©® सौ. प्रतिभा परांजपे.
सहा वाजता शोभाताई यांची सून सीमा ऑफिस मधून परत आली. तिला आलेली पाहून शोभाताई मंदिरात जायला निघाल्या.
"सासुबाई आमच्या आफिस मधल्या सानेलाही गरम मसाल्याची दोन पाकिट हवी आहेत."
"हो उद्या घेवून जा" म्हणत शोभाताईंनी बरोबर पिशवीमध्ये वातींची पाकीट व मसाल्यांची पाकीट ठेवून घेतली.
हा त्यांचा घरबसल्या गृहउद्योग होता. त्यातून हातखर्चाचे पैसे त्यांना मिळत.
शोभाताई मंदिरात जाऊन आल्या तेव्हा सीमाचा स्वयंपाक होत आला होता. शशांक स्वयंपाक घरात आईजवळ काहीतरी करत होता. आजी ला पाहताच तो बाहेर येऊन बसला.
सगळ्यांची जेवणं झाली. सीमा आवराआवरी करत होती. तेवढ्यात शोभाताई चा फोन वाजला म्हणून त्या बाहेर अंगणात गेल्या.
तेवढ्यात वेळ साधून शशांकने टेबल आवरायला सुरुवात केली.
"अगं पण इथे"
"नका काळजी करू, होईल सगळे."
"शशांक अभ्यास नीट कर ,मी नाही म्हणून स्वयंपाकघरात लुडबुड करू नको."
खूप उत्साहाने जावयांना आवडतात म्हणून लाडू केले. चार दिवसांनी शोभाताई मीनाकडे पोहचल्या.
वातींचा शंभर पाकिटांचा सेट करून डब्यात ठेवून शोभाताई उठून उभ्या राहिल्या .
बरेच वेळ बसल्याने पाय आखडुन गेले होते,आज त्यांनी ठरवलंच होत शंभर पूर्ण करायच्याच. .
उठून त्यांनी घड्याळ पाहिले-- चार वाजले, चला दुपारचा चहा करावा, असे त्या म्हणाल्या,...
शशांक त्यांचा नातू तिथेच अभ्यास करत होता.

" आजी तू बस मी करतो चहा"
"नको रे-- राहू दे, तू कशाला अभ्यास सोडून उठतो. तुझी परिक्षा जवळ आली आहे, तुला भूक लागली असेल तर सांग."
"अगं-- झालाय माझा अभ्यास. पहा तर मी कसा करतो चहा?"
"नको रे तुम्ही फार गोंधळ घालून ठेवता ओट्यावर" ,मीच करते म्हणून शोभाताई चहा करायला उठल्या
शोभाताई अतिशय कामसु आणि शिस्तप्रिय होत्या. यजमान लवकर गेल्याने वागण्यात कडकपणा आला होता, मुला मुलीच लग्न होऊन बराच काळ लोटला होता.

आता मुलीच्या मुलीचं म्हणजे नातीच लग्न ठरलं होतं तर नातू बारावीला होता.
सून आणि मुलगा नौकरीपेशा, त्यामुळे सर्व काम वेळेत पूर्ण होत. सकाळचा स्वयंपाक अजुनही शोभाताई करत.
सहा वाजता शोभाताई यांची सून सीमा ऑफिस मधून परत आली. तिला आलेली पाहून शोभाताई मंदिरात जायला निघाल्या.
"सासुबाई आमच्या आफिस मधल्या सानेलाही गरम मसाल्याची दोन पाकिट हवी आहेत."
"हो उद्या घेवून जा" म्हणत शोभाताईंनी बरोबर पिशवीमध्ये वातींची पाकीट व मसाल्यांची पाकीट ठेवून घेतली.
हा त्यांचा घरबसल्या गृहउद्योग होता. त्यातून हातखर्चाचे पैसे त्यांना मिळत.
शोभाताई मंदिरात जाऊन आल्या तेव्हा सीमाचा स्वयंपाक होत आला होता. शशांक स्वयंपाक घरात आईजवळ काहीतरी करत होता. आजी ला पाहताच तो बाहेर येऊन बसला.
सगळ्यांची जेवणं झाली. सीमा आवराआवरी करत होती. तेवढ्यात शोभाताई चा फोन वाजला म्हणून त्या बाहेर अंगणात गेल्या.
तेवढ्यात वेळ साधून शशांकने टेबल आवरायला सुरुवात केली.
टेबल पुसे पर्यंत शोभाताई आत आल्या.
"अरे राहू दे मी पुसते रे " म्हणत त्यांनी पुसणे फडके शशांक घ्या हातून काढून घेतले.
"काय म्हणतात आहे ताई? लग्नाची तारीख ठरली कां?"
"मुहूर्त करायचं म्हणते, मदतीला येतेस का विचारले आहे?"
"हो हो जाऊन या की!"
"अरे राहू दे मी पुसते रे " म्हणत त्यांनी पुसणे फडके शशांक घ्या हातून काढून घेतले.
"काय म्हणतात आहे ताई? लग्नाची तारीख ठरली कां?"
"मुहूर्त करायचं म्हणते, मदतीला येतेस का विचारले आहे?"
"हो हो जाऊन या की!"
"अगं पण इथे"
"नका काळजी करू, होईल सगळे."
"शशांक अभ्यास नीट कर ,मी नाही म्हणून स्वयंपाकघरात लुडबुड करू नको."
खूप उत्साहाने जावयांना आवडतात म्हणून लाडू केले. चार दिवसांनी शोभाताई मीनाकडे पोहचल्या.
स्टेशनवर घ्यायला जावई आले होते.
घरी पोहोचल्यावर शोभा ताईंना जाणवले वातावरण जरा गंभीर आहे.
चहापाणी होताच शोभाताईंजवळ मीना बोलली. "अग आई निशा इतक्यात लग्नाला नाही म्हणते."
"काय?? अग साखरपुडा झालाय ना?
मुहूर्त करायचा म्हणून बोलावले मला आणि मध्येच हे काय आहे?'
"अगं हो पण निशाला त्यांची फॅमिली जुनाट वळणाची वाटते."
"इतक्यात असा अंदाज आणि फॅमिली शी काय करायचे? मनीष राव तर चांगले आहेत ना ?'
"अगं तसे छान आहे सगळे पण त्यांच--तुला कसं सांगु निशा खूपच अपसेट आहे."
संध्याकाळी निशा कामावरून आली, आजीला पाहून संकोचली.
"निशा--- ये इकडे,--मी काय ऐकते आहे? नेमके असे काय घडले की तू लग्न-----?'
"आजी, मनीष तसा चांगला आहे पण--"
"आता अजून काय पण् बिण--?"
"सांगते पण तुला पटेल की नाही माहित नाही, पण नंतर रोज रोज कटकटी करण्यापेक्षा."
"म्हणजे?"
"बघ मी नोकरी करते ,माझे टाइमिंग तू पाहतेस सकाळी 9 ते रात्री कधी कधी आठ वाजतात घरी यायला .इतकी थकलेली असते मी कधीकधी जेवण पण करत नाही आणि कधी तिथेच खाणे होते. ते इथे आई कडे ,"
'बरोबर पण मग?'
'अग मी बरेच दा मनीष च्या घरी जाऊन आले. त्याची वहिनी पण माझ्यासारखी नोकरी करणार पण तरीही घरी आल्यावर कामाची जबाबदारी तिचीच, सासुबाई संध्याकाळी काही नाही करत."
"अगं वयापरत्वे थकत असतील, आमच्याकडे ही तसेच आहे . संध्याकाळी मी नाही करत."
"अग पण घरात तीन पुरुष ही आहेत पण त्यांची काहीही जबाबदारी नाही,?
त्यांना सगळं हातात द्यायचे. मनीष च्या आईचे म्हणणे, मला नाही आवडत पुरुषांनी स्वयंपाक घरात लुडबुड केलेली."
"असतं ग एकेकाचं---बरोबर आहे मलाही नाही पटत,फार गोंधळ करून ठेवतात.'
'पण मग यांनी नोकरीवाल्या सुनांची अपेक्षा करू नये, बायकांनी दोन्ही खिंड लढवायची ऑफिस मध्ये कामात गडबड झालेली बॉसला चालणार नाही . आणि घरात यांना.'
"अगं पण मग कामाला बाई का नाही ठेवत?"
"आहे-- पण तरीही बरीच काम असतात, आपले, कपडे,व इतर वस्तु जागच्या जागी ठेवण, भाज्या किराणा आणण, कमीतकमी चहाचा कप तरी ...सगळ्यांनी मिळून केले तर सगळ्यांना च आराम."
"हो हे खर आहे बाई!"
"पण त्यांना करूच दिले नाही तर येणार कसे? मुलींना सगळ आलं पाहिजे नोकरी करून घर काम ही आणि बाहेर ची ही., पण मुलांनी घरकामात केलेली मदत लुडबूड वाटते तेच तेच ऐकून मग तेही तसेच वागायला लागतात ".बोलता-बोलता निशाच्या डोळ्यात पाणी यायला लागले ती उठून गेली.
"हो -आई, खरं आहे निशा म्हणते ते, मुलांनाही मुलीं प्रमाणेच घर काम व्यवस्थित यायला हवे . आता मी पण नितीनला काम सांगते, एकटे राहायची वेळ आली तर त्यांना काहीच जमत नाही.असे नको व्हायला."

"अग पण लग्न मोडण्या ---?'
'अगं लग्न मोडले असे नाही, पण मुहूर्ताची घाई नाही करू, निशा मनिषशी बोलणार आहे, .'
'पहा बाई? '

दोन दिवसांनी गाडीत बसल्या बसल्या शोभाताई विचार करत होत्या, निशा चे म्हणणे त्यांना पटत होते, काळ बदलला आहे मुलींच्या बाबतीत आपण इतके कडक धोरण ठेवतो पण मुलांना मोकळे सोडतो. कुठतरी आपलेही चुकते असे त्यांना जाणवू लागले.
आपण ही मुलाला घरकामाला हात लावून दिला नाही. आपला काळ वेगळा होता आपण नौकरी करत नव्हतो, ह्यांनी पण कधी आपल्या ला मदत केली नाही अगदी आजारी होते तेव्हा फार तर खिचडी केली असेल पण ते तेवढच.
आणी आता शशांकलाही आपण करु देत नाही. सुनबाई ची किती धावपळ होते. उद्या समजा शशांक पुढिल शिक्षणासाठी बाहेरगावी गेला तर, त्याला खाण्यापिण्याची पंचाईत होणार, बाहेर जेवण मिळाले तरीही बाकी कामाची सवय हवी आणि त्याही पुढे निशा म्हणते तसं जर मुलींना बाहेर ची सर्व काम यायला हवीत तर त्याच न्यायाने मुलांना पण घर संभाळता आले पाहिजे. असा विचार आपण कधीच केला नाही.
आता शोभाताई चा च्या विचारसरणीत बदल होऊ लागला.
निशा ने जणू त्यांचे डोळे उघडले. परिस्थिती कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला
मनाशी काही ठरवूनच त्या परत आल्या.
शोभाताई घरी पोहोचल्या तो सीमा नोकरीवर जाण्याच्या तयारीत.

त्याना पाहून, "आई बसा मी चहा टाकते. तुम्ही पटकन हात पाय धुवून या मग मी निघते."
"नको --अग तू जा बिनधास्त, तुला उशीर होईल, शशांक आहे ना हा करून देईल कि चहा, काय शशांक चहा करशील ना?"
शशांक आश्चर्याने आजी कडे पहात, "हो-हो!. नक्की."
"आणि नंतर च ही सर्व आवरून ठेव, मला काम नीट करुन हव. नाही तर---उद्या लग्न झाल्यावर तुझ्या सासरची माणसे म्हणतील मुलाला साधा चहा पण धड येत नाही, काहीच शिकवले नाही ?
आणि बायको नोकरी करणारी असली किंवा नसली तरी तिला मदत, होईल. नाही तर ,उगाच आमच्या नावाने खडे फोडतील---" म्हणत शोभाताई हसायला लागल्या.
"उद्या पासून मी शिकवेन तुला.."
शोभाताईं मधे झालेला बदल पाहून सीमा व शशांक आश्चर्याने पाहू लागले.

समाप्त
©® सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा