपल्या मोठाल्या डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली.
"तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी रोज ज्या बस स्टॉपवर उभ्या राहता, तिथूनच आमच्या ऑफिसची कॅब जाते. गेले कित्येक दिवस मी तुम्हाला पाहतोय. मग नकळत मला तुम्ही आवडायला लागलात. तुमच्या चेहऱ्यावरचं मंद स्मित, तुमचा नम्र, विनयशील स्वभाव मला खूप आवडला आणि तुमच्या चेहऱ्यावरचा शांत भाव मला तुमच्या आणखी जवळ खेचतो.
तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता, तिथे माझा मित्र देखील काम करतो. त्याच्याकडून मी तुमची सारी माहिती काढून घेतली. ती माझ्या आई - वडिलांना सांगितली आणि 'स्थळ' म्हणून तुमच्या घरी आलो." परेश उत्साहाने म्हणाला.
"खरं की काय? तरीच म्हंटल, आता कुठलाच विषय नसताना अचानक स्थळ कसं काय आलं?" राधाला खूप आश्चर्य वाटलं. बोलता बोलता ती काहीशी लाजली.
"हो. मला तुम्ही खूप आवडता. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. लग्न कराल माझ्याशी?" परेश खाली गुडघ्यावर बसत म्हणाला.
"अहो, हे काय करताय? उठा बघू आधी. कोणी पाहिलं तर काय म्हणेल? आणि प्रेम असं असतं का? नुसतं बघून होतं ते?" राधा आपल्या पदराशी चाळा करत म्हणाली.
"प्रेम हे असंच असतं. मला तुम्ही आवडलात म्हणून मी तुमचा पाठलाग करू शकलो असतो. असंच रस्त्यावर कुठेतरी प्रपोज करू शकलो असतो आणि जर तुम्ही नाही म्हणाला असता तर माझा प्रेमभंग झाला असता. नाही का?"
परेश अजूनही तसाच बसला होता.
"त्यापेक्षा योग्य मार्ग निवडलेला बरा. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दया. लग्न कराल माझ्याशी?" त्याने कुठून तरी गुलाबाचं फुलं काढलं आणि ते राधाच्या पुढ्यात धरलं.
तशी खिडकीतून हे सारं पाहणारी तिची लहान बहीण टाळ्या वाजवत आत पळाली.
"परेश, या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या आई -बाबांच्याजवळ देईन." राधा खाली मान घालून म्हणाली.
"ते द्याल हो. पण आत्ता मला सांगायला काय हरकत आहे? बघा, हे फुलही तुमच्याच बागेतलं आहे. घरही तुमचंच आहे. इथे आपल्या आजूबाजूला कोणी नाही. जे मनात असेल ते बिनधास्त बोला." परेश गडबडीने म्हणाला.
"नको. तुम्ही उठा बघू आधी. कोणी पाहिलं तर काय म्हणेल?" राधा आजूबाजूला पाहत म्हणाली.
"कोण काय म्हणायचं ते म्हणू दे. पण तुम्ही उत्तर दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही." परेश रुसून म्हणाला.
"असा हट्टीपणा करू नये? मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे आणि मुली काही लगेच 'हो' म्हणत नसतात." राधाला परेशच्या नजरेशी नजर मिळवण्याचे धाडस होईना.
"ठीक आहे. तुम्ही विचार करेपर्यंत मी असाच बसून राहतो. मग तर झालं?" परेश म्हंटल्याप्रमाणे मांडी घालून खाली बसला.
आता नक्की काय करायचं? ते राधाला कळेना.
ती परेशकडे तिरक्या नजरेने पाहत होती. 'किती हँडसम दिसतात हे! कुरळे केस, गव्हाळ वर्ण, भेदक डोळे, धारदार नाक.' ती आपल्या मनाशीच म्हणाली.
इतक्यात तिचं लक्ष खिडकीकडे गेलं. तिची बहीण तिला 'हो 'म्हण म्हणून खुणावत होती. तशी राधाने लाजून मान वळवली आणि तिला 'आत जा ' अशी खूण केली.
"परेशराव, अहो असे का बसलात? काही अडचण आहे का?" बाबा अचानक बाहेर येत म्हणाले.
तसा परेश गडबडीने उठला. "हो.. म्हणजे नाही. बघा ना, तुमची मुलगी ऐकतच नाहीय."
हे ऐकून राधा कावरीबावरी झाली.
"काय झालं नक्की?" बाबा गालातल्या गालात हसत म्हणाले.
"बाबा, काही नाही. ते झाडं घेत होते. त्यांनाही झाडं खूप आवडतात म्हणे. त्यांच्या घरी देखील मोठी बाग आहे." राधा सावरून घेत पुढे म्हणाली.
"वा. छान. दोघांच्या आवडी -निवडी जुळतात म्हणायच्या. बरं, चला आत. सगळे तुमची वाट पाहत आहेत."
दोघेही बाबांच्या मागून आत आले.
"मी काय म्हणते, आम्हाला राधा सून म्हणून पसंत आहे." परेशची आई राधा जवळ जात म्हणाली.
"हे तर उत्तम झालं. आम्हालाही परेशराव जावई म्हणून आवडले बरं. फक्त राधा काय म्हणते ते पाहू. तिचा निर्णय तोच आमचा निर्णय." बाबा आपल्या लेकीकडे पाहत म्हणाले. हे ऐकून राधा कावरीबावरी झाली. कधी आपल्या आईकडे तर कधी आजीकडे पाहू लागली.
सगळेच राधाच्या उत्तराची वाट बघत होते.
राधाने परेशकडे एक नजर टाकली. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. जणू त्याची नजर म्हणत होती, 'आता उत्तर द्यावंच लागेल.'
"काही गडबड नाही. तुम्ही तुमचं उत्तर दोन दिवसांत कळवलं तरी चालेल. मात्र आमचा होकार आहे, हे लक्षात ठेवा." राधाला सर्वांच्या समोर उत्तर देणं अवघड जाऊ नये म्हणून परेशची आई म्हणाली.
"न...नाही म्हणजे माझाही होकार आहे." राधा कशीबशी म्हणाली आणि लाजून तिने आपला चेहरा ओंजळीत लपवला. तिचं उत्तर ऐकून सर्वांना आनंद झाला. परेशच्या आईने भराभर सगळ्यांना पेढे वाटले.
"ये हुई ना बात.." परेश खूप खुश झाला होता. त्याला वाटलं, असंच पुढे होऊन राधाचे हात हातात घ्यावेत आणि पुन्हा गुडघ्यावर खाली बसून तिचा होकार ऐकावा.
"चला, आता दोघेही जोडीने सर्वांच्या पाया पडा." राधाची आजी म्हणाली. तसे दोघे आधी आजीच्या पुढ्यात वाकले.
"किती वाट पाहायला लावलीत?" परेश राधाला कोपराने ढोसत म्हणाला.
"मगाशी तुम्हीच म्हणालात ना, प्रेम हे असंच असतं." राधा किंचित हसून म्हणाली आणि परेश मनापासून हसला. तशी तिने लाजून आपली नजर फिरवली. तिला ठाऊक होतं, परेशची नजर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर खिळलेली असणार. परेश ही तिच्याकडेच पाहत होता. त्याची नजर तिच्या नजरेत पुन्हा एकदा गुंतण्यासाठी आतुर झाली होती.
समाप्त

सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा