©® मृणाल शामराज
काळ्या मातकटलेल्या रस्त्यावरून जिजा राणूला बोटाला धरून चालली हॊती. वरून ऊन तळपत होतं. घामाच्या धारा लागल्या होत्या.

नाही म्हणायला समोरच्या झाडांमधून येणारी झुळूक सुखावत हॊती.
राणूला मात्र ह्याच काही नव्हतं. ती आपली रमत गमत चालली हॊती. तिला आईला खूप काही विचारायचं होतं.
पण आई आज चिडली आहे, हॆ त्या निष्पाप जीवाला जाणवत होतं.
"आई ए आई.."
"काय ग??"
"अगं. आज मामाकडे काय आहे?"
"वास्तूशांत.."
"म्हणजे ?"
"मामानी नवीन घरं घेतलंय ना म्हणून वास्तूची पुजा करतात त्याला वास्तूशांत म्हणतात."
"आपण दोघी चाललोय, पण बाबा.."
"तो नाही येणार," काहीसं वैतागून जिजा म्हणाली.
"का ग आई? बाबा का नाही आला ?"
"किती चौकश्या तुला ! चल पाय उचल लवकर."
जिजाला आठवलं, एवढं जीव तोडून सांगत होतो त्याला पण ऐकेल तर खरं ना..एकाच गावात राहतोय. बरं दिसतं का असं.
जिजाचं माहेर देशमुखांकडचं. तालेवार आसामी देशमुख म्हणजे. जिजाचे बाबा गेले नी सगळा कारभार दादानी हातात घेतला.

वहिनी पण तालेवारांकडचीच त्यामुळे तिचा तोरा न्यारा.
आईचं काही चालायचं नाही तिच्या पुढे.
जिजानी स्वतःच लग्न स्वतः जमवलं. शिरीष, शिक्षकी पेशातला. हाडाचा शिक्षक. सज्जन, सतशील. तत्वानी चालणारा. त्यामुळे जिजा खाऊन, पिऊन सुखी हॊती.
पण आज..
दादानी एवढं टोलेजंग घरं बांधलं, पण आमंत्रण फक्त जिजाला केलं.

शिरीष स्वाभिमानी होता. त्यामुळे तो आला नाही.
जिजाला इकडे आड तिकडे विहीर असं झालं. न जावं तर पंचाईत. माहेरची आब जायला नकॊ म्हणून तिनं खास ठेवणीतली साडी नेसली.
गळ्यात एकुलती एक ठुशी घातली.
राणूला खणाचं शिवलेलं परकर पोलक घातलं.
ती निघाली खरी. पण तिला आतून सल होता. सवाष्ण असतांना असं सड जाण तिला रुचत नव्हतं.

दादाला कळलं नाही, आईनी तरी बोलवावं ना ह्यांना. ती पुटपुटली.
"काय ग आई..?"
आता जिजाच्या लक्षात आलं, काय बोलतोय आपण या लेकराजवळ.
"चल ना लवकर.." जिजानी तिला जोरात ओढलं आणि ती घाईनी चालायला लागली.
"आलं का ग मामाच घरं?"
"येईल ना, चल."
"आई, मामाचा चंदन ना, त्याच्याकडे खूप छान सायकल आहे. मी बसू का त्याच्यावर?"
"हं.."
"मला आणून देशील का तशी?"
"आई, मामाची गाडी केवढी मोठी आहे खूप मज्जा येत असेल ना त्याच्यात बसायला? खूप मोठं घरं आहे का ग त्याचं?"
"किती वटवट लावली आहेस! ते बघ आलं घरं मामाचं."
राणू खूष झाली. लांबूनच ती माडी तिला खुणावू लागली. ती उडया मारतच पोचली.
सगळं अंगण प्रशस्त मांडवानी सजलं होतं. प्रवेशद्वार फुलांच्या तोरणानी सजलं होतं. मंद सनईचे सुर तिथे रेंगाळले होते. सुंदर रंगसंगतीच्या खुर्च्या पाहुण्यांनी भरल्या होत्या.
दाराबाहेर गाड्यांची रीघ लागली हॊती.
जिजा दबकतच आत आली. दूरवर पाहुण्यांशी बोलत असलेली आई तिला दिसली.
"आजी.." राणू जोरात ओरडली.
सगळ्यांनी एकदम तिच्याकडे पहिलं.
आजी लगबगीने पुढे आली. प्रेमानी राणूला जवळ घेतं जिजाला म्हणाली,
"किती ग हा उशीर.. पुजा सुरु झाली. चल आत."
ती इकडे तिकडे बघतच आत गेली.
केवढं वैभव उभं केलंय दादानी. तिला भावाचा अभिमान वाटला.
दादाचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यानी प्रेमानी हसून तिला जवळ येण्याची खूण केली.
ती त्याच्याजवळ जावून बसली.
वहिनीनी जांभळी पैठणी नेसली हॊती. मुळात गोऱ्यापान देखण्या वहिनीला तो रंग खुलून दिसतं होता.

अंगावर घातलेले दागिने तिच्या वैभवाची साक्ष देतं होते.
कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय हा, जिजानी कानावर बोट मोडली.
वहिनीनी तिला पाहून न पाहिल्यासारखं केलं.
जिजाला ते जाणवलं.
तिनी आजूबाजूला पाहिलं. वहिनीच्या माहेरचे त्याच तोलामोलात आले होते.
तिनं आपल्या साडीचा दुमडलेला काठ सरळ केला. आणि कानकोंड होतं ती बसून राहिली.
राणू चंदनला शोधत घरभर फिरत हॊती. फिरतांना प्रत्येक खोलीची भव्यता, तिथलं उंची फर्निचर सगळं त्या बालमनाला अचंबित करत होतं.
एवढं मोठं घरं.. ह्यात फक्त चौघेच राहणार.
आजी, मामा, मामी, चंदन.
मनाशीच विचार करत ती बाहेर आली.
चंदन अंगणात मित्रांशी बोलत बसला होता.
"आली का चिमणी.."
"ए, मला चिमणी म्हणू नकोस. मी मोठी झाली आहे आता.."
"असं का !" तो वेडावंतच म्हणाला.
"तुझी सायकल कुठे रे.. मी बसू का?"
"नकॊ.. मला नाही आवडत माझी वस्तू कुणी वापरलेली.तु तुझ्या बाबाला सांग आणून द्यायला."
ती नाराज होऊन तिथं बसून राहिली.
जिजा तिला शोधत तिकडे आली.
"आई, बघ ना हा मला सायकल देतं नाही."
"असू दे, आत चल. आजी बोलवतेय."
पूजा झाली. तशी वहिनी जवळ आली.
"जिजा.."
तिनं चमकून पाहिलं. आज वन्स वरून एकदम जिजा..
तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत ती म्हणाली,
"अगं, जरा बरी साडी नेसून यायची.दागिने तर नसतीलच म्हणा तुझ्याकडे.सगळे प्रतिष्टीत लोकं आलेत. तुझ्या दादाचं नाव आहे गावात.
मी देते ती साडी नेसून ये."
"वहिनी, मी आहे तशीच छान आहे आणि दागिने म्हणशील तर हाच माझा खरा दागिना आहे."
राणूला पुढे करत जिजा बाणेदारपणानी म्हणाली.
"काही नाही तरी माज पहा हिचा.." पुटपुटतच वहिनी निघून गेली.
जिजाच्या डोळ्यात पाणी आलं
राणू सगळं ऐकत हॊती. पाहात हॊती.
आजूबाजूच्या बायका आणि आपली आई ह्यातला फरक तिला जाणवत होता.
जिजा.. दुरूनच पाहात असलेली आई जवळ आली.
"लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. हॆ घाल."
आपल्या गळ्यातली मोहनमाळ तिनं जिजाला दिली.
"आई.. काय हे. मी जावू का ? मी जशी आहे तशी छान आहे."
ती कोपऱ्यात एका खुर्चीत बसून राहिली. राणू इकडे तिकडे खेळत हॊती.

तिनं दिलेला आहेर वहिनीनी कोपऱ्यात सरकवून दिलेला दादानी पाहिला. सगळं कसं छान थाटामाटात पार पडलं.
"आई, देवाला जावून येतों ग.." दादा म्हणाला.
"राणू येणार का?"
जोरात मान फिरवत राणू म्हणाली, "हो तर.."
"चला मग बसा गाडीत."
"नकॊ रे दादा.. येतें आता मी."
"थांब ग जाशील ना. किती दिवसांनी आलीस. निवांत गप्पा मारू आल्यावर. जावू नकोस."
वहिनी गाडीत बसताना तिला राणू आत दिसली.
"उतर ग. जागा नाही आहे. गर्दीत बसलं तर कपड्यांची इस्त्री खराब होईल."
राणू नाईलाजाने खाली उतरली. तमाशा नकॊ म्हणून दादाही काही बोलला नाही.
गाडी गेली. जिजाचे डोळे भरून आले.
'अजून किती अपमान सहन करायचा!'
"आई, चंदन गेला. मला नाही नेलं."
"बस.. चल आता." तिला हाताला धरून जिजा म्हणाली.
"अगं, न जेवता जावू नकोस.." आई म्हणाली.
"पोट भरलं ग माझं.. येतें."
ती ताडतडीने तिथून निघाली.
"चल राणू.."
आता मात्र राणू गुपचूप निघाली.
जिजा जड पाऊलानी वाट तुडवत हॊती. मायेचे पाश तुटले होते.
डोळे वहात होते.
"आई.. ए आई.. ती चंदनची सायकल ना मला मुळीच आवडली नाही. मला नकॊ तसली.
आई.. त्याच दप्तर ना.. त्यापेक्षा माझाच छान आहे. फक्त तुटलेला बंद जोडला की झालं.
आई.. रडू नकॊ ग. मला काही नकॊ.
रडवेल्या आवाजात राणू म्हणाली.
आई, ग. ए आई.
आपल्याला मामाच काही नकॊ. आपण तिकडे नकॊ जावू या परत..
आई.."
"माझं गुणाचं बाळं.. नाही हं रडत मी."
"आई, मी खूप मोठी होईन. मग आपण मामापेक्षा मोठं घरं घेवू हं.
कशी हसलीस !
माझी आई ती.. माझी आई."
तिनं जिजाचा हात घट्ट धरला. त्या घट्ट हातांनी जिजाला बळ आलं.
आता ती तिचा हात धरून भरभर वाट चालू लागली. तिचे अश्रू आता सुकले होते. आणि तिला आशा हॊती की ही चिमण पावलं योग्य मार्गानी चालली तर यशाचं शिखर दुर नाही.
काळ पुढे सरकत होता. राणू चिकाटीनं शिकत हॊती. फायनान्स मधली मास्टर डिग्री घेवून ती एका नामांकित उद्योगसमूहात मोठ्या हुद्द्यावर काम करत हॊती.

वैभव आज तिच्या दारात हात जोडून उभं होतं. जिजा, आणि शिरीष कौतुकानी लेकीची प्रगती बघत होते.
बंगला, गाडी आज जिजाला काही कमी नव्हतं.
फक्त उणीव हॊती ती मायेच्या पाशाची.
राणूला साजेश्या मुलाशी तीचं लग्न ठरलं होतं.
लग्नाची गडबड सुरु हॊती.
आणि एक दिवस अचानक दादा, वहिनी घरी आले.
"जिजा.. माहेरचं केळवण करायचंय. केव्हा येता?"
"दादा.. किती वर्षांनी आलास रे..एकाच गावात राहतो ना आपण!"
"वन्स.. माझं चुकलं. मी असं नकॊ वागायला पाहिजे होतं."
"वहिनी.. लक्ष्मी चंचल असते. मला आज शुक्रवारची कहाणी आठवतेय."
"नकॊ ना वन्स, काही मनात आणू. झालं गेलं विसरून जा."
"दादा.." जिजा दादाच्या गळ्यात पडली.
राणू हॆ सारं पाहात हॊती. मायेचे पाश परत जुळले होते.

दूरवर गेलेल्या त्या गाडीकडे राणू हताश होऊन पाहात हॊती.. तिच्या बालमनावर तेव्हा पडलेले ओरखडे अजूनही तसेच ठसठसत होते.. अश्वथाम्याच्या भळभळणाऱ्या जखमेसारखे...
समाप्त
समाप्त
©® मृणाल शामराज.
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

ही कथाही अवश्य वाचा